Kachori Recipe in Marathi – Shegaon Kachori Recipe कचोरी रेसिपी मराठी कचोरी हे भारतातील लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणून ओळखले जाते आणि जे सणासुदीच्या काळात, छोट्या पार्टीमध्ये नाश्ता म्हणून किंवा संध्याकाळच्या चहा सोबत स्नॅक म्हणून खाल्ले जाते आणि बनवले देखील जाते. ही एक गोल आणि पोकळ तळलेली पुरी सारखी दिसणारी कचोरी असते ज्यामध्ये जी मूग डाळ आणि मसाल्यांनी भरलेली असते. कचोरीची चव एकदम चविष्ट आणि लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते. कचोरी हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आणि कमी वेळे मध्ये बनणारा पदार्थ आहे. जो घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून अगदी सहज बनू शकतो.
कचोरी हा पदार्थ खूप लोक घरामध्ये बनवण्यासाठी प्रयत्न करतात पण आपली कचोरी बाहेरील हॉटेल सारखी होत नाही म्हणूनच आज या लेखामध्ये आम्ही उत्तम कचोरी रेसिपी कशी बनवायची हे पाहणार आहोत.
कचोरी रेसिपी मराठी – Kachori Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४० मिनिटे |
पाककला | भारतीय |
वाढणी | ३ ते ४ व्यक्ती |
कचोरी हे भारतातील लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणून ओळखले जाते आणि हे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते. म्हणूनच आज आपण मुग डाळ कचोरी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहणार आहोत.
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४० मिनिटे |
पाककला | भारतीय |
वाढणी | ३ ते ४ व्यक्ती |
कचोरी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते बहुतेक आपल्या घरामध्ये उपलब्ध असू शकते आणि जर आपल्या घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपल्या जवळच्या किरणामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकते. आता आपण पाहू कचोरी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.
- नक्की वाचा: समोसा रेसिपी मराठी
- २ वाटी मैदा.
- मीठ ( चवीनुसार ).
- २ चमचे तूप.
- अर्धी वाटी कोमट पाणी.
- तेल ( तळण्यासाठी ).
- २ मोठे चमचे मुग डाळ.
- १ चमचा कस्तुरी मेथी.
- २ चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा धने पावडर.
- १ चमचा गरम मसाला पावडर.
- काळी मिरी पावडर.
- आमचूर पावडर.
- ४ चमचे बेसन.
- १ चमचा हिंग.
- २ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या ).
- १ चमचा पिठी साखर.
- २ चमचे जिरे आणि बडीशेप ( क्रश करून ).
- २ चमचा तेल
- सर्वप्रथम मिक्सिंग बाऊलमध्ये मैदा, मीठ आणि तूप घाला आणि हे चांगले मिसळा. आपण जे पिठामध्ये तेल घातलेले असते ते पिठाला चांगले लाऊन घ्या.
- आणि मग त्या पिठामध्ये हळूहळू पाणी घालून एक मऊ गोळा मळून घ्या.
- त्यानंतर तो पिठाचा गोळा २० ते २५ मिनिटे झाकून ठेवा.
- आता २ चमचे मूग डाळ सर्वप्रथम धुवून घ्या आणि मग ती १ वाती पाण्यामध्ये किंवा पुरेशा पाण्यात भिजत घालावी.
- मूग डाळ फुगली की पाणी काढून टाका आणि थोडे मोठे मोठे वाटून घ्या किंवा तुम्हाला जर मुग डाळ तशी घालायची असल्यास सारणामध्ये तुम्ही तशीच मुग डाळ घालू शकता.
- आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर, मीठ, आणि कसुरी मेथी घाला आणि हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
- आता कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, हिरवी मिरची, क्रश केलेली बडीशेप आणि जिरे टाका ते एक मिनिट भाजून घ्या.
- मग त्यामध्ये मसाल्यांचे मिश्रण आणि बेसन घालून त्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत भाजून घ्या.
- त्यानंतर या सारणामध्ये पिठी साखर आणि भिजवलेली मूग डाळ घाला आणि सर्वकाही मिक्स करा.
- तआणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते मिश्रण झाकून मध्यम आचेवर चांगले शिजवून घ्या आणि सारण थोडे घट्ट बनवा कारण याचे गोळे बनवले जातात.
- मूग डाळीचे सारण तयार झाल्यानंतर ते किंचित थंड करा आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवा.
- आता आपण मळून ठेवलेली मैद्याची कणिक घ्या आणि त्याचे छोटे छोटे म्हणजेच सारणाच्या गोळ्यापेक्षा दोनपट मोठे असवेते अशे गोळे बनवून घ्या.
- आणि कणकीच्या गोळ्यांच्यामध्ये सारणाचे गोळे भरून ते पूर्णपणे झाकून घ्या.
- आता कढईमध्ये कचोरी तळण्यासाठी तेल गरम करून घ्या.
- आपण बनवून ठेवलेले गोळे हाताने मध्यम आकारामध्ये थापून घ्या आणि ते हळुवार तेलामध्ये सोडा आणि चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्या तसेच कचोरी चांगली फुगू द्या.
- कचोरी चांगली तळली कि ती तेलातून काढा आणि अश्या प्रकारे सर्व कचोऱ्या तळून घ्या ( टीप : कढईतील तेलामध्ये जितक्या कचोऱ्या मावतील तितक्या कचोऱ्या घालून तुम्ही बॅचमध्ये कचोऱ्या टाळू शकता ).
- तुमची स्वादिष्ट कचोरी तयार झाली.
- नक्की वाचा: वडा पाव रेसिपी मराठी
मुग डाळ कचोरी कशी सर्व्ह करावी – how to serve moong dal kachori
मुग डाळ कचोरी सर्व्ह करतेवेळी सर्वप्रथम एक प्लेट घ्या आणि त्यामध्ये एक कचोरी घाला आणि ती कचोरी मधून फोडा आणि त्यामध्ये चिंचेची लाल चटणी, हिरवी चटणी आणि शेव घालून सर्व्ह करा किंवा कचोरीचा वरचा मधला भाग फोडून त्यामध्ये चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, चिंचेची लाल चटणी, हिरवी चटणी, शेव आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. अश्या प्रकारे आपण जर कचोरी खाल्ली तर ती खूप छान लागते.
- आपण जर सारणामध्ये १ चमच्या ऐवजी २ चमचे तेल वापरले तर ते ३ ते ४ दिवस चांगले टिकते.
- कचोरी पीठ एकदम मऊ आणि गुळगुळीत बनवा त्यामध्ये कोणत्याही क्रॅक्स दिसू नयेत.
- कचोरी मध आचेवर तळा त्यामुळे कचोरी चांगली कुरकुरीत होईल.
- कचोरी लाटण्याने लाटू नका त्याला आपल्या तळहाताने अकरा द्या.
आम्ही दिलेल्या kachori recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कचोरी रेसिपी मराठी माहिती matar kachori recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dal kachori recipe in MARATHI या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि upasachi kachori recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dahi kachori recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट