लोटस मंदिर माहिती Lotus Temple Information in Marathi Language

Lotus Temple Information in Marathi Language लोटस मंदिर हे दिल्लीतील पर्यटकांचे सर्वात मोठ आकर्षण ठरणार स्थळ असून, आज आपण या मंदिराची माहिती या ब्लॉगद्वारे घेणार आहोत. हे मंदिर बहरा जमातीचं प्रार्थना स्थळ आहे. या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये, रहस्य आणि अद्भुत असा इतिहास आहे तर चला जाणून घेऊया या मंदिरा बद्दल. लोटस टेम्पल म्हणजे कमळ मंदिर हे भारताची राजधानी दिल्ली या शहरात स्थित आहे. हे मंदिर शिल्पकला व वास्तूकलेसाठी या शहराचे प्रसिद्ध आकर्षण आहे. हे मंदिर भारतीय उपमहाद्वीप मधील मदर टेम्पल म्हणून देखील ओळखलं जात. पर्यटन स्थळांमध्ये मुख्य आकर्षण असल्याची याची नोंद आहे.

lotus temple information in marathi
lotus temple information in marathi

लोटस मंदिर माहिती – Lotus Temple Information in Marathi Language

लोटस मंदिरमाहिती
मंदिराचे नावबोहरा जमातीचे प्रार्थनास्थळ
उत्सव, यात्रामंदिरांसारख या मंदिरात कुठलेही सण किंवा उत्सव साजरे होत नाहीत
मंदिर कोठे आहेदिल्ली येथील नेहरू पॅलेस जवळ स्थित आहे
मंदिर कधी बांधलेमंदिर १९८६  मध्ये बनवण्यात आले होते‌
मंदिराचे दुसरे नावमदर टेम्पल, कमळ मंदिर
मंदिराची उंची४० मीटर

मंदिराचा इतिहास:

लोटस टेम्पल म्हणजे कमळ मंदिर हे भारताची राजधानी दिल्ली या शहरात स्थित आहे. हे मंदिर शिल्पकला व वास्तूकलेसाठी या शहराचे प्रसिद्ध आकर्षण आहे. हे मंदिर भारतीय उपमहाद्वीप मधील मदर टेम्पल म्हणून देखील ओळखलं जात. पर्यटन स्थळांमध्ये मुख्य आकर्षण असल्याची याची नोंद आहे. पर्यटक हे मंदिर बघण्यासाठी जगाच्या वेगवेगळ्या काना-कोपऱ्यातून येतात. लोटस म्हणजे कमळाच्या आकारात बनवलेल हे मंदिर आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध असल्यामुळे या मंदिराला आजपर्यंत अनेक पारितोषिक देखील भेटली आहेत. हे मंदिर १९८६  मध्ये बनवण्यात आले होते‌. हे मंदिर अतिशय सुंदर असून मंदिरात जात धर्म असे काहीच मानले जात नाही‌.

मंदिरा मध्ये कोणीही प्रवेश करू शकतो. हे मंदिर सुख, शांती आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. या मंदिराची डिझाईन कन्नड पर्शियन आर्किटेक्चर फरिबोर्ज सहबा यांनी केली आहे. लोटस मंदिर हे बहाई प्रार्थनास्थळ असून मंदिरात कुठल्याही प्रकारची प्रतिमा किंवा कुठल्याही प्रकारचा देव नाही आहे. व नाही ईथे कुठल्या प्रकाराची पूजा-अर्चना होते. खूप सारे लोक मन शांतीसाठी या मंदिराला भेट द्यायला येतात. मंदिराची सुंदरता लोकांना मोहित करून टाकते. पूर्ण विश्वात एकूण सात बहाई मंदिर आहेत आणि त्यातलं सातवा मंदिर म्हणजे हे लोटस मंदिर होय.

मंदिराचं वैशिष्ट्य:

लोटस टेंपल बोहरा जमातीचे प्रार्थनास्थळ आहे. हे मंदिर भारतातील दिल्ली येथील नेहरू पॅलेस जवळ स्थित आहे. हे मंदिर बहाई धर्माचे संस्थापक बहा उल्ला यांनी निर्माण केले आहे. हे मंदिर अगदी कमळाच्या आकाराचे असून त्याचे बांधकाम १९८६ मध्ये परिपूर्ण झाले. मंदिराचे उद्घाटन २४ डिसेंबर १९८६ मध्ये करण्यात आले तर सर्वसामान्यांसाठी हे मंदिर नववर्ष १ जानेवारी १९८७  मध्ये खुले करण्यात आले. सुमारे दहा वर्षानंतर या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. लोटस टेम्पल हे बहाई जमातीचे सातवे प्रमुख मंदिर आहे त्यानंतर बाकीचे मंदिर जगभरात कँपला, सिडनी, इलिनॉय, फ्रँकपर्ट, विलमेट, पनामा, आपिया या देशांमध्ये आहेत.

हे मंदिर भारताची सुंदर संस्कृती व भारतातील समभाव दर्शवतो. कारण हे मंदिर प्रत्येक धर्मियांसाठी खुले आहे. लोटस मंदिर हे भारतातील आधुनिक व वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे

अर्धकमळ आकाराचं हे मंदिर बनवण्यासाठी जवळपास एक करोड डॉलर लागले होते. मंदिराला पाकळ्यांचा आकार देण्यासाठी संगमरवरी दगडाचा उपयोग केला गेला असून जवळपास 27 संगमरवरी सुंदर पाकळ्या मंदिराला लाभल्या आहेत. मंदिराच्या मधोमध एक अतिशय सुंदर असा तलावदेखील आहे. सुमारे २६ एकर क्षेत्रफळावर उभा असलेल‌ अर्धकमळ आकाराच हे मंदिर अतिशय सुंदर कलाकृती व आर्किटेक्चर साठी विशेष प्रसिद्ध आहे.

मंदिराचे रहस्य:

एकता व शांतीच प्रतीक मानलं जाणारं दिल्लीतील लोटस टेंपल हे अर्धकमळा आकाराचं असून अतिशय आकर्षक असल्यामुळे या मंदिराचा समावेश दिल्ली मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये होतो. मंदिराचा आकार अर्धकमळ असल्यामुळे कमळाच्या पाकळ्या बनवण्यासाठी संगमरवरी दगडाचा वापर केला आहे, तसेच २७ अर्ध कमात संगमरवरी पाकळ्या असून त्यांची विभागणी तीन चक्रांमध्ये केली आहे. मंदिराच्या चारी बाजूने अतिशय सुंदर असे ९ प्रवेशद्वार आहेत. हे कमान आकाराचे दरवाजे कोपरा, दंडगोलाकार आणि साध्या आकारात बनवले आहेत. मंदिराची उंची ४० मीटर असून मंदिरात जवळपास नऊ कोपरे आहेत.

या नऊ कोपर्‍यांचा बिंदू सर्वात भव्य असल्यामुळे हे मंदिर एकता, अखंडता आणि विस्ताराचे प्रतीक आहे. मंदिराच्या मध्यभागी खूप मोठा परिसर असून या परिसरात जवळपास दहा हजार लोक बसून प्रार्थना करू शकतात मंदिराने आयोजित केलेल्या वेळेत मंदिरामध्ये एक विशेष प्रार्थना होते. ही प्रार्थना जवळपास पाच मिनिटांची असून दररोज जवळपास हजाराच्यावर लोक इथे हजेरी लावतात. मंदिरामध्ये जोराने बोलण्यासाठी किंवा जोरात प्रार्थना करण्यास मनाई आहे. तसेच कुठल्याही प्रकारचे संगीत किंवा वाद्य वाजवण्यास मनाई आहे. २०१३ मध्ये मंदिरामध्ये सूचना केंद्राची स्थापना करण्यात आली या सूचना केंद्रांमध्ये मंदिराच मुख्य सभागृह आहे तिथे जवळपास चारशे लोक शांती प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करू शकतात.

मंदिरामध्ये दोन लहान सभागृह आहे ज्याच्यामध्ये जवळपास ७० लोक सामवू शकतात. लोटस टेंपल मध्ये ऑडिओ-व्हिज्युअल रूम व लायब्ररी देखील आहे जिथे पर्यटकांना पुराणकथां बद्दल माहिती दिली जाते‌. व पुराणिक ग्रंथदेखील वाचण्यासाठी ठेवली आहेत. मंदिर इतक आकर्षक व सुंदर बनवलं आहे की या मंदिराला विसाव्या शतकातील ताजमहल देखील बोलतात. काही इतिहासकारांच्या अनुसार कमळ आकार हे मंदिराची शोभा वाढवत आहे असे म्हटले जाते की  मंदिराच्या आधुनिक सजावटीमुळे मंदिर बनवण्यात दहा हजार वेगवेगळ्या आकाराची संगमरमर दगड वापरण्यात आली होती.

या मंदिराला परीपूर्ण बनवण्यात जवळपास सातशे इंजिनियर, कामगार, कलाकार यांनी योगदान केले आहे. अश्या भव्य व आकर्षक रूप असलेल्या लोटस टेंपलला वास्तुशाली व आर्किटेक्चर मुळे‌ पुरस्कार देखील मिळाले आहेत. एवढेच नव्हे तर खूप कित्येक अशा वर्तमानपत्रामध्ये या मंदिराची ख्याती लिहून आली आहे. अतिशय सुंदर वास्तुकलेमुळे या मंदिराला ब्रिटेन व अमेरिका अशा भव्य देशांकडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.

उत्सव, यात्रा:

लोटस टेम्पल हे दिल्ली शहरात स्थित असून हे मंदिर बोहरा जमातीचे प्रार्थना स्थळ म्हणून या मंदिराची स्थापना बहाई जमातीचे संस्थापक बहा उल्ला यांनी केली आहे. मंदिराला कुठल्याही प्रकारचा जात,धर्म नसून हे मंदिर सर्व धर्मियांसाठी खुले आहे. इतर मंदिरांत सारखं या मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचा देव किंवा कुठल्याही देवाची प्रतिमा नाही आहे. म्हणूनच इतर मंदिरांसारख या मंदिरात कुठलेही सण किंवा उत्सव साजरे होत नाहीत. मंदिराच्या दर्शनाची वेळ मंगळवार ते रविवार पर्यंत चालू असते. सोमवारी हे मधील पूर्णपणे बंद असतं तस तर पर्यटकांसाठी हे मंदिर सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु असतं पण हिवाळ्याच्या दिवसात हे मंदिर सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू असतं.

लोटस टेम्पल फोटो – Lotus Temple Delhi Information in Marathi

lotus temple delhi information in marathi
lotus temple delhi information in marathi

मंदिर कोठे आहे? कसे जायचे?:

प्रसिद्ध लोटस टेम्पल हे भारताची राजधानी दिल्ली येथे स्थित असून दिल्लीला जाण्यासाठी आपण कुठल्याही माध्यमांचा वापर करू शकतो. मग तो हवाई माध्यम असो किंवा बस व रेल माध्यम असो. आरामात आपण दिल्ली मध्ये पोचू शकतो. जर पर्यटक बस मार्गाने येत असतील तर दिल्लीची लोकल बस सेवा व मेट्रो स्टेशनच्या सहाय्यतेने लोटस टेम्पल पर्यंत आपण पोहोचू शकतो. या मंदिराच्या सगळ्यात जवळचं मेट्रो स्टेशन म्हणजे कालिका जी मेट्रो स्टेशन या मेट्रो स्टेशन वरून आपण पाच मिनिटांत चालत जाऊन हे भव्य मंदिर पाहू शकतो व तसेच पर्यटक रेल्वेमार्ग मार्गाने येत असतील तर लोटस टेम्पल पर्यंत पोचण्यासाठी नवी दिल्ली व निजामुद्दीन हे दोन जवळचे स्टेशन आहेत.

जर पर्यटक हवाई मार्गाने दिल्लीत पोहोचत असतील तर एअरपोर्ट पासून नेहरू पॅलेस जवळ स्थित लोटस टेम्पल ला भेट देण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट सेवा म्हणजेच बस, ट्रेन, मेट्रो, टॅक्सी इत्यादींचा वापर करू शकतो. इतकेच नव्हे तर आपण स्वतःच्या खाजगी वाहनाने देखील या मंदिराला भेट देऊ शकतो.

बहाई प्रार्थना :

लोटस मंदिरामध्ये पूजा-अर्चना होत नाहीत. तर हे मंदिर सुख,समाधान,शांतीसाठी प्रसिद्ध आहे. लोक इथे मनशांतीसाठी येतात. हे मंदिर बहरा जातीचे प्रार्थनास्थळ असून बहाई धर्मांच्या काही प्रार्थना आहेत  त्यातल्याच काही प्रार्थना म्हणजे – 

(१) ही अनिर्वार्य प्रार्थना दररोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी केली पाहिजे. ही प्रार्थना वाचण्या आधी हात स्वच्छ धुवावे आणि म्हणावे :

हे प्रभू, माझ्या या हातांना अशी शक्ती दे की तुझा हा ग्रंथ मी या माझ्या हातांनी अशा दृढ संकल्प सोबत पडू शकेल की त्यांना कोणीच विचलित करू शकणार नाही. मग या हातांना त्यांच्यापासून संरक्षण दे, जे तुझे नाहीत हे प्रभू तूच सत्य आहेस तूच सर्वात शक्तिशाली आहेस तूच सर्वात सामर्थ्यवान आहेस. मग तोंड धुताना म्हणावे देवा मी तुझ्याकडे लक्ष देतो, तुझ्या प्रतिमेच्या प्रकाशाने मला प्रकाश दे,व मला वाईट शक्तींपासून वाचव.

(२)देवा तु गौरवशाली आहेस. मी तुमच्या प्रियजनांच्या नावावर,  तुमच्या विश्वासू लोकांच्या नावाने मी विनंती करतो की तू तुझ्या अवताराचा आणि तुमच्या दैवी दूतांचा शिक्का म्हणून शिकवतोस. तुझे स्मरण माझे मित्र, तुझे प्रेम माझी आकांक्षा, तुझे सामर्थ्य माझे ध्येय असू दे, तुझे नाव माझे मार्गदर्शक असू दे, तुझी इच्छा माझी इच्छा, तुझ्या आनंदात माझा आनंद असू दे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा लोटस मंदिर lotus temple information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास,  मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती  दिली आहे. lotus temple information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about lotus temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही लोटस मंदिर विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या lotus temple in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!