कस्तुरबा गांधी यांची माहिती Kasturba Gandhi Information in Marathi

Kasturba Gandhi Information in Marathi कस्तुरबा गांधी भारताच्या स्वातंत्र्याबद्दल बोलायचे असेल तर त्यात सहभागी झालेल्या कित्येक महिला आठवतात. त्यातील एक म्हणजे कस्तुरबा गांधी. कस्तुरबा गांधी यांना लोक प्रेमाने ‘बा’ असे म्हणत. कस्तुरबा गांधी या महात्मा गांधी यांच्या धर्मपत्नी होत्या. भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या आंदोलनात कस्तुरबा गांधी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.कस्तुरबा गांधी या शिकलेल्या नव्हत्या. निरक्षर असूनही त्यांना चांगले काय वाईट काय ओळखण्याची तर्क बुद्धी होती.त्यांनी आयुष्यभर वाईट गोष्टींना न घाबरता खंबीरपणे सामना केला.

काही वेळा तर त्या महात्मा गांधीजींना पण सल्ला द्यायला मागे पुढे झाल्या नाहीत. महात्मा गांधी म्हणायचे की, जेवढे लोक माझ्या आणि कस्तुरबा यांच्या संपर्कात आहेत त्यातील जास्तीत जास्त लोकांची कस्तुरबा यांच्यावर श्रद्धा आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन आपले पती महात्मा गांधी आणि देश यांच्यासाठी व्यतीत केल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कस्तुरबा गांधी यांचे बहुमूल्य योगदान आहे.

kasturba gandhi information in marathi
kasturba gandhi information in marathi

कस्तुरबा गांधी यांची माहिती – Kasturba Gandhi Information in Marathi

नाव (Name)कस्तुरबा गांधी
जन्म (Birthday)11 एप्रिल 1869
जन्मस्थान (Birthplace)काठीयावाड मधील पोरबंदर नगर
वडील (Father Name)गोकुळदास माखनजी
आई (Mother Name)वज्र कुवर
पती (Husband Name)मोहनदास करमचंद गांधी
मुले (Children Name)हरीलाल आणि मणिलाल
मृत्यू (Death)22 फेब्रुवारी 1944
लोकांनी दिलेली पदवीबा

जन्म :

कस्तुरबा गांधी यांचा जन्म 11 एप्रिल 1869 साली काठीयावाड मधील पोरबंदर नगर मध्ये झाला. कस्तुरबा यांचे वडील गोकुळदास माखनजी एक व्यापारी होते. त्यांच्या आईचे नाव वज्र कुवर  होते. कस्तुरबा गांधी यांना दोन भाऊ होते. त्यावेळी  मुलींच्या शिक्षणाला तेवढे महत्व दिले जात न्हवते. मुलींची लग्नही कमी वयातच करत. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचे वडील चांगले मित्र होते. त्यांनी कस्तुरबा आणि महात्मा गांधी यांचे लग्न करायचा निर्णय घेतला.

कस्तुरबा 7 वर्ष्याच्या आणि महात्मा गांधी 6 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न ठरवले आणि कस्तुरबा 13 वर्ष्याच्या असताना त्या दोघांचे लग्न झाले. कस्तुरबा यांना सगळेजण “बा” म्हणत.  त्यांचे लग्न झाले त्यावेळी ते दोघेही तेरा वर्षाचे होते. गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात बा त्यांच्या बरोबर राहत. त्या खूप धार्मिक होत्या पण गांधीजींच्या प्रमाणे त्यांनी जातिभेदाचा त्याग केला. त्या शिकलेल्या नव्हत्या. गांधीजींनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले.

जीवन प्रवास:

लग्न झाल्यानंतर महात्मा गांधी आणि कस्तुरबा दोघे सन 1888 पर्यंत सोबत होते. कस्तुरबा गांधी राजकोट मध्ये महात्मा गांधी यांच्या परिवारासोबत राहत होत्या. त्यांच्या सासू-सासर्‍यांना मदत करत होत्या. लग्नांचे सुरुवातीच्या दिवसांमध्ये कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी एकमेकांना मित्र समजत होते. कस्तुरबा यांनी 1888 मध्ये आपला पहिल्या मुलाला जन्म दिला त्याचे नाव हरीलाल.

1892 मध्ये त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला त्याचे नाव मणिलाल. परंतु गांधीजींना शिक्षणासाठी इंग्लंडला जावे लागले त्यावेळी कस्तुरबा एकट्याच होत्या. त्यांनी गांधीजीच्या अनुपस्थित मुलांचे पालनपोषण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गांधीजी भारतात आले पण त्यांना लगेच दक्षिण आफ्रिकेला जावे लागले. त्यानंतर गांधीजी 1896 ला भारतात आले आणि कस्तुरबाला आपल्या सोबत घेऊन गेले. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजी एकवीस वर्ष राहिले. 

तिकडे गोर्‍या राजवटीने वर्णभेदाच्या आधारे भारतीयावर मोठ्या प्रमाणावर जुलूम चालवला होता. त्या जुलूमशाही विरोधात अहिंसक मार्गाने आवाज उठवून  लढा उभारला. दक्षिण आफ्रिका हा देश कस्तुरबा गांधी यांच्यासाठी अनोळखी देश होता. तेथील लोकांचे राहणीमान खूप वेगळे होते. सुरुवातीच्या काळात कस्तुरबांना तिथे राहणे खूप कठीण झाले होते. पण कस्तुरबा यांनी कठीण परिस्थितीचा सामना करत दक्षिण आफ्रिकेतील लोकांबरोबर मिळून मिसळून राहू लागले. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत कस्तुरबा महात्मा गांधीजी यांचे अनुसरण करायची. त्यांनी त्यांचे जीवन महात्मा गांधीजी सारखे साधी आणि साधारण बनवले.

कस्तुरबा महात्मा गांधीजींच्या प्रत्येक कामात त्यांच्या सोबत राहायची. गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी अनेक आंदोलने केली. त्या आंदोलनात त्यांनी उपवास केला त्यावेळी कस्तुरबा त्यांच्या सोबत राहून त्यांची काळजी घेत होती.

दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना कस्तुरबा यांनी खूप साथ दिली. दक्षिण आफ्रिकेमधील भारतीयासाठी झालेल्या आंदोलनामध्ये कस्तुरबा गांधी सहभागी होत्या. त्यावेळी त्यांना अटक केली गेली आणि त्यांना तीन महिने जेलमध्ये ठेवण्यात आले. तुरुंगातील जेवण व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी फलाहार करण्याचा निश्चय केला पण अधिकाऱ्यांनी ते मान्य केले नाही. मग कस्तुरबा गांधी यांनी जेलमध्ये उपोषण करायला सुरुवात केली. त्यांचे उपोषण पाहून अधिकाऱ्यांनाही त्यांच्यापुढे झुकावे लागले.

सन 1915 मध्ये कस्तुरबा गांधीजींच्या बरोबर भारतात परत आल्या. त्यांनी प्रत्येक क्षणी गांधीजींची साथ दिली. गांधीजी जेलमध्ये असताना त्यांची जागा कस्तुरबा गांधी यांनी घेतली. भारतात आल्यानंतर 1917 मध्ये गांधीजींनी बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात युरोपीय मने वाल्याकडून निळीच्या मळ्यात काम करणार्‍या मजुरांची होत असलेली पिळवणूक या विरोधात आंदोलन केले. चंपारण सत्याग्रहाच्या दरम्यान कस्तुरबाही गांधी यांच्या बरोबर होत्या आणि तेथील लोकांना अनुशासन, शिक्षण, साफसफाई याचे महत्त्व सांगू लागल्या. यादरम्यान गावोगावी फिरून त्या औषधाचे वाटपही करत होत्या. खेडा सत्याग्रहाच्या दरम्यान कस्तुरबा गावोगावी फिरून प्रत्येक घरातील स्त्रीला प्रोत्साहन देत होती.

सन 1922 मध्ये गांधीजींना अटक झाल्यानंतर कस्तुरबा गांधी यांनी वक्तृत्व दिलं. त्यांच्या अटके विरोधात विदेशी कपड्यांचा त्याग करण्याचा आव्हान दिलं. गांधीजींचा संदेश प्रसारित करण्यासाठी गुजरात मधील प्रत्येक गावी त्या फिरत होत्या. दांडी आणि धारासना  नंतर गांधीजींना अटक करण्यात आली त्यावेळी कस्तुरबा गांधी यांनी गांधीजींचे स्थान घेऊन लोकांचे मनोबल वाढवू लागल्या. 1939 मध्ये राजकोट च्या राजाच्या विरोधात झालेल्या सत्याग्रहातही कस्तुरबा सहभागी झाल्या होत्या.

मृत्यू :

भारत छोडो आंदोलनच्या वेळेला इंग्रज सरकारने महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांना 9 ऑगस्ट 1942 ला अटक केली. महात्मा गांधी यांच्या अनुपस्थिती कस्तुरबा गांधी यांनी मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये भाषण करण्याचा निर्णय घेतला. पण तिथे पोचल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली  त्यावेळी त्या पार्कमध्ये एक लाखापेक्षा जास्त लोक उभे होते. त्यांना अटक होताना पाहून लोक खूप अडकले होते. कस्तुरबा गांधी यांना बॉम्बे ऑर्थररोड जेलमध्ये पाठवण्यात आले. पण तो जेल अस्वच्छ असल्यामुळे त्या सारख्या आजारी पडू लागल्या. म्हणून त्यांना पुण्याच्या आगा खा महल मध्ये पाठवण्यात आले. गांधीजीनाही तिथे ठेवण्यात आले होते. अटक झाल्यानंतर त्यांची तब्येत बिघडत होती त्यांच्यामध्ये काही सुधारणा होत नव्हती.

जानेवारी 1944 मध्ये कस्तुरबा गांधी यांना दोन वेळा हृदयविकाराचा त्रास झाला. सरकारने त्यांच्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर ची सोय केली. त्यामुळे त्यांना थोड्यावेळासाठी आराम भेटला पण 22 फेब्रुवारी 1944 ला परत हृदयविकाराचा त्रास चालू झाला आणि त्यावेळी कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले.

आम्ही दिलेल्या kasturba gandhi information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कस्तुरबा गांधी biography of kasturba gandhi in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kasturba gandhi marathi mahiti या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kasturba gandhi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kasturba gandhi information in marathi  Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!