Nashik District Information in Marathi – Nashik in Marathi नाशिक जिल्हा माहिती महाराष्ट्राच्या कुशीत वसलेला नाशिक जिल्हा हा दख्खन पठारावरील आणि सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यात पश्चिमेकडून वाहत येणारी तापी व पूर्वेकडून वाहनारी गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यांचा भाग येत असल्याने या जिल्ह्याच्या उत्तरेला, दख्खन पठाराच्या भूस्तररचनेत कालांतराने महत्त्वपूर्ण बदल होत असतात. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याकडे पाहिले जाते.
याशिवाय, नाशिक जिल्ह्याला अनेक प्रसिद्ध व्यक्ती असण्याचे श्रेय मिळाले आहे जसे की, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर, वसंत कानेटकर इत्यादी. नाशिक जिल्ह्याला ‘मिनी महाराष्ट्र’ असेही म्हटले जाते.
कारण, सुरगाणा, पेठ, इगतपुरीचे हवामान कोकण सारखे आहे, तर निफाड, सिन्नर, दिंडोरी आणि बागलाण येथील हवामान पश्चिम महाराष्ट्र सारखे आणि येवला, नांदगाव, चांदवड ब्लॉक या भागांतील हवामान हे विदर्भ विभागासारखे आहे. त्यामुळे, नाशिकला मिनी महाराष्ट्र असे म्हटले जाते. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, मनमाड आणि इगतपुरी इत्यादी शहरे प्रसिध्द आहेत.
नाशिक जिल्हा माहिती – Nashik District Information in Marathi
भूगोल
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातून सह्याद्रीची प्रमुख रांग दक्षिणोत्तर दिशेने जाते आणि या रांगेच्या तीन शाखा नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम–पूर्व दिशेने जातात. अगदी उत्तर भागात पश्चिमेला १,३०० मी. पासून पूर्वेला ६५० मी. पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग असून, या डोंगररांगेमध्ये वसलेली मंगीतुंगी डोंगराची उंची ही १,३३१ मी. इतकी आहे.
शिवाय, या रांगेच्या पूर्वेस सेलबारी आणि हिंदबारी खिंडी व थेरमाळ आणि गाळणा हे किल्ले देखील आहेत. गाळणा किल्याच्या दक्षिणोत्तर रस्त्यावर खिंड आणि दक्षिण बाजूला १,६१३ मी. पर्यंत उंचीची घोलबारी डोंगररांग आहे.
या रांगेतच घोलबारी खिंड व साल्हेर हे दोन किल्ले देखील आहेत. या रांगेच्या दक्षिणेस जिल्ह्याच्या मध्यातून जाणारी तापी व गोदावरी या नद्यांची खोरी अलग करणारी सातमाळा/अजिंठा ही डोंगररांग आहे. ही रांग प्रथम पूर्वेस, नंतर आग्नेयेला व शेवटी ईशान्येस पसरते.
अजिंठा रांगेची सरासरी उंची १,१०० ते १,३५० मी. असून धोडप, सप्तशृंरगीसारखी काही शिखरे १,४०० मी. पेक्षा जास्त उंच आहेत. अचल व जावाता हे किल्ले या रांगेमध्ये असून त्यांचे डोंगरमाथे मात्र अरुंद व सपाट आहेत. या रांगेच्या दक्षिणेकडील छोट्या रांगेत, आलंदी व बाणगंगा या नद्यांदरम्यान रामशेज नावाचा डोंगर सुद्धा आहे.
नाशिक जिल्ह्यात गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी आहे, जी नाशिकपासून जवळच असलेल्या गंगाद्वार म्हणजेच त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. गोदावरी नदीला १४ किमी. वर किकवी मिळते. काश्यपी (कास)–गोदावरी संगमापासून जवळच गंगापूर धरण बांधले आहे व तेथून दहा किमी.
अंतरावर नाशिक शहर वसले आहे. जलालपूरजवळ आलंदी नदी गोदावरीस मिळाल्यानंतर काही अंतरावर गोदावरी अरुंद, खडकाळ पात्रातून जाऊन सु. १० मी. खोल उडी घेते. ज्यामुळे, त्या ठिकाणी दूधस्थळी नावाचा धबधबा तयार झाला आहे.
नाशिक शहरात प्रवेश करण्यापूर्वी गोदावरी नदी सुमारे दोन मी. ची छोटीशी उडी घेते. गोदावरीच्या काठी अनेक देवळे असून, तिच्या विशाल पात्रात अनेक कुंडले बांधलेली आहेत. नाशिक व निफाड या दोन तालुक्यांतील गोदावरीचा ९६ किमी. लांबीचा प्रवाह या जिल्ह्यातून वाहतो. दारणा नदी ही गोदावरी नदीची नाशिक जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे, जी इगतपुरीच्या आग्नेय बाजूस १३ किमी अंतरावर आहे. वर सह्याद्रीमध्ये उगम पावते.
दारणेवर नांदगावजवळ धरण बांधण्यात आले आहे व त्यामुळे त्याठिकाणी ‘लेक बीले’ हा जलाशय निर्माण झाला आहे. दारणेस वाकी, उंदुलोह व वालदेवी या प्रमुख उपनद्या मिळतात आणि शेवटी त्यांच्यासह दारणा नदी निफाड तालुक्यात प्रवेश करून गोदावरी नदीस मिळते.
या पूर्ववाहिनी नद्या बऱ्याच उथळ असून वर्षातून सहा ते आठ महिने कोरड्या असतात. दारणेशिवाय गोदावरी नदीला नाशिक जिल्ह्यात देव, झाम, बाणगंगा, काडवा व गुई या प्रमुख नद्या सुद्धा मिळतात.
ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निर्माण झालेल्या दख्खन पठाराच्या पश्चिम काठावर नाशिक जिल्हा वसलेला आहे. त्यामुळे, संपूर्ण जिल्ह्यात चुनखडी व कंकर प्रत्यक्षपणे आढळून येतात. जळगाव आणि औरंगाबाद हे दोन जिल्हे नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला आहेत. ठाणे व गुजरात यांचा भाग नाशिकच्या पश्चिमेला आहे, तर अहमदनगर जिल्ह्याचा भाग नाशिकच्या दक्षिणेला आहे.
त्यामुळे, येथील काळी माती शेतीसाठी खूप अनुकूल ठरते. त्र्यंबकेश्वर जेथे गोदावरी नदी उगम पावते, नाशिक शहरापासून ३० किमी म्हणजे जवळजवळ १९ मैल अंतरावर आहे. शहराचे एकूण जमीन क्षेत्र २५९,१३ चौ.कि.मी. (१००.०५ चौरस मैल) असून, महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश व पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रदेशांनंतर नाशिक शहर हे तिसर्या क्रमांकाचे शहर आहे.
इतिहास – Nashik History in Marathi
खरंतर, नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला गेलेला आहे. रामायण या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले होते. त्यामुळे, या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. मात्र, कालांतराने महाराष्ट्र सरकारने नासिक हे नाव बदलून या ठिकाणचे नाशिक असे नामांकन केले.
नाशिक जिल्ह्याच्या नावावरून अजुन एक कथा प्रसिद्ध आहे ती म्हणजे, नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’ मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा मराठीमध्ये टेकडी असा अर्थ होतो. त्यामुळे, त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून सुद्धा नाशिक झाले.
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, नासिक, आणि विद्यमान नाशिक अशी पाच नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.
नाशिक जिल्हा पाहाण्यासारखी ठिकाणे
नाशिक जिल्ह्यातील अनेक स्थळे पर्यटनासाठी विशेष प्रसिध्द आहेत. खासकरून,
- नाशिक हा जिल्हा धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे ठिकाण १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे. शिवाय, हे स्थळ नाशिकपासून केवळ २७ कि.मी. अंतरावर आहे.
- तसेच, अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
- तर, सप्तशृंगीदेवीचे मंदिर नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे, दूरवरून अनेक पर्यटक या स्थळांना आवर्जून भेट देतात. नाशिकमध्ये सुमारे १२०० वर्षांची जुनी पांडवलेणी वसलेली आहेत.
- शिवाय, ‘फाळके स्मारक’ या नावाने दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ स्थित आहे.
- गोदावरी नदीवरील राम कुंड नाशिकमधील अन्य कुंडांमध्ये विशेष प्रिय आहे; कुंभमेळ्याच्या पर्वात राम कुंडामध्ये स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा या कुंडामागे दडलेली आहे.(nashik kumbh mela information in marathi)
महत्वाची केंद्रे
- ‘देवळाली तोफखाना’ हा नाशिक जिल्ह्यात नाशिक शहरात नाशिक रोड या ठिकाणी वसलेला आहे. या तोफखान्याजवळ कॅन्टोनमेंट बोर्ड देखील स्थित आहे. देवळाली तोफखाना म्हणजे रणगाडे आणि तोफखाना यांचे संग्रहालय आहे. शिवाय, आशिया खंडातील हे सर्वांत मोठे तोफखाना केंद्र देखील आहे. याच ठिकाणी भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांना तसेच, जवानांना प्रशिक्षण दिले जाते.
- तसेच, बोफोर्स तोफांचे देखील या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय, ‘गारगोटी संग्रहालय’ हे सिन्नर जवळ माळेगांव एम आय डी सी क्षेत्रामध्ये नाशिक शहरापासून पासून सुमारे २८ कि. मी. अंतरावर स्थित आहे.
- सिन्नर हे शहर छोटी नगरपालिका असलेले शहर असून या ठिकाणच्या गारगोटी संग्रहालयाने वेगवेगळे पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. हिरासदृश्य विविध खनिजांचे हे उत्कृष्ठ असे संग्रहालय आहे. याठिकाणी अतिशय मौल्यवान अशी विविध प्रकारची खनिजे पहायला मिळतात.
- यांखेरीज, या संग्रहालयास प्राईड ऑफ इंडिया, सरस्वती पुरस्कार आणि सिन्नर गौरव असे निरनिराळे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अनेक प्रकारचे रंगीबेरंगी खडक, स्फटीक, वेगवेगळया प्रकारामध्ये व आकारामध्ये या ठिकाणी आकर्षकपणे प्रदर्शित केलेले असतात.
- मित्रहो, आपल्या भारतात ‘भारतीय सिनेमाचा आत्मा’ म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते. दादासाहेब फाळके हे भारतीय सिनेमा सृष्टीचे आद्यजनक होते. त्यांचा जन्म नाशिक येथे दिनांक ३० एप्रिल १८७० रोजी झाला होता. इसवी सन १९१३ मध्ये दादासाहेब यांनी भारतातील १ ला सिनेमा ‘राजा हरिश्चंद्र’ या नावाने निर्माण केला.
- नाशिकच्या स्टुडीओमध्ये इसवी सन १९३२ पर्यंत त्यांनी जवळजवळ ९५ चित्रपट आणि २६ डॉक्युमेंटरी चित्रपट बनविले. सदरचे दादासाहेब फाळके संग्रहालय हे दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये केलेल्या दूरदृष्टी परिश्रमांना नम्र श्रध्दांजली म्हणून निर्माण करण्यात आलेले आहे.
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये nashik district information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर information of nashik in marathi म्हणजेच “नाशिक जिल्हा माहिती” nashik chi mahiti यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या information about nashik in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि nashik jilha mahiti माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
imformation is very helpful