कर्मवीर भाऊराव पाटील माहिती Karmaveer Bhaurao Patil Information in Marathi

Karmaveer Bhaurao Patil Information in Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आणि त्यांच्या जीवनाचा आढावा घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्रात अनेक शिक्षणमहर्षी होऊन गेली ज्या शिक्षणाच्या आणि प्रचंड देशात पैशाच्या आधारावर राज्यावर शिक्षणात जाळं निर्माण केलं ,वसतिगृह ,अनाथ आश्रम हायस्कूल, कॉलेज, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज, भरमसाठ फी घेऊन तरुण पिढीला व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था ,परंतु स्वतःचे शिक्षण कमी झाल्या तरी इतरांना शिकविण्यासाठी ज्ञानाची गंगा सतत वाहत राहील ,याच विचाराने पेटून उठलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःची ओळख रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करून दिली.

karmaveer bhaurao patil information in marathi
karmaveer bhaurao patil information in marathi

कर्मवीर भाऊराव पाटील माहिती – Karmaveer Bhaurao Patil Information in Marathi

नाव (Name)महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील
जन्म (Birthday)२२ सप्टेंबर १८८७
जन्मस्थान (Birthplace)कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नदीच्या किनारी वसलेल्या कुंभोज या गावात
वडील (Father Name)पायगोंडा पाटील
आई (Mother Name)गंगुबाई पायगोंडा पाटील
पत्नी (Wife Name)लक्ष्मीबाई पाटील
मुले (Children Name)आप्पासाहेब पाटील
मृत्यू (Death)9 मे 1959
लोकांनी दिलेली पदवीमहर्षी कर्मवीर

जन्म आणि बालपण

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नदीच्या किनारी वसलेल्या कुंभोज या गावात २२ सप्टेंबर १८८७ रोजी भाऊरावांचा जन्म झाला. वडील पायगोंडा पाटील आई गंगुबाई यांच्या सदन जैन कुटुंबात भाऊराव वाढू लागले. वारणा नदी मध्ये पोहणे ,लाल मातीत कुस्ती खेळणे हे त्यांचे अंगभूत गुणधर्म होते. मूळचे ते कर्नाटक प्रांतात आपली पूर्वीची त्यांचे आडनाव देसाई हे होते परंतु त्यांच्या घराण्यात पाटीलकी आल्याने त्यांचे आडनाव पाटील झाले.

गावच्या बाजूला बाहुबलीचा डोंगर आणि डोंगराच्या कुशीत लपलेले कुंभोज हे गाव त्यांचे बालपण कुंभोज सांगली जिल्ह्यातल्या या गावी गेली. भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर स्वभावाचे होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. कुंभोज मधील अस्पृश्य मुलांच्या सोबत खेळण्यातच त्यांचे बालपण गेले अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा व इतर ठिकाणी झाली.

कोल्हापूरच्या मध्ये राहून राजाराम हायस्कूलमध्ये ते शिकले. त्यांच्या गावात कुंपणाच्या काट्या तोडणाऱ्या एका दलित गरोदर महिलेला एका माणसांनी जनावरासारखे मारले .गावात  राहणाऱ्या सताप्पा भोसले ला त्याचा प्रचंड राग आला होता आणि रागाच्या भरात सत्तापानी त्या माणसाला ठार मारले होते व फरार ही झाला होता.

तो फरार माणूस कर्मवीर अण्णांच्या आजोबांच्या उसाच्या फडात लपून बसला होता. छोट्या भाऊरावांना पराक्रमाच्या गोष्टी तो सांगत असे छोट्या भाऊरावांना तो अंगाखांद्यावर खेळवत असे त्यावेळी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरता येत नसे पाण्यासाठी तासन्तास विनंती करावी लागेल एकदा हे दृश्य पाहून लहानग्या अण्णांचे हृदय पिळवटून आले. रागाने कर्मवीर आन रहाट मोडून आडात टाकले . प्राथमिक शिक्षण विद्या जवळ दहिवडी येथे घेऊन भाऊरावांना कोल्हापूरला यावे लागले.

शाहू महाराजांचा प्रभाव

कोल्हापूरच्या संस्थानचे राजे राजश्री शाहू महाराज होते. त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लागून प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते समाज प्रबोधनाच्या चळवळी मध्ये एक मोलाचा वाटा उचलला होता त्यांच्या विचारांचा प्रभाव भाऊरावांवर पडला. पुढे पुणे करार झाल्यानंतर भाऊरावांनी पुण्यात 1932 झाली आईच्या स्मरणार्थ यूनियन बोर्डिंग ची स्थापना केली 1935 मध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालय उघडले शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागात पोहोचणे हा त्यामागील त्यांचा उद्देश होता.

एकदा कर्मवीर इस्लामपूरला आले होते आई वडील तिथेच होते एकदा फिरत फिरत शाळेकडे गेले दिवस पावसाळ्याचे होते सर्व मुली वर्गात होती व एकच मुलगा बाहेर थंडीने पावसात कुडकुडत बसला होता चौकशी केल्यावर कळले तो मुलगा अस्पृश्य जातीचा आहे त्याला घरी आणले जेवू घातले व कोल्हापूरला मिस क्लार्क होस्टेल मध्ये दाखल केले तो मुलगा शिकला विधिमंडळाचा सभासद झाला डॉक्टर आंबेडकरांच्या मूकनायक वर्तमानपत्राचा काही काळ संपादक ही झाला पण भाऊरावांचा प्रयत्न वाया गेला नाही.

1914 मध्ये कोल्हापूर आता रात्री सातवा एडवर्ड व्हिक्टोरिया राणीचा पुतळा डांबर फसले गेले त्यावेळी भाऊरावांना वसतिगृहातून हाकलून देण्यात आले होते कर्मवीरांनी हुगळी काच कारखान्यात काम केले सुपर कारखान्यातही काम केले पण योग्य मोबदला न मिळाल्याने ती नोकरी त्यांनी सोडली .

शिक्षणसंस्था

भाऊरावांनी सुरुवातीचे काही काळ शिकवण्या ही घेतल्या. पुढे काही मातब्बर व सुशिक्षित लोकांच्या समवेत दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले.  सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही उघडलं आणि त्यांच्या ‘रयत शिक्षण संस्थेची’ बीजे ही इथेच पेरली गेली.  भाऊराव हे समाजसुधारक व शिक्षणप्रसारक होते.  सर्वसामान्य जनतेला शिक्षणाची कवाडं उघडी मिळाली.

याच हेतूने सातारा जवळ काले येथे ४ ऑक्टोंबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यावेळी नागनाथअण्णा नाईकवडी यांनी 1,11,111 रुपयांची देणगी दिली होती  मागास व गरीब मुलांना शिकता यावे, यासाठी संस्थेच्या माध्यमातून ‘कमवा व शिका’ योजना सुरू केली. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात मिळून संस्थेच्या एकूण 675 शाखा आहेत .भाऊराव पाटील यांनी क्रमिक शिक्षणाबरोबरच समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी ची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

वटवृक्ष ही त्यांच्या संस्थेचे बोधचिन्ह आहे. वटवृक्षाप्रमाणे त्यांच्या संस्थेच्या शाखा महाराष्ट्रात व कर्नाटकात पसरलेल्या आहेत. त्यांच्या संस्थेत वसतिगृहात राहणारी मुलं स्वतः काम करून शिक्षण घेत असतात म्हणूनच संस्थेची ब्रीद वाक्य ‘स्वावलंबी शिक्षण’ असेच ठेवले आहे. भाऊरावांना जनतेने त्यांचा कर्मवीर ही पदवी बहाल केली होती. एकदा ब्रिटिशांनी यांचं कार्य बघून काही डॉलर देण्याची तयारी दर्शवली परंतु कर्मवीर आपल्या विद्यार्थ्यांसह एक टेकडी फोडीत होते. त्यावेळी त्या खडी कडे बोट दाखवून कर्मवीरांनी ब्रिटीशांना उत्तर दिले की  ‘ते पहा , हेच आमचे डॉलर’ राहील अशा तऱ्हेने भाऊरावांनी डोंगर सपाट करून ज्ञानमंदिर उभी केली होती.

सातारातील वसतिगृह बांधताना भाऊरावांना पत्नीचे मंगळसूत्रही विकावं लागलं होतं. महाराष्ट्रातील शिक्षण संस्थेमध्ये ‘रयत शिक्षण’ संस्था ही एक नंबर वर असणारी संस्था आहे. त्यांनी अनाथ आश्रम, वसतिगृह उभारून गरीब अनाथ मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय केलेली आहे. 1924 मध्ये त्यांनी साताऱ्यात एक वसतिगृह काढली राजश्री शाहू महाराज यांचे नाव वसतीगृहास दिले.

1927 ला महात्मा गांधीजींनी वसतिगृहात भेट दिली होती. तेव्हापासून भाऊराव खादी कापड वापरून राजकरना पासून दूर राहून शिक्षण कार्यात स्वतःला वाहून घेतले. तरी मुलांना खेड्यापाड्यातून आणून त्यांनी त्यांना वसतिगृहात ठेवून पोटच्या पोराप्रमाणे त्यांना सांभाळलं होतं. भाऊ रावांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी भाऊरावांना त्यांच्या कार्यात सतत साथ दिली. दोन मुली आणि एक मुलगा त्यांना लाभला ,असून संस्थेचे संघटक आप्पासाहेब पाटील हीच भाऊरावांचे चिरंजीव होत.

अखेर

भाऊराव पाटील हे धिप्पाड देहाचे प्रभावी व्यक्तिमत्वाचे विलक्षण जिद्दीचे व धडाडीचे कार्यकर्ते होते. महात्मा फुले, राजश्री शाहू यांची शिक्षण प्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली .पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डिलीट’ ही सन्माननीय पदवी अर्पण केली. सद्गुरु गाडगे बाबांचे ही त्यांच्या रयत शिक्षण संस्थेला सहाय्य लाभले होते, त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रपती कडून ‘पद्मभूषण’ हा किताब ही मिळाला होता.

कर्मवीरांचे शिक्षण जास्त नव्हते. केवळ इंग्रजी सहावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. परंतु समाज सेवेची तळमळ त्यांच्या रक्तातच आली होती. सत्याने बोलणे भाऊरावांचा पिंड होता .महाराष्ट्रातील जनता प्रेमाने त्यांना अण्णा म्हणत. कर्मवीर भाऊराव पाटलांचे कार्य फारच महान होते. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणजे समाजातील दीनदुबळे गरीब जनता शिक्षणाच्या प्रवाहात आली होती.

राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, गाडगे महाराज, महात्मा गांधी ,डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर पडला होता. त्यातूनच ते थोर समाज सुधारक बनले होते आणि शाळांमध्ये शिक्षणाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणातून पटवून दिलं होतं. अस्पृश्यतेचा त्यांनी नेहमीच तिरस्कार केला. असे थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक ,कर्मवीर भाऊराव पाटील यांचं 9 मे 1959 रोजी देहावसान झाले, पण त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने आजही ते आपल्यात आहेत. 

आम्ही दिलेल्या karmaveer bhaurao patil information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कर्मवीर भाऊराव पाटील information about karmaveer bhaurao patil in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या karmaveer bhaurao patil jayanti या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि karmaveer bhaurao patil in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये karmaveer bhaurao patil yanchi mahiti Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!