जेम्स वॅट यांचा जीवन परिचय James Watt Biography in Marathi

James Watt Biography in Marathi जेम्स वॅट यांचा जीवन परिचय जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि औद्योगिक क्रांती घडवून आणली. जेम्स वॅट यांत्रिक अभियंता, शोधक आणि रसायन शास्त्रज्ञ होते. थॉमस न्यूकॉम यांनी पहिल्यांदा वाफे वरच्या इंजिन ची ओळख जगाला करून दिली त्यावरती जेम्स यांनी अधिक मेहनत घेऊन त्यास कार्यक्षमता आणि वापराची श्रेणी वाढवली त्यांनी सुरुवातीच्या वाफेवरच्या इंजिन रचनांमध्ये सुधारणा केल्या ज्यामुळे आधुनिक वाफेचे इंजिन तयार झालं आणि जे औद्योगिक क्रांती मागील कारण ठरलं. या लेखामध्ये आपण जेम्स वॅट यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

james watt biography in marathi
james watt biography in marathi

जेम्स वॅट यांचा जीवन परिचय – James Watt Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)जेम्स वॅट
जन्म (Birthday)१९ जानेवारी १७३६
जन्म गाव (Birth Place)ग्रीनाॅक,‌ स्कॉटलांड
ओळख (Identity)यांत्रिक अभियांता, शोधक आणि रसायन शास्त्रज्ञ
मृत्यू (Death)२५ ऑगस्ट १८१९

जन्म व वैयक्तिक आयुष्य

ग्रीनाॅक,‌ स्कॉटलांड येथे १९ जानेवारी १७३६ जेम्स वॅट जन्माला आले. ते त्यांच्या पाच भावंडांपैकी सर्वात मोठे होते. त्यांचे आजोबा एक सुप्रसिद्ध गणित तज्ञ आणि स्कूल मास्टर होते. त्याची आई एक सुशिक्षित व्यक्ती होती व त्यांचे वडील जहाजाचे मालक आणि कंत्राटदार होते. जेम्स वॅट यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच पूर्ण झाल. त्यांच्या आईने त्यांना घरीच शिक्षण दिलं. पुढे ते ग्रीनाॅक ग्रामर स्कूलमध्ये गेले. गणितामध्ये त्यांना रुची निर्माण झाली. त्यांना लहानपणीच दीर्घ आजाराने त्रासले.

जेम्स वॅट यांनी कालांतराने शिक्षण सोडलं आणि वडिलांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करण्यास सुरुवात केली. त्यांना अभियांत्रिकी मॉडेल तयार करण्यामध्ये आवड निर्माण झाली. अगदी सहा वर्षाचे असल्यापासून जेम्स वॅट यांनी आपले कौशल्य दाखवायला सुरुवात केली. काही गणित सोडवत असताना त्यांनी वाफेची तपासणी करण्यासाठी चहाची किटली वापरली होती. जेव्हा जेव्हा त्यांना फावला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा त्यांनी पेन्सिल रेखाटन केले, कोरले आणि पूल बेंचवर लाकडाने धातूचे काम केले, वेगवेगळे मॉडेल बनवले आणि आपल्या वडिलांना नेव्हिगेशन उपकरणे दुरुस्त करण्यात मदत देखील केली.

वडिलांना व्यवसायामध्ये अपयशाचा सामना करावा लागला त्यामुळे जेम्स वॅट यांनी गणिताचे साधन निर्माता म्हणून नोकरी करण्यासाठी ग्लासगो येथे जावे लागले. जवळपास जेम्स वॅट अठरा वर्षाचे होते तेव्हा त्याची आई मरण पावली आणि कालांतराने त्यांच्या वडिलांची तब्येत देखील बिघडू लागली. १७६४ मध्ये जेम्स वाट यांनी त्यांच्या चुलत बहिणीशी लग्न केलं. मार्गरेट मिलर ज्या पेगी म्हणून ओळखल्या जातात. या दोघांना पुढे पाच मुलं झाली परंतु त्यातली दोन मुलं जगू शकली. १७७२ मधील पेगी यांचा बाळंतपणा दरम्यान मृत्यू झाला व पुढे जेम्स यांनी दुसरं लग्न १७७७ मध्ये अॕन मेकग्रेगर यांच्याशी केलं या दोघांना दोन मुलं झाली.

कारकीर्द

कारकिर्दीस सुरवात पुढे जेम्स वॅट लंडनला गेले लंडनमध्ये असताना त्यांनी वाद्य निर्माता म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांना लहानपणापासूनच आजाराने ग्रासले होते याच गोष्टीमुळे त्यांचं पूर्ण प्रशिक्षण झालं नाही पुढे १७५६ पर्यंत त्यांच्या पोटापाण्याची सोय होईल इतकं शिक्षण त्यांनी घेतलं होतं. १७५७ मध्ये जेम्स वॅट स्कॉटलंड ला पुन्हा परतले. ग्लासगो हे प्रमुख व्यवसायिक शहर जिथे जेम्स वाट स्थायिक झाले आणि त्यांनी ग्लासगो विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एक दुकान टाकलं या दुकानांमध्ये ते सेक्स्टंट, कंपास, बॅरोमीटर आणि प्रयोगशाळा स्केल इत्यादींसारखे गणिते साधने बनवण्यास सुरुवात केली व ती दुरुस्त करण्याचे काम केले.

या दरम्यान त्यांचा परिचय प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ आणि ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ ब्लॅक‌ यांच्याशी झाला. या दोन महान व्यक्तिमत्वांशी केलेली मैत्री पुढे जाऊन जेम्स वॅट यांच्या पुढील आयुष्यामध्ये प्रभावशाली व सहाय्यक ठरली. १७५९ मध्ये जेम्स वॅट यांनी स्कॉटिश व्यापारी आणि आर्किटेक्ट जॉन क्रेग यांच्याशी भागीदारी केली ही भागीदारी संगीतमय खेळणी बनवण्यासाठी व विकण्यासाठी केली गेली होती. एकावेळी सोळा कामगारांना रोजगार देण्याचे काम त्यांनी केलं ही भागीदारी १७६५ पर्यंत टिकली.

ग्लासगो विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याने जेम्स वॅट यांना न्यूकॉमन मॉडल दाखवलं आणि सुचवले की हे गाड्यांचे चालवण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. १७०३ मध्ये‌ इंग्लिश संशोधक थॉमस न्यूकॉमन यांनी बनवलेलं हे इंजिन सिलेंडर मध्ये वाफ तयार करून कार्य करते ज्यामुळे एक व्याक्युम तयार होतो जो वातावरणाचा दाब वाढवून सिलेंडर मधील पिस्टन वर दबाव देण्याचे कार्य करतो. हे इंजिन अठराव्या शतकामध्ये संपूर्ण ब्रिटन आणि युरोपमध्ये वापरलं गेलं जात होतं या इंजिनचा वापर खाणीतून पाणी काढण्यासाठी केला जायचा.

या इंजिनमधून काहीतरी वेगळ तयार करण्याचा प्रयत्न जेम्स यांनी केला. त्यांनी टीन स्टीम सिलेंडर आणि गिअरच्या द्वारे ड्रायव्हिंग व्हीलला जोडलेले पिस्टन वापरून लघू मॉडेल तयार केलं. थॉमस न्यूकॉम यांचं हे इंजिनचे मॉडेल दुरुस्त करण्यास जेम्स वॅट यांना सांगण्यात आले. ते इंजिन चालू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु वाफेच्या अपव्ययामुळे जेम्स वॅट गोंधळले आणि त्यांनी वाफेचे इंजिनच्या इतिहासाबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली त्यांनी वाफेच्या गुणधर्मावर वेगवेगळे प्रयोग केले.

जेम्स यांनी सुप्त उष्णतेचे अस्तित्व सिद्ध करून दाखवलं ज्या मध्ये पाण्याच वाफेमध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक ते उष्णता असते हे त्यांनी जोसेफ ब्लॅक यांच्या सिद्धांतावरून शोधून काढलं होतं. इंजिनमध्ये त्यांनी ० दबाव असलेलं कंडेन्सर बसवलं ज्यामुळे पिस्टनची आपोआप हालचाल होऊ लागली ज्यामुळे त्यासाठी अतिरिक्त लागणाऱ पाणीही थांबलं. या कंडेन्सर चा शून्य दबाव स्थितीत ठेवण्यासाठी जेम्स यांनी एक वायु पंप बसवून पिस्टन अधिक मजबूत बनवलं.

त्यांनी घर्षण रोखण्यासाठी तेल वापरलं ज्यामुळे वाया जाणारी ऊर्जेची बचत झाली. या इंजिनची गती नियंत्रित रहावी म्हणून त्यांनी सेंट्रीफ्युगल गव्हर्नर चा वापर केला. सिलेंडर मध्ये वाफेचा दाब मोजण्यासाठी स्टीम इंडिकेटर बसवलं ज्यामुळे इंजिनची शमता मोजता येऊ लागली आणि यातूनच वाफेचे इंजिन तयार झालं. त्यांनी या इंजिनचा शोध लावला नव्हता परंतु त्यांनी या इंजिनमध्ये योग्य अमुलाग्र बदल घडवून आणले ज्यामुळे हे इंजिन चालवायला सोपा आणि या वेळी अधिक खात्रीशीर रीतीने वापरताही येऊ लागेल असं बनलं.

इंजिन मध्ये सुधारणा घडवून आणताना जेम्स यांच्या लक्षात आले की थॉमस कॉमन यांच्या इंजिन मधील सर्वात मोठी चूक म्हणजे खराब इंधन मुळे त्यांच्या सुप्त उष्णतेवर परिणाम होत होता. वाफेने निर्माण होणारी ऊर्जा व वाफ बनवण्यासाठी जळालेल्या कोशाच प्रमाण व अकार्यक्षम ठरत होतं. त्यांच्या इंजिन मध्ये स्टीम आणि थंड पाण्याचे पर्यायी जेट एका सिलेंडर मध्ये इंजेक्ट केले गेले होते. ज्यामुळे पिस्टन च्या प्रत्येक वर-खाली स्ट्रोक मुळे सिलेंडरच्या भिंती पहिल्या गरम केल्या जायच्या नंतर त्या थंड केल्या जायच्या त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा वाफ सिलेंडर मध्ये तयार व्हायची तेव्हा ती तोपर्यंतच कंडेन्स व्हायची जोपर्यंत सिलेंडर थंड पाण्याच्या जेट ने त्याच्या कार्यरत तापमानापर्यंत थंड होत नाही.

या सगळ्या चुका लक्षात घेऊन त्यांनी स्वतःचे स्वतंत्र असं वाफेचे इंजिन तयार केलं या इंजिन मुळे अधिक वेगळी व शक्तिशाली इंजिन बनवण्यात मदत झाली. या इंजिनचा वापर पुढे कागद गिरण्या, कापड गिरण्या, पीठ गिरण्या, लोखंड कारखाने, भट्ट्या, पाणीपुरवठा असंख्य ठिकाणी होऊ लागला. हे इंजिन व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरलं आणि त्यातूनच औद्योगिक क्रांती घडून आली. त्यांनी या इंजिनचा पेटंट घेतलं आणि जॉन रोबक यांच्यासह भागीदारी करून इंजिन निर्मितीचा व्यवसाय सुरू केला तो कालांतराने अयशस्वी ठरला.

पुढे त्यांनी उपजीविकेसाठी वेगवेगळी छोटी मोठी कामे केली परंतु पुन्हा त्यांनी मॅथ्यू बोल्टन यांच्यासमवेत भागीदारी करून इंजिन निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. ही भागीदारी पुढे पंचवीस वर्षे चालली आणि त्यांचा व्यवसाय यशस्वी झाला. पुढे त्यांनी दगडी कोळशाच्या खाणीत, लोखंडाच्या कारखान्यात वाफेचे इंजिन उभारलं. इथेही त्यांना यश प्राप्त झालं त्यामुळे पुढे त्यांनी तांबे आणि कथिलाचा खाणीतील पाणी उपसण्यासाठी इंजिन बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी समांतर गतीचा शोध लावत दाबमापकचा शोध लावला. बोल्टन यांच्यासोबत काम केल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली .

मृत्यू

१८०० मध्ये आपल्या कामातून निवृत्ती घेऊन त्यांनी त्यांच्या उर्वरित आयुष्य विश्रांतीकरता आणि मित्र परिवाराला कुटुंबाला भेट देण्यात घालवलं. २५ ऑगस्ट १८१९ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी जेम्स वॅट यांचे निधन झालं.

आम्ही दिलेल्या james watt biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जेम्स वॅट यांचा जीवन परिचय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या james watt biography in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!