Kasara Ghat Information in Marathi कसारा घाट मुंबईहून नाशिकला जाताना कसारा घाट पाहायला मिळतो. कसारा घाटाचे मूळ नाव “थळ घाट “असे आहे हे आपल्याला माहित होते का? घाटाची उंची तब्बल दोन हजार फूट इतकी आहे. कसारा घाटातून रेल्वे मार्ग जातो हे पाहताना खूपच मज्जा येते. हा रेल्वे मार्ग भारतातील सर्वाधिक वेगवान रेल्वे मार्ग आहे. घाट चढतांना डाव्या बाजूस दरी आणि उजव्या बाजूस उंच डोंगर आहे. त्यातल्या एका वळणावर एक अर्धवर्तुळाकार इग्लूच्या आकाराचे दगडी बांधकाम केलेले पाहायला मिळते.त्या घाटातून येताना जाताना आपल्याला ते बांधकाम दिसते.
पण घाटात थांबणे खूप धोक्याचे आहे कारण घाटात गाड्यांची खूप गर्दी असते. पावसाळ्यामध्ये कसारा घाट पाहण्यासारखा असतो. पावसाळ्यामध्ये या घाटाचे सौंदर्य एकदम खुलून दिसते. हे पाहण्यासाठी तेथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. पर्यटक तेथे फोटो काढतात, सेल्फी काढतात. या घाटाच्या आसपास बळवंत गड आणि त्रिंगलवाडीचा टेकही आहे.
कसारा घाट माहिती – Kasara Ghat Information in Marathi
कसारा घाट | माहिती |
जुने नाव | थळ घाट |
लांबी | ६८ किमी. कल्याणपासून |
कोठे आहे | महाराष्ट्रातील मुंबई-नाशिक मार्गावर |
पाहण्यासारखी ठिकाणे | भंडारदरा, कळसुबाई, अलंग, कुरुंगवाडी, त्र्यंबकेश्वर, अमृतेश्वर मंदिर, रंधा फॉल |
इग्लुच्या आकाराचे दगडी बांधकाम जवळ जाउन पाहिले तर आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण ते बांधकाम म्हणजे एक विहीर आहे. जवळपास तीस-पस्तीस फुट व्यासाची विहीर आहे. त्यात कचरा किंवा जंगली प्राणी पडू नये म्हणून दगडी बांधकाम करून त्याच्यावर टोपली सारखे छप्पर बांधलेले आहे. डोंगराच्या वरच्या बाजूला चार वस्त्या म्हणजे छोटी गावे आहेत. या चार वस्त्यांमधील महिला बांधकामात ठेवलेल्या खिडकीवजा खुल्या भागातून पाणी भरत असतात. जुन्या काळात या कसारा घाटातून प्रवास करणाऱ्या वाटसरूंना, यात्रेकरूंना घाटामध्ये विसावा मिळावा, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर व तिचे हे अर्धवर्तुळाकार इग्लुच्या आकाराचे केलेले दगडी बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी बांधले.
जवळपास अडीचशे वर्ष अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळास झाले. याचा अर्थ ही विहीर आणि बांधकाम अडीचशे वर्षापासून आहे. कडक उन्हाळ्यात या विहिरीला भरपूर पाणी असते. शिवाय इतक्या उंचावर या विहिरीला पाणी आहे हा सुद्धा एक चमत्कारच आहे असं वाटतो.
कसारा घाटात पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस असतो. आणि तेथे धुके पडलेले असते. पाऊस आणि धुक्यांचा तो रंगणारा खेळ पाहण्यास एक वेगळीच मजा असते. कसारा घाटात भावली धरण परिसरातील धबधबे, वैतरणा मार्गावरील हिरवाईने नटलेला प्रदेश, घाटन देवी परिसर, दारणा अशी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
कसारा घाटामध्ये जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावर आपल्याला इगतपुरी तालुका लागतो. या तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. या तालुक्यात अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. ऐतिहासिक धार्मिक ठिकाणे आहेत. पावसाळ्यात येथील डोंगर-दऱ्या व इतर सर्वत्र परिसर हिरवागार असतो. इगतपुरी तालुक्यात आपण भंडारदरा, कळसुबाई, अलंग, कुरुंगवाडी, त्र्यंबकेश्वर, अमृतेश्वर मंदिर, रंधा फॉल अशी अनेक ठिकाणे पाहू शकतो.
कसारा घाट फोटो
भंडारदरा :
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा हे एक छोटेसे गाव आहे. प्रवरा नदीच्या काठी वसलेले हे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण असून अनेक धबधबे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अधिकच भर टाकतात. सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगरकडे आणि दर्या पर्यटकांना विशेष आकर्षित करून घेतात. मुंबई नाशिक अहमदनगर पुण्यासारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या पर्यटन प्रेमीसाठी विकेंडच्या दृष्टिकोनातून भंडारदरा हा एक उत्कृष्ट उपाय आहे.
मुंबई आणि नाशिक घोटी मार्गे अनुक्रमे साडेतीन आणि दोन तासाच्या प्रवासानंतर आपण भंडारदर्याला पोहोचू शकतो. तसेच मुंबईच्या मध्य रेल्वेवरील कसारा स्थानकावर उतरून टॅक्सी किंवा प्रायव्हेट गाड्यांच्या मदतीने भंडारदरा करता येते. तसेच राज्य परिवहन मंडळाच्या बस गाड्यांची सोय आहे.
कळसुबाई शिखर :
कळसुबाई शिखराला ‘महाराष्ट्राचे माउंट एवरेस्ट’ असे म्हणतात. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. या कळसूबाई शिखराची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे पाच हजार चारशे फूट इतकी आहे. पुण्यापासून यांचे अंतर 180 किलोमीटर आहे. मुंबई नाशिकहुन घोटी भंडारदरा बारी मार्गे कळसुबाई शिखर सर करता येते. या शिखराला कळसूबाई हे नाव पडण्यामागे एक कथा आहे. ती म्हणजे कळसुबाई ही तेथील गावची सून होती. जंगलात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींची जाण असल्यामुळे संकटसमयी कळसुबाई गावकऱ्यांची सेवा करत असे. त्यामुळे गावकरी कळसुबाईला आपली देवता मानत असत. तिच्या मृत्यूनंतर तिच्या स्मृतींना जपण्यासाठी गावकऱ्यांनी या शिखराला कळसूबाई हे नाव दिले आणि तिचे देऊळ बांधले.
अमृतेश्वर मंदिर :
भंडारदरापासून बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या विविध आकर्षणापैकी एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलदीप अमृतेश्वर मंदिर. या मंदिरात पूर्ण दगडी बांधकाम केलेले आहे. मंदिराच्या भिंतीवर नक्षीकाम केलेले आहे. मुख्य गाभाऱ्यात मधोमध शिवलिंग असुन घुमटाकार छतावर ठरावीक अंतरावर नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा कोरल्या आहेत.
रंधा फॉल
शेंडी या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा आहे तो गावाच्या नावावरून रंधा फॉल म्हणून खूप प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजूने अजून एक धबधबा पाहायला मिळतो. दोन्ही धबधबे पुर्ण क्षमतेने वाहत असतात हे पाहणे हा एक रोमांचित करुन जाणारा अनुभव आहे.
कसारा घाट रात्रीच्या वेळी महाभयंकर असतो असे तेथील लोक म्हणतात. तिथल्या हायवेवरील कथा तेथील लोकांच्या कडून ऐकायला भेटतात.तेथील लोक म्हणतात की कोणी रात्रीच्या वेळी तिथे गेला की कोणी डोकं नसलेली बाई लिफ्ट मागते. कोणी म्हणतो तुम्ही तिथे गोल गोल घाटात फिरत बसता. भरपूर अपघात या कसारा घाटात झालेले आहेत असे तिथे राहणारी लोक सांगतात. अशीच एक घटना कसारा घाटातील वाचनात आली आहे.
एक माणूस टू व्हीलर घेऊन कसारा घाटातून संध्याकाळच्या वेळी प्रवास करायला निघाला होता. तेथील लोकांनी त्याला रात्रीच्या वेळी प्रवास करण्यापासून थांबवले पण तो कोणाचेही न ऐकता घाटातून प्रवास करू लागला. साधारण साडे अकराची वेळ ती बाहेर दाट किर झाडी, रातकिड्यांची आवाज, हवेत प्रचंड गारवा होता आणि हा गाडीवरून गाणं गुणगुणत चालला होता. अचानक वाटेमध्ये त्याला केस सोडलेली एक बाई दिसली. तिने त्याला पुढे थोड्या अंतरावर जायचे असे सांगून लिफ्ट मागितली. त्याने बिचारी एकटी बाई आहे.
असे समजून लिफ्ट दिली आणि पुढे थोड्या अंतरावर सोडले आणि तो प्रवासाला निघाला. पण पुढे परत तीच पाहिजे त्याला दिसली आणि लिफ्ट मागू लागली. असे तीन-चार वेळा घडले त्याने डोळे बंद केले आणि जोरात गाडी पळवली आणि नंतर तो बेशुद्ध झाला. पुढे जाऊन त्याला जेव्हा जाग आली तेव्हा तो एका ढाब्याजवळ होता. पहाट झाली होती. गाडी एका बाजूला आणि तो एका बाजूला पडलेला होता. नीट उठता येत नव्हते. हातापायाला गंभीर दुखापत झाली होती. अशा अनेक कसारा घाटातील कथा तेथील लोकांच्या कडून ऐकायला भेटतात.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, कसारा घाट kasara ghat information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. kasara information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about kasara ghat in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही कसारा घाटा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या kasara ghat images माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही kasara ghat in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट