काढा रेसिपी मराठी Kadha Recipe in Marathi

Kadha Recipe in Marathi काढा रेसिपी मराठी भारतामध्ये वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक घरगुती उपाय केले जातात आणि जर आपल्याला सर्दी, खोकला किंवा पडस झाला असेल तर एक रामबाण केला जाणारा उपाय म्हणजे काढा होय. जर आपण साडी किंवा खोकला झाल्यानंतर काढा करून पिला तर घरच्या घरी आपली सर्दी किंवा खोकला डॉक्टरांच्या कडे जाण्या अगोदर कमी होतो. थंडीचे दिवस सुरु झाले कि सर्दी आणि खोकला यासारखे आजार होतात आणि याच्यावर रामबाण घरगुती उपाय म्हणजे काढा. काढा हा दालचिन, लवंग, काळी मिरी, आले, तुळशीच्या मंजुळा, तुळशीची पाने, हळद हे सर्व साहित्य पाण्यामध्ये घातले जाते आणि त्याला चांगले उकळून ते गाळून गरमागरम पिले जाते आणि हा उपाय शक्यतो सकाळीच करावा.

काढा आपण बनवून ठेवू शकतो किंवा मग ज्यावेळी पिणार आहे त्यावेळी बनवू शकतो परंतु बनवून ठेवलेला काढा ज्यावेळी पिणार आहे त्यावेळी कडक गरम करून प्यावा.

काढा हा औषधी पदार्थ लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांच्यासाठी उपयुक्त आहे आणि हा उपाय भारतामध्ये बहुतेक ठिकाणी सर्दी खोकला झाल्यानंतर केला जातो. काढा हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये म्हणजे २० ते २५ मिनिटामध्ये मोजक्याच साहित्यामध्ये बनते. चला तर मग काढा रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

kadha recipe in marathi
kadha recipe in marathi

काढा रेसिपी मराठी – Kadha Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पद्धतखूप सोपी

काढा कसा बनवला जातो ? 

काढा हा दालचिन, लवंग, काळी मिरी, आले, तुळशीच्या मंजुळा, तुळशीची पाने, हळद हे सर्व साहित्य पाण्यामध्ये घातले जाते आणि त्याला चांगले उकळून ते गाळून गरमागरम पिले जाते आणि हा उपाय शक्यतो सकाळीच करावा.

काढा रेसिपी – how to make kadha at home

भारतामध्ये बहुतेक ठिकाणी सर्दी आणि खोकला झाल्यानंतर केला जाणारा घरगुती उपाय म्हणजे काढा. बहुतेक लोक सादरी किंवा खोकला झाला कि तुळस, दालचिन, लवंग, काळी मिरी, आले, तुळशीच्या मंजुळा, हळद, साखर हे सर्व साहित्य खलु बनवलेला काढा पितात. काढा हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये म्हणजे २० ते २५ मिनिटामध्ये मोजक्याच साहित्यामध्ये बनते. आता आपण काढा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहुयात.

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पद्धतखूप सोपी

काढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make kadha recipe 

काढा बनवण्यासाठी दालचिन, लवंग, काळी मिरी, आले, तुळशीच्या मंजुळा, तुळशीची पाने, हळद आणि साखर हे साहित्य लागते आणि यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते. जे साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते ते आपण बाजारातून विकत अनु शकतो. चला तर मग काढा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ लिटर पाणी.
  • ४ ते ५ लवंग.
  • ३ ते ४ काळी मिरी.
  • २ चमचे खिसलेले आले.
  • २ तुकडे दालचिन.
  • १ चमचा हळद.
  • १ चमचा तुळशीच्या मंजुळा.
  • ८ ते ९ तुळशीची पाने ( खोडा बरोबर काढलेली )
  • २ चमचे साखर.

काढा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make kadha recipe 

पौष्टिक आणि आयुर्वेदिक काढा रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि रेसिपी २० ते २५ मिनिटामध्ये बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून काढा रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

  • काढा रेसिपी नवताना सर्व प्रथम तुळशीच्या मंजुळा आणि पाने स्वच्छ धुवून बाजूला ठेवा.
  • आणि आता एक स्वच्छ धुतलेले आणि ज्या भांड्यामध्ये एक लिटर पाणी मावेल असे भांडे घ्या आणि त्या भांड्यामध्ये पाणी घाला आणि ते भांडे गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा.
  • या भांड्यावर झाकण ठेवा त्यामुळे पाणी लवकर उकळेल.
  • पाणी उकळायला सुरुवात झाली कि त्यामध्ये तुळशीची पाने खोड सोबत घाला तसेच मंजुळा घाला. त्यानंतर त्यामध्ये ४ ते ५ लवंग, ३ ते ४ काळी मिरी, दालचिन, खिसलेले आले, हळद आणि साखर घाला आणि हे सर्व चमच्याने चांगले मिक्स करा आणि हे मिश्रण चांगले १५ ते २० मिनिटे उकळू द्या.
  • म्हणजे आपण यामध्ये एक लिटर पाणी घातलेले ते उकळून ते अर्धा लिटर होऊ द्या.
  • पाणी उकळून उकळून अर्धा लिटर झाले कि गॅस बंद करा.
  • आणि काढा गरमागरम असताना तो गाळून लगेच प्यावा. हा उपाय शक्यतो सकाळी लवकर करावा.
  • काढा आपण बनवून ठेवून आपल्याला जास्त सर्दी किंवा खोकला झाला असेल तर दिवसातून दोनदा पिवू शकतो परंतु तो पिताना गरम करून प्यावा.

टिप्स (Tips) 

  • जर काढ्यामध्ये घालण्यासाठी आले नसेल तर त्या ऐवजी आपण त्यामध्ये सुंठ पावडर देखील घातली तरी चालते.
  • काढा गरम करून पिल्यामुळे घश्यामध्ये होणारी खवखव आणि खोकला कमी होतो आणि म्हणूनच आला घरगुती रामबाण उपाय म्हणून ओळखले जाते.

आम्ही दिलेल्या kadha recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर काढा रेसिपी मराठी माहिती khokla sathi kadha बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sardi kadha recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि adulsa kadha recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये tulsi kadha recipe for weight loss in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!