कुंभलगड किल्ला Kumbhalgarh Fort Information in Marathi

kumbhalgarh fort information in marathi कुंभलगड किल्ला माहिती, आपल्या भारतामधील राजस्थान या राज्यामध्ये अनेक वेगवेगळे आणि मोठे किल्ले आहेत जसे कि अजमेर किल्ला, जैसलमेर किल्ला, चित्तोरगड किल्ला, रणथंबोर किल्ला आणि बाला किल्ला असे अनेक किल्ले आहेत आणि त्यामधील एक पर्यटकांचे आकर्षण असणारा किल्ला म्हणजे कुंभलगड किल्ला आणि आज आपण या लेखामध्ये कुंभलगड किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

कुंभलगड हा किल्ला भारतातील राजस्थान राज्यातील राजसमंद जिल्ह्यामध्ये वसलेला आहे आणि हा किल्ला राजस्थानमधील मुख्य शहर उदयपुर या शहरापासून १०३ किलो मीटर अंतरावर आहे. 

कुंभलगड हा किल्ला मेवाड प्रकारातील म्हणजेच या किल्ल्याचे बांधकाम हे मेवाड प्रकातील असून या किल्ल्याची स्थापना १४४३ ते १४५८ या काळामध्ये झाली होती.

कुंभलगड या किल्ल्याला कुंभल किल्ला या नावाने देखील ओळखले जाते आणि हा किल्ला राजपूत लष्करी टेकडी वास्तुशैलीतील असून या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची हि ३६०० फुट इतकी आहे.

kumbhalgarh fort information in marathi
kumbhalgarh fort information in marathi

कुंभलगड किल्ला – Kumbhalgarh Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावकुंभलगड किल्ला किंवा कुंभल किल्ला
ठिकाणभारतातील राजस्थान राज्यातील राजसमंद जिल्ह्यामध्ये वसलेला आहे
स्थापना१४४३ ते १४५८ या काळामध्ये
जवळचे शहरउदयपुर
समुद्रसपाटीपासूनची उंची३६०० फुट
टेकडीपश्चिम आरवली टेकडी

कुंभलगड किल्ल्याची वास्तूकला आणि पाहण्यासारखी ठिकाणे

कुंभलगड हा किल्ला डोंगराळ भागामध्ये वसलेला आहे आणि या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३६०० फुट इतकी असून हा किल्ला राजपूत लष्करी टेकडी वास्तूशैलीतील आहे. त्याचबरोबर या किल्ल्याला सात तटबंदीच्या प्रवेशदारांच्यासह ३६ किलो मीटर लांब अशी एक जाड आणि भक्कम तटबंदी आहे.

ज्यामुळे पूर्वीच्या काळी शत्रूने हल्ला केला तरी किल्ल्याचे संरक्षण होत होते. कुंभलगड या किल्ल्यावर ३५० पेक्षा जास्त मंदिरे आहेत आणि या किल्ल्यामध्ये बहुतेक करून हिंदू आणि जैन मंदिरे आहेत. मेवाड राजकर्त्यांनी या किल्ल्यामध्ये अनेक वास्तुकला तयार केल्या आहेत आणि ह्या वास्तू या किल्ल्याविशायीचा इतिहास सांगत असतात.

कुंभलगड किल्ल्यामधील पाहण्यासारखी ठिकाणे

  • कुंभ महाल : कुंभ महाल किंवा पॅलेस हा या किल्ल्यातील मुख्य वास्तूकलांच्यापैकी एक आहे कारण हा पूर्वीच्या काळी राजाचे निवास्थान होता आणि आपण या किल्ल्यामध्ये हे राजाचे निवास्थान पाहू शकतो.
  • मंदिरे : या किल्ल्यामध्ये ३५० पेक्षा जास्त मंदिरे आहेत असे म्हटले जाते आणि त्यामधील बहुतेक मंदिरे हे हिंदू आणि जैन धर्मावर आधारित आहेत. या ठिकाणी नील कंठ महादेव मंदिर, प्राचीन गणेश मंदिर, मामदेव मंदिर, सूर्य मंदिर, पार्श्वनाथ मंदिर, माताजी मंदिर, गोलेरा मंदिर आणि इतर अशी अनेक मंदिरे त्या ठिकाणी आहेत.
  • बादल महाल : या किल्ल्यामधील पर्यटकांना पाहता येणारा एक महाल म्हणजे बादल महाल जो राणा फतेह सिंग यांनी बांधला होता आणि  या महालाची रचना हि दुमजली होती.
  • प्रवेशद्वार : कुंभलगड या किल्ल्याला सात प्रवेशद्वार आहेत आणि यामध्ये राम पोळ हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार असून या ठिकाणी हनुमान पोळ, आरेत पोळ आणि हल्ला पोळ आणि आणखीन ३ प्रवेश दरवाजे आहेत.
  • इतर ठिकाणी : आपल्याला या किल्ल्यामध्ये बादशाह बावडी, लाखोल टाकी, प्राचीन पाण्याच्या टाक्या , जलसाठे आणि इतर काही ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. 

कुंभलगड किल्ल्याविषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये

  • या किल्ल्याला जी तटबंदीची भिंत आहे हि भिंत जगातील दुसरी सर्वात मोठी भिंत म्हणून ओळखली जाते कारण हि भिंत ३६ किलो मीटर लांब असून १५ फुट रुंदीची आहे आणि म्हणून या भिंतीला चीनच्या भिंतीनंतर दुसरे स्थान मिळाले आहेत.
  • कुंभलगड किल्ला हा राजस्थान राज्यातील राजसमंद जिल्ह्यामध्ये वसलेला असून हा किल्ला पश्चिम आरवली टेकडीवर वसलेला आहे.
  • कुंभलगड किल्ल्याला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे.
  • या किल्ल्यामध्ये अनेक मंदिरे आहेत जी हिंदू आणि जैन धर्माशी संबधित आहेत आणि या किल्ल्यामध्ये नील कंठ महादेव मंदिर देखील आहे आणि या मंदिरामध्ये विशाल असे शिवलिंग आहे.
  • कुंभलगड हा किल्ला मेवाड शासकांनी बांधला आणि हा किल्ला शेवटपर्यंत त्यांच्याकडेच राहिला त्यामुळे हा किल्ला अजिक्य राहिला.
  • कुंभलगड या किल्ल्यामधून आपल्याला आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पहावयास मिळतो.
  • कुंभलगड किल्ल्यामध्ये लाईट शो आणि साऊंड शो असतात आणि रोज संध्याकाळी ६.४५ वाजता हा लाईट शो आणि साऊंड शो सुरु होते आणि या शो साठी प्रवेश मिळवण्यासाठी तिकीट काढावे लागते ज्याचा शुल्क ७५ रुपये आहे.
  • या किल्ल्याच्या आतमध्ये एक लाखोला नावाची एक टाकी आहे जी जगप्रसिध्द आहे आणि हे राणा लक्षणे १४२१ मध्ये बांधले होते आणि हे टाके स्वातंत्र्यापूर्वी सुमारे ४० फुट खोल होते जे नंतर ६० फुट खोल करण्यत आले.
  • कुंभलगड हा किल्ला इतका भव्य आहे कि या किल्ल्याचे सौंदर्य हे आपल्या डोळ्यांच्यामध्ये भरते.
  • या किल्ल्याला सुरक्षतेच्या दृष्टीने सात दरवाजे आहेत त्यामुळे या किल्ल्याचे संरक्षण झाले आणि हा किल्ला शेवटपर्यंत मेवाड राजकर्त्यांच्याकडे होता.
  • कुंभलगड हा किल्ला जगातील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक आहे कारण हा किल्ला समुद्रसपाटीपासून ३६०० फुट उंच आहे.

कुंभलगड किल्ला माहिती – information about kumbhalgarh fort in marathi

  • कुंभलगड हा किल्ला पर्यटकांच्यासाठी एक आकर्षक ठिकाण आहे आणि हा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात आणि हा किल्ला पर्यटकांना पाहण्यासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ खुला असतो.
  • काही किल्ल्यांच्यामध्ये किल्ला पाहण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जातात आणि तसेच राजस्थान मधील कुंभलगड हा किल्ला पाहण्यासाठी देखील प्रवेश शुल्क आकारला जातो. जर भारतीय पर्यटक हा किल्ला पाहायला गेल्यास त्यांच्यासाठी फक्त १० रुपये प्रती व्यक्ती असा प्रवेश शुल्क आहेत तर विदेशी लोकांच्यासाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आहे.
  • जर एखाद्याला या किल्ल्यामध्ये व्हिडीओ शुटींग करायचे असल्यास त्या व्यक्तीला २५ रुपये व्हिडीओ शुटींग शुल्क द्यावा लागतो.
  • कुंभलगड किल्ल्याचा परिसर हा मोठे असल्यामुळे या किल्ल्यामध्ये भरपूर चालावे लागते त्यामुळे आरामदायी शूजचा वापर केला तर ते चांगले ठरेल.

आम्ही दिलेल्या kumbhalgarh fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कुंभलगड किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kumbhalgarh fort history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about kumbhalgarh fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!