झाडे बोलू लागली तर निबंध If Trees Could Speak Essay in Marathi

If Trees Could Speak Essay in Marathi Langauge झाडे बोलू लागली तर निबंध आज आपण या लेखामध्ये झाडे बोलू लागली तर Zade Bolu Lagli Tar Essay in Marathi या विषयावर निबंध लिहिणार आहोत. झाडे जर बोलू शकत असली असती तर त्यांनी त्यांच्या सर्व समस्या मानवाला सांगितल्या असत्या तसेच सध्या मनुष्य औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड होत आहे परंतु जर झाडे जर बोलत असती तर त्यांनी त्यांचे महत्व सांगितले असते तसेच त्यांच्या भावना देखील मनुष्याजवळ व्यक्त केल्या असत्या. चला तर मग पाहूया झाड बोलू शकत असले असते तर काय म्हटले असते.

झाड हे माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे कारण झाड आपल्याला ऑक्सिजन देते आणि गाड्यांच्या मधून येणारा कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेते त्यामुळे वातावरण शुद्ध राहते. त्याचबरोबर झाड आपल्याला फळे फुले तसेच सावली देते. झाडांपासून मिळणाऱ्या लाकडांचा उपयोग इमारती बांधण्यासाठी होतो तसेच झाडाच्या लाकडांचा उपयोग वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी, कागत तयार करण्यासाठी तसेच काही वनस्पतीचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी हि होतो.

पण आत्ताच्या जगामध्ये जास्त प्रमाणात झाडे तोडली जात आहेत आणि जंगलांचे हि प्रमाण कमी होत चालले आहे. पण आपल्याला जर शुद्ध वातावण हवे असेल तर झाडे लावणे गरजेचे आहे कारण ते दुषित वायू शोषून घेवून त्याचे रुपांतर ऑक्सिजन मध्ये करतात आणि आपल्याला शुद्ध हवा देतात म्हणूनच आपल्या आजूबाजूला झाडांची हिरवळ असणे आवश्यक आहे.

if trees coULd speak essay in marathi langauge
If Trees Could Speak Essay in Marathi langauge

झाडे बोलू लागली तर निबंध – If Trees Could Speak Essay in Marathi Langauge

Zade Bolu Lagli Tar Essay in Marathi

आपल्या सर्वांनाच माहित आहे कि झाड हा प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक आहे आणि जर झाड बोलू शकले असते तर हे सर्व झाडानेच सांगितले असते तसेच काही लोक काम करून थकून झाडा खाली बसतात त्यावेळी त्यांना एकटे वाटले नसते कारण त्यांच्या सोबत झाड बोलले असते आणि झाड म्हंटले असते कि ये मनुष्या उन्हामध्ये काम करून तू थकला असशील माझ्या सावलीला बसायला ये आणि माझ्याशी बोल म्हटले असते.

त्याचबरोबर एक महत्वाच भाग म्हणजे झाडणे सांगितले असते कि मी तुम्हाला फळे, फुले आणि सावली देतो परंतु माझ्या कसेही घाव घालून मला तोंडू नका आणि माझे जीवन संपवू नका आणि माझ्या सोबत निसर्गाला देखील ऱ्हासाकडे नेऊ नका. अश्या त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना झाडणे सांगितल्या असत्या.

जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत आणि जर झाड बोलू शकत असते तर आपल्या झाडाची ओळख करून घेण्यासाठी कोणाला विचारावे लागले नसते कि हे झाड कशाचे आहे, याला कोणत्या प्रकारची फुले लागतात किंवा फळे लागतात किंवा या झाडाचा उपयोग काय होतो.

Essay on If Trees Could Speak in Marathi

तर झाडानेच आपली स्वताची ओळख करून दिली असती तसेच सांगितले असते कि मी आंब्याचे झाड आहे आणि मी १५ ते १६ मीटर उंच वाढतो मला जमिनीमध्ये घट्ट मुळे असतात आणि तसेच माझे खोड देखील जड असते आणि मला खूप साऱ्या फांद्या असतात आणि त्याला प्रथम गुलाबीसर पाने येतात मग ती मोठी झाल्यानंतर गडद हिरव्या रंगाची होतात आणि लांबट असतात. मला वसत ऋतूमध्ये मोहर येतो आणि मला आंबा हे फळ लागते आणि माझे फळ कच्चे असताना आंबट असते आणि ते पिकले कि गोड होते आणि लोक माझे फळ खूप आवडीने खातात.

अश्या प्रकारे सर्व झाडांनी आपले आपले महत्व काय आहे ते सांगितले असते म्हणजे त्यांनी त्यांचा परिचय करीन दिला असता तसेच झाडांनी आपला वापर कश्यासाठी होते ते देखील सांगितले असते. तसेच त्यांनी आपले पुरवणारे फायदे देखील सांगितले आते जसे कि मी मनुष्यांना सावली देतो, तसेच मनुष्याला जगण्यासाठी जो ऑक्सिजन गरजेचा असतो तो मोठ्या प्रमाणात माझ्या पानांच्या पासून मिळतो त्यामुळे माणसाला आयुष्य जगण्यासाठी माझ्यावर अवलंबून राहावे लागते.

तसेच मी मनुष्याला अन्नाचा पुरवठा करतो तसेच तसेच माझ्यापासून मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारची फळे आणि फुले पुरवतो तसेच मी वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी मोलाची कामगिरी बजावतो कारण झाडे हि वातावरण दुषित करणारा कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेवून त्याचे रुपांतर ऑक्सिजन मध्ये करतो आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेमध्ये सिडतो आणि त्यामुळे हवा स्वच्छ आणि शुध्द राहते. तसेच माझी लाकडे देखील वेगवेगळ्या कारनंच्यासाठी वापरली जातात जसे कि घरे बनवण्यासाठी, फर्निचर बनवण्यासाठी, तसेच काही वस्तू बनवण्यासाठी आणि इतर वापरासाठी देखील माझ्या लाकडाचा उपयोग केला जातो असे सांगितले असते.

त्याचबरोबर जर झाडे बोलू शकली असती तर ज्यावेळी झाडे तोडली जातात त्यावेळी झाडांनी त्यांची भावना लोकांना सांगितली असती कि कोणत्याही धार धार वस्तूने त्यांच्यावर वार केल्यानंतर त्यांना किती दह होती ते सांगितले असते तसेच त्यांनी त्यांच्यावर येणारी सर्व संकटे जसे कि वादळे, पाऊस, कडक उन्ह ते कसे झेलतात किंवा मग ते त्याचा सामना कसे करतात ते देखील सांगितले.

पण सत्याची गोष्ट म्हणजे झाडांना बोलता येत नाही आणि ते आपल्या भावना सांगता येत नाहीत पण त्यांना जर बोलता येत असले असते तर त्यांनी आपल्या भावना सांगितल्या असत्या तसेच त्यांच्या समस्या सांगितल्या असत्य. पण झाडांना बोलता येत नाही आणि ते आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही पण मराठी साहित्यातील कवींनी झाडांच्या भावना सांगणाऱ्या अनेक कविता लिहून ठेवल्या आहेत त्यामुळे आपल्याला झाडाच्या भावना समजू शकतात.

आम्ही दिलेल्या If Trees Could Speak Essay in Marathi langauge माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर झाडे बोलू लागली तर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Essay on if trees could speak in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Zade Bolu Lagli Tar Essay in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये JHADE BOLU LAGLI TAR NIBANDH IN MARATHI Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!