Samosa Recipe in Marathi – Samosa Kasa Banvaycha समोसा रेसिपी मराठी समोसा हि एक डिश आहे जी आपण नाश्ता किंवा स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकतो. समोसा हि एक अशी रेसिपी आहे जी भारतातील सर्वात लोकप्रिय डिश मधील एक आहे आणि समोसा हा पदार्थ भारतामध्ये खूप लोक आवडीने खातात. बटाट्याच्या भाजीने भरलेला हा चवदार समोसा तुम्ही घरामध्ये अगदी सोप्या पध्दतीने आणि खूप कमी वेळामध्ये बनवू शकता. आज या लेखामध्ये आपण सामोसा कसा बनवला जातो आणि त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते याबद्दल माहिती घेवूया.
समोसा रेसिपी मराठी – Samosa Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४० मिनिटे |
पाककला | भारतीय |
कॅलरीज | ५७५ |
आता आपण समोसा बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य पाहूयात.
- बटाटे : बटाटे हा घटक सामोसा बनवण्यासाठी लागणारा एक महत्वाचा घटक मनाला जातो कारण समोस्यामध्ये जे सारण भरलेला असते ते बटाट्यापासूनच बनवलेले असते. समोस्यामध्ये बटाटे शिजवून त्याच्या बारक्या फोडी करून त्याला कांदा, हळद, मिरची आणि मीठ घालून फोडणी टाकून ते सारण मैद्याच्या पानामध्ये भरले जाते.
- मैदा : समोस्याचे जे वरचे कव्हर असते ते मैद्याच्या पीठापासूनच बनलेले असते. त्यामुळे समोसे बनवताना मैद्याचे पीठ देखील महत्वाचे असते.
- तेल : समोसे तेलामध्ये तळल्याशिवाय ते चांगले खामग आणि कुरकुरीत लागत नाहीत त्यामुळे तेल देखील समोसा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापैकी एक आहे.
नक्की वाचा: कोथिंबीर वडी रेसिपी
समोसा डिश हि एक लोकप्रिय भारतीय डिश आहे जी लोक नाश्ता किंवा स्नॅक्स म्हणून खातात. आता आपण पाहूयात समोसा बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते आणि तो कसा बनवला जातो. चला तर मग पाहूयात समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
तयारीसाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४० मिनिटे |
पाककला | भारतीय |
कॅलरीज | ५७५ |
समोसा बनवण्यासाठी लागणारे बहुतेक साहित्य घरामध्ये उपलब्ध असू शकते आणि काही साहित्य आपल्याला बाजारातून आणावे लागते. खाली आपण समोसे बनवण्यासाठी लागणाऱ्या समोस्याची यादी पाहूयात.
- ३ ते ४ मोठे बटाटे.
- ८ ते ९ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
- २ वाटी ताजे मटार.
- १ चमचा मोहरी.
- १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
- २ चमचा आलं लसून पेस्ट.
- १/२ चमचा हळद.
- १/४ चमचा हिंग.
- २ चमचे लिंबूचा रस.
- मीठ ( चवीनुसार )
- साखर ( चवीनुसार )
- २ ते ३ वाटी मैदा.
- १ मोठा चमचा तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- आता आपण समोसा बनवताना सारण कसे बनवायचे त्यामध्ये काय काय घालायचे तसेच त्याला सामोस्याचा आकार कसा द्यायचा याबद्दल माहिती घेणार आहोत.
- सर्व प्रथम बटाटे घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- मग कुकरमध्ये पाणी घाला आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून कुकरचे झाकण घालून त्याला ३ ते ४ शिट्या द्या त्यामुळे बटाटे चांगले शिजण्यास मदत होईल. ( टीप : आपण बटाटे भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये बटाटे टाकून त्यावर झाकण घालून देखील शिजवू शकतो ).
- कुकर गार झाल्यानंतर त्यामधील बटाटे काढून घेवून त्याची साल काढा आणि ते चिरून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १/२ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
- मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कांदा घाला आणि तो कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजा.
- मग त्यामध्ये आलं लसून पेस्ट घाला आणि ते कांद्यासोबत चांगले एकत्र करा.
- त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ताजे मटार, हिंग, हळद घाला ते काही वेळासाठी चांगले शिजवा. आणि मग त्यामध्ये शिजवलेला बटाटा, मीठ ( चवीनुसार ) आणि साखर ( चवीनुसार ) घाला ते चांगले मिक्स करा.
- मग त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाका आणि बटाट्याचे सारण एकत्र करून घ्या. आता हे सारण काही वेळासाठी बाजूला ठेवा.
- आता ३ वाटी मैद्याचे पीठ चाळून घ्या आणि त्यामध्ये तेलाचे मोहन घाला आणि तेल मैद्याला चांगले लावून घ्या आणि मग त्यामध्ये मीठ ( चवीनुसार ) घालून ते चांगले एकत्र करून घ्या.
- मग त्यामध्ये लागेल तेवढे पाणी घालून घट्ट माळून घ्या आणि हे मळलेले पीठ ९ ते १० मिनिटे भिजत ठेवा.
- १० मिनिटांनी या पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून त्याच पाण लाटून घ्या आणि त्या पानाचे २ अर्धे भाग करा.
- मग त्या अर्ध्या भागाचा त्रोकोनी आकार करा आणि त्याची एक बाजू झाकून रिकाम्या बाजूने त्यामध्ये बटाट्याचे सारण भरून ती बाजू देखील दुमडून घ्या म्हणजे आपले समोसे तयार होतील. हि प्रक्रिया सर्व सारणासाठी करा आणि सर्व समोसे बनवून घ्या.
- आता एका खोल कढईमध्ये सामोसे तळण्यासाठी तेल घाला आणि ती कढई गरम होण्यासाठी मोठ्या आचेवर ठेवा.
- कढइमधले तेल गरम झाले की त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेले समोसे घाला आणि ते चांगले कुरकुरीत आणि लालसर होईपर्यंत तळून घ्या.
- अश्याप्रकारे सर्व तयार केलेले सर्व समोसे तळून घ्या.
समोसा कश्यासोबत खाल्ला जातो – serving suggestions
समोसा हि एक अशी डिश आहे जी लोक नाश्ता किंवा स्नॅक्स म्हणून खाल्ला जातो. समोसा आपण चिंचेचा कोळ, टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत देखील खाल्ला जातो. समोसा आपण तसाच चहा पिता पिता देखील खाऊ शकतो.
Samosa Chatni Recipe in Marathi
आम्ही दिलेल्या samosa recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर समोसा रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या samosa kasa banvaycha या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि madhura samosa recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये marathi recipe samosa Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट