Zade Lava Zade Jagva Essay in Marathi – Save Tree Save Life in Marathi झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध झाडे लावा पर्यावरण वाचवा मराठी निबंध अनेक संत, थोर समाजसुधारक, महात्मे आपल्याला झाडांचे महत्त्व सांगून गेले. झाडांचा आपल्या जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्याला मिळणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हा झाडांपासूनच मिळतो. झाडांची निर्मिती आणि निसर्गचक्र यांचे खूप जवळचे नाते आहे. एखादे बीज रुजवले की त्याचे रोप बनते. रोपाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी त्याला सुयोग्य जमीन, खत आणि पाणी अशा घटकांची आवश्यकता असते.
झाडे आपल्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन वायू देतात आणि सजीवांनी सोडलेला कार्बन डायऑक्साइड ते स्वतः शोषून, परत ऑक्सिजन बाहेर सोडतात. निसर्गचक्रात शुध्द हवेची असलेली कमतरता झाडे भरुन काढत असतात. मनुष्यालाच तेवढं नाही तर पृथ्वीवरील सर्व जीवांना जगवण्यासाठी वृक्ष महत्वाची भूमिका बजावत असतात. झाडे अनेक साऱ्या नैसर्गिक आपत्यापासून आपला बचाव करत असतात.
झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध – Zade Lava Zade Jagva Essay in Marathi
एक तरी झाड जगवा मराठी निबंध – Jhade Lava Jhade Jagva Essay in Marathi
झाडे ही सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतात. शिवाय, ज्याठिकाणी जास्त झाडे असतात तेथे ओझोन लेयर चांगल्या प्रमाणात असतो. त्यामुळे सूर्यापासून येणारी घातक किरणे माणसांवर पडत नाहीत आणि माणसांचा त्यापासून बचाव होतो. याशिवाय झाडे आपल्याला अन्न जसे की अनेक प्रकारची फळे देतात, तसेच आपल्याला विविध उत्सवांसाठी, सणांसाठी लागणारी पाने – फुले झाडांपासूनच मिळतात.
- नक्की वाचा: माझी शाळा निबंध
आपल्याला दिली जाणारी औषधे झाडांपासूनच बनवली जातात, अनेक झाड तर मुळापासूनच औषधी असतात. त्यातील काही वनस्पती आणि त्यांचे महत्त्व खालीलप्रमाणे;
१) अडुळसा – ही वनस्पती सर्दी, खोकला तसेच दमा असणाऱ्या व्यक्तींसाठी खूप औषधी ठरते.
२) कोरफड – प्रत्येकाच्या घरी असायला हवी अशी बहुगुणी वनस्पती म्हणजे कोरफड . भाजणे, पोळणे यावर ही वनस्पती औषध म्हणून वापरली जाते. त्वचेच्या तसेच, पोटांच्या अनेक विकारांवर ही वनस्पती खूप उपयोगी आहे.
३) शतावरी – खरंतर , ही वनस्पती स्त्रियांसाठी खूप गुणकारी ठरते. स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करणारे उत्तम औषध म्हणजे शतावरी होय. मधुमेह, रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल अशा अनेक आजारांसाठी ही वनस्पती औषधी मानली जाते.
४) आपटा वृक्ष – दगड आणि खडकाला भेदणारे हे वृक्ष आहे. पोटातील मुरडा, मुतखडा तसेच लघवीला जळजळ होणे अशा आजारांवर हे वृक्ष औषध म्हणून वापरले जाते.
अशा कित्येक लाखो वनस्पती आपण औषध तयार करण्यासाठी वापरत असतो.
- नक्की वाचा: पर्यावरण मराठी निबंध
झाडे लावा झाडे जगवा घोषवाक्य
” वृक्ष लावा दारोदारी,
समृद्धी नांदेल घरोघरी.”
झाडे ही निसर्गाने मनुष्याला दिलेली अमूल्य अशी भेट आहे. एका तऱ्हेने झाडे आपले पालन पोषणच करत असतात . पृथ्वी आणि पर्यावरणाला स्वच्छ आणि ताजेतवाने ठेवायचे काम झाडे नियमितपणे करत असतात. त्यामुळे, आपल्याला पण त्यांच्या प्रती पुर्णपणे जिम्मेदार आणि जागरूक बनायला हवे.
लहान झाडांपेक्षा उंच, परिपक्व आणि मोठी झाडे जास्त उपयोगी असतात. घनदाट झाडे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, पावसापासून आपले संरक्षण करतात, थंड आणि मोठी सावली उपलब्ध करून देतात, तसेच उष्णतेचा ताप कमी करतात आणि आपल्याला गारवा देतात. एका एकर जागेत लावलेले झाड वीस लोकांसाठी एका वर्षाचा ऑक्सिजन तयार करत असते.
ज्या ठिकाणी जास्त झाडे असतात त्याठिकाणी थंडी आणि गर्मी असे दोन्हीही ऋतु नियंत्रित राहतात. शिवाय, अतिवृष्टी आणि अती उष्णता देखील झाडांमुळे टाळता येते.
झाडे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण आणि मृदा प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. झाडे ज्या प्रदेशात जास्त आहेत त्या प्रदेशात पाऊस जास्त प्रमाणात पडतो. याचा अर्थ म्हणजे झाडांसाठी पाण्याची आवश्यकता असते म्हणून, त्या प्रदेशात झाडांमुळे पावसाचे वातावरण निर्मिले जाते.
त्यामुळे, दुष्काळी भाग जर आपल्याला समृद्ध करायचा असेल तर, त्याठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. झाडांचे महत्त्व समजून घेऊन, आपण झाडांची होणारी तोड आणि त्यांची विदेशात होणारी तस्करी थांबवली पाहिजेत. तसेच, नवीन वृक्ष लागवड यासंदर्भात देखील एक पाऊल पुढे चालले पाहिजेत.
आपण आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये कुठंही दुष्काळ पडला की आरडाओरडा करतो आणि जास्त पाऊस पडला तरीदेखील आरडाओरडाच करतो. परंतू, निसर्गाचे नियमित चक्र बदलून त्याची आपल्यावर का अशी अवकृपा होत आहे, हे आपण कधी जाणून घेतले आहे का?
निसर्ग आपले काम व्यवस्थितच करत असतो. पण, मानवी दुष्कृत्यामुळे निसर्गचक्रात अडथळा निर्माण होतो. वृक्षतोड हे त्याला पहिले आणि महत्वाचे कारण म्हणावे लागेल. आज वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. आता वृक्षतोड केली की काय होत, हे सर्वांनाच ज्ञात आहे. पण, ती थांबली जावी यासाठी कुणी प्रयत्न मात्र करत नाही.
- नक्की वाचा: माझा गाव मराठी निबंध
आजकाल, आपल्या भारत देशात लोकसंख्यावाढ खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसते. आता जितकी लोक तितकी वृक्षतोड तर होणारच. मानवाला त्याचे अन्न शिजवण्यासाठी लाकडांची गरज भासते, त्यासाठी तो वृक्षतोड करतो. तसेच, शहरीकरण, औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी जमिनीची गरज भासते, अशावेळी देखील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जाते.
एक वृक्ष तोडण्यासाठी लागणारा वेळ हा पुरेसा आहे पण, तोच वृक्ष मोठा होण्यासाठी कितीतरी वर्षांचा कालावधी लागत असतो; तरीदेखील, या गोष्टीचा विचार न करता वृक्षतोड केलीच जाते.
झाडांची हत्या जर अशीच वाढत गेली तर एकदिवस त्यांचे पृथ्वीवरचे अस्तित्व नष्ट होईल आणि त्याचबरोबर आपलेही अस्तित्व पृथ्वीवर उरणार नाही. झाडांमुळे फुकट मिळणारा अमूल्य प्राणवायू जर आपण गमावला तर आपल्याला श्वास घेण्यासाठी तडफडाव लागेलं. कडक उन्हामध्ये डोकं तापत असताना, झाडांच्या थंडगार सावलीसाठी आपल्याला पळाव लागेल.
अनेक रोग, आजार शरीराला जडले की त्यावर उपाय म्हणून वापरली जाणारी औषध मिळवण्यासाठी झाडांना शोधावं लागेल. हवेच्या प्रदूषणामध्ये गुदमरत असताना, शुध्द हवेसाठी आपल्याला भटकावं लागेल. त्यामुळे, इतक्या परिणामांना सामोरे जाण्यापेक्षा आपण झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
‘एक मुल, एक झाड’ याप्रमाणे प्रत्येकाने दरवर्षी जरी एक झाड लावले तरी आपल्याला दरवर्षी होणारी वृक्षतोड आटोक्यात आणता येईल.
खरंतर, आज आपल्याला वरील समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यासाठी ‘ झाडे लावा , झाडे जगवा! ‘ हे घोषवाक्य खूप सार्थकी ठरू शकते. वृक्ष संवर्धनासाठी प्रत्येक देशाचे सरकार पाऊले उचलत असते मात्र त्यासाठी त्या त्या देशांतील जनतेने देखील हातभार लावला पाहिजेत.
प्रत्येक व्यक्तीने जर दरवर्षी एक झाड लावून ते जगवले तर आपल्या देशात जेवढी लोकसंख्या आहे तेवढी झाडे उत्पन्न होऊ शकतात. आपल्या भारतात सद्यस्थितीत अनेक सरकारी किंवा खाजगी संस्था अशा आहेत ज्यांनी वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्यात पुढाकार घेतलेला आहे. आपल्या आसपास जर अशा संस्था असतील तर आपण त्यांना नक्की हातभार करायला हवा. तसेच, जर कोणी झाडे तोडत असेल तर त्याला आपण आळा घातला पाहिजेत.
” तोडू नका वृक्ष,
निसर्ग होईल रुक्ष!
जर एक वृक्ष वाढेल,
सर्व परिसर शुध्द बनेल! “
हिरवीगार झाडे निसर्गाचे साैंदर्य वाढवत असतात. मनुष्यासोबत इतर प्राणी आणि पक्षी झाडांवर अवलंबून असतात. त्यामुळे, आपण वृक्षतोड करताना याच भान ठेवलं पाहिजेत की आपण स्वतः बरोबर इतर सजिवांचा जीव देखील धोक्यात आणत आहोत. झाडांची फळे हे प्राणी तसेच, पक्ष्यांचे अन्न आहे. याशिवाय, त्यांचे हेच निवासस्थान सुध्दा आहे.
झाड म्हणजे देवाने मानवाला दिलेले वरदानच आहे. मानवी जीवन आणि झाडे यांच्यात अतुट असे नाते आहे. लहानपणाच्या पांगुळड्यापासून ते म्हातारपणाच्या काठीपर्यंत झाडांनी मानवाला साथ दिलेली आहे. आजच्या या एकविसाव्या शतकात शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्याने जमिनीची होणारी धूप थांबवण्यासाठी झाडे महत्वाची आहेत.
आज मनुष्य विकासाच्या नावाखाली झाडे तोडत आहे. परंतू, तो विकासाकडे नाही तर स्वतःच्या विनाशाकडे जात आहे याचे त्याला ज्ञान नाही. उगवणारा प्रत्येक दिवस जरी मानवापुढे नवनव्या समस्या निर्माण करत असला तरी त्यातील ९० % समस्या या मानवाने स्वतःच्या हाताने स्वतःकडे ओढवल्या आहेत.
उंच उंच आभाळाकडे जाऊन भिडणारी वृक्षराजी पाहून मानवाचे आकाशाकडे लक्ष गेले आणि तिथूनच त्याने अंतराळाच्या शोध मोहिमा सुरू केल्या. पण, आज तोच मानव ज्याच्यामुळे आकाशात भरारी घ्यायला शिकला त्या वृक्षांचे उपकार विसरून, कृतघ्न बनला आहे.
आपण झाडांची पाने – फुले हवी तेंव्हा तोडतो, कुरतडतो, त्यांच्या फळांचा मनसोक्त आस्वाद घेतो, त्यांच्या सावलीत विश्रांती करतो आणि शेवटी झाडांची हत्या करतो. तरीदेखील, ही झाडे कधीच आपल्यावर राग धरत नाहीत किंवा आपल्याबद्दल नाराजी व्यक्त करत नाहीत. आपला अन्याय, अत्याचार ते निमुटपणे सहन करतात तरीदेखील ते आपल्याला स्वतःची फळे, फुले, पाने, ऑक्सिजन घेताना अडवत नाहीत .
सगळ्या जिवांमध्ये झाडे ही खूप दानशूर आहेत. स्वतःचा जीव जाईपर्यंत ते दुसऱ्याला मदत करत असतात. कितीही झालं तरी ते देखील निसर्गाने निर्माण केलेले सजिवच आहेत. त्यांनाही आपल्याप्रमाणेच वेदना होत असतात. पण, ते कुणासमोर व्यक्त करू शकत नाहीत. खरंतर, वृक्षच आपले खरे मित्र आहेत.
पण, आपण ही मैत्री कुठपर्यंत निभवतो? त्यांना आपण कधी मदत केलीय का? कधीतरी त्यांना होणाऱ्या वेदनांचा आपण विचार केलाय का? नाही, कधीच नाही! मदतीऐवजी त्यांच्यावर फक्त अन्याय केलाय. पण, ते मात्र ही मैत्री अजूनपर्यंत प्रामाणिकपणे निभावत आलेले आहेत. त्यांचं अस्तित्व आज नष्ट होताना आपल्याला दिसतंय.
आजपण आपण जर हातावर हात ठेवून गप्प बसलो तर निसर्ग आपल्याला कधीच आयुष्यात माफ नाही करणार. कारण, आपण जसे निसर्गाचे अपत्य आहोत तसेच, झाडे आणि इतर जीवही त्याचेच अपत्य आहेत. कोणतीही आई आपल्या मुलांवर अन्याय होताना बघू शकत नाही. जर तिच्या एका मुलावर, दुसऱ्या मुलामुळे अन्याय होत असेल तर ती दुसऱ्या मुलाला शिक्षा करणारच. त्यामुळे, वेळीच आपण आपली चूक सुधारली पाहिजे.
चला तर मग, आज आपण सर्वांनी एक निश्चय करूया आणि झाडांना पुनर्जीवन देऊया. त्यांच्या संवर्धनासाठी मोहिमा राबवूया. झाडे लावुया आणि झाडे जगवूया!
झाडे लावा झाडे जगवा कविता
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे|
पक्षीही सुस्वरे आळवीती||
येणे सुखे रुचे एकांताचा वास|
नाही गुणदोष अंगा येत||”
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या zade lava zade jagva essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या zade lava zade jagva nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि jhade lava jhade jagva marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण jhade lava jhade jagva nibandh या लेखाचा वापर zade lava zade jagva असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट