kalaram mandir nashik information in marathi काळाराम मंदिर माहिती, नाशिक शहरामध्ये अनेक अशी ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक आकर्षणे आहेत आणि त्या आकर्षनापैकी एक म्हणजे काळाराम मंदिर आणि आज आपण या लेखामध्ये काळाराम मंदिरविषयी माहिती पाहणार आहोत. काळाराम मंदिर हे नाशिक शहरामध्ये पंचवटी परिसरातील एक प्रसिध्द आणि ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर १७९० मध्ये पेशवेकालीन सरदार ओढेकर यांनी बांधले आहे आणि हे नाशिक मधील सर्वात मोठे आणि साधे मंदिर आहे.
या मंदिरामध्ये काळ्या पाषाणामध्ये श्री राम, सीता आणि श्री रामाचे भाऊ लक्ष्मण यांची मूर्ती आहे आणि हे मंदिर भगवान श्रीराम यांना समर्पित आहे आणि या मंदिरातील श्री रामांची प्रतिमा हि काळ्या रंगाची असल्यामुळे या मंदिराला काळाराम असे नाव पडले आहे.
७० फुट उंचीचे हे मंदिर असून या मंदिराचे शिखर हे ३२ टन सोन्याने बनलेले आहे. या मंदिराला चार प्रवेश दरवाजे आहेत आणि ते प्रत्येकी पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दिशेला आहेत. काळाराम मंदिर हे गोदावरी नदीच्या परिसरामध्ये आहे.
त्यामुळे या मंदिराला आणखीन नैसर्गिक सुंदरता लाभली आहे आणि या मंदिरामध्ये भगवान श्री रामांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक या मंदिरामध्ये येतात. या मंदिरासोबत या ठिकाणी पंचवटी परिसरामध्ये अनेक ठिकाणे देखील पाहता येते.
काळाराम मंदिर माहिती – Kalaram Mandir Nashik Information in Marathi
ठिकाणाचे नाव | काळाराम मंदिर |
स्थान | नाशिक मधील पंचवटी परिसर |
मंदिरामधील मूर्ती | भगवान श्री राम, सीता आणि श्री रामांचे भाऊ लक्षमण |
स्थापना | १७९० |
कोणी बांधले | पेशवेकालीन सरदार ओढेकर |
मंदिराची उंची | ७० फुट |
पंचवटी ठिकाण काय आहे ?
हे प्रभू श्री रामांच्या संबधित ठीकानापैकी एक आहे आणि हे श्री रामांच्या भक्तांच्यासाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पंचवटी बद्दल असे मानले जाते कि प्रभू श्री राम आणि सीता हे वर्षासाठी याच ठिकाणी वास्तव्यासाठी होते आणि हा काळ त्यांचा वनवासाचा काळ होता.
या ठिकाणी आपल्याला काळाराम मंदिरासोबत गोराराम मंदिर, बालाजी मंदिर, विठ्ठल मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, काट्या मारुती मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, राजकुंड, भद्रकाली मंदिर, दुतोंड्या मारुती मंदिर अशी अनेक मंदिरे पहायला मिळतात.
काळाराम मंदिराविषयी काही महत्वाची माहिती – kalaram mandir information in marathi
काळाराम मंदिर हे भगवान रामांना समर्पित मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये काळ्या पाषाणामध्ये कोरलेल्या तीन मुर्त्या आहेत ज्या भगवान श्री राम, सीता आणि लाक्ष्मनांची आहे. या मंदिराची उंची हि ७० फुट इतकी आहे आणि हे मंदिर ७४ मीटर लांब आहे आणि ३२ मीटर रुंदीचे मंदिर आहे.
आणि या मंदिराला चार दरवाजे आहेत आणि हे मंदिराच्या चारही दिशेला आहेत. मंदिराच्या महादरवाज्यातून आत अल्यानंतर सभामंडप पहायला मिळतो आणि या सभामंडपाला चाळीस खांब आहेत.
या मंदिराचे शिखर हे ३२ टन सोन्याने बनलेले आहे आणि हे या मंदिरामध्ये तीन दालने आहेत आणि मंदिराच्या तिसऱ्या दालनामध्ये भगवान श्री राम, सीता आणि लक्षमण यांची मुर्त्या आहेत.
काळाराम मंदिराविषयी मनोरंजक तथ्ये – facts
- या पूर्वी या मंदिरामध्ये हरिजन लोकांना या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता परंतु डॉ आंबेडकर यांच्या १९३० च्या सत्याग्रहा नंतर हरिजनांना या परिसरामध्ये प्रवेश मिळाला.
- या मंदिरातील मुर्त्या ह्या काळ्या रंगाच्या पाषाणापासून बनलेल्या आहेत त्यामुळे या तिन्ही मुर्त्या काळ्या रंगाच्या आहेत आणि म्हणून या मंदिराला काळाराम मंदिर असे नाव पडले आहे.
- काळाराम मंदिर हे नाशिक शहरामध्ये पंचवटी परिसरातील एक प्रसिध्द आणि ऐतिहासिक मंदिर आहे.
- काळाराम मंदिर हे ७४ मीटर लांब आहे आणि ३२ मीटर रुंदीचे मंदिर आहे आणि या मंदिराला सोन्याचे शिखर असून प्रवेशासाठी चार दरवाजे आहेत आणि हे दरवाजे चारी दिशेला आहेत.
- या मंदिरामध्ये सभामंडप आहे आणि या सभामंडपाच्या बाजूला नगारखाना आहे जो तीस फुट उंचीवर आहे.
- श्री रामांच्या भक्तांच्यासाठी पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक म्हणून काळाराम मंदिर ओळखले जावू शकते.
- काळाराम मंदिर हे पंचवटी परिसरामध्ये आहे आणि या मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला अनेक इतर मंदिरे देखील पाहता येतात.
- या मंदिराचे बांधकाम हे पेशवेकालीन सरदार ओढेकर यांनी केले होते आणि या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात हि १७८२ मध्ये केली होती आणि हे मंदिर १७८८ मध्ये बांधून पूर्ण झाले.
- काळाराम मंदिरामध्ये असणाऱ्या सभामंडपाची उंची हि १२ फुट इतकी आहे.
टिप्स
- काळाराम मंदिरामध्ये रोज आरती केली जाते आणि या मंदिरामध्ये सकाळी ६ वाजता आरती केली जाते आणि रात्री ८ वाजता आरती केली जाते.
- काही ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणे आणि मंदिरे पाहण्यासाठी अनेक प्रकारचे शुल्क आकारले जातात परंतु नाशिक शहरामध्ये असणारे काळाराम मंदिर पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही.
काळाराम मंदिरला भेट देण्यासाठी कसे जायचे – how to reach
जर तुम्हला भगवान श्री रामांचे पंचवटी परिसरामध्ये असणारे मंदिर पाहायचे असल्यास तुम्हाला नाशिक शहरामध्ये जावे लागेल आणि हे मंदिर नाशिक शहरापासून फक्त ३ किलो मीटर अंतरावर आहे.
तुम्ही नाशिक शहरामध्ये कोणत्याही मुख्य शहरातून बसने, ट्रेनने आणि विमानाने येऊ शकता आणि तेथेऊन रिक्षा किंवा टॅक्सी पकडून मंदिरापर्यंत जावू शकता आणि जर तुम्ही स्वताची गाडी घेऊन आला तर ते तुमच्यासाठी आणखीन सोयीस्कर ठरेल कारण आपल्याला मंदिरासोबत नाशिकमधील काही इतर ठिकाणे देखील पाहता येतील.
आम्ही दिलेल्या kalaram mandir nashik information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर काळाराम मंदिर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kalaram mandir information in marathi या kalaram mandir info in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि kalaram mandir satyagraha in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट