कुरवपूर माहिती Kuravpur Information in Marathi

kuravpur information in marathi कुरवपूर माहिती, कुरवपूर या ठिकाणाविषयी कोणाला माहित नाही तर या ठिकाण विषयी सर्वांना माहित आहे कारण हे दत्तप्रभूंच्या तीर्थक्षेत्रापैकी एक आहे आणि आज आपण या लेखामध्ये पिठापूर या ठिकाणा विषयी माहिती घेणार आहोत. कुरवपूर हे एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाण आहे ज्या ठिकाणी दत्त प्रभूंचा पहिला अवतार मानले जाणारे श्रीपाद श्री वल्लभ यांनी या ठिकाणी १४ वर्ष वास्तव्य केली होते आणि म्हणून या ठिकाणाला दत्तप्रभूंच्या तीर्थक्षेत्रापैकी एक मानले जाते आणि हे कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांच्या सीमा भागामध्ये रायचूर जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या एका बेटावर हे क्षेत्र आहे.

आणि या क्षेत्राच्या अवतीभोवतीचा प्रदेश हा पाण्याने व्यापला आहे. आपल्याला माहित आहे कि अनेक दत्तभक्त दत्त प्रभूंच्या तीर्थक्षेत्रांची परिक्रमा करतात आणि ह्या परिक्रमेमध्ये देखील हे ठिकाण येते. कुरवपूर या ठिकाणाला कुरुगड्डा, कुरवपूर आणि कुरुगड्डी या नावाने देखील ओळखले जाते आणि या ठिकाणाला ध्यानधारणा भूमी किंवा तपोभूमी म्हणून देखील ओळखले जाते.

दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा हा मंत्र आपण म्हटला कि आपल्या डोळ्यासमोर कुरवपूर यायला पाहिजे कारण आपल्यामधील अनेक जणांना माहित नाही कि दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा या मंत्राचा उगम हा कुरवपूर या ठिकाणीच झाला आहे.

kuravpur information in marathi
kuravpur information in marathi

कुरवपूर माहिती – Kuravpur Information in Marathi

कुरवपूर या गावाविषयी माहिती

कुरवपूर हे गाव कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर आहे आणि हे गाव कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यामध्ये आहे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर निजाम राज्यामध्ये होते. या कुरवपूर या छोट्याश्या खेड्यामध्ये कृष्ण नदी आहे आणि कृष्ण नदीचे दोन भाग आहेत आणि पुढे ते दोन भाग एकत्र आलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक बेट देखील आहे त्या बेटाला कुरुगड्डी बेट म्हणून ओळखले जाते आणि या बेटावर कुरवपूर हे क्षेत्र आहे.

कुरवपूर क्षेत्राविषयी माहिती

कुरवपूरच्या बेटावर एक दगडी गुहा आहे आणि या दगडी गुहेमध्ये श्रीपाद श्री वल्लभ यांच्या वास्तव्याचे स्थान आहे असे मानले जाते आणि या गुहेमध्येच दत्त गुरूंचा पहिला अवतार असणारे श्री पद श्री वल्लभ यांचे तपश्चर्या करण्याचे ठिकाण आहे आणि असे म्हणतात कि या गुहेमध्ये त्यांनी २२ वर्ष तपश्चर्या केली होती. त्या काळामध्ये बेटावर देखील तीन चार घरे होती आणि या घरांच्यामध्ये श्री पाद श्री वल्लभ हे माधुकरी मागून ते आपला उदार निर्वाह चालवत होते.

आणि तसेच ते रोज सकाळी नदीवर स्नान करून सूर्य नमस्कार देखील घालत होते आणि ते ज्या शिळेवर किंवा दगडावर उभे राहून सूर्य नमस्कार घालत होते त्यावेळी शिळेवर पडणारी सावली आजही दिसते तसेच त्यांच्या पायाचे ठशे देखील या शिळेवर आहेत. कुरवपूर या ठिकाणी बेटावर असणाऱ्या गुहेच्या समोर एक अवदुंबराचे वृक्ष आहे.

तसेच या परिसरामध्ये मंदिर आणि पादुका देखील आहेत. या ठिकाणाचा शोध हा वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी लावला आणि दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा ह्या मंत्राचा उगम देखील याच ठिकाणी झाला. कुरवपूर हे ठिकाणी एक पवित्र आणि धार्मिक ठिकाण आहे ज्या दरवर्षी अनेक भावीन दर्शनासाठी गर्दी करतात.

श्रीपाद श्री वल्लभ हे कोण होते ?

श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म इ. स १३२० मध्ये झाला आणि त्यांचा जन्म हा भारताच्या आंध्रप्रदेश राज्यातील गोदावरी या गावामध्ये झाला होता आणि असे म्हणतात कि श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म हा दत्तात्रेय प्रभूंचा मानव रूपातील पहिला जन्म आहे.

कुरवपूर क्षेत्रावरील ठिकाणे

  • श्रीपाद श्री वल्लभ मंदिर: कुरवपूर या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ यांचे मंदिर आहे आणि हे मंदिर दगडी बांधकामाचे आणि या मंदिराला एक भव्य दरवाजा आहे आणि या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दगडी कट्टे आहेत. या मंदिराच्या अवरमध्ये मारुतीची रेखीव मूर्ती, शिवलिंग पादुका आणि केशवमूर्ती आहे. या मंदिराच्या समोर एक दगडी पार आहे आणि पाराच्या समोरच मुख्य पूजास्थान आहे.
  • टेंबेस्वामी गुहा: कुरवपूर या ठिकाणी आपल्याला टेंबेस्वामी गुहा देखील पहायला मिळते. टेंबेस्वामी यांची जी गुहा आहे ती एक निसर्गनिर्मित गुहा आहे आणि असे म्हटले जाते कि या ठिकाणाचे शोध हा वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी लावला.
  • औदुंबर वृक्ष: औदुंबर वृक्ष हे या ठिकाणावरील खूप प्राचीन वृक्ष आहे आणि हे वृक्ष डौलदारपणे उभे आहे आणि या ठिकाणी पारायण करू इच्छिणाऱ्या भक्तांच्यासाठी एक कट्टा बांधला आहे तेथे बसून पारायण करू शकतात.

कसे जायचे – how to reach 

  • आपल्याला जर कुरवपूरला जायचे असल्यास आपण रस्ता किंवा रेल्वे मार्गाने जावू शकतो जर आपल्याला रेल्वेने जायचे असल्यास आपण कोणत्याही मुख्य शहरातून रायचूर या शहरासाठी ट्रेन पकडू शकतो आणि मग रायचूर शहरामध्ये ट्रेनने येऊन मग आपण तेथून आपण कुरवपूर या गावापर्यंत टॅक्सीने जावू शकतो आणि त्या क्षेत्रापर्यंत जाण्यासाठी आपल्याला पाण्यातून बोटीने जावे लागते.
  • तसेच रायचूर रेल्वे स्थानकापासून बस स्थानक हे फक्त २ तास अंतरावर आहे आणि आपण कुरवपूरला बसने देखील जावू शकतो.
  • आपण कुरवपूरला स्वताची कर देखील घेऊन जावू शकतो कारण आपण जर स्वताची कार घेऊन गेलो तर आपण इतर ठिकाणे देखील पाहू शकतो आणि कुरवपूर हे क्षेत्र देखील पाहू शकतो, त्यामुळे स्वताची कार घेऊन जाणे सोयीस्कर ठरेल.

आम्ही दिलेल्या kuravpur information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कुरवपूर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about kuravpur in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!