भारतीय नृत्य प्रकार मराठी माहिती Indian Dance Information in Marathi

indian dance information in marathi भारतीय नृत्य प्रकार मराठी माहिती, भारतीय नृत्य संस्कृती बद्दल पाहायचे म्हटले तर भारतीय नृत्य प्रकारांचे वर्गीकरण प्रामुख्याने दोन प्रकारात केले जाते ते म्हणजे लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य. भरतनाट्यम, कथ्थक, कथकली, कुचिपुडी, मणिपुरी हे काही जगप्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहेत. भारतामध्ये अशी अनेक प्रकारची नृत्ये आहेत जी भारतातील वेगवेगळ्या राज्यामधून येतात जसे कि कर्नाटक मध्ये गुल्लू कुनिथा आणि यक्षगान हे लोकनृत्य आहे तर महाराष्ट्र मध्ये लावणी हा नृत्यप्रकार खूप लोकप्रिय आहे.

आणि कथक, भरतनाट्यम, कुचीपुडी, मणिपुरी आणि कथकली हे ओडिसी नृत्य प्रकार आहे आणि असे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य प्रकार आहेत आणि आज आपण या लेखामध्ये वेगवेगळ्या राज्यामधील आणि भारतामधील काही नृत्य प्रकार पाहणार आहोत.

indian dance information in marathi
indian dance information in marathi

भारतीय नृत्य प्रकार मराठी माहिती – Indian Dance Information in Marathi

लोकप्रिय नृत्य प्रकार – indian dance types in marathi

भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये असे वेगवेगळे नृत्य प्रकार आहेत आणि खाली आपण त्यामधील काही लोकप्रिय नृत्य प्रकार पाहणार आहोत.

भरतनाट्यम

भरतनाट्यम हा प्रकार लोकप्रिय नृत्य प्रकार आहे आणि हा प्रकार जरी तामिळनाडू राज्यातील असला तरी हा नृत्यप्रकार संपूर्ण राज्यामध्ये लोकप्रिय आहे. भरतनाट्यम हा कर्नाटकी संगीताच्या सुरावर सादर केला जाणारा एक दक्षिणेतील तामिळनाडू राज्यातील एक नृत्य प्रकार आहे.

या नृत्य प्रकाराविषयी असे म्हटले जाते कि या नृत्य प्रकारची निर्मिती हि १००० बीसी मध्ये झाली होती आणि तमिळनाडूच्या प्राचीन मंदिरामधून शास्त्रीय काळातील स्त्रियांनी हा नृत्य प्रकार सादर केला होता. हा नृत्य प्रकार शारीरिक सुंदर हालचालीसाठी आणि हावबावासाठी ओळखला जातो.

जरी हा प्राचीन नृत्य प्रकार असला तरी भारतामध्ये या नृत्य प्रकारचे महत्व आहे आणि हा प्रकार आजही भारतामध्ये सर्वात आदरणीय कला प्रकार म्हणून ओळखला जातो.

मणिपुरी

मणिपुरी हा देखील एक न्रीत्या प्रकार आहे जो ईशान्य भारतातील मणिपूर या ठिकाणावरील आहे आणि हा प्रकार देखील एक प्रसिध्द नृत्य प्रकार आहे. मणिपुरी हा नृत्य प्रकार कृष्ण आणि राधा यांच्यामधील प्रणय संबध सांगण्यासाठी सादर केला जातो आणि या नृत्य प्रकाराला रासलीला या नावाने देखील ओळखले जाते.

हा नृत्य कला प्रकार पारंपारिक मणिपूर पोशाख आणि मेकअपसह दोन देवतांच्या कथा सांगण्यासाठी एका संघामध्ये सादर केला जातो.

लावणी

लावणी हा एक महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सादर केला जाणारा एक नृत्य प्रकार आहे आणि हा नृत्य प्रकार मराठा साम्राज्याच्या राज्यातून उदयास आलेला एक नृत्य प्रकार आहे. हा एक स्त्री केंद्रित नृत्य प्रकार असून देवतांच्या कथांचे मिश्रण आहे.

१८ व्या शतकामध्ये युद्धांच्या दरम्यान हा नृत्य प्रकार मनोबल वाढवणारा एक नृत्य प्रकार होता. लावणीचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे तात्त्विक निर्गुण लावणी आणि कामुक शृंगार लावणी.

यामध्ये नर्तिका नऊवारी साडी नेसते तसेच सोन्याचे दागिने घालते आणि पायामध्ये घुंगरू बांधते आणि हा नृत्य प्रकार ढोलकीच्या तालावर सादर केला जातो आणि हे कथा आणि वेगवेगळ्या विषयावर आधारित असते.

कुचीपुडी

कुचीपुडी हा देखील एक नृत्य प्रकार आहे जो आंध्र प्रदेश राज्यातून आला आहे आणि हा भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारातील सर्वात कठीण नृत्य प्रकार आहे परंतु हा नृत्य प्रकार देखील भारतामधील लोकप्रिय नृत्य प्रकारापैकी आहे. कुचीपुडी हा एक साधा नृत्य प्रकार नाही तर हि एक धार्मिक प्रक्रिया आहे.

जी देवाला समर्पित आहे आणि या प्रक्रियेमध्ये पाणी शिंपडणे, अगरबत्ती जाळणे आणि देवाला प्रार्थना करणे या सारखे विधी समाविष्ट आहेत. हा नृत्य प्रकार करताना एकतर ननृत्य प्रकारापेक्षा अधिक कौशल्ये त्या व्यक्तीकडे असणे आवश्यक असते.

या नृत्य प्रकाराविषयी असे सांगितले जाते कि पूर्वीच्या काळामध्ये हा नृत्य प्रकार केवळ मंदिरामध्ये पुरुष नर्तक सादर करत होते आणि विशेषता ब्राह्मण पुरुष सादर करत होते परंतु काळ जस जसा पुढे सरकत गेला तस तसे हा नृत्य प्रकार महिलांच्यामध्ये देखील लोकप्रिय झाला.

कथक

कथक हा नृत्य प्रकार अनेक लोकांना परिचित आहे आणि हा नृत्य प्रकार उत्तर भारतामध्ये असणाऱ्या उत्तर प्रदेश या राज्यामधील आहे आणि जरी हे उत्तर भारतातील प्रसिध्द नृत्य असले तरी भारतामधील लोकप्रिय नृत्य प्रकारापैकी एक आहे.

कथक हे नृत्यांगना वापरत असलेल्या शरीराच्या हालचालीद्वारे कथाकथनांच्या स्वरूपामध्ये सादर केले जाते. कथक या नृत्य प्रकाराला प्रेमाचे नृत्य म्हणून देखील ओळखले जाते आणि हे स्त्री आणि पुरुष एकत्र सादर करू शकतात. बनारस, लखनौव आणि जयपूरचा समावेश असलेल्या राज्यातील ठिकाणी हे नृत्य सादर केले जाते.

कथकली

कथकली हे नृत्य देखील एक लोकप्रिय नृत्य प्रकारांपैकी असणारे एक भारतीय नृत्य आहे आणि हा नृत्य प्रकार दक्षिण भारतातील केरळ राज्यातील नृत्य प्रकार आहे आणि हा एक पारंपारिक नृत्य प्रकार आहे.

कथकली हा नृत्य प्रकार भारतातील सर्वात प्रसिध्द आणि धार्मिक ननृत्य प्रकारांपैकी एक आहे आणि हे रामायण आणि शिव यांच्या कथांच्यामध्ये उद्भवत होते. कथकली या प्रकारचे आकर्षण म्हणजे चेहऱ्याच्या हालचाली आणि जड पोशाखांचा समावेश आहे आणि ज्यामध्ये पारंपारिक फेक मास्क आणि बॉडी पेंट्स असतात.

भांगडा

भांगडा हा नृत्यप्रकार कोणाला माहित नाही असे नाही, तर हा नृत्य प्रकार आपल्यापैकी अनेकांना माहित आहे आणि हा नृत्य प्रकार पंजाब राज्यातील एक लोकप्रिय नृत्य प्रकार आहे.

जो भारतामधील नृत्य प्रकारामधील एक प्रसिध्द लोकप्रिय प्रकार आहे. भांगडा हा ढोलच्या नांदत सादर केला जातो आणि हा नृत्य प्रकार एक हृदयस्पर्शी नृत्य प्रकार आहे.

बिहू

बिहू हा देखील भारतातील एक प्रसिध्द नृत्य प्रकारातील आहे आणि हा नृत्य प्रकार असाम राज्यातील आहे आणि हा नृत्य प्रकार बहुतेक तरुण पुरुष आणि स्त्रिया सादर करतात. बिहू हा नृत्य प्रकार आसामचा आनंद आणि वारसा सांगणार एक नृत्य प्रकार आहे आणि हा रंगली बिहुच्या निमित्ताने सादर केला जातो.

बिहू हा नृत्य प्रकार ढोल, गोगोना, टोका, बान्ही आणि झुतुली या सारख्या वाद्यांच्या सुरावर केला जातो. बिहू हा आसामी नृत्य प्रकार फक्त भारतामध्ये लोकप्रिय नाही तर हा जगामध्ये देखील प्रसिध्द आहे आणि हा नृत्यप्रकार २०१२ मध्ये लंडन ऑलम्पिक मध्ये देखील सादर केला होता.

गरबा

गरबा हा देखील भारतातील लोकप्रिय नृत्य प्रकारापैकी एक आहे आणि हा नृत्य प्रकार गुजरात राज्यातील पारंपारिक नृत्य प्रकार आहे आणि जरी हा प्रकार गुजराती असला तरी हा भारतामध्ये लोकप्रिय आहे आणि दसऱ्यामध्ये हा प्रकार भारतामध्ये अनेक ठिकाणी सादर केला जातो.

हे नृत्य गुजरातीमध्ये एका जोडप्यामध्ये सादर केले जाते आणि हे सादर करण्यासाठी छोट्या काठ्या वापरल्या जातात आणि ह्या काठ्यांना दांडिया देखील म्हणतात. गरबा या नृत्य प्रकाराला दांडिया या नावाने देखील ओळखतात.

आम्ही दिलेल्या indian dance information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भारतीय नृत्य प्रकार मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या indian classical dance information in marathi या indian folk dance information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about indian dance in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!