पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती Pandit Jawaharlal Nehru Information in Marathi

Pandit Jawaharlal Nehru Information in Marathi पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती नमस्कार मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बद्दल आपण जाणून घेऊ. आपण त्यांचे बालपण, शिक्षण, तसेच स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पंतप्रधान असताना त्यांची कारकीर्द, नेहरूंचे साहित्य, इत्यादी बद्दल माहिती पाहणार आहोत. सदरच्या लेखामध्ये आपल्याला पंडित नेहरू यांचे जीवनचरित्र थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे जवाहरलाल नेहरू Jawaharlal Nehru in Marathi हे व्यक्तिमत्व कसे होते हि कल्पना आपल्याला येईल.   

pandit jawaharlal nehru information in marathi
pandit jawaharlal nehru information in marathi

पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती – Pandit Jawaharlal Nehru Information in Marathi

नाव (Name)पंडित जवाहरलाल नेहरू
जन्म (Birthday)14 नोव्हेंबर 1889
जन्मस्थान (Birthplace)जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद
वडील (Father Name)मोतीलाल नेहरू
आई (Mother Name)स्वरूप राणी नेहरू
पत्नी (Wife Name)कमला नेहरू
मुले (Children Name)इंदिरा गांधी

जन्म आणि बालपण

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यात आत्ताचे प्रयागराज येथे एक सधन कश्मीरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू राष्ट्रीय लढ्यातील एक ज्येष्ठ पुढारी होते. आई स्वरुपरानी धार्मिक वृत्तीची होती. आई व बीबी अम्मा मावशी कडूनच जवाहरलाल सह इतर भावंडांना रामायण – महाभारतातील कथांचा लाभ मिळाला होता.

जवाहरलाल यांचे प्राथमिक शिक्षण घरीच पार पडले होते. घरी शिकवण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांकडूनच जवाहरलाल मध्ये विज्ञानाची आणि वाचनाची आवड निर्माण झाली होती.

पंडित जवाहरलाल चे बालपण काहीशा संमिश्र संस्कृतिक वातावरणात पार पडले होते. घरातील पश्चिमी वळणाची राहणी, आई व मावशीचे पारंपारिक संस्कार, उपनिषदे रामायण, महाभारत, भगवद्गीता यांचे वाचन उच्च भारतातील खानदानी मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव व वडिलांकडून लाभलेला सामाजिक रूढी बद्दलचा बंडखोरपणा त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंना एक उदार सहिष्णुतेचे वळण लाभले होते.

शिक्षण

पंडित जवाहरलाल हे उच्च शिक्षणासाठी 1905 साली इंग्लंडला गेले होते. दोन वर्षानंतर केंब्रिज विद्यापीठाच्या त्रिनिटी महाविद्यालयात दाखल झाले. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या जहाल पक्षाचा पंडितजीवर प्रभाव होता. त्यावेळी १९०५ च्या दरम्यान रुसो जपानी युद्धाचा त्यांच्या मनावर परिणाम झाला होता. केंब्रिजमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर, परदेशी मालावर बहिष्कार, सशस्त्र क्रांती, स्वदेशीचा पुरस्कार हा चर्चेचा विषय होता.

दुसऱ्या वर्गात पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पंडितजिनी बॅरिस्टरची परीक्षाही दिली होती. शिक्षण घेत असतानाच पंडितजींनी इंग्लंडमधील प्रसिद्ध लेखकांची पुस्तकेही वाचली होती, त्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.

स्वातंत्र्य चळवळ

पंडित जवाहरलाल इंग्लंडमध्ये असतानाच त्यांना राजकारणात आशा वाटू लागली होती. भारतात आल्यानंतर काही काळ वकिलीही केली. परंतु त्याच्यामध्ये त्यांचं मन रमेना. भारतात आल्यानंतर त्यांनी त्याची पहिली काही वर्षे राजकीय परिस्थितीचा अंदाज खेळण्यात घालवली. वडिलांना लिहिलेल्या पत्रात त्यांची भारतीय स्वातंत्र्या बद्दलची तळमळ दिसून येते. त्यांच्याही मनात भारतीय स्वातंत्र्याची आस लागली होती.

देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांचं मन अस्वस्थ होतं. त्याच वेळी 1916 साली कमलाकर या दिल्लीतील स्वजातीय मुलीबरोबर पंडित जवाहरलाल यांचा विवाह झाला. त्यांना इंदिरा गांधी आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये झाली. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नावारूपास आल्या. तर मुलगा जन्मतःच मृत्यू पावला. कमला नेहरू हीनी ही इतर कुटुंबांसह स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता.

कारावासातील जीवन व क्षय रोग यामुळे ऐन तारुण्यात 1936 साली त्यांचं निधन झालं तत्पूर्वी 1916 साली लखनऊ काँग्रेस अधिवेशनात पंडित नेहरूंची गांधीजींची पहिली भेट झाली होती. अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे पण हा लढा हा अहिंसेच्या मार्गांनी असावा हे गांधीजींचे तत्त्व नेहरूंना पटले होते . पंडित नेहरूंचा काँग्रेसशी घनिष्ठ संबंध आला. पहिल्या महायुद्धात भारताचे अपरिमित शोषण करण्यात आले होते.  जालियनवाला बागेत लाखो भारतीयांची अमानुष हत्या करण्यात आली होती.

एकदा जवाहरलाल नेहरू रेल्वेने प्रवास करत होते. वेळ रात्रीची होती. जालियनवाला बाग हत्याकांड करणारा जनरल डायर त्याच डब्यात होता. नेहरूंनी त्याच्याबद्दल खुप ऐकलं होतंजालियनवाला हत्याकांड याची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने नेमलेला समितीत पंडितजीने सहाय्य केले होते. गांधीजींनी १९२१ असहकार चळवळ सुरू केली त्यावेळी पंडितजींना अटक झाली तेव्हापासून ते पंचवीस वर्षात अनेक वेळा तुरुंगात गेले, छोडो भारत चळवळीचा १९४२ चा त्यांचा अखेरचा तुरुंग प्रवास होता. त्यावेळी त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात तुरुंगवास म्हणून तीन वर्षे काढली. 

तिथेच पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. पंडित जवाहरलाल नेहरू अलाहाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष असताना त्यांना 1923 ला काँग्रेसचे सरचिटणीस पद देण्यात आले होते. परंतु दोनच वर्षात पक्ष कार्याला महत्त्व देत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 1926 च्या दरम्यान जेव्हा कमला नेहरू आजारी होत्या तेव्हा औषध पाणी व हवापालट करण्यासाठी नेहरू पत्नीला घेऊन स्वित्झर्लंडला गेले होते.

युरोप मध्ये झालेली आंतरराष्ट्रीय परिषद व युरोप रशिया दौरा हा पंडितजींच्या जागतिक राजकारणातील पहिला अनुभव होता. जवाहरलाल युरोप होऊन जेव्हा भारतात परत आले तेव्हा भारतात सायमन आयोगावर विरुद्ध आणि दर्शनाची लाट उसळली होती. 

जवाहरलाल इतर अनेक तरुण नेत्यांप्रमाणेच संपूर्ण स्वातंत्र्य या मताचे होते.  सुभाष चंद्र बोस व इतर सहकाऱ्यांच्या समवेत इंडियन इंडिपेंडन्स ही संस्था काढून देशभर स्वातंत्र्याचा प्रचार व प्रसार करत होते. रावी नदीच्या तीरावर त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राष्ट्र आणि संपूर्ण स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली आणि या स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञा ची सांगता पंडित जी यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री बारा वाजता झाली.

काँग्रेसचे अध्यक्ष यांना त्यांनी पंडितजींनी देशभर अनेक दौरे काढले, गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला, या सत्याग्रहात जवाहरलाल यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1936 साली लखनऊ कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी वरून समाजवादाचा पुरस्कार केला. युरोप, रशिया च्या दौर्या पासूनच ते समाजवादाकडे ओढले गेले होते.

त्यांच्या विचारांची जडण-घडण एकांतिक स्वरूपाची नव्हती, म्हणूनच त्यांना मार्क्सवाद पसंत नव्हता. त्याच्या मनावर पाश्चात्य देशातील उदारमतवादाचा व त्यात असलेल्या व्यक्ती स्वातंत्र्य असल्या कल्पनेचा प्रभाव पडला होता. गांधीजींचा नेहरूनशी जेव्हा निकटचा संबंध आला त्या वेळी त्यांच्याही काही कल्पना आत्मसात केल्या, गांधीजींचा मार्ग आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन ही त्यांना मान्य होता.

मार्क्सचे बौद्धिक ऋण मान्य करूनही जीवन हे एखाद्या सिद्धांताच्या चौकटीत कोंडून ठेवता येत नाही असे ते म्हणत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राष्ट्रवादाला आंतरराष्ट्रीय दृष्टिकोणाचा संदर्भ दिला. जवाहरलाल नेहरूंच्या तुफानी दौऱ्याने काँग्रेसला भरगोस यश मिळवून दिले जवाहरलाल हे कॉंग्रेसला मते मिळवून देणारी जादूगर ठरले.

प्रांतिक निवडणुकात अनेक प्रांतात काँग्रेसला बहुमत मिळाले होते. तरी बंगालमध्ये संमिश्र मंत्रिमंडळाचा प्रश्न उपस्थित होता सप्टेंबर 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाली, तेव्हा भारतात व काँग्रेस पुढे नवा पेच प्रसंग निर्माण झाला होता.

त्यावेळी भारताने माजी विरोधी युद्धात स्वातंत्र्य राष्ट्र म्हणून भाग घ्यावा अशी पंडित जवाहरलाल यांची भूमिका होती. त्याच वेळी 1940 मध्ये गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला, त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाचे सत्याग्रही म्हणून जवाहरलाल नेहरूंना पकडण्यात आले व चार वर्षांची शिक्षा झाली त्यावेळी स्वातंत्र्य धोक्यात आहे. प्राणपणाने त्याचे संरक्षण करा असा स्फूर्ती दायक संदेश पंडित नेहरुंनी न्यायालयात केलेल्या भाषणात संपूर्ण देशाला दिला होता.

त्यानंतर महात्मा गांधीजींनी छोडो भारत ची घोषणा केली मुंबईत 8 ऑगस्ट 1942 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी अखिल भारतीय काँग्रेस  वर्किंग कमिटीच्या अधिवेशनात ‘छोडो भारत’ आंदोलनाचा ठराव मांडला ठराव मंजूर होताच रातोरात गांधीजींसह सर्व पुढाऱ्यांची धरपकड करण्यात आली. जवाहरलाल सह सार्‍यांनाच अहमदनगर किल्ल्यात ठेवण्यात आले.

पुढे 1945 ला सोडण्यात आले. त्यानंतर जिना व गांधीजींच्या विचाराने देशाची फाळणी झाली जवाहरलाल नेहरू हे प्रथमपासून फाळणीचे कट्टर विरोधक होते शेवटी देशाची फाळणी होऊन 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचा उदय झाला आणि जवाहरलाल हे स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री बनले.

पंतप्रधान कारकीर्द 

30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली, या भीषण घटनेने जवाहरलाल नेहरूंना फार मोठा धक्का बसला. “आपल्या जीवनातील प्रकाश हरपला” अशा शब्दात नेहरूंनी गांधींबद्दल वक्तव्य केले होते.

अठरा वर्षांच्या कारकिर्दीत नेहरूंनी भारताच्या उत्क्रांतीचे अनेक निर्णय घेतले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत देशातील ज्ञानाचा प्रकांडपंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून स्वतंत्र भारताची राज्यघटना पूर्ण करून घेतली. हिंदू कोड बिल मंजूर करून तमाम महिलांना त्यांचा हक्क मिळवून दिला. संविधानात अस्पृश्यता नष्ट करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

महिला, अस्पृश्य व अल्पसंख्यांकांना समान दर्जा व समान संधी देण्याची तरतूद करण्यात आली. नेहरूंच्या प्रयत्नाने नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली. पोर्तुगीजांनी वाटाघाटी करून गोव्या चा प्रश्न सोडवला. अखेरीस 1962 ला गोवा एक स्वतंत्र राष्ट्र झाले. शिक्षण व तंत्रज्ञानाच्या प्रयासाठी नेहरुंनी देशात अनेक संशोधन संस्था व राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन केल्या.

नेहरूंचे साहित्य

नेहरूंनी त्यांचे लेखन कारागृहातच केले. संपूर्ण साहित्य हे इंग्रजीतच आहे. त्यापैकी “ग्लींप्स ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री”, “जवाहरलाल नेहरू अँड ऑटोबायोग्राफी”, “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” हा ग्रंथ विशेष महत्त्वाचे आहेत. ‘ग्लींप्स ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री’ मध्ये त्यांनी आपल्या कन्येला अर्थात इंदिराजींना लिहिलेल्या पत्रांची संकलन संग्रह आहे. नेहरूंचे वक्तृत्व हे मनाचा ठाव घेणारी होते.

त्यांनी भारतावर व भारतीय जनतेने त्यांच्यावर अफाट प्रेम केले विशेषतः त्यांना लहान मुलं फार आवडायची म्हणूनच त्यांची 14 नोव्हेंबर ची जयंती बालदिन म्हणूनच साजरी केली जाते. नेहरू त्यांच्या सदराच्या खिशावर गुलाबाचं फूल त्यांच्या व्यक्तिमत्वाची दाद देत असते.

अखिल भारतीय काँग्रेसचे पाच वेळा अध्यक्ष असणारे ते एकमेव नेते होते. 1955 मध्ये देशातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पुढे भारत सरकारने आंतरराष्ट्रीय सामंजस्य व शांतता यासाठी नेहरू पुरस्काराची योजना कार्यान्वित केली आहे.

अखेर

चीनच्या मैत्री वर पंडितजींचा विश्वास होता परंतु चीनच्या प्रश्नावर तडजोड वाटाघाटी न झाल्याने चीनने 1962 मध्ये भारतावर आक्रमण केले. पंडितजींना या घटनेचा फार मोठा धक्का बसला व त्यांची प्रकृती ढासळली 1963 साली फार मोठ्या आजाराने खचून गेले व 1964 च्या मे महिन्यात दिल्ली येथे त्यांचे देहावसान झाले.

आम्ही दिलेल्या pandit jawaharlal nehru information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pandit nehru information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pandit jawaharlal nehru in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती Pandit Jawaharlal Nehru Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!