सिंहाबद्दल संपूर्ण माहिती Lion Information In Marathi

Lion information in Marathi सिंहाला जंगलाचा किवा सर्व प्राण्यांचा ‘राजा’ म्हणून ओळखले जाते. सिंह हा मांजराच्या कुळातील एक मोठा प्राणी असून सिंहाचे अस्तित्व भारतामध्ये आणि आफ्रिका मध्येच आढळून येते. सिंहाला धैर्याचे प्रतिनिधित्व करणारा प्राणी समजले जाते त्याचबरोबर त्यांना धैर्य आणि रॉयल्टीचे एक प्रतीक मानले जातात. सिंह जंगलामध्ये 10 ते 14 वर्षे जगतात आणि ते जर पकडले असतील तर ते 20 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकतात. जंगलामध्ये नर सिंह सहसा १० ते ११ वर्षापेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत कारण इतर नर सिंहाशी भांडून झालेल्या जखमांमुळे त्यांचे आयुष्य कमी होते. सिंह हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे तो मृग,  म्हशी, पक्षी, झेब्रा, वारथोग, हरीण, मासे यासारख्या प्राण्याचा शिकार करून आपले पोट भरतो.

lion-information-in-marathi
सिंहाबद्दल संपूर्ण माहिती

जंगलचा राजा सिंह संपूर्ण माहिती (Lion information in Marathi)

सिंह ‘नर’ असतात तर सिंहिणी ‘मादी’ असतात तसेच सिंहाला इंग्रजीमध्ये lion म्हणतात आणि सिंहिणीला lioness म्हणतात व सिंहिणीच्या पिल्लांना ‘छावा’ म्हणतात. सिंहिणीला दोन वर्षानंतर पिल्ले होतात व सिंहीण एका वेळी २ किवा ३ पिल्लांना जन्म देते. सिंह १० ते १५ प्राणी असनाऱ्या कळपामध्ये राहतात ज्यामध्ये मादा, लहान नर आणि पिल्ले असतात. सिंहाच्या चेहऱ्याभोवती आणि मानेभोवती जे केस असतात त्यांना आयाळ म्हणतात सिंहिणीला आयाळ नसते .

सिंहाचे विविध प्रकार ( different types of lion)

सिंहांचे बघायला गेले तर पाच ते सहा प्रकार होते सुमारे 10,000 वर्षांपूर्वी युरेशिया तसेच अमेरिकेतही सिंह सापडले पण काळाबरोबर काही प्रजाती नामशेष झाल्या आता सिंहांचे दोनच प्रकार आढळतात ते म्हणजे आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह. सिहांचे काही प्रकार खाली दिले आहेत

आशियाटिक सिंह (Asiatic Lion information in marathi )

एके काळी तुर्कीपासून दक्षिण-पश्चिम आशिया ओलांडून भारतीय उपखंडात आढळणारे एशियाटिक सिंह किंवा भारतीय सिंह (पँथेरा लिओ पर्सिका) सध्या गुजरातच्या गुजरातमधील गिर राष्ट्रीय उद्यानात  आणि वन्यजीव अभयारण्यमध्ये दिसतात. प्रौढ नर एशियाटिक सिंहाचे वजन 160 किलो ते 190 किलो इतके असते तर प्रौढ मादी एशियाटिक सिंहीनींचे वजन ११० ते १२० इतके असते. एशियाटिक सिंहाचा फर रंग गडद-गवंडी, बफिश-राखाडी किंवा वालुकामय ते काळ्या रंगाने दाट तपकिरी असतो.

बार्बरी सिंह (Barbary Lion information in marathi)

बर्बरी सिंह (पँथेरा लिओ) उत्तर आफ्रिकान सिंह म्हणून ओळखला जाणारा सिंह आहे. या सिंहाच्या उप-प्रजाती पूर्वी मोरोक्को, ट्युनिशिया, इजिप्त आणि अल्जेरियामध्ये आढळल्या होत्या पण त्या सिंहांचा शिकार केल्यामुळे त्या जंगलातील सिंह नामशेष झाल्या. १९२० मध्ये मोरोक्कोमध्ये शेवटचा बार्बरी सिंह ठार मारला. या सिंहाचे वजन २०० किलो पेक्षा जास्त असते.

ट्रान्सव्हाल लायन (Transvaal Lion information in marathi)

ट्रान्सव्हाल लायन हा दक्षिणपूर्व आफ्रिकन सिंह (पँथेरा लिओ क्रुगेरी) आहे आणि या सिंहाला कलहरी सिंह किंवा ट्रान्सव्हल शेर म्हणून ओळखले जाते. कलहारी सिंह हे आफ्रिकेच्या कलहारी प्रदेशात आढळतात तसेच हे सिंह आफ्रिकेच्या क्रूजर नॅशनल पार्क आणि स्वाझीलँडच्या ह्लेन रॉयल नॅशनल पार्कमध्ये आढळतात. सिंहाची लांबी ५.५ फूट ते १०.५ फूट इतकी असते तर सिंहीनींची लांबी ७.७ फुट ते ९.० इतकी असते. ट्रान्सव्हाल लायन या सिंहाचे वजन २५० पर्यंत असते तर सिंहिणीचे  वजन १८५ पर्यंत असते.

मसाई सिंह (Masai lion information in marathi)

मसाई सिंह हा एक आफ्रिकान सिंह असून त्याला (पँथेरा लिओ न्युबिका) असेही म्हंटले जाते. हा सिंह पूर्व आफ्रिकेमध्ये आढळतो. मसाई सिंह इतर प्रजातींपेक्षा कमी वक्र आणि लांब पाय असतात. सिंहाची लांबी ९.७ फुट इतकी असू शकते तर सिंहिणीची लांबी ८.५ फुट इतकी असते. मसाई सिंह केनिय, टांगा, युगांडा, मोझांबिक आणि टांझानिया या देशातही आढळतात.

सेनेग्लेन्सिस सिंह (senegalensis lion information in marathi)

सेनेग्लेन्सिस सिंह हा पश्चिम आफ्रिकेतील सिंह असून त्याला सेनेगल सिंह असेही म्हंटले जाते. त्याचा आकार काही प्रमाणात मध्य आफ्रिकेतील सिंहाप्रमानेच असतो पण दक्षिण आफ्रिकेतील सिंहापेक्षा लहान असतात. हा सिंह सर्वात धोकादायक प्रजातींपैकी एक मानली जाते.

इथिओपियन सिंह (Ethiopian Lion information in marathi)

इथिओपियन सिंह हा एक पूर्व आफ्रिकन सिंह आहे या सिंहाला अ‍ॅडिस अबाबा सिंह किवा अबिसिनियन सिंह या नावांनी हि ओळखले जाते.

पांढरा सिंह (White lion information in marathi)

पांढरे सिंह हे क्रुगेरी सारख्याच प्रजातीचे आहेत. हे सिंह अत्यंत दुर्मिळ आहेत आणि ते फक्त प्राणीसंग्रहालय, अभयारण्य आणि वन्यजीव साठ्यांमध्ये आढळतात. हे आफ्रिकेच्या टिंबवती प्रदेशातील आढळतात असे म्हटले जाते. त्यांचा रंग पांढरा असतो आणि ते दक्षिण आफ्रिकेतील लॉरी पार्क प्राणीसंग्रहालय, न्यूझीलंडमधील झिओन किंगडम आणि सर्बियातील बेलग्रेड प्राणीसंग्रहालयात दिसून येतात.

आशियाटिक सिंह आणि आफ्रिकन सिंह यांच्यातील फरक (asiatic lion vs african lions)

 दोन्ही आशियाई आणि आफ्रिकन सिंह धोकादायक सिंह आहेत आणि ते दोन्हीही पॅन्थेरा लिओ प्रजातीचे आहेत. आशियाटिक सिंह आणि आफ्रिकन सिंह यांच्यातील फरक खाली दिले आहेत.

आशियाटिक सिंह (asiatic lion)

आशियाटिक सिंह आफ्रिकन सिंहाची उपजाती आहे. ते फक्त भारतातील गुजरातमधील गिर  वनक्षेत्रात टिकून आहेत. आययूसीएनच्या म्हणण्याप्रमाणे आशियाई सिंह हा एक धोकादायक प्रजाती पैकी आहे. आशियाटिक सिंहाचे वजन १९० किलो इतके असते आणि सिंहीनिचे वजन १६५ किलो इतके असते तसेच ते १० फुट लांब असतात. हे सिंह जंगलामध्ये १५ वर्ष जगू शकतात आणि जर कैदेत ठेवले तर ते ३० वर्ष जगू शकतात.

आफ्रिकन सिंह (african lion)

आफ्रिकन सिंह हि एक मुख्य सिंहांची प्रजाती आहे आणि मुख्य प्रजातीच्या वेगवेगळ्या उपजाती आपल्याला आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतात. आफ्रिकन सिंहाची वजन २२५ किलो इतके असते  तर सिंहीनिचे वजन १६५ किलो इतके असते तसेच ते ११ फुट लांब असतात. हे सिंह जंगलामध्ये १७ वर्ष जगू शकतात आणि जर कैदेत ठेवले तर ते ३४ वर्ष जगू शकतात.

आफ्रिकन सिंह आणि आशियाई सिंह यांच्यात काय फरक आहे?

आशियाई आणि आशियाई सिंह हे दोन वेगळ्या देशातील सिंह आहेत.

आशियाई सिंह हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तर आफ्रिकन सिंह असुरक्षित वर्गात आहेत.

आशियाई सिंहांच्या कळपात नर सिंह एकाच असतो आणि आफ्रिकन सिंहांच्या कळपात दोन ते तीन नर सिंह असतात

आशियाई सिंहांची लोकसंख्या खूप कमी आहे आफ्रिकन सिंहांची लोकसंख्येचे क्षेत्र मोठे आहे.

आशियाई सिंहांना केसांचे आयाळ कमी असते तर त्यांच्या तुलनेत केसांचे आयाळ जास्त असते.

सिंहा बद्दल काही तथ्य (facts of lion)

सिंहा बद्दलची काही अनोखी आणि मनोरंजक तथ्ये खाली दिलेली आहेत

  • सिंह आपल्या कळपाचा आणि आपल्या प्रदेशाचा बचाव करतात जेव्हा सिंहीण शिकार करत असते आणि असे असूनही, नर सिंह प्रथम खातात ( म्हणजेच सिंहापेक्षा जास्त सिंहीण शिकार करते ).
  • सिंहाची गर्जना 5 मैलांच्या अंतरावर ऐकू येते.
  • नर सिंहाच्या वयाचा चांगला अंदाज आपण त्याच्या मानेवरून घेवू शकतो जर त्याची मान जास्त काळी नसेल तर तो तरुण असतो आणि जर त्याची मान खूप काळी असेल तर त्या सिंहाचे खूप वय झालेले असते.
  • चालताना सिंहाची टाच जमिनीवर स्पर्श करते.
  • सिंहाचा ताशी ५० किलोमीटर पळू शकतो.
  • दिवसात सिंहाला २० तास विश्रांती घ्यावी लागते .
  • सिंह घनदाट जंगलात , दलदल असलेल्या परिसरात किवा वाळवंटात राहू शकत नाहीत ते गवताळ प्रदेशात राहतात.
  • सिंहाला दिवसात सात ते आठ किलो मांस लागते व तो चार ते पाच दिवस पाण्याशिवाय राहू शकतो.
  • जगामध्ये सर्वात जास्त वजनाचा प्राणी सिंहाला म्हंटले जाते.

याबरोबरच कुत्रा या प्राण्याबद्दल माहिती येथे पहा. तसेच घोड्याबद्दल माहिती येथे पहा.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा जंगलचा राजा सिंह व त्याचे जीवन कसे आहे. lion information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही सिंहाबद्दल या राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “सिंहाबद्दल संपूर्ण माहिती Lion Information In Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!