केंजळगड किल्ला माहिती Kenjalgad Fort Information in Marathi

kenjalgad fort information in marathi केंजळगड किल्ला माहिती, महाराष्ट्रामधील किल्ल्याचा इतिहास हा खूप मोठा आहे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत आणि यामधील एक किल्ला म्हणजे केंजळगड किल्ला आणि आज आपण या लेखामध्ये केंजळगड किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. केंजळगड हा किल्ला गिरिदुर्ग किंवा डोगरी प्रकारातील किल्ला असून हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी आहे.

काही इतिहासकारांच्यामते असे म्हटले जाते कि केंजळगड हा किल्ला १२ व्या शतकामध्ये पन्हाळ्याच्या भोज राज्याने बांधला आहे. जरी किल्ल्याचे प्रवेशद्वार हे इंग्रजांनी उद्वस्त केले असले तरी या किल्ल्याच्या आवारामध्ये सहा लहान आणि तीन मोठ्या अश्या पाण्याच्या टाक्या आहेत तसेच केंजळ देवीची मूर्ती देखील आहे. 

आणि त्याचबरोबर या किल्ल्यावर एक कचेरी किंवा सरदार खोली आपल्याला जीर्ण अवस्थेत पाहायला मिळते. केंजळगड या किल्ल्याला घेरा खेलंजा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते आणि या किल्ल्याची उंची ४२७३ फुट इतकी असून या किल्ल्याचा आकार समभूज चौकोनामध्ये आहे.

kenjalgad fort information in marathi
kenjalgad fort information in marathi

केंजळगड किल्ला माहिती – Kenjalgad Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावकेंजळगड किल्ला किंवा घेरा खेलंजा किल्ला
फुट इतकी असून ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई
केंव्हा बांधला१२ व्या शतकामध्ये
कोणी बांधलापन्हाळ्याचा भोज राजा
किल्ल्याची उंची४२७३ फुट
पायथ्याचे गावकोरले, केंजळ

केंजळगड किल्ल्याचा इतिहास – kenjalgad history in marathi

केंजळगड या किल्ल्याविषयी फारशी अशी जरी माहिती नसली तरी काही इतिहासकरांच्या मते केंजळगड हा किल्ला १२ व्या शतकामध्ये पन्हाळ्याचा भोज राजाने बांधला आहे. इ.स १६४८ मध्ये या किल्ल्यावर विजापूरचा आदिल शहा याने हल्ला केला आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला किंवा किल्ला जिंकला.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील अनेक किल्ले घेण्यास सुरुवात केली होते आणि त्यांनी वाई भोर भागातील देखील अनेक किल्ले ते आपल्या हातात घेत होते आणि त्यांनी केंजळगड किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला आणि हा किल्ला त्यांनी १६७४ मध्ये आपल्या ताब्यात घेतला होता.

१७०१ मध्ये औरंगजेबाने अनेक किल्ले आपल्याला ताब्यात घेतले होते आणि केंजळगड किल्ला देखील त्याने १७०१ मध्ये आपल्या ताब्यात घेतला होता परंतु मराठा सैनिकांनी १७०२ मध्ये परत हा किल्ला आपल्या मराठा साम्राज्यामध्ये सामील करून घेतला आणि त्यानंतर हा किल्ला १८१८ पर्यंत मराठी साम्राज्याकडेच राहिला.

१८१८ मध्ये इंग्रज भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतातील तसेच महाराष्ट्र राज्यातील देखील अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली आणि त्यांनी केंजळगड किल्ला देखील आपल्या तब्यत घेतला.

केंजळगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे – what to see in fort

  • किल्ल्यावर एकूण ९ टाक्या आहेत आणि त्यामधील तीन टाक्य ह्या मोठ्या आकाराच्या म्हणजेच सुमारे चाळीस फुट चौरस फुट लाम आहेत तर इतर सहा टाक्या ह्या लहान आकाराच्या आहेत आणि त्याचा पूर्वीच्या काळी पाणी साठवण्यासाठी आणि धान्य साठवण्यासाठी वापर केला जात होता.
  • त्याचबरोबर किल्ल्यावर एक केंजळ देवीची मूर्ती देखील आहे  आणि त्याचबरोबर या किल्ल्यावर एक कचेरी किंवा सरदार खोली आपल्याला जीर्ण अवस्थेत पाहायला मिळते.
  • किल्ल्याच्या उत्तरेकडील भागामध्ये एक उत्कृष्ट पाणी असलेली एक गुहा आहे आणि हि गुहा पूर्वी पाणी साठवण्यासाठी वापरली जात असावी कारण या किल्ल्यावर कोणतेही जिवंत झरे नाहीत.

केंजळगड किल्ल्यावर कसे जायचे – how to reach

या किल्ल्याजवळचे सर्वात जवळचे मुख्य शहर पुणे हे आहे त्यामुळे पुणे या शहरामध्ये बसने, ट्रेनने आणि विमानाने येऊ शकता आणि मग तेथून टॅक्सीने आणि बसने तीटेघर, कोरले आणि आंबवडेला जाऊ शकता. पायथ्याच्या गावामध्ये जाऊन तेथून किल्ल्यावर चढण्यासाठी ट्रेक चालू करू शकता.

केंजळगड किल्ला ट्रेक विषयी माहिती – kenjalgad information in marathi

केंजळगड हा किल्ला वाई – भोर जवळ स्थित असलेला एक सुंदर किल्ला आहे. जो दिवसा किंवा रात्रीच्या ट्रेकसाठी योग्य आहे आणि हा मध्यम दर्जाच्या चढाई श्रेणीचा ट्रेक किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठीची वाट हि घनदाट जंगलातून आणि खडकांच्या पायऱ्यामधून जाते.

कोरले आणि केंजळ हि गडाच्या पायथ्याशी असणारी गावे आहेत आणि केंजळ गावातून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी अर्धा पाऊण तास लागतो. गडावर जाताना ट्रेकर्सनी पुरेसे अन्न आणि पाणी घेऊन जाणे खूप गरजेचे असते.

टिप्स

  • केंजळगड किल्ल्यावर जाण्यासाठी १ तास लागतो म्हणजे आपण हा गड पाहण्यासाठी गेल्यानंतर आपल्या एक दिवस जाऊ शकतो.
  • केंजळगड किल्ल्यावर जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे तुम्ही तुमच्यासोबत जेवण आणि पिण्याचे पाणी घेवून जा.
  • केंजळगड किल्ल्यावर राहण्याची देखील सोय नाही परंतु तुम्ही गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावामध्ये एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये वस्ती राहू शकता.
  • केंजळगडाच्या आजूबाजूचे गावे हि खूपच दुर्गम असल्यामुळे जर तुमच्या गटामध्ये स्त्रिया असल्यास सुरक्षितता निश्चित करण्यासाठी तुमचा मोठा गट असल्याची खात्री करा.
  • केंजळगडाचा ट्रेक हा खूप सोपा आहे आणि या गडाचा ट्रेक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण किंवा अनुभवाची गरज नाही.
  • नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या कालावधी मध्ये तुम्ही केंजळगडाला भेट देण्याचे नियोजन करू शकता.
  • केंजळगड किल्ल्यावर वर्षभर जाता येते परंतु शक्यतो केंजळगडावर पावसाळ्यामध्ये जाणे टाळले तर ते आपल्यासाठी चांगले आहे आणि तुम्ही पावसाळा झाल्यानंतर लगेच केंजळगडावर जाऊ शकता.

आम्ही दिलेल्या kenjalgad fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर केंजळगड किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kenjalgad history in marathi या kenjalgad information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about kenjalgad in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kenjalgad wikipedia in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!