Mango Tree Information in Marathi आंबा झाड संपूर्ण माहिती वर्षातून एकदाच येणारा आंबा हा भारताचे राष्ट्रीय फळ आणि फळांचा राजा म्हणून ओळखला जात असून सुमारे ४००० वर्षापासून आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाधिक लोकप्रिय असणारे आंबा हे विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे. महाराष्ट्रामध्ये आंब्याला कोकणचा राजा असे म्हणतात. आंब्याचा मोसम हा एप्रिल ते जुन महिना असा असतो. सदरच्या लेखात आपण आंबा या झाडाचे थोडक्यात वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आंबा झाडाची माहिती मराठी – Mango Tree Information in Marathi
नाव | आंबा |
वैज्ञानिक नाव | Mangifera indica |
मोसम | एप्रिल ते जून |
आयुष्य | १०० वर्षाहून अधिक |
जाती | भारतात जवळपास १३०० |
उंची | साधारणपणे ३५ ते ४० मीटर |
वर्णन – Mango Tree in Marathi
आंब्याचे झाड हे साधारणपणे ३५-४० मीटर उंच असते. त्याचे खोड साधारणपणे १० मीटर एवढे जाड असून त्याला रुंद गोलाकार गुमटासारखा छत असलेल्या फांद्या असतात. आंब्याच्या झाडाची साल जाड करडी किवा काळपट, खरबरीत, खवलेदार अशी असते. त्याची पाने लांबट साधारण १५-३५ सेंमी तर ६-१६ सेंमी रुंद असतात. पाने कोवळी असताना पानाचा रंग केशरी-गुलाबी असतो.
मोठी झाल्यानंतर ती हिरवी होतात. आंब्याच्या फुलांना मोहोर येतो. आंब्याला बाहेरील भागात गर असून आतमध्ये कडक कवच असते या कवचाला कोय असे म्हणतात. कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात त्याचा रंग हिरवा असतो. पूर्ण परिपक्व फळांचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसतो. आंब्याचे झाड १०० वर्षाहून अधिक काल जगू शकतात.
- नक्की वाचा: नारळाच्या झाडाची माहिती
आंबा कलम कसे करावे ?
आंब्याची कलम हि १५ ते २० वर्षाच्या झाडावर करता येते. आंब्याची रोप लावले असता त्याची फळे हि मातृवृक्षाच्या फळासारखीच निघत नाहीत. म्हणून ज्या झाडाची फळे हवी असतील त्या झाडापासून निरनिराळ्या प्रकारची कलमे करून लावावी लागतात. आंब्याची कलम कोय कलम आणि मृदकाष्ठ कलम या प्रकारे करता येते.
कोय कलम
या पद्धतीने कलम करण्यासाठी मे ते जुलै महिन्याचा कालावधी योग्य असतो, कोय कलम आंब्याच्या अभिवृद्धीसाठी साधी आणि सोपी पद्धत आहे.
- या पद्धतीमध्ये गादी वाफ्यावर कोयी रुजवून १५ ते २० दिवसांचे रोप मुळासकट कोयीसह काढून घ्यावे रोपाचा खालचा ७ ते ९ से.मी. चा भाग ठेवून शेंडा छाटून टोकापासून ४-६ सें. मी. लांबीचा बरोबर मध्यभागी काप द्यावा.
- ज्या जातीची कलम करायची असेल त्याची ३-४ महिन्याच्या वयाची जून,निरोगी आणि डोळे फुगीर, परंतु न फुटलेली १०-१५ सें.मी. लांबीची काडी कापून त्यावरची सर्व पाने कडून टाकावीत. आणि त्याला दोन तिरके काप करून विरुद्ध बाजूला पाचरीसारखा आकार द्यावा लागतो.
- नंतर ती काडी रोपाला दिलेल्या कापात व्यवस्थित बसवावी. कलमाचा जोड २ सें.मी. रुंद व २० सें.मी लांबीच्या पोलिथीनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा.
- नंतर हि कलमे पोलीथीनच्या पिशवीत मध्ये लावावीत. तसेच ती लावताना कलमांचा जोड हा मातीच्या वर राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे. कलम बांधून झाल्यानंतर १५ ते २० दिवसात काडीला नवीन फुट येते.
मृदकाष्ठ कलम
या पद्धतीमध्ये कोय कलम पद्धतीनेच कलम केले जाते. परंतु यामध्ये खुंट म्हणून वापरले जाणारे रोप उंच वाढलेले आणि ३ महिने वयाचे, पहिली फुट जून झालेले असते.
- नक्की वाचा: वडाच्या झाडाची माहिती
आंबा लागवड माहिती
सुमारे ४००० वर्षापासून आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. आंबा हा प्रामुख्याने उष्ण प्रदेशात आढळतो. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासून १२.१२ लाख मे.टन उत्पादन मिळते. समुद्रसपाटीपासून १५०० मी. पेक्षा जास्त उंचीवरील कडक थंडी असलेल्या जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तरप्रदेश या राज्यातील टेकड्यांचे प्रदेश सोडून सर्व भारतात आंब्याची लागवड केली जाते.
जमीन-
- आंबा लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रतीची दीड ते दोन मीटर खोलाची आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी लागते. पारंपारिक पद्धतीमध्ये आंब्याची अभिवृद्धी कोयांपासून केली जाते.
- आंब्याची कलमे ९-१० मी. अंतरावर आणि रायवळ रोपे १२-१८ मी. हमचौरस अंतरावर लावतात. उन्हाळ्यामध्ये खड्डे खणून तापू द्यावेत. आणि पाऊस सुरु होण्यापूर्वी खड्याच्या तळाशी शेणखत, राख घालून जमिनीच्या सपाटीच्या १०-१५ सें.मी. येईल इतका खड्डा भरून घ्यावा. या खड्यात ऑगस्टअखेर कलम लावतात.
- एक वर्ष वयाच्या झाडास १५ किलो कंपोस्ट खत, १५० gm नत्र, ५० gm स्फुरद, १०० gm पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस चर खोडून द्यावेत. दरवर्षी हि मात्रा वाढवावी.
रोग-
- भुरी हा रोग पडल्यामुळे मोहर व कच्च्या फळांची गळ होते. त्याच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने, मोहर नष्ट करावेत ०.२% गंधकाची फवारणी करावी.
- डायबॅंक यामुळे रोगग्रस्त फांद्या शेंड्यापासून वाळायला लागतात. त्याच्या नियंत्रणासाठी निरोगी कलमांची निवड करावी. रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी.
- नक्की वाचा: कडुलिंब झाडाची माहिती
आंबा झाडाचे – fact
- आंबा भारताचे राष्ट्रीय फळ आहे ज्याला इंग्रजी मध्ये मँगो असे म्हटले जाते .
- आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात.
- आंबा हा वर्षातून एकदाच ग्रीष्म ऋतू मध्ये येतो.
- आंब्याला हिरवा पिवळा, केशरी या असे रंग असतात.
- अ,क,ड जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आढळतात.
- जगातील ५६% आंबा उत्पादन एकट्या भारतात होते.
आंबा झाडाचे पान
- हिंदू धर्मात आंब्याच्या पानाचा धार्मिक कार्यात खूप महत्व आहे. मग त्यात कोणताही शुभप्रसंग असो मंगल कार्य, सन या शुभ दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात.
- त्याचबरोबर परंपरेने कलशपूजन हे आपल्या भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतिक आहे. कलशामध्ये नेहमी आंब्याची झाडाची पाने ठेवतात.
- धार्मिक मान्यतेनुसार आंबा हे हनुमान यांचे आवडते फळ आहे. त्यामुळे आंबा आणि आंब्याची पाने जिथे असतात तिथे हनुमानाची कृपा असते असे मानले जाते.
- याशिवाय आंब्याची पाने मानवी आरोग्यामध्येही उपयुक्त ठरतात.
आंब्याच्या जाती / आंब्याचे प्रकार
भारतात आंब्याच्या जवळपास १३०० जातींची नोंद आहे. परंतु २५ ते १० जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत.
आंब्याची जात | लागवडीचा प्रदेश |
हापूस | महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू |
पायरी | महाराष्ट्र, कर्नाटक |
कावसजी पटेल | महाराष्ट्र |
जमादार | गुजरात |
लंगडा, दशेरी, सफेदा, फझरी, चौसा, तौमुरीया | उत्तरप्रदेश |
हेमसागर, कृष्णभोग, सिंदुराय, सुकाल | बिहार |
रुमाली, नीलम, बेनिशान, तोतापुरी, मलगोवा,गोवाबंदर | आंध्रप्रदेश |
मडप्पा, पीटर फर्नोदिन | कर्नाटक |
माकुरांद | गोवा |
- नक्की वाचा: झाडांची माहिती
आंबा झाडाचे उपयोग / आंबा खाण्याचे फायदे
- कच्च्या कैरीचे चविष्ट लोणचे करतात.
- पिकलेल्या आंब्याचा आमरस करतात.
- राजापुरी कैऱ्यापासून मुरांबा, साखरांबा बनतो.
- कैऱ्या किसून, वाळवून आमचूर करतात. हा मसाल्यासारखा वर्षभर वापरतात.
- आंब्यामध्ये अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्व जंतुनाशक तर क जीवनसत्व त्वचारोग हारक आहे.
- आंब्याची कोवळी पाने चावून त्याचा रस प्यायल्याने आवाज सुधारतो, खोकला कमी होतो.
- आंब्याच्या पानांचा चीक हा टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे.
- आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा असून अतिसार, रक्तदोष आणि कफ पित्त दूर करणारा आहे.
- उन्हाळ्यामध्ये कच्च्या कैरीचे पन्हे प्यायल्याने उन्हाळ्याचा त्रास कमी होतो.
- आयुर्वेदात साल, पाने, फुले आणि फळांचा वापर पोट आणि त्वचेच्या अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
आंबा खाण्याचे तोटे / नुकसान
- आंब्या मध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते त्यामुळे आंब्याचे जास्त सेवन केल्यास वजन वाढते.
- आंबा हा उष्ण असल्यामुळे त्याचे अतिसेवन त्रासदायक ठरते. तसेच कैरीचे अतिसेवन पोटाचे विकार वाढवते.
केसर आंबा झाड माहिती – Kesar Mango Tree Information in Marathi
कोकणचा हापूस आंबा जसा प्रसिद्ध आहे तसाच महाराष्ट्रातील केशर आंब्याची गोडी अनेकांना तृप्त करते. केसर आंबा हा लांबट असून जाडीला पण असतो. माळरान भागामध्ये या आंब्याची लागवड केली जाते. हा आंबा चवीला गोड असतो आणि याची टिकून राहण्याची क्षमता जास्त असते. याचे वजन २०० ते ३०० ग्रॅम पर्यंत असते. गुजरात राज्यातील केसर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
आम्ही दिलेल्या mango tree information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर आंब्याच्या झाडाची अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about mango tree in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mango tree information in marathi pdf Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर 10 lines on mango tree in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
मी आत्ता नवीन चार एकर शेती घेतली आहे. त्यापैकी अडीच एकर मध्ये केशर आंबा लावायचा आहे. जमीन काळी आहे. कृपया मार्गदर्शन करावे