आयपीएस चा फुल फॉर्म IPS Full Form in Marathi

IPS Full Form in Marathi – IPS Meaning in Marathi आयपीएस चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये आयपीएस IPS याचे पूर्ण स्वरूप, आयपीएस IPS कोण असतात आणि त्यांची कामे काय असते तसेच ते बनण्यासाठी कोणती पात्रता लागते हे सर्व आपण आता पाहणार आहोत. भारतामध्ये पोलीस सेवेचा उगम हा भारतामध्ये ज्यावेळी ब्रिटीशांचे राज्य होते म्हणजेच ब्रिटीश राजवटी मध्ये झाला आहे. आयपीएस IPS हे पोलीस सेवेतील एक महत्वाची सेवा आहे. आयपीएस IPS अधिकाऱ्याने कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेऊन नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

ते राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलांना,  सीएपीएफ (CAPF) दलांना, ( बीएसएफ BSF),  एसएसबी ( SSB ),  सीआरपीएफ ( CRPF ), सीआयएसएफ (CISF) आणि ITBP,  राष्ट्रीय सुरक्षा रक्षक इत्यादी दलांचे नेतृत्व पार पडण्याची महत्वपूर्ण कामगिरी ते बजावतात. आयपीएस  IPS उमेदवार हे एएसपी (ASP), एसपी (SP),  डीजीपी (DGP), डीआयजी (DIG), आयजीपी (IGP) आणि डीआयबी (DIB) या सारख्या पदांच्यावर काम करू शकतात.

आयपीएस IPS याला मराठी मध्ये भारतीय पोलीस सेवा असे म्हटले जाते आणि इंग्रजी मध्ये आयपीएस IPS चे पूर्ण स्वरूप हे Indian police service असे आहे.  आयपीएस IPS हि भारत सरकारच्या कार्यकारी शाखेच्या केंद्रीय नागरी सेवा अंतर्गत प्रशासकीय राजनयिक नागरी सेवा आहे आणि आयपीएस IPS अधिकारी होण्यासाठी इच्छुकांना प्रवेश परीक्षा द्यावी लागते जी मुळात IPS परीक्षा किंवा UPSC (Union Public Service Commission) नागरी सेवा परीक्षा म्हणून ओळखली जाते.

ips full form in marathi
ips full form in marathi

आयपीएस चा फुल फॉर्म – IPS Full Form in Marathi

प्रकारभारतीय पोलीस सेवा [ आयपीएस IPS ]
पदे( ASP ), एसपी ( SP ),  डीजीपी ( DGP ), डीआयजी ( DIG ), आयजीपी ( IGP ) आणि डीआयबी ( DIB )
आयपीएस IPS चे पूर्ण स्वरूपIndian police service
वयोमर्यादा२१ ते ४७ वर्ष

आयपीएस IPS अधिकारी कोण आहे – ips officer information in marathi

भारतीय पोलीस सेवा ही एकमेव अखिल भारतीय सेवा आहे ज्यामध्ये अधिकाऱ्यांना विविध विभागांशी संबंधित विविध कर्तव्ये पार पाडावी लागतात. आयपीएस अधिकारी गुन्हेगारी प्रतिबंधापासून आपत्ती व्यवस्थापनापर्यंतच्या सीमेवरील अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात तसेच ते अनेक अडचणींच्या गोष्टींच्या मध्ये आपली महत्वाची कामगिरी पार पडतात.

तुम्हाला समाजात सर्व प्रकारे बदल घडवायचा असेल, तर आयपीएस अधिकारी तुमच्यासाठी करिअरची निवड असू शकते कारण भारतातील आयपीएस अधिकारी प्रत्येक जिल्हा, शहर आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जबाबदार असतात.

आयपीएस चे पूर्ण स्वरूप – ips meaning in marathi

आयपीएस IPS याला मराठी मध्ये भारतीय पोलीस सेवा असे म्हटले जाते आणि इंग्रजी मध्ये आयपीएस IPS चे पूर्ण स्वरूप हे Indian police service असे आहे.

आयपीएस IPS परीक्षेचे टप्पे – steps of IPS exam 

आयपीएस IPS परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत ते आपण खाली पाहूयात.

  • प्राथमिक परीक्षा ( preliminery ).
  • मुख्य परीक्षा ( mains ).
  • मुलाखत ( interview ).

सर्व प्रथम इच्छुक व्यक्तीची उदिष्ट चाचणी घेतली जाते ज्याला आपण preliminery म्हणून ओळखतो आणि इच्छुक व्यक्तीला यामध्ये उतीर्ण व्हावे लागते कारण यामध्ये उतीर्ण झाल्या शिवाय तो व्यक्ती मुख्य परीक्षेसाठी पात्र होत नाही.

मग त्यानंतर त्या व्यक्तीची लेखी परीक्षा घेतली जाते मग तो संबधित व्यक्ती त्या परीक्षेमध्ये उतीर्ण झाला कि तो पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतो.

मग मुख्य परीक्षेमध्ये पात्र झालेला व्यक्तीला मुलाखतीसाठी म्हणजेच त्याचा व्यक्तिमत्व चाचणी घेण्यासाठी बोलवले जाते. मुलाखतीचा उद्देश हा सक्षम आणि निपक्षपाती निरीक्षकांच्या मंडळाद्वारे सार्वजनिक सेवेतील करियरसाठी उमेदवाराच्या वैयक्तिक योग्यतेचे मुल्यांकन केले जाते आणि मग त्या संबधित व्यक्तीची त्या जागेसाठी निवड केली जाते.

आयपीएस IPS होण्यासाठी पात्रता निकष – eiligibility 

आयपीएस IPS अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराला काही खालील पात्रता निकष पूर्ण करावे लागतात किंवा खालील निकषासाठी पात्र व्हावे लागते. चला तर आपण आता आयपीएस IPS होण्यासाठी पात्रता निकष पाहूयात.

  • आयपीएस IPS होण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे.
  • उमेदवार कोणत्याही विद्यापीठातून पदवी पात्र केलेला असावा.
  • सर्वसाधारण उमेदवाराचे वय हे २१ ते ३७ दिले आहे परंतु काही वेळा म्हणजेच एससी आणि एसटी उमेदवाराचे वय देखील २१ ते ३७ दिले आहे तर ओबीसी उमेदवाराचे वय हे २१ ते ३५ इतके दिले आहे आणि काही प्रकरणांमध्ये उमेदवाराची वयोमर्यादा २१ ते ४७.
  • यामध्ये जर शारीरिक क्षमता विचारात घ्यायची म्हटली तर पुरुषाची लांबी हि १६५ सेंटीमीटर असावी आणि महिलांची १५० सेंटीमीटरअसावी आणि पुरुषाची छाती ८४ सेंटीमीटर आणि महिलांची छाती ७९ सेंटीमीटर इतकी असावी.

आयपीएस अधिकाऱ्याकडे कोणकोणती कौशल्ये असावीत

आयपीएस IPS अधिकाऱ्याकडे आयपीएस IPS बनण्यासाठी काही महत्वाची कौशल्ये पाहिजेत ज्यामुळे तो अधिकारी त्याच्या सामोरे येणाऱ्या समस्या अगदी चांगल्या प्रकारे सोडवू शकेल.

  • कोणत्याही आयपीएस IPS अधिकाऱ्याकडे निर्णन घेण्याची क्षमता चांगली असावी म्हणजे त्या अधिकाऱ्याला योग्य आणि चांगले निर्णय घेता यावेत.
  • लोकांशी प्रभावीपणे संवाद साधण्याचे कौशल्य त्या अधिकाऱ्याकडे असणे खूप गरजेचे आहे कारण संवाद साधल्याशिवाय लोकांच्या काय समस्या आहेत ते समजत नाहीत.
  • एक कनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून तुमच्या प्रशिक्षणादरम्यान आणि गस्तीवर असताना, तुम्ही शारीरिक तंदुरुस्तीची मूलभूत पातळी राखणे आवश्यक आहे.
  • समस्यांकडे जाण्याची आणि त्वरित आणि तार्किक पद्धतीने उपाय शोधण्याची क्षमता हे पोलिस अधिकाऱ्यासाठी अत्यंत मौल्यवान कौशल्य आहे.
  • समुदायामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सतत संवाद साधला पाहिजे. त्यांच्या गरजा ऐकल्या पाहिजेत आणि ज्यांच्यासोबत ते दैनंदिन काम करतात त्यांच्याशी संबंध निर्माण करणे आवश्यक आहे.
  • सक्रिय ऐकणे म्हणजे संभाषणातील इतरांच्या गरजा योग्यरित्या समजणे आणि समजून घेणे.

आयपीएस अधिकाऱ्याला दिल्या जाणाऱ्या सुविधा

जो व्यक्ती आयपीएस IPS अधिकारी बनतो त्याला प्रशासना कडून काही सोयी आणि सुविधा मिळतात त्या आता आपण खाली पाहूयात.

  • आयपीएस IPS अधिकाऱ्यांना खूप कमी दरामध्ये मुक्त निवास मिळतो.
  • मोफत वीज मिळते तसेचमोफत फोनच्या सुविधा मिळतात.
  • अजीवन पेन्शन आणि इतर सेवानिवृत्त लाभ मिळतात.
  • सायरन असलेले अधिकृत वाहन मिळते.
  • सुरक्षा रक्षण आणि घरगुती मदत.

आयपीएस अधिकाऱ्याचे कार्ये – roles of IPS officer 

आयपीएस IPS अधिकारी अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपली कार्ये पार पडतो त्यामधील काही कार्ये खाली दिली आहेत.

  • आयपीएस अधिकारी गुन्हेगारी रोखून सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता राखतात.
  • आयपीएस अधिकार्‍याची भूमिका सर्वोच्च क्रमाची अखंडता निर्माण करणे आणि कायदा आणि न्यायाचा व्यापक उदारमतवादी दृष्टीकोन आहे याची खात्री करणे आहे.
  • महत्वाच्या लोकांना आणि महत्वाच्या कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम आयपीएस अधिकार्‍याचे असते.
  • भ्रष्टाचार, चोरी आणि इतर सर्व गुन्ह्यांचा तपास घेवून ते पूर्णत्वाला नेणे किंवा त्याचा सोक्ष मोक्ष लावणे हे आयपीएस अधिकाऱ्याचे काम असते.

आम्ही दिलेल्या ips full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आयपीएस चा फुल फॉर्म माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या IPS Meaning in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि ips information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ips officer information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!