Kharvas Recipe in Marathi खरवस रेसिपी मराठी खरवस हि एक पारंपारिक महाराष्ट्रीयन गोड डिश आहे जे म्हशी किंवा गाई विल्यानंतर तिचे त्यांचे जे २ ते ३ दिवस दुध निघते ते खूप घट्ट असते आणि त्याला चिक्क म्हणतात आणि त्या चीक्का पासून खरवस बनवला जातो. खरवस हा गोड आणि इतका मऊ असतो कि खाताना त्याची मजा एक वेगळीच असते. खरवस हा पदार्थ जास्ती करून खेडेगावामध्ये केला जातो कारण गाई किंवा म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणात खेडेगावामध्ये केले जाते. बहुतेक लोकांना हा पदार्थ आवडत असल्यामुळे ते हा पदार्थ आवडीने बनवतात आणि खातात देखील.
खरवस हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा बनवताना चिक्कामध्ये साधे दुध मिक्स करून त्यामध्ये गुळ विरघळला जातो आणि मग त्यामध्ये सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालून ती मिक्स केली जाते.
आणि ते एका डब्यामध्ये घालून त्याला झाकण लावून ते कुकरमध्ये किंवा स्टीमर मध्ये शिजवले जाते. आता आपण बनवण्यासाठी खूप सोपा आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारा खरवस कसा बनवायचं ते पाहूयात.
खरवस रेसिपी मराठी – Kharvas Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ ते ६ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन ( भारतीय ) |
बनवण्याची पद्धत | खूप सोपी |
खरवस म्हणजे काय ?
खरवस बनवताना चिक्कामध्ये साधे दुध मिक्स करून त्यामध्ये गुळ विरघळला जातो आणि मग त्यामध्ये सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालून ती मिक्स केली जाते आणि ते एका डब्यामध्ये घालून त्याला झाकण लावून ते कुकरमध्ये किंवा स्टीमर मध्ये शिजवले जाते.
- चिक्क : खरवस बनवण्यासाठी चिक्क हा एक महत्वाचा घटक आहे. म्हशी किंवा गाई विल्यानंतर तिचे त्यांचे जे २ ३ दिवस दुध निघते ते खूप घट्ट असते आणि त्याला चिक्क म्हणतात. या चीक्कामध्ये साधे दुध आणि गुळ मिक्स केले जाते आणि ते शिजवले जाते.
- गुळ : खरवस बनवताना आपण त्यामध्ये गुळ देखील वापरतो कारण गुळामुळे खरवसला गोड चव येते.
- सुंठ आणि वेलची पावडर : खरवस बनवताना जर आपण सुंठ पावडर आणि वेलची पावडर त्यामध्ये घातली तर खार्वासला खमंग वास येतो आणि चवीला देखील छान लागते.
खरवस रेसिपी – how to make kharvas
खरवस रेसिपी हि भारतातील पारंपारिक डिश आहे म्हणजेच हि डिश भारतामध्ये खूप आधीपासून केली जाते. खरवस हा एक गोड पदार्थ आहे जो म्हशी किंवा गाई विल्यानंतर तिचे त्यांचे जे २ ते ३ दिवस दुध निघते ते खूप घट्ट असते आणि त्याला चिक्क म्हणतात त्या चीक्का पासून बनवला जातो. चला तर मग आता आपण खरवस कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ ते ६ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन ( भारतीय ) |
बनवण्याची पद्धत | खूप सोपी |
खरवस बनवण्यासाठी चिक्क, गुळ, साधे दुध आणि काही इतर साहित्य लागते आणि हा पदार्थ मोजक्याच साहित्यात बनतो. चला तर आता आपण खरवस बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- अर्धा लिटर चिक्क.
- अर्धा लिटर दुध.
- १ वाटी खिसलेला गुळ.
- १/२ चमचा सुंठ पावडर.
- अर्धा चमचा वेलची पावडर.
खरवस हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि रेसिपी खूप कमी वेळामध्ये म्हणजे ३० ते ३५ मिनिटामध्ये बनते. आता आपण वर दिलेले साहित्य वापरून खरवस रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
- खरवस रेसिपी बनवताना सर्वप्रथम गुळ बारीक किसून किंवा चाकूने बारीक पाडून म्हणजे दुधामध्ये गुळ चांगला विरघळेल.
- तुम्हाला जर कुकरमध्ये किंवा स्टीमर मध्ये खरवस शिजवायचा नसेल तर खरवस ज्या डब्यामध्ये शिजवणार आहात तो दाबा ज्या भांड्यामध्ये अगदी सहजपणे बसेल असे भांडे घ्या आणि मग त्यामध्ये पाणी घालून त्यात एक वाटी ठेवा किंवा तुमच्या कडे स्टँड असल्यास स्टँड ठेवा. आणि आता ते भांडे थोडा वेळ बाजूला ठेवा.
- आता एका भांड्यामध्ये अर्धा लिटर चिक्क घ्या आणि त्यामध्ये अर्धा लिटर दुध घाला आणि आणि ते चांगले मिक्स करा. मग त्यामध्ये खिसलेला गुळ घाला आणि ते दुध गुळ विरघळूपर्यंत हलवत रहा.
- एकदा त्यामधी गुल विरघळला कि त्यामध्ये वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालून ते चांगले मिक्स करा.
- हे मिश्रण थोडे थोडे करून झाकण असलेल्या दोन डब्यामध्ये घाला आणि मग पहिला एक दाबा शिजवून घ्या.
- खरवस शिजवण्यासाठी आपण जे भांडे पाणी घालून ठेवले आहे त्यामध्ये स्टँडवर किंवा वाटीवर तो डबा ठेवा आणि ते भांडे गॅसवर ठेवा आणि त्याला गच्च झाकण लावून हा खरवस मध्यम आचेवर २५ ते ३० मिनिटे शिजवून घ्या.
- २५ ते ३० मिनिटांनी झाकण उघडून त्यामध्ये सुरु घालून पहा जर सुरीला दुध लागले तर खरवस अजून शिजला नसेल आणि जर सुरुला दुध लागले असेल तर खरवस शिजला असेल.
- खरवस शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि भांड्यामधील डबा बाहेर काढा आणि तो थोडा गार होऊ द्या.
- खरवस गार झाल्यानंतर त्याच्या हव्या तश्या वड्या पडून घ्या.
- आपला पारंपारिक गोड खरवस खाण्यासाठी तयार झाला.
- हा खरवस आपण फ्रीजमध्ये गार करून देखील खावू शकतो.
खरवस कसा सर्व्ह करावा – serving suggestions
खरवस आपण तसाच शिजवल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून गरमागरम खावू शकतो किंवा मग फ्रीजमध्ये गार करून खावू शकतो.
टिप्स (Tips)
- खरवस शिजवताना त्यावर वरती केशर देखील घातले तरी चालेल.
- खरवस बनवताना आपण त्यामध्ये साखर घालून देखील बनवू शकतो परंतु गुळ घालून बनवलेला खरवस जास्त छान लागतो.
- सुंठ पावडर तुम्हाला आवडत नसेल तर ती घातली नाही तरी चालते.
आम्ही दिलेल्या kharvas recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर खरवस रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या instant kharvas recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kharvas recipe in marathi by madhura माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kharvas benefits in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट