इस्राईल या देशातील शेतीची माहिती Israel Agriculture Information in Marathi

israel agriculture information in marathi इस्राईल या देशातील शेतीची माहिती, आपल्या भारताच्या विकासाचे रहस्य हे आपली भारतीय शेती आहे आणि तसेच इस्त्रायल मध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि आपल्याला असे म्हणावे लागेल कि इस्त्रायलच्या विकासाचे रहस्य हे शेतीच आहे आणि आज आपण या लेखामध्ये इस्रायलच्या शेतीविषयी माहिती पाहणार आहोत. इस्रायल हा एक भारताच्या तुलनेत खूपच छोटा देश आहे म्हणजेच हा देश आकाराने भारतातील मुंबई या शहरा इतका आहे.

आणि या देशाची संख्या ८० लाख इतकी असून या देशामध्ये शेती मोठ्या प्रमाणत केली जाते आणि शेती उत्पादनावर या देशाचा विकास हा शेतीवर आणि शेतीतील उत्पादनांच्यावर अवलंबून आहे आणि शेती उत्पादने इस्रायल मधील स्थानिक बाजारपेठेमध्ये देखील विकली जातात.

आणि हि उत्पादने युरोपमध्ये देखील निर्यात केली जातात. चला तर खाली आपण इस्रायल शेती विषयी आणखीन माहिती घेवूया.

israel agriculture information in marathi
israel agriculture information in marathi

इस्राईल या देशातील शेतीची माहिती – Israel Agriculture Information in Marathi

इस्रायलमधील शेतीचा इतिहास – israel agriculture history in marathi

कास्य युगापासून हे स्पष्ट झाले आहे कि रहिवाश्यांच्या जीवनाचे प्रत्येक पैलू हे निसर्गावर अवलंबून होते आणि हे खरतर १० व्या शतकामध्ये चुनखडीच्या चौकोनी आकाराच्या एका साच्यावर लिहिलेले गेझर कॅलेंडर आहे, जे शेतीच्या कामाचे वार्षिक वेळापत्रक नोंदवते.

तसेच बायबल मध्ये असे संबोधले आहे कि इस्रायलला दुध आणि मधाचा देश म्हटले आहे. प्राचीन इस्रायल मध्ये लोक बार्ली, द्राक्षे, गहू, ऑलिव्ह, अंजीर या सारखी पिके घेत होते. त्यावेळी बार्लीची कापणी हि मे महिन्यामध्ये केली जात होती आणि द्राक्ष्यांचे पिक हे ऑगस्टमध्ये घेतले जात होते.

आणि सध्या इस्रायलची शेती हि जगातील एक विकसित आणि अव्वल दर्जाची शेती म्हणून ओळखली जाते आणि या शेतीमध्ये सफरचंद, द्राक्ष, ऑलिव्ह ग्रोव्ह, बार्ली, कोई शेती, खजूर, गहू, ऑलिव्ह, अंजीर, संत्री, एवोकाडो, अल्पाकास, काळवीट आणि अगदी गोगलगाई या सारखी विकसित शेती केली जाते.

आधुनिक शेती तंत्र – israel agriculture technology in marathi

सध्या आपण आधुनिक शेतीचा विचार केला तर हायड्रोपोनिक, उभ्या आणि रोबोटिक शेतीचा विचार हा मनामध्ये येतो आणि इस्रायल हा यामध्ये जागतिक नेता म्हणू शकतो कारण इस्रायल मध्ये चांगली आणि विकसित शेती करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जातो.

या देशामध्ये वनस्पतीच्या मुलांना वाढ देण्यासाठी तसेच पिकांची थेट वाढ करण्यासाठी हायड्रोपोनिक पद्धतीचा वापर केला जातो.

इस्रायलमधील शेती आणि पिके – agriculture and crop

  • इस्रायल देशामध्ये २०० हून अधिक प्रकारचे मसाले आणि वनस्पती पिकवल्या जातात आणि त्या स्थानिक बाजारपेठेमध्ये आणि दुसऱ्या देशामध्ये देखील निर्यात करतात. या ठिकाणी असणाऱ्या कुटुंबांना हे पिकावाण्याचा ५० हून अधिक वर्षाचा अनुभव आहे.
  • अल्पाका फार्म म्हणून देखील शेती केली जाते आणि या ठिकाणी एक शेतामध्ये दक्षिण अमेरिकन अल्पाका नावाचे प्राणी पाळले जातात आणि हे प्राणी पाळण्याचे मुख्य कारण म्हणजे बकरीला जसे दाट केस असतात आणि त्या केसांच्यापासून घोंगडी आणि इतर वस्तू बनवल्या जातात तसेच या प्राण्याला देखील दाट केस असतात आणि या केसांच्यापासून तेथील लोक कपडे तसेच अनेक वस्तू तयार करतात.
  • इस्रायल देशामध्ये शेळीचे पालन देखील केले जाते आणि शेली पालन हे इस्रायल या देशामध्ये १९७० पासून सुरु झालेले आहे.
  • इस्रायलची शेती हि जगातील एक विकसित आणि अव्वल दर्जाची शेती म्हणून ओळखली जाते आणि या शेतीमध्ये सफरचंद, द्राक्ष, ऑलिव्ह ग्रोव्ह, बार्ली, कोई शेती, खजूर, गहू, ऑलिव्ह, अंजीर संत्री, एवोकाडो, अल्पाकास या प्रकारची शेती केली जाते.
  • या देशामध्ये इलॅटच्या उत्तरेस १४० किलो मीटर अंतरावर एका वाळवंटामध्ये मगरींची शेती देखील केली जाते.

इस्रायल शेतीविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • इस्रायल हा देश शेतीमधून मोठ्या प्रमाणात पिक घेतो किंवा उत्पादन घेतो आणि त्यामधील काही उत्पादन हे स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री करतो तर काही उत्पादन म्हणजेच ७६ टक्के उत्पादन हे युरोपला निर्यात करतो.
  • त्या ठिकाणी पिकवले जाणारे बदाम आणि अंजीर हे हाताने काढले जात नाहीत तर हे विशेष प्रक्रिया वापरली जाते म्हणजेच खोडांच्या कंबाइन शेखने काढणी केली जाते.
  • या ठिकाणी लोक शेतीसाठी उपकरणे खरेदी करत असतील तर त्या ठिकाणी असणारे सरकार हे उपकरणाच्या खरेदी किमतीच्या ४० टक्के पर्यंत अनुदान देते आणि त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा सतत परिचय होतो. सिचन प्रणाली आणि नवीन कापणी उपकरणे या गोष्टींच्यासाठी सरकारी अनुदान मिळते त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना कमी खर्च येतो.
  • इतर देशांपेक्षा इस्रायल या देशामध्ये कीटकांच्या विरूद्ध अधिक सक्रीयपणे काम केले जाते म्हणजेच पिकावर असणाऱ्या हानिकारक कीटक आणि सुक्ष्मजीवांचे निवडक नियंत्रण करणे तसेच फायदेशीर कीटक आणि सूक्ष्मजीवांचे लोकसंख्येवर तर्कशुध्द नियंत्रण एकत्र करते.
  • इस्रायलमधील शेतकरी हे फळे आणि भाज्यांची चव आणि गुणवत्ता वाढवण्यास सक्षम आहेत.
  • या ठिकाणी लावली जाणारी भाज्यांची क्रमवारी हि फोटोग्राफीक उपकरणे आणि संगणकाद्वारे लावली जाते.
  • इस्रायल या देशामध्ये बार्लीची कापणी हि मे महिन्यामध्ये केली जात होती आणि द्राक्ष्यांचे पिक हे ऑगस्टमध्ये घेतले जात होते.
  • काही वेळा द्राक्ष्याचे पिक काढताना जास्त प्रमानात नुकसान होते परंतु इस्रायल या देशामध्ये विशेष कापणी यंत्राचा वापर करू द्राक्ष्याची काढणी केली जाते त्यामुळे द्राक्ष काढणीवेळी होणारे नुकसान हे १० टक्के वरून १.५ टक्के वर आले आहे.

आम्ही दिलेल्या israel agriculture information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर इस्राईल या देशातील शेतीची माहिती, बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या israel agriculture technology in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about israel agriculture in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!