खैरलांजी हत्याकांड Khairlanji Hatyakand Information in Marathi

khairlanji hatyakand information in marathi खैरलांजी हत्याकांड, खैरलांजी हत्याकांड हे महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी या गावामध्ये घडलेली एक घटना आहे ज्यामध्ये एका कुटुंबातील लोकांची गावातील काही लोकांनी मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि हि घटना २९ सप्टेंबर २००६ मध्ये घडली होती आणि आज आपण या लेखामध्ये खैरलांजी हत्याकांड विषयी माहिती पाहणार आहोत.

khairlanji hatyakand information in marathi
khairlanji hatyakand information in marathi

खैरलांजी हत्याकांड – Khairlanji Hatyakand Information in Marathi

हत्याकांडातील सुरेखा भोतमांगे यांची कौटुंबिक माहिती आणि हत्याकांडाचे मूळ

खैरलांजी या गावामध्ये सुरेखा भोतमांगे या महार जातीमधील एक सुशिक्षित महिला राहत होत्या आणि त्यावेळी महार हा जातीचा गट भारतीय जातीव्यवस्थेमध्ये एक गुंतागुंतीचा गट होता आणि त्यावेळी सुरेखा भोतमांगे हि सुशिक्षित असल्यामुळे तिने त्यांच्या जाती विषयी होणाऱ्या अन्यायाविरुध्द खैरलांजी या गावामध्ये आवाज उठवला.

इतर अनेक दलित स्त्रिया आणि सुरेखा हिचे जीवन आणि परिस्थिती हि खूप वेगळी होती म्हणजेच तिच्या कडे चांगले शिक्षण होती आणि तिने स्वताची आर्थिक संसाधने वापरून आपले जीवन आणि कुटुंब चालवले होते.

त्यांच्या घरामध्ये ५१ वर्षाचे पती भैयालाल, त्यांची २ मुले सुधीर २१ वर्षाचा आणि रोशन १९ वर्षाचा होता तसेच त्यांना एक मुलगी देखील होती जी १७ वर्षाची होती आणि तिचे नाव प्रियांका होते.

सुरेखा हि सुशिक्षित असल्यामुळे ती समृध्दी आणि सामाजिक गतीशिलतेकडे कल वाढला त्याचवेळी त्या ठिकाणी असणाऱ्या कुणबी मराठ्यांना ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय म्हणून वर्गीकृत करण्यात आले आणि त्यावेळी त्यांना हे अनाकलनीय वाटले आणि सुरेखा हि दलित असून देखील तिने समृध्दीचे कोणाडे गाठत आहे हे देखील चांगले वाटले नाहीत.

हत्याकांडाचे मूळ

सुरेखा यांची आणि त्यांच्या मुलांची होणारी प्रगती हि त्या ठिकाणी असणाऱ्या काही कुणबी मराठ्या बगवली नाही आणि म्हणून त्यांचा विरोध करण्यासाठी म्हणून सुरेखा यांच्या कडे असणाऱ्या शेतजमिनीवर कुणबी मराठ्यांनी त्यांच्या शेतजमिनीवर रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला आणि यातून मोठा जमिनीचा वाद उफाळून निघाला.

ज्यावेळी त्यांच्या जमिनीवर रस्ता बांधण्याचा प्रयत्न होत होता त्यावेळी त्यांनी कडकडून विरोध केला आणि त्या यशस्वी देखील झाल्या परंतु परत काही गावातील लोकांनी सुडाच्या भावनेने तिच्या शेतामध्ये बैलगाड्या सोडल्या आणि त्यांची शेतातील सर्व पिक नष्ट केले, परंतु त्या पुन्हा न घाबरता तातडीचे स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

३ सप्टेंबर २००६ मध्ये भोतमांगे परिवाराचा मित्र सिध्दार्थ आणि पोलीस हवलदार यांच्यावर हल्ला झाला आणि त्यामुळे वाद आणखीनच वाढला परंतु सिध्दार्थ कायमच भोतमांगे परिवारासोबत उभा राहिला आणि त्याने एससी / एसटी कायदा वापरण्याची धमकी देखील दिली.

खैरलांजी हत्याकांड

२९ सप्टेंबर २००६ हा दिवस भोतमांगे कुटुंबांसाठी एक काळा दिवस होता हे म्हटले तरी ते कमीच आहे कारण या दिवशी सुरेखा भोतमांगे यांच्या कुटुंबावर खैरलांजी या गावातील काही लोक आणि महिला अश्या ७० जणांनी त्यांच्या घराला वेढा घातला आणि ज्यावेळी वेढा घातला.

त्यावेळी त्यांच्या घरामध्ये सुरेखा, तिची दोन मुले आणि प्रियांका हि त्यांची मुलगी होती आणि त्यांचे पती भैयालाल हे शेतामध्ये काम करत होते. त्यांच्या घरामध्ये गुसलेल्या लोकांनी त्यांच्यावर खूप अन्याय केला. सुरेखा आणि प्रियांकाला विवस्त्र करून बैलगाडीला बांधून गावातून नग्न प्रदक्षिणा काढली.

तसेच सुधीर आणि रोशन यांना स्वताच्या बहिणीवर आणि आईवर बलत्कार करण्यास भाग पाडण्यासाठी एक अशक्य पर्याय दिले त्यावेळी त्या दोघांनी नकार दिला आणि त्या दोघांनी नकार दिल्यानंतर त्यांचे गुप्तांग तोडण्यात आले तसेच त्यांना खूप मारण्यात आले.

तसेच सुरेखा आणि प्रियांका यांना मारण्यापूर्वी त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करून त्यांना मारले गेले आणि त्यांचे नग्न मृतदेह त्यांच्या घराजवळच्या कालव्यात टाकले. या सर्व गोष्टींपासून भैयालाल मात्र वाचला.  

खैरलांजी हत्याकांड हे ज्यावेळी गावातील इतर लोकांनी शेतातून रस्ता करताना त्यांचा विरोध केला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी हे केले होते असे म्हटले जाते.

२००६ च्या हत्याकांडनंतर दलित समाज न्यायहक्कासाठी एकवटला

खैरलांजी या गावातील हत्याकांड प्रकरणामुळे या गावामध्ये व्यापक प्रमाणात संताप निर्माण झाला आणि याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निदर्शने झाली, म्हणजेच मुंबई आझाद मैदानावर २००६ मध्ये चार हजारहून अधिक अनुसूचित जातीच्या लोकांचा जमाव भरला होता.

त्याचबरोबर २३ नोव्हेंबर २००६ मध्ये चंद्रपूर जवालाच्च्या जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या लोकांनी खैरलांजी हत्याकांडाला प्रतिसाद देण्यासाठी स्वताचा निषेध आयोजित केला होता.

खैरलांजी हत्याकांड विषयी काही महत्वाची माहिती – information about khairlanji hatyakand in marathi

  • खैरलांजी हत्याकांड आणि खुण प्रकरणाविषयी त्यावेळी पोलिसांनी गावातील ४५ ते ४७ लोकांना अटक केले होते आणि त्यामधील अकरा जणांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.
  • या प्रकरणामध्ये जे दोषी असतील अश्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी अशी अनेक अनुसूचित लोकांची इच्छा होती.
  • खैरलांजी हत्याकांड नंतर या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला.
  • सुरेखा भोतमांगे यांचे पती हे या सर्व घटनेच्या वेळी शेतामध्ये गेलेले असल्यामुळे त्यांचा या सर्व प्रकारातून बचाव झाला परंतु ह्या सर्व भयानक घटनेचे ते एक साक्षीदार होते.
  • खैरलांजी हत्याकांड हे सायंकाळच्या वेळी गावातील लोकांच्यामार्फात भोतमांगे कुटुंबावर झाले.
  • खैरलांजी हत्याकांडाचे एकमेव साक्षीदार सुरेखा भोतमांगे यांचे पती भैयालाल यांचे निधन २०१७ मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

आम्ही दिलेल्या khairlanji hatyakand information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर खैरलांजी हत्याकांड माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या khairlanji hatyakand news in marathi या khairlanji hatyakand full story in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about khairlanji hatyakand in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये khairlanji hatyakand story in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!