जमशेदजी टाटा यांची माहिती JRD Tata Biography in Marathi

JRD Tata Biography in Marathi – JRD Tata Information in Marathi जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा जीवन परिचय, जमशेदजी टाटा यांची माहिती. आजवर आपण अनेक यशस्वी उद्योजकांच्या कथा ऐकलेल्या आहेत त्यातीलच एक सुप्रसिद्ध नाव म्हणजे टाटा ग्रुप. या लेखामध्ये आपण जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जीवन परिचय जाणून घेणार आहोत. ते भारतीय विमान चालक, उद्योगपती, उद्योजक‌ आणि टाटा समूहाचे अध्यक्ष होते.

jrd tata biography in marathi
jrd tata biography in marathi

जमशेदजी टाटा यांची माहिती – JRD Tata Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा
जन्म (Birthday)२९ जुलै १९०४
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)विमान चालक, उद्योगपती, उद्योजक‌ आणि टाटा समूहाचे अध्यक्ष
मृत्यू (Death)२९ नोव्हेंबर १९९३

JRD Tata Information in Marathi

जन्म

२९ जुलै १९०४ रोजी पॅरिस येथे जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जन्म झाला. ते भारतीय पार्शी कुटुंबात जन्माला आले. ते उद्योगपती रतन टाटा आणि त्यांची फ्रेंच पत्नी सुनी ब्रियर यांचे दुसरे अपत्य जहांगीर टाटा होय. त्यांचे वडील पारशी भारतीय होते तर आई फ्रेंच होती. जहांगीर टाटा यांना एकूण तीन भावंडे आहेत. ते जे.आर.डी या नावाने प्रसिद्ध आहेत परंतु त्यांचे संपूर्ण नाव जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा आहे. जहांगीर टाटा यांचे बालपण फ्रान्स मध्ये गेले.

पुढे जहांगीर टाटा यांचे शिक्षण देखील फ्रान्स मधूनच पूर्ण झालं. काही काळ ते शिक्षणासाठी जपान व इंग्लंडमध्ये देखील गेले. त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॅनन या शाळेतून शिक्षण घेतले आहे. त्यांनी मॅट्रिकच्या पुढे शिक्षण घेतलं नाही. भारतातील यशस्वी उद्योजक जमशेदजी टाटा चे रतन टाटा चुलत भाऊ होते.

कारकीर्द

सन १९२५ मध्ये जे आर.डी.टाटा बिनपगारी शिकाऊ म्हणून रुजू झाले. १९३८ मध्ये जहांगीर टाटा यांची टाटा च्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली जो भारतातील सर्वात मोठा औद्योगिक समूह आहे.‌ त्यांच्या मित्राच्या वडिलांकडून त्यांना उड्डाण करण्यासाठी प्रेरणा मिळाली. आणि तेव्हापासून जी.आर.डी टाटा देखील उड्डाण करण्यास सुरुवात करू लागले.‌ १० फेब्रुवारी १९२९ रोजी पहिला परवाना प्राप्त करून ते पहिले भारतीय वैमानिक बनले. त्यानंतर त्यांनी टाटा एअरलाईन्सचे निर्मिती केली. जी भारतातील पहिली व्यवसायिक विमानसेवा ठरली. ते भारतीय नागरी उड्डाणाचे जनक म्हणून ओळखले जातात.

पुढे टाटा एअरलाइन्स च १९४६ मध्ये एअर इंडिया मध्ये रूपांतर झालं. जी सध्या भारताची राष्ट्रीय विमान सेवा म्हणून ओळखली जाते. १९५३ मध्ये भारत सरकारने जे. आर.डी यांची एअर इंडियाचे अध्यक्ष आणि इंडियन एअरलाइन्सच्या बोर्डावर संचालक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी एकूण पंचवीस वर्ष हे पद सांभाळलं. एव्हिएशन मधील त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना भारताचे मानद एअर कमोडोर ही पदवी देण्यात आली. टाटा एव्हिएशन सर्विस टाटा एअरलाइन आणि एरंडाच्या अग्रदूताने आकाशात भरारी घेतली.

भारतीय विमानचालण्याच्या इतिहासातील पहिले उड्डाण कराचीतील द्रीघ ते मद्रासला १५ ऑक्टोंबर १९३२ रोजी जी.आर.डी यांच्यासह उड्डाण केले. त्यांचा उड्डाणाचा आवेश १९३२ मध्ये टाटा सर्विसेस स्थापने नंतर पूर्ण झाला. पुढील अनेक दशके त्यांनी टाटा ग्रुप सोबत काम केलं. यादरम्यान त्यांनी स्टील, अभियांत्रिकी, ऊर्जा, रसायने आणि इतर क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या. त्यांनी आपल्या कामगारांना कुटुंबा सारखंच मांनलं होतं.

कामगारांसाठी कर्मचारी संघटना देखील सुरू केली होती. त्यांनी कर्मचाऱ्यांना दिवसातून आठ तास काम व मोफत वैद्यकीय मदत, कामगार भविष्य निर्वाह योजना आणि कामगारांचा अपघात झाल्यास नुकसान भरपाई या सगळ्या सुविधा दिल्या होत्या. कामगार कामावर येईपर्यंत ते काम सुटल्यावर घरी जाईपर्यंत जर त्यांचा कोणत्याही प्रकारचा अपघात झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी कंपनी वर टाकली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूहाची मालमत्ता $१०० दशलक्ष वरून $ पाच अब्ज इतकी झाली. त्यांनी त्यांच्या अधिपत्याखाली १४ उद्योग नवीन कंपन्या सुरू केल्या. त्यांनी १९८७ मध्ये टायटन इंडस्ट्रीजची स्थापना केली.

जहांगीर टाटा यांनी टाटा ग्रुप कंपनी साठी टाटा कम्प्युटर सेंटर सुरू केलं. पहिले अध्यक्ष बनले. टाटा कम्प्युटर सेंटर हे आत्ताच्या घडीला आशियातील माहिती तंत्रज्ञानाची सर्वात मोठी प्रदाता आणि भारतातील व्यवसाय प्रक्रिया आऊटसोर्सिंग सेवा देणारे दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. टाटा मोटर्स कंपनीची स्थापना १९५० मध्ये करण्यात आली. हा टाटा समूहाचा एक भाग आहे. ज्याचे शेअर होल्डिंग टाटा सन्स मॅनेज करतात.

टाटा मोटर्स मध्ये वेगवेगळ्या सुधारणा आणायची गरज होती ग्राहकांच्या मागणीवरून त्यांनी एक छोटी कार बनवण्याचा निर्णय घेतला व १९९८ मध्ये टाटा इंडिका नावाची ही भारताची पहिली स्थानिक प्रवासी कार लॉन्च केली जी स्वस्त व भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय ठरली. ही कार भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असलेली कारण ठरली जि युरोप व यूके आणि इडली मध्ये निर्यात केली जाते. टायटन घड्याळे सर्वात महाग व लोकप्रिय घड्याळ आहे. टायटन इंडस्ट्रीजची स्थापना १९८७ मध्ये करण्यात आली जी भारतातील तिसरी वॉच कंपनी होती. टायटन घड्याळे भारतीय बाजारपेठेत ६० टक्के वापरले जातात व सुमारे ४० देशांमध्ये विकले जातात.

१९८६ मध्ये टाटा कम्युनिकेशनची स्थापना करण्यात आली. विदेश संचार निगम लिमिटेड हे सुरुवातीस सरकारच्या मालकीचं होतं पण १३ फेब्रुवारी २००८ रोजी टाटा समूहाने ते विकत घेतले आणि त्याचे नाव टाटा कम्युनिकेशन लिमिटेड मध्ये रूपांतरित केलं. संपूर्ण भारतीयांच्या घरांमध्ये टाटा चहा वापरला जातो. टाटा चहा, टाटा टेटली म्हणून ओळखला जाणारा चहा हा जगातील दुसरा सर्वात मोठा चहाचा ब्रँड आहे. चहाचे उत्पादन व वितरण करतो टाटा समूहाच्या मालकी मध्ये आहे.

६ सप्टेंबर १९५६ रोजी मुंबई येथे टाटा ग्रुपने वोल्टास कंपनी स्थापन केली. जहांगीर टाटा यांनी त्यांच्या आयुष्यातील पन्नास वर्षे टाटा अँड संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे १९९२ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सर दोराबजी टाटा ट्रस्टचे जहांगीर टाटा ट्रस्ट स्थापन झाल आहे.

तेव्हापासून जवळपास पुढे अर्धशतकाहून अधिक काळ या ट्रस्टचे ट्रस्टिज होते. जहांगीर टाटा यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या ट्रस्ट द्वारे आशियामध्ये पहिले कर्करोग रुग्णालय बांधले गेले. पुढे या ट्रस्ट द्वारे टाटा मेमोरियल सेंटर फॉर कॅन्सर रिसर्च अँड ट्रीटमेंट १९४१ मध्ये बॉम्बे मध्ये उभारलं गेलं. १९३६ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ची स्थापना केली. १९४५ मध्ये टाटा मूलभूत संशोधन उर्फ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च स्थापन करण्यात आल. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स स्थापन करण्यात आल.

पुरस्कार

जहांगीर टाटा यांनी टाटा ग्रुप उभारण्या मध्ये मोलाची भर घातली आहे. त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या त्यांच्यामुळे देशाला व समाजाला फायदा झाला. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. १९४५ मध्ये जहांगीर टाटा यांचा फ्रेंच सरकारतर्फे लिजन डी ऑनर हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. १९५७ मध्ये एअर इंडियाचा रौप्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस जहांगीर टाटा यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कारां पैकी एक मानला जाणारा पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

व्यवसायिक उड्डाण क्षेत्रांमधील टाटा यांनी महत्त्वपूर्ण व विशिष्ट योगदान दिले आहे. त्यासाठी १९७९ मध्ये जहागीर टाटा टोनी जॅनस या पुरस्काराचे मानकरी ठरले. विमानचालनासाठी त्यांना १९९८ मध्ये गुगेनहेम पदक प्राप्त झालं. भारत सरकार तर्फे टायर जहांगीर टाटा यांना १९९२ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतामध्ये कुटुंबनियोजन चळवळ सुरू केल्याबद्दल व ती समृद्धपणे राबविल्याबद्दल त्यांच्या अविरत प्रयत्नांसाठी १९९२ मध्ये टाटा जहांगीर यांना संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मृत्यू

जहांगीर टाटा यांचा मृत्यू २९ नोव्हेंबर १९९३ रोजी झाला. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेनिवा, स्विझरलँड येथे घेतला. टाटा जहांगीर यांचा मृत्यू किडनी इन्फेक्शन मुळे झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ भारतीय संसदेचे कामकाज काही काळ थांबवण्यात आले होते. टाटा जहांगीर यांना हा सन्मान देण्यात आला कारण त्यांनी व्यवसायिक क्षेत्रात भरपूर योगदान दिलं होतं. हा सन्मान सहसा संसद सदस्य नसलेल्या व्यक्तींना दिला जात नाही. पॅरिस फ्रान्समधील पेरे लाचैस या स्मशानभूमीमध्ये त्यांचे दफन करण्यात आले.

२०१२ मध्ये CNN आणि BBC व हिस्ट्री एटीन या चायनल ने आयोजित केलेल्या आउटलुक मेगझिन मध्ये द ग्रेटेस्ट इंडियन म्हणून टाटा जहांगीर यांना सहावं स्थान देण्यात आलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने नाशिक फाटा पिंपरी चिंचवड येथील बांधलेल्या दुहेरी पुलाला भारतरत्न जे.आर.डी टाटा ओव्हर ब्रिज नाव दिल आहे.

आम्ही दिलेल्या jrd tata biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जमशेदजी टाटा यांची माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या jrd tata information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of jrd tata in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!