जंगल तोड प्रकल्प कार्यपद्धती Jangal Tod Project Information in Marathi

jangal tod project information in marathi – deforestation in marathi language जंगल तोड प्रकल्प कार्यपद्धती, सध्या जगामध्ये मोठ्या प्रमाणात अधुनीकरण होत आहे तसेच मोठ मोठ्या इमारती बांधल्या जात आहेत मोठ मोठी हॉटेल्स बांधली जात आहेत आणि अश्या अधुनिकरनासाठी जागा अपुरा पडत आहे त्यामुळे अनेक लोक जंगल तोड करत आहेत तसेच जंगलांची नासधूस करत आहेत आणि त्याठिकाणी औद्योगीकारण होते आहे तसेच काही लोक या शेतीसाठी वापर करत आहेत तसेच त्या ठिकाणी मोठ मोठ्या बिल्डींग सुध्दा बांधल्या जाऊ लागल्या आहेत. आपल्या पृथ्वीवर ३० टक्के भाग हा जंगलांनी व्यापून टाकलेला आहे.

आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे वन्यजीव राहतात आणि ह्या जंगलांच्यामुळे आणि वन्य जीवांच्यामुळे आपल्या पृथ्वीवर नैसर्गिक समतोल राहण्यास मदत होते परंतु संधी असे घडत आहे कि जंगल तोडी मुळे झाडांची संख्या खूप कमी होत आहे आणि त्यामुळे अनेक नैसर्गिक समस्या उद्भवत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण जगाला त्याला सामोरे जावे लागत आहे.

जंगल हे वन्य जीवांचे घर आहे म्हणजेच ते जीव याच ठिकाणी आपला अन्न, पाणी निवारा बनवतात असतात परंतु मनुष्य आपल्या स्वार्थासाठी झाडाची तोड करत आहेत तसेच जंगलांचा नाश करत आहे त्यामुळे वन्य जीवांचा राहण्याचा निवारा मोडत आहे आणि जंगल नष्ट होत असल्यामुळे भयानक वन्यजीव हे जंगलातून बाहेर पडत आहेत आणि ते मानवाला देखील हानी पोहचवत आहेत म्हणून हे सर्व धोके कमी करण्यासाठी किंवा धोक्यांच्या पासून वाचण्यासाठी जंगल तोड थांबवली पाहिजे.

jangal tod project information in marathi

jangal tod project information in marathi

जंगल तोड प्रकल्प कार्यपद्धती – Jangal Tod Project Information in Marathi

जंगल तोड म्हणजे काय – deforestation in marathi language

जंगल तोड म्हणजे जंगलामधील झाडे मनुष्य आपल्याला स्वर्थासाठी म्हणजेच औद्योगीकरणासाठी, शेतीसाठी, घरे बांधण्यासाठी, मोठ मोठ्या इमारती आणि हॉटेल्स बांधण्यासाठी तोडणे म्हणजे जंगल तोड होय.

वृक्षतोड एक समस्या प्रकल्प कार्यपद्धती – vruksha tod ek samasya project in marathi

सध्या माणूस अधुनिकारानाच्या मागे लागून जंगलांचा नाश करत आहेत तसेच मनुष्याला अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी लाकडाची गरज बसत आहे त्यामुळे मनुष्य मोठ्या प्रमाणात जंगलतोड करत आहे आणि यामुळे मात्र जंगलांचा नाश होत आहे. परंतु जंगल तोडीची हि समस्या दूर करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु केले गेले आणि त्यामधील एक लोकप्रिय झालेला प्रकल्प म्हणजे झाडे लावा झाडे जगवा.

हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आणि त्यामुळे लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत झाडाचे आपल्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे ते कळू लागले. त्याच बरोबर तसेच अनेक लोकांना या प्रकल्पामुळे जंगलांचे महत्व समजून देण्यासाठी यश मिळाले. जंगलतोड केल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचते त्यामुळे मनुष्याने वेळीच जागे होऊन जंगल तोड थांबवली पाहिजे.

जंगल तोड प्रकल्पाचे हेतू – objectives 

जंगल हे आपल्या चांगल्या पर्यावरणासाठी महत्वाचे आहे परंतु लोकांनी असे अनेक प्रकल्प सुरु केले आहेत जे जंगल तोड थांबण्यास मदत करतात आणि आत आपण खाली जंगलतोड प्रकल्प सुरु करण्याचा हेतू काय आहे ते पाहणार आहोत.

  • जंगल तोड प्रकल्प सुरु करण्याचे मुख्य कारण म्हणजे जंगलांचा बचाव करणे.
  • जंगलतोड प्रकल्पामध्ये जर आपण जंगलाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली तर त्याचा परिणाम कश्यावर होऊ शकतो याचा सविस्तरपणे अभ्यास करणे.
  • जंगले हि आपल्या पृथ्वीला संतुलित ठेवण्यासाठी कसे मदत करतात याचा सविस्तरपणे अभ्यास करणे आणि जंगलांचे महत्व काय आहे या बद्दल लोकांच्या मनामध्ये जागरुकता निर्माण करणे.
  • जंगल या विषयी माहिती घेणे तसेच जंगलांचे मनुष्याच्या आयुष्यात काय महत्व आहे ते जाणून घेणे.
  • चांगल्या पर्यावरणासाठी जंगल कसे महत्वाचे आहे हे मनुष्यांना पटवून देणे.

जंगलांचे उपयोग – uses 

  • आपल्या सर्वांना माहिती आहे कि ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात झाडे आहेत त्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रमाणात होतो त्यामुळे जंगलातुल झाडांच्या मुळे देखील ऑक्सिजन पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो आणि त्या मुळे मानवाला चांगल्या प्रकारे ऑक्सिजन पुरवठा होतो पण जर मानवाने जंग तोडले तर ऑक्सिजनची निर्मिती कमी होयील आणि त्यामुळे मानवाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
  • झाडांच्यामुळे हवेतील गाड्यांच्या धुरातून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतला जातो आणि आणि त्यामुळे हवेतील प्रदूषण थांबते आणि त्या ठिकाणी शुध्द हवा निर्माण होते. परंतु जर जंगलामधील झाडे तोडली तर कार्बनडाय ऑक्साईडचे शोषून घेण्याचे प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे हवा प्रदूषित होयील आणि त्यामुळे मनुष्याला अनेक समस्येला सामोरे जावे लागेल.
  • जंगलातील झाडांचे लाकूड हे वेगवेगळ्या कारणांच्यासाठी वापरले जाते जसे कि घरे बांधण्यासाठी, कागद तयार करण्यासाठी, इंधन म्हणून अश्या अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी वापरले जाते.
  • जास्त प्रमाणात झाडे असल्यामुळे पृथ्वीचे तापमान कमी होण्यासाठी मदत होते त्यामुळे जास्त प्रमाणात झाडे असणे आवश्यक आहे आणि तसेच जंगले देखील पृथ्वीचे तापमान कमी करू शकतात.
  • झाडांच्या नियमितपणे जलचक्र चालण्यास मदत होते आणि जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे असल्यामुळे जलचक्र चांगल्या प्रकारे चालण्यास मदत होते.

जंगल तोडीचे परिणाम

  • जंगलतोडीमुळे हवेमध्ये ऑक्सिजन कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढेल आणि हवा प्रदूषित होईल त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.
  • जंगल तोडीमुळे वन्य जीवांचा अन्न, पाणी आणि निवारा नष्ट होईल आणि ते अन्नाच्या आणि निवाऱ्याच्या शोधासाठी जंगलाच्या बाहेर पडतील आणि मानवी वस्तीमध्ये शिरून त्यांना हानी देखील पोहचू शकतात.
  • जंगल तोडी मुळे झाडांची संख्या खूप कमी होत आहे आणि त्यामुळे अनेक नैसर्गिक समस्या उद्भवत आहेत.
  • झाडांच्या तोडीमुळे पृथ्वीवरील तापमान वाढत चालले आहे.

जंगलतोड कमी करण्यासाठी काय उपाय अवलंबले पाहिजे? 

आम्ही दिलेल्या jangal tod project information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जंगल तोड प्रकल्प कार्यपद्धती माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vruksha tod ek samasya project in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि deforestation in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!