Judo Information In Marathi जुडो हा एक जपानी खेळ आहे ज्यामध्ये निशस्त्र लढण्याची प्रणाली आहे म्हणजे या खेळामध्ये लढण्यासाठी कोणतेही शस्त्र वापरले जरात नाही लढण्यासाठी हत्तांचा वापरा केला जतो. जुडो हा मार्शल आर्ट मधील एक प्रकार आहे. मार्शल आर्ट मध्ये वेगवेगळे अनेक प्रकार आहेट पण जुडो हा एक लोकप्रिय प्रकार आहे जो सर्व साधारण कराटे सारखाच असतो. पूर्वीच्या काळी जुडो हा प्रकार लोक आपले संरक्षण करण्यासाठी शिकत होते पण आत्ताच्या काळा मध्ये या खेळाच्या स्पर्धा असल्यामुळे हा खेळ लोकांच्यामध्ये खूप प्रसिध्द झाला आहे. जुडो हा लोकांना शारीरिक, मानसिक आणि नैतिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी तयार केलेली एक कला आहे.
जुडो या खेळाची विशेषता म्हणजे हा खेळ खेळण्यासाठी वयाची अट नसते आपण कोणत्याही वयामध्ये जुडो हा खेळ खेळू शकतो. जुडोचे खेळामध्ये प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी त्याला जमिनीवर आणून त्याला तेथेच काही काळासाठी रोखून ठेवणे किवा त्याच्यावर आपला पूर्ण भर टाकून त्याचा ताबा मिळवणे.
जुडो खेळाविषयी माहिती – Judo Information In Marathi
खेळ | जुडो |
मूळ | जपान |
मैदानाचा आकार | चौरसाकृती ( १४ मीटर ते १६ मीटर ) |
मैदानाचे तीन भाग | सुरक्षा क्षेत्र, व्दंव्द क्षेत्र आणि घातक क्षेत्र |
खेळाडू | २ ( एकमेकाविरुद्ध खेळतात ) |
खेळाचा मुख्य हेतू | खेळामध्ये लोकांना शारीरिक, मानसिक आणि नैतिक दृष्ट्या स्वताला मजबूत करणे आणि आपले संरक्षण आपणच करण्याची कला शिकवली जाते. |
जुडो खेळाचा इतिहास
शारीरिक शिक्षण देणाऱ्या जीगोरो कानो नावाच्या एका शिक्षकाने १८८२ मध्ये जुडो मार्शल आर्ट तयार केले. जुडो हा खेळ पूर्णपणे ताकदीवर अवलंबून असल्यामुळे त्यांनी खेळाडूंमधील ताकद आणि निर्भरतेची कमी दूर करण्यासाठी गुरुत्वाकर्षण किवा लेव्हीटेशन सिस्टम वापरण्यासाठी एक तंत्र बनवले आणि त्यामुळे विस्तापण वजन या हालचालींच्या अंमलबजावणीत मदत होऊ लागली. आणि त्यावेळी पासूनच त्यांनी आपले निकष ठरवण्यास सुरुवात केली ज्यामुळे खेळाडूंना जुडोचे शिक्षण देणे सुलभ होऊ लागले यानंतर जीगुरो कानो यांनी जुडोचे पहिले प्रशिक्षण केंद्र सुरु केले.
- नक्की वाचा: कुस्ती खेळाची माहिती
जुडो खेळाचा मुख्य उद्देश
पूर्वीच्या काळी मार्शल आर्टचा मुख्य हेतू शत्रूला मारणे असा होता. जरी जुडो हा मार्शल आर्टच भाग असला तरी या कलेमध्ये शत्रूला मारके जात नाही तर त्याच्या शक्तीचा वापर त्याच्या विरुध्द वापरली जाते आणि त्याचे मानसिक संतुलन बिघडवले जाते आणि त्यावर आपला ताबा मिळवला जातो म्हणजेच या खेळामध्ये लोकांना शारीरिक, मानसिक आणि नैतिक दृष्ट्या स्वताला मजबूत करणे आणि आपले संरक्षण आपणच करण्याची कला शिकवली जाते.
जुडो खेळाचे मैदान – judo ground
जुडोचे मैदान हे चौरसाकृती असते आणि त्यावर एक मॅट टाकलेले असते आणि या मैदानाचा आकार १४ मीटर ते १६ मीटर असते आणि त्यावर २ मीटर लांबीच्या आणि १ मीटर रुंदीच्या मऊ गाद्या टाकलेल्या असतात आणि हे मैदान ३ भागामध्ये विभागलेले असते. ते तीन भाग म्हणजे सुरक्षा क्षेत्र, व्दंव्द क्षेत्र आणि घातक क्षेत्र.
व्दंव्द क्षेत्र :
हे मैदानावरील मॅटच्या मध्यभागी असतो आणि याचे अंतर ८ ते १० मीटर इतके असते. या भागामध्ये खेळाडू लढतात आणि या भागामध्ये गुण देखील मिळू शकतात. या क्षेत्रामध्ये २ गुण मिळवता येतात. या क्षेत्राला लढाऊ क्षेत्र या नावाने देखील ओळखले जाते.
घातक क्षेत्र :
घातक क्षेत्र हे लाल रंगाने चिन्हाकित केलेले असते आणि १ मीटर रुंद असते आणि हे लढाऊ क्षेत्राच्या आसपासच असते. हे क्षेत्र व्दंव्द क्षेत्राच्या बाहेर जाणाऱ्या खेळाडूला (जुडोकास) इशारा देण्यासाठी असते.
सुरक्षा क्षेत्र :
हे क्षेत्र जर आपण मैदानावरील लढाई क्षेत्र सोडले तर ते ३ मीटर रुडीचे असते आणि हे क्षेत्र काही गोष्टी मंजूर करण्यासाठी असते यामध्ये जुडोकास स्कोर करता येत नाही.
- नक्की वाचा: कबड्डी खेळाची माहिती
वजन श्रेणीमध्ये विभागलेले भाग
जुडो खेळामध्ये खेळाडूंना वजन क्षेत्रा मध्ये विभागलेले असते जेणेकरून प्रतिस्पर्धी देखील त्याच वजनाचा असेल.
- अतीरिक्त वजन ( ६० किलो पर्यंत )
- हलके वजन ( ६६ किलो पर्यंत )
- सरासरी हलके वजन ( ७३ किलो पर्यंत )
- सरासरी मध्यम वजन ( ८१ किलो पर्यंत )
- सरासरी वजन ( ९० किलो पर्यंत )
- मध्यम वजन ( १०० किलो पर्यंत )
- वजन ( १०० किलो पेक्षा अधिक )
जुडो खेळाचे नियम – rules of judo game
- या खेळामध्ये ५ मिनिटे पुरुषांसाठी आणि ४ मिनिटे महिलांसाठी असा वेळ लढण्यासाठी असतो.
- जुडो या खेळामध्ये २ न्यायाधीश आणि एक केंद्रीय न्यायाधीश असतो.
- ज्युडोकास चढाईसाठी ३ मिनटे अतिरिक्त वेळ असतो.
- केंद्रीय न्यायाधीशाचे काम मिदानावरील खेळाडू नियमांचे पालन करत आहेत कि नाही हे पाहण्याचे असते.
- या खेळामध्ये एक कर न्यायाधीशहि असतो.
- जुडो या खेळामध्ये प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर आणून त्याला तेथेच काही काळासाठी रोखून ठेवणे किवा त्याच्यावर आपला पूर्ण भर टाकून त्याचा ताबा मिळवणे.
- जुडो या खेळामध्ये खेळाडू प्रतिस्पर्ध्याला पंच किवा लाथ मारू शकत नाही जर एखाद्या खेळाडूने तसे केले तर त्याला दंड बसू शकतो.
- जर एखादा खेळाडू दंडासाठी पात्र असेल तर जो मध्यवर्ती रेफरी असतो तो खेळ थांबवतो आणि खेळाडूंना त्याची उपकरणे किवा कपडे निश्चित करण्यास सांगतो आणि खेळ पुन्हा सुरु करतो.
- स्पर्धेमध्ये जर एकाद्या खेळाडूने ( जुडोकाने ) इप्पॉन स्कोर केल्यानंतर हा खेळ संपतो आणि तो खेळाडू विजयी होतो.
जुडो खेळामध्ये केले जाणारे स्कोर – scoring
जुडो या खेळामध्ये स्कोरिंग चे मुख्य तीन भाग आहेत आणि ते म्हणजे युका, वझारी आणि ईप्पण.
- युका : प्रतिस्पर्धी जर बाजूला पडला तर हा स्कोर मिळतो.
- वझारी : खेलाडी त्याच्या पाटीवर पडतो पण कमी वेगाने पडतो त्यावेळी वझारी स्कोर मिळतो.
- इप्पण : खेळाडू मॅटवरून खाली सरकतो तेव्हा हा स्कोर दिला जातो.
जुडो खेळामधील पॉइंट्सचे भाषांतर
- १ डिग्री शिडो : १ डिग्री शिडो म्हणजे खेळाडूला किवा जुडोकाला एक चेतावणी दिली जाते.
- २ डिग्री शिडो : २ डिग्री शिडो म्हणजे विरोधक स्कोर युको.
- ३ डिग्री शिडो : प्रतिस्पर्ध्याने एक वझारी स्कोर केले तर ३ डिग्री शिडो.
- ४ डिग्री शिडो : जर प्रतिस्पर्ध्याने इप्पॉन स्कोर केले असता.
आम्ही दिलेल्या judo information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर कबड्डी या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about judo in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि judo game information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू judo karate information in marathi नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट