If I Win a Lottery Essay in Marathi मला लॉटरी लागली तर निबंध आज आपण या लेखामध्ये मला लॉटरी लागली तर या विषयावर निबंध लिहिणार आहोत. ज्यावेळी मी शाळेमध्ये होतो त्यावेळी मला लॉटरी हि संकल्पना माहित होती आणि जर आपल्याला लॉटरी लागली तर आपण श्रीमंत होते तसेच आपल्याकडे खूप सारे पैसे येतात असे मी माझ्या आजू बाजूच्या असणाऱ्या मोठ्या लोकांच्याकडून ऐकले होते. मला लहानपणी पासूनच असे वाटायचे कि आपण श्रीमंत घरामध्ये जन्माला आलो असतो तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असत्या तसेच आपल्याला जे हवे आहे ते आपण घेवू शकलो असतो तसेच मी राज्यासारखे जीवन जगलो असतो तसेच गरीब लोकांना मदत केली असती.
त्याचबरोबर गरजू लोकांच्या गरजा भागवल्या असत्या आणि अश्या ओरकारे वेगवेगळे सामाजिक कार्य मी करू शकलो असतो परंतु असे काही नव्हते ती माझी एक कल्पना होती कारण माझा जन्म हा मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये झाला होता पण आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो. पण मला नेहमी वाटायचे कि मला गरजू लोकांना मदत करावी.
तसेच आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात आणि असे विचार आल्यानंतर एके दिवशी माझ्या मनामध्ये लॉटरी चा विषय आला आणि मला वाटले कि जर मी लॉटरी जिंकलो तर मला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी पूर्ण करू शकतो. पुर्वीच्या काळी लॉटरी चे नंबर हे आठवड्यातून किंवा मग महिन्यातून लागायची पण आता या लॉटरीचे नंबर रोज लागतात आणि म्हणून मला असे वाटले कि मी जर लॉटरी जिंकलो तर काय काय करू शकतो.
मला लॉटरी लागली तर निबंध – If I Win a Lottery Essay in Marathi
If I Win a Lottery Essay in Marathi Language
जर मला लॉटरी लागली तर मी माझ्या घराचा भार माझ्यावर घेईन म्हणजे माझ्या आई आणि वडिलांच्या वरील कामाचा भारकमी करण्याचा प्रयत्न करीन तसेच तसेच माझ्या आईच्या आणि वडिलांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत करीन. त्याचबरोबर मला जर लॉटरी लागली तर त्या लॉटरीतून मिळालेल्या पैश्यातून मी माझे शिक्षण पूर्ण करू शकतो कारण शिक्षण हि आयुष्यासाठी एक चांगली शिदोरी आहे.
मी शाळेमध्ये ६ वी – ७ वी ला असल्यापासूनच माझी इच्छा आहे कि मला उच्च शिक्षण घ्यायचे आहे आणि मला माझ्या उच्च शिक्षणासाठी प्रदेशमध्ये जायचे आहे आणि प्रदेशात जाण्यासाठी आपल्याकडे पैसे हवे असतात आणि जर मला लॉटरी लागली तर मी माझे प्रदेशमध्ये जाऊन शिकण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो.
आयुष्यामध्ये आपली अनेक वेगवेगळी स्वप्ने असतात जी आर्थिक अडचणींच्यामुळे बहुतेकदा तटतात आणि माझे देखील असेच काही असेच झाले होते पण जर मला लॉटरी लागली तर मी माझी अनेक स्वप्ने पूर्ण करू शकतो जसे कि मी वर सांगितले आहे. जर मला लॉटरी लागली तर मी मला हव्या त्या गोष्टी खरेदी करू शकतो तसेच मला हवे ते खावू शकतो तसेच मला महागडे मोबईल, लॅपटॉप आणि महागडी घड्याळ घेवू शकतो अश्या परके मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो.
त्याचबरोबर मला प्रवास करायला तसेच वेगवेगळ्या ठिकाणी जायला तसेच पर्यटन स्थळे म्हणजे ऐतिहासिक इमारतील, ऐतिहासिक किल्ले, समुद्र किनारे, नैसर्गिक धबधबे, नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे या सारखी ठिकाणे पाहण्यासाठी आणि तेथील सौदर्याचा आनंद घेण्यासाठी खूप आवडते आणि हे आपल्याजवळ पैसे असल्यास शक्य होते त्यामुळे मला जर लॉटरी लागली तर हि इच्छा देखील पूर्ण करू शकतो. जर मला जर लॉटरी लागली तर मी माझ्या घरातील सर्व लोकांच्या इच्छा पूर्ण करू शकतो आणि माझ्या घरातील लोकांना जे हवे आहे ते सर्व आणून देवू शकतो.
त्याचबरोबर माझ्या आजीला डोळ्यांचा खूप त्रास होतो आणि तिला जर चांगल्या डॉक्टरला दाखवायचे असेल तर बाबांच्या कडे जास्त पैसा पाहिजे पण बाबांना आमच्या शिक्षणासाठी तसेच इतर घरातील खर्चामुळे चांगल्या डॉक्टर कडे दाखवणे आणि योग्य प्रकारे आजीला डोळ्याची ट्रीटमेंट देणे शक्य झाले नाही परंतु जर मला लॉटरी लागली तर हे मी करू शकतो. तसेच मला सतत वाटत राहते कि मी मोठा खूप पैसे मिळवून गरोबा आणि गरजू लोकांना मदत करू शकतो कारण मला गरीब लोकांना, तसेच ज्यांना खायला अन्न मिळत नाही.
अश्या लोकांना तसेच गरजू लोकांना मदत करायला खूप आवडते आणि मी आज देखील काही छोटी मोठी मदल अश्या लोकांना करतो जर मला लॉटरी लागली तर मी माझ्या भागामध्ये राहणाऱ्या गरजू किंवा गरोब लोकांची मदत करू शकतो आणि माझे हे स्वप्न देखील पूर्ण करू शकतो. अश्या प्रकारे जर लॉटरी लागल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खरेदी करतात जसे कि मोबईल, गाड्या, लॅपटॉप, टॅब, फ्रीज यासारख्या अनेक वस्तू खरेदी करतात आणि अश्या प्रकारे वेगवेगळ्या इच्छा ते लॉटरी लागल्यावर पूर्ण करू शकतात.
जरी लॉटरी लागणे हि एक आनंदाची गोष्ट असली तरी आणि जर आपल्याला लॉटरी लागल्यानंतर आपल्या सर्व इच्छा आणि स्वप्न जरी पूर्ण होत असली तरी लॉटरी म्हणजे आपल्या आयुष्यभराची कमाई नाही किंवा आपण एका लॉटरी पासून आपली सर्व स्वप्ने पूर्ण करू शकत नाही तसेच आपल्याला प्रत्येक वेळी लॉटरी लागेल असे नाही.
तसेच आपल्याला वाटते कि लॉटरी जिंकणे म्हणजे नशिबाच खेळ आहे तसेच जर आपण लॉटरी काढू तर आपल्याकडे खूप पैसे येतील आणि आपण लॉटरी लागल्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकू आणि म्हणून असे समजून अनेक लोक लॉटरी काढण्यासाठी पैसे खर्च करून लॉटरी काढतात परंतु लॉटरी हि एकाच व्यक्तीला लागते आणि लॉटरीतून जे पैसे मिळतात ते काही आयुष्यासाठी उपयोगाला येत नाहीत आणि लॉटरी हा एक जुगार आणि याचा उपयोग कधीच आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी होऊ शकत नाही.
आपल्याला जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असल्यास आपल्या कठोर परिश्रम करावे लागतील आणि पैसे मिळवून मग आपण आपली सर्व स्वप्ने पूर्ण करू शकतो आणि म्हणूनच मी माझ्या मनाला समजावले कि मला लोतारीची काय गरज मी कठोर परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्न करून देखील माझी स्वप्न पूर्ण करू शकतो.
आम्ही दिलेल्या if i win lottery essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मला लॉटरी लागली तर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या if i win lottery essay in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट