Vada Pav Recipe in Marathi वडा पाव रेसिपी मराठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पदार्थ अगदी आनंदाने आणि आवडीने खाल्ले जातात आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या पदार्थांना एक वेगळीच ओळख आहे म्हणजेच मिसळ पाव हा पदार्थ कोल्हापुरी किंवा पुणेरी पदार्थ म्हणून ओळखला जातो. तसेच वडा पाव हा मुंबईचा पदार्थ म्हणून ओळख आहे कारण हा पदार्थ मुंबई मध्ये उदयास आला आणि त्या ठिकाणी हा पदार्थ अनेक लोकांचा आवडता पदार्थ आहे आणि अनेक लोकांची रोजीरोटी देखील आहे. फक्त मुंबईच नव्हे तर भारताच्या इतर ठिकाणी देखील वडा पाव हा पदार्थ लोक खूप आवडीने खातात.
वडा पाव म्हणजे बटाट्याची भाजी बनवलेली असते आणि त्याचे लाडू एवढे गोळे करून ते डाळीच्या पिठाच्या बॅटर मध्ये बुडवून तो गोळा पीठाने पूर्णपणे झाकला जातो आणि तळून साधा पाव, बन पाव किंवा ब्रेंड सोबत सर्व्ह केला जातो.
वडा पाव हा घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा खूप कमी वेळामध्ये बनतो. आज या लेखामध्ये आपण वडा कसा बनवायचा याबद्दल माहिती घेणार आहोत.
वडा पाव रेसिपी मराठीमध्ये – Vada Pav Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन (मुंबई) |
वाढणी | ५ ते ६ व्यक्ती |
वडा पाव हा पदार्थ सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये १९६६ मध्ये अशोक वैद्य आणि सुधाकर म्हात्रे यांनी बनवला होता आणि बहुतेक वडा पाव हा पदार्थ बनवण्याची सुरुवात महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये झाली आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये वडा हा पदार्थ मुंबईचा वडा म्हणून प्रसिध्द आहे.
वडा पाव म्हणजे काय ?
वडा पाव म्हणजे बटाट्याची भाजी बनवून त्याचे लाडू एवढे गोळे करून ते डाळीच्या पिठाच्या बॅटर मध्ये बुडवून तो गोळा पीठाने पूर्णपणे झाकला जातो आणि तेलामध्ये तळून तो साधा पाव, बन पाव किंवा ब्रेंड सोबत सर्व्ह केला जातो.
- नक्की वाचा: डोसा रेसिपी मराठी
वडा पाव मध्ये वापरले जाणारे मुख्य साहित्य – key ingredients
आता आपण पाहूयात वडा बनवण्यासाठी काय काय मुख्य साहित्य लागते आणि ज्या साहित्याशिवाय वडा पाव बनूच शकत नाही.
- डाळीचे पीठ : डाळीचे पीठ हा घटक या पदार्थातील महत्वाचा घटक आहे कारण आपण जे वड्यावर आवरण आवरण पाहतो ते डाळीच्या पीठाचे असते.
- मिरची, हळद आणि मीठ : मिरची, मीठ आणि हळद हे देखील महत्वाचे असतात कारण हळदीमुळे भाजीला रंग येतो, मिरचीमुळे तिखट पणा आणि मिठामुळे चव येते.
- बटाटे : वाड्याच्या आतमध्ये जे सारण भरलेले असते ते बटाट्याची भाजीच असते आणि ते हिरवी मिरची, हळद मीठ आणि मोहरी घालून फोडुनी देवून त्यामध्ये उकडलेले बटाटे घालून भाजी बनवली जाते.
- तेल : तेल हे वडा तळण्यासाठी खूप आवश्यक असते.
वडा पाव हा एक मराठमोळा आणि महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो अनेक लोकांना आवडतो आणि म्हणूनच आज आपण स्वादिष्ट आणि उत्तम वडा पाव कसा बनवायचा आणि हा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन ( मुंबई ) |
वाढणी | ५ ते ६ व्यक्ती |
आता आपण वडा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात ज्यामुळे जर आपल्याकडे त्यामधील काही साहित्य नसेल तर ते बाजारातुन लगेच आणता येईल. चला तर मग वडा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहू.
- नक्की वाचा: पाणीपुरी रेसिपी मराठी
- १ वाटी हरभरा डाळीचे पीठ.
- १ चमचा रवा.
- १/२ चमचा हळद.
- १/४ चमचा खायचा सोडा.
- मीठ (चवीनुसार).
- पाणी (आवश्यकतेनुसार).
- ३ ते ४ बटाटे
- ६ हिरव्या मिरच्या (चिरलेल्या किंवा बारीक पेस्ट केलेल्या).
- १ चमचा मोहरी.
- १/२ चमचा जिरे.
- २ चमचे आलं लसून पेस्.
- ७ ते ८ कडीपत्ता पाने.
- १/४ चमच्या हिंग.
- हळद (आवश्यकतेनुसार ).
- मीठ (चवीनुसार).
- साखर ( चवीनुसार ).
- १/२ मोठा चमचा कोथिंबीर (चिरलेली).
- १ मोठा चमचा तेल.
इतर लागणारे साहित्य
- तेल (तळण्यासाठी).
- पाव किंवा ब्रेड (सर्व्हिंगसाठी).
- लसून चटणी किंवा लाल चटणी.
- तळलेल्या मिरच्या.
- सर्व प्रथम बटाटे घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- मग कुकरमध्ये पाणी घाला आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून कुकरचे झाकण घालून त्याला ३ ते ४ शिट्या द्या त्यामुळे बटाटे चांगले शिजण्यास मदत होईल. (टीप : आपण बटाटे भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये बटाटे टाकून त्यावर झाकण घालून देखील शिजवू शकतो).
- कुकर गार झाल्यानंतर त्यामधील बटाटे काढून घेवून त्याची साल काढा आणि ते चिरून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
- मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच जिरे, हिरवी मिरची, आलं लसून पेस्ट आणि कडीपत्ता घाला आणि ते चांगले एकत्र करा.
- त्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद घाला ते काही वेळासाठी चांगले चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये शिजवलेला बटाटा, मीठ (चवीनुसार) आणि साखर (चवीनुसार) घाला ते चांगले मिक्स करा.
- आता त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाका आणि बटाट्याचे सारण एकत्र करून घ्या. आता हे सारण काही वेळासाठी बाजूला ठेवा.
- सर्वप्रथम एका बाऊलमध्ये डाळीचे पीठ घ्या आणि त्यामध्ये रवा, हळद, सोडा आणि मीठ घालून ते कोरडे मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
- आता त्या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून वड्यासाठी लागणारे बॅटर बनवून घ्या.
बटाटे वडा तळताना केली जाणारी कृती
- सर्व बटाट्याच्या भाजीचे लाडू एवडे किंवा तुम्हाला ज्या आकाराचे वडे हवे आहेत त्या आकाराचे गोळे बनवून घ्या.
- आता कढई गॅसवर ठेवून तापवून घ्या आणि त्यामध्ये वडे तळण्यासाठी तेल घाला आणि ते तेल मोठ्या आचेवर गरम करा.
- तेल गरम झाले कि गॅसची आच कमी ( मध्यम ) करा.
- आता भाजीचे गोळे डाळीच्या पिठाच्या बॅटर मध्ये बुडवून तो गोळा त्या पीठाने चांगला झाकून घ्या आणि तो हळुवार तेलामध्ये सोडा आणि ते वडे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्या
- वरची प्रक्रिया सर्व भाजीच्या गोळ्यांच्यासाठी करा.
वडे सर्व्ह कशे करावे
- प्रथम एक पाव घ्या आणि तो मधुन थोडा कापा आणि मग त्या पावाच्या खालच्या बाजूला लाल चटणी लावा आणि त्यावर बनवलेला वडा ठेवा आणि त्यावर पावाचा वरचा भाग ठेवा. हि रचना आपल्याला सँडविच किंवा बर्गर सारखी दिसेल.
वडा कश्यासोबत खावा – serving suggestion
वडा हा भारतातील बहुतेक सर्व भागामध्ये पाव किंवा ब्रेड सोबत खाल्ला जातो आणि वड्यासोबत तळलेल्या किंवा वाफवलेल्या हिरव्या मिरच्या खायला दिल्या जातात. त्याचबरोबर काही भागामध्ये वड्यासोबत खायला खोबऱ्याची चटणी देखील दिली जाते.
- नक्की वाचा: पिझ्झा रेसिपी मराठी
टिप्स ( tips )
- जर या डाळीच्या पिठाच्या बॅटरमध्ये ओवा घातला तरी चालेल कारण ओवा हा पचण्यास हलका असतो त्यामुळे आपल्याला वडा खाल्ल्यानंतर कोणताही त्रास होत नाही.
- भाजीमध्ये आपण ताजे मटार देखील वापरले तर चालतात.
आम्ही दिलेल्या vada pav recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर वडा पाव रेसिपी मराठीमध्ये माहिती vada pav recipe in marathi by archana बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vada pav chutney recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि vada pav kasa banvaycha माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chinese vada pav recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट