जैसलमेर किल्ला माहिती Jaisalmer Fort Information in Marathi

Jaisalmer Fort Information in Marathi जैसलमेर किल्ला माहिती मराठी जैसलमेर हा किल्ला जगातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी गणला जाणारा किल्ला आहे. जैसलमेर शहराचा सर्वात लोकप्रिय खूण आहे आणि हा किल्ला परीकथेतील वाड्यासारखं दिसतो. जैसलमेर हा किल्ला राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यामध्ये त्रिकुटा टेकडीवर वसलेला आहे आणि  हा किल्ला रावल जैस्वाल जैसलमेर यांनी इ. स. ११५६ मध्ये बांधला आहे. जैसलमेर हा किल्ला २५० फुट उंच आहे आणि या किल्ल्याला ३० फुट उंचीच्या संरक्षक तटबंदी देखील आहे. जैसलमेर या किल्ल्याचे बांधकाम शैली हि इस्लामिक आणि राजपूत मिश्रित आहे.

जैसलमेर किल्ला जगातील काही जिवंत स्मारकांपैकी एक आहे आणि शहराच्या लोकसंख्येचा चौथा भाग आहे. या किल्ल्यावरील सूर्यास्ताचे दृश्य हे सर्व प्रवाश्यांसाठी आणि विशेषत: छायाचित्रकारांच्या दृष्टीने एक आवडता भाग आहे. जैसलमेर या किल्ल्याला सोनार किल्ला या नावाने देखील ओळखले जाते कारण हा किल्ला सोनेरी वाळूच्या खडकापासून बनलेला आहे.

jaisalmer fort information in marathi
jaisalmer fort information in marathi

जैसलमेर किल्ला माहिती मराठी – Jaisalmer Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावजैसलमेर किल्ला (jaisalmer kila)
ठिकाणहा किल्ला राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यातील त्रिकुटा टेकडीवर वसलेला आहे.
संस्थापकरावल जैस्वाल जैसलमेर
स्थापनाइ. स. ११५६
उंची२५० फुट
आकार१५०० फुट लांब आणि ७५० फुट रुंद
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणेराज महल (रॉयल पॅलेस), लक्ष्मीनाथ मंदिर, काही जैन मंदिरे, संग्रहालय, व्यापारी हवेली, श्री नाथ हवेली आणि किल्ल्याचे चार दरवाजे

जैसलमेर हा किल्ला राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यातील त्रिकुटा टेकडीवर विस्तारलेला हा किल्ला जगातील मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्याची बांधणी ११ व्या शतकामध्ये  रावल जैस्वाल जैसलमेर केली. या किल्ल्याची उंची २५० फुट आहे आणि या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी किल्ल्याभोवती भक्कम अशी तटबंदी बांधली आहे.

नक्की वाचा: कंधारचा किल्ला माहिती

या किल्ल्याला शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण ९२ बुरुज बांधले आहेत. जैसलमेर या किल्ल्यावर चार प्रवेश दरवाजे आहेत ते म्हणजे गणेश पोळ, सूरज पोळ, हवा पोळ आणि अक्षय पोळ. जैसलमेर किल्ल्यामधील मुख्य आकर्षणे आणि ठिकाणे म्हणजे राज महल (रॉयल पॅलेस), लक्ष्मीनाथ मंदिर आणि काही जैन मंदिरे.

जैसलमेर किल्ल्याचा इतिहास – Jaisalmer Fort History in Marathi

जैसलमेर हा किल्ला इ. स. ११५६ मध्ये रावल जैस्वाल जैसलमेर यांनी बांधले आहे. या किल्ल्यावरील महत्वाच्या घटना म्हणजे जैसल गौर सुलतानांच्या षड्यंत्रामध्ये फसले होते तसेच इ. स. १२७६ मध्ये जेत्सी राजाने दिल्लीच्या सुलतानावर हल्ला केला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी ८ वर्षानंतर दिल्लीच्या सुलतानाने ह्या किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ल्याचा विनाश केला होता पण त्यावेळी भाटीया लोकांनी या किल्ल्यावरील हल्ल्याला नियंत्रित केले.

त्याचबरोबर इ. स. १३०६ मध्ये दोंदू याने राठोड याला या किल्ल्यच्या बाहेर काढले त्यामुळे याला किल्ल्याचा रावल बनवले आणि त्यावेळी पासून आपण जो किल्ला पाहतो त्या किल्ल्याची निर्मिती करण्यास सुरुवात झाली पण रावल हे मुगल साम्राज्याचे हल्ले सहन करू शकत नव्हता म्हणून तो इ. स. १५७० अकबरला शरण गेला आणि आपल्या मुलगीचा विवाह देखील अकबरशी केला.

नक्की वाचा: झांसी किल्ला माहिती

मध्य काळामध्ये जैसलमेर या शहरामध्ये इजिप्त, आफ्रिका, पर्शिया आणि अरबीया या देशांमधून मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता त्यामुळे या शहरावर आणि किल्ल्यावर खूप जन तग लावून बसले होते आणि १३ व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने या किल्ल्यावर हल्ला केला आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. अल्लाउद्दीन खिलजीने या किल्ल्यावर ९ वर्ष राज्य केले.

त्यानंतर या किल्ल्यावर मोगलांनी आपले वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी परत हल्ला केला आणि मुगल शासक हुमायु याने किल्ला आपल्या इ. स. १५४१ ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर इ. स. १७६२ पर्यत वर्चस्व गाजवले त्यानंतर हा किल्ला महारावल मूळराज याच्याकडे गेला. १२ डिसेंबर १८१८ मध्ये महारावल मूळराज आणि पूर्व भारतीय कंपनी याच्यामध्ये एक करार झाला आणि महारावल मूळराज याला किल्ल्याचा उत्तराधिकारी बनवण्यात आले आणि ज्यावेळी या किल्ल्यावर आक्रमण होईल त्यावेळी त्यांना मदत करण्याचे देखील ठरले.

जैसलमेर किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

  • या किल्ल्यावर आपल्याला लक्ष्मीनाथ मंदिर आहे ज्या मध्ये लक्ष्मीची आणि विष्णूची मूर्ती आहे आणि या मंदिरमध्ये अजून देखील लक्ष्मीची आणि विष्णू देवाची पूजा केली जाते.
  • या किल्ल्यामध्ये हवेली इमारती बांधल्या होत्या ज्यामध्ये राजाचे कुटुंब राहत होते त्यामधील एक प्रसिध्द हवेली श्री नाथ हवेली. या हवेली मध्ये जैसलमेरचे पंतप्रधान यांनी देखील वास्तव्य केले होते.
  • किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे राजमहाल पॅलेस आणि हा राजमहाल पॅलेस जैसलमेरच्या महारावलचे निवासस्थान होते.
  • किल्ल्यामध्ये आपल्यला जैन मंदिरे देखील पाहायला मिळतात.
  • या किल्ल्यामध्ये व्यापाऱ्यांच्या भावी पिढ्यांच्यासाठी निवासस्थाने होती आता त्यामधील काही निवास्थानामध्ये संग्रहालये आहेत त्यामुळे आपल्यला तेथे संग्रहालये देखील पाहायला म्हणतात.
  • या किल्ल्यामध्ये व्यापारी हवेली देखील पाहायला मिळते.
  • जैसलमेर किल्ल्याला एकूण चार प्रवेश दरवाजे आहेत आणि या दरवाज्यावरील नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. किल्ल्यावरील प्रवेश दरवाज्यांची नावे – गणेश पोळ, सूरज पोळ, हवा पोळ आणि अक्षय पोळ.

जैसलमेर किल्ल्याविषयी काही मनोरंजक तथ्ये 

  • या किल्ल्यामध्ये १५ फुट लांबीचे एक तळघर आहे.
  • २०१३ मध्ये जैसलमेर किल्ल्याचा समावेश कोलंबिया नोम पेन्ह येथे आयोजित केलेल्या जागतिक वारसा समितीच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीमध्ये केला आहे .
  • सूर्याच्या किरणांमुळे दिवसा हा किल्ला सोनेरी रंगाचा दिसतो.
  • हा किल्ला थारच्या वाळवंटामध्ये त्रिकुटा टेकडीवर वसलेला आहे.
  • जैसलमेर या किल्ल्यामध्ये सात जैन मंदिरे आहेत.
  • महारावल मूळराज मृत्यूनंतर हा किल्ला गजसिंग यांच्या हातात गेला.
  • हा किल्ला १५०० फुट लांब आणि ७५० फुट रुंद आहे.

जैसलमेर किल्ला फोटो:

jaisalmer fort information in marathi
jaisalmer fort information in marathi

जैसलमेर या किल्ल्यावर कसे जायचे ? 

जैसलमेर या शहरामध्ये विमानतळ असल्यामुळे आपण दिल्ली, सुरत, मुंबई, अहमदाबाद, जयपूर या सारख्या मुख्य शहरातून थेट जैसलमेर या शहरामध्ये येवू शकतो. जैसलमेर मधील हे विमानतळ शहराच्या बाहेर १७ किलो मीटर अंतरावर आहे. विमानतळा पासून किल्ल्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला टॅक्सी किवा रिक्षाने यावे लागेल.

नक्की वाचा: जिंजी किल्ला माहिती

टीप

  • जैसलमेर हा किल्ला सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० पर्यंत पर्यटकांच्यासाठी खुला असतो.
  • या किल्ल्यावर भारतीय पर्यटकांच्यासाठी ५० रुपये प्रवेश शुल्क आहे आणि विदेशी पर्यटकांच्यासाठी २५० रुपये प्रवेश शुल्क आहे.
  • जर आपल्यला या किल्ल्यावर फोटो काढायचे असतील तर ५० रुपये शुल्क आकाराला जातो आणि जर किल्ल्यामध्ये व्हीडोयो करायचे असल्यास १०० रुपये शुल्क आकाराला जातो.
  • जर तुम्हाला किल्ला पाहण्यासाठी मार्गदर्शकाची गरज असेल तर तेथे मार्गदर्शक देखील मिळतील त्यांची फी ४०० रुपये इतकी असते.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, जैसलमेर किल्ला jaisalmer fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. jaisalmer fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about jaisalmer fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही जैसलमेर किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या jaisalmer killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!