पुणे शहराची माहिती Pune Information in Marathi

pune information in marathi – pune district information in marathi पुणे शहराची माहिती, आज आपण या लेखामध्ये भारतातील लोकसंखेसाठी सातव्या क्रमांकावर असणारे पुणे या शहराविषयी माहिती पाहणार आहोत. पुणे हे शहर महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकावरील मोठे शहर आहे आणि पुणे या शहराविषयी कोणाला माहित नाही कारण हे सर्वांच्याच परिचयाचे शहर आहे कारण या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय चालत असल्यामुळे या शहरामध्ये देशभरातून अनेक लोक नोकरी शोधण्यासाठी येत असतात. महाराष्ट्र राज्यातील मुंबई हे प्रथम मोठे शहर आहे.

तर मुंबई या शहरानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर हे पुणे शहर आहे आणि पुणे या शहराचे एकूण क्षेत्रफळ हे ३३१.६४ चौरस किमी इतके आहे आणि या शहराची लोकसंख्या अंदाजे ६.९९ दशलक्ष इतकी आहे.

पुणे हे शहर आर्थिक आणि औद्योगिक वाढीच्या दृष्टीने खूप महत्वाचे शहर आहे. भारताच्या स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेल्या १०९ या शहरांच्यामध्ये पुणे हे शहर देखील समाविष्ट आहे आणि ऐतिहासील काळामध्ये पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख होती.

पुणे या शहरामध्ये अनेक महाविद्यालये आहेत तसेच विद्यापीठे असलेले एक प्रतिष्ठित शैक्षनिक ठिकाण आहे आणि या शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असा मान देखील मिळाला आहे तसेच पुणे हे शहर नाट्य, क्रीडा, शास्त्रीय संगीत आणि साहित्य या सारख्या संसंकृतिक क्रीयाकालापांच्या साठी देखील ओळखले जाते. त्याचबरोबर पुणे हे मजबूत औद्योगिक पाया असणारी सातव्या क्रमांकाचे महानगरी म्हणून ओळख मिळाली आहे तसेच या शहराला भारतामधील सहाव्या क्रमांकाचे दरडोई उत्पन्न आहे.

हे शहर सॉफ्टवेअर आणि आयती सेवांचे प्रमुख क्षेत्र आहे तर अॅटोमोबईल आणि आयटी क्षेत्र हे प्रमुख उद्योग क्षेत्र म्हणून उदयास आली आहेत त्यामुळे या शहरामध्ये अलीकडच्या वर्षामध्ये नेत्रदीपक आर्थिक वाढ आपल्याला पहायला मिळते.

pune information in marathi
pune information in marathi

पुणे शहराची माहिती – Pune Information in Marathi

शहराचे नावपुणे
राज्यमहाराष्ट्र
शहराचे क्षेत्रफळ३३१.६४ चौरस किमी
लोकसंख्याशहराची लोकसंख्या अंदाजे ६.९९ दशलक्ष इतकी आहे
ऐतिहासिक ठिकाणेशनिवार वाडा, आगा खान पॅलेस, विश्रामबाग वाडा, गांधी राष्ट्रीय स्मारक, पार्वती टेकडी आणि सिंहगड

पुणे शहराचा इतिहास – pune history in marathi

पुण्याचा इतिहास हा ८ व्या शतकामध्ये सापडतो आणि हे शर पूर्वी पुन्निका म्हणून ओळखले जात आणि त्या काळामध्ये राष्ट्रकुटांचे राज्य होते आणि हा प्रदेश विशेषता कृषी वस्ती होता. नंतर १७ व्या शतकामध्ये पुणे हे शहर महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमुख तळापैकी एक बनले आणि नंतर हे पेशव्यांच्या सत्तेचे आसन देखील बनले आणि त्यांच्या राजवटीच्या काळामध्ये या शहरामध्ये अनेक मंदिरे, शैक्षणिक संस्था तसेच उद्याने झाली.

पुणे शहरातील सण – festivals 

पुणे हे शहर संस्कृती जपणारे शहर म्हणून ओळखले जाते आणि या शहराला ऐतिहासील काळामध्ये पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख होती. पुणे या शहरामध्ये अनेक वेगवेगळ सन साजरे केले जातात जसे कि गुढी पाडवा, होळी, मकर संक्रांत, गोकुळ अष्टमी, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी.

पुणे शहरातील अन्न पध्दती – food 

हे शहर पर्यटकांच्यासाठी आणि विशेष करून खाद्यप्रेमींच्यासाठी स्वर्गच मनाला जातो. पुणे शहरातील मिसळ पाव, पावभाजी, वडापाव, साबुदाणा वडा, भाकरवड्या आणि कचोरी हे तेथील काही प्रसिध्द स्ट्रीट फूड खाद्य आहे. तुम्ही महाराष्ट्रीयन, कोल्हापुरी, उडपी या सारखे भारतीय जेवण तसेच जपानी, इटालियन या सारख्या अंतरराष्ट्रीय जेवणाचा देखील आनंद तुम्ही पुणे शहरामध्ये घेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही श्रुसबरी बिस्किटे, वडापाव, आणि महाराष्ट्रीयन थाळी या सारख्या प्रसिध्द देशी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय तुमची पुण्याची भेट हि अपूर्णच राहील.

पुणे जिल्हा माहिती – pune jilha information in marathi

पुणे पाहाण्यासारखी ठिकाणे आणि आजूबाजूची पर्यटन स्थळे – tourist places to visit in pune

  • शनिवार वाडा : शनिवारवाडा हि एक प्राचीन आणि ऐतिहासिक इमारत आहे जी पुणे या शहरामध्ये वसलेले आहे. शनिवार वाडा हा एक किल्ला आहे आणि हा पुणे या शहरामध्ये १७३२ मध्ये मराठा साम्राज्याचा राज्यकारभार सांभाळणाऱ्या पेशव्यांनी बांधला आहे आणि याच ठिकाणी पेशव्यांचा मुक्काम देखील होता.
  • आगा खान पॅलेस : आगा खान पॅलेस हि देखील पुण्यातील एक ऐतिहासिक प्रमुख खून आहे आणि हा पॅलेस १८९२ मध्ये सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरा याने बांधला.
  • सिंहगड किल्ला : सिंहगड हा किल्ला देखील पुणे या शहरापासून खूप जवळ आहे आणि ह्या किल्ल्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जोडलेले आहे हे सर्वांनाच माहित आहे. सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोणजे गावामध्ये आहे. सिंहगड हा किल्ला पुण्यापासून ३० ते ३५ किलो मीटर आहे.
  • सिंहगड हा किल्ला मराठा साम्राज्याचा गौरव म्हणून ओळखला जाणारा किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्र मधील यादव किवा शिलाहार यांनी बांधला असावा असे काही इतिहासकारांच्या मते म्हटले जाते. किल्ल्यावर आपण तानाजी मालुसरे स्मारक, कोंडानेश्वर मंदिर, देवटाके, तानाजी कडा, राजाराम स्मारक, अमृतेश्वर मंदिर, कल्याण दरवाजा, उदयभानाचे स्मारक या सारखी ठिकाणे पाहू शकतो.
  • पार्वती टेकडी : पार्वती टेकडी हे देखील निसर्गरम्य, सुंदर आणि आकर्षक असे ठिकाण आहे. पार्वती टेकडी हि समुद्र सपाटी पासून २१०० फुट उंचीवर आहे आणि या ठिकाणी अनेक लोक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जातात.
  • इतर ठिकाणे : पुणे शहरापासून लोणावळा, खंडाळा, जेजुरी, जवळ आहेत तसेच पुणे शहरामध्ये राजा दिनकर केळकर संग्रहालय, विश्रामबाग वाडा, गांधी राष्ट्रीय स्मारक हे पाहण्यासाठी ठिकाणे आहेत.

पुणे या शहरामध्ये कसे पोहचायचे – how to reach 

पुणे हे शहर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांची चांगल्या वाहतूक मार्गाने जोडले आहे त्यामुळे आपण या शहरामध्ये बसने, रेल्वेने किंवा विमानाने अश्या तिन्ही पर्यायांनी येऊ शकतो. आपण जर पुण्याला बसने जाणार असाल तर तुम्हाला भारताच्या अनेक प्रमुख शहरातून पुण्याला जाण्यासाठी बस मिळतील. तसेच पुण्यामध्ये विमानतळ देखील आहे जे शहरापासून १० ते १२ किलो मीटर अंतरावर आहे आणि आपण बेळगाव, मुंबई, बेंगलोर, चेन्नई या शहरातून पुणे या शहरामध्ये विमानाने ययेऊ शकतो तसेच ट्रेनने देखील आपण या शहरामध्ये येऊ शकतो.

pune wikipedia in marathi

आम्ही दिलेल्या pune information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पुणे शहराची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pune history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि pune district information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pune wikipedia in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!