6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन Mahaparinirvan Din in Marathi

Mahaparinirvan Din in Marathi 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन, आज आपल्या सगळ्यांना माहित आहे, कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची घटना लिहून मोठे कार्य केले आहे आणि अश्या या महान व्यक्तीचा पुण्यतिथी दिवस म्हणून महापरीनिर्वान दिन साजरा केला जातो आणि आज आपण या लेखामध्ये महापरीनिर्वान दिवसाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. डॉ बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची पुण्यतिथी हि ६ डिसेंबर या दिवशी असते आणि ६ डिसेंबर हा दिवस दरवर्षी महापरीनिर्वान दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉ बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे अस्पृश्यांच्या आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांच्या हक्कासाठी घालवले तसेच अस्पृश्यांना सामाजिक मान्यता, निवडणूक हक्कामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता अश्या या महान व्यक्तीला श्रद्धांजली देण्यासाठी दरवर्षी ६ डिसेंबरला महापरीनिर्वान दिवस साजरा केला जातो.

आपल्याला माहित आहे कि डॉ बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांनी बौध्द धर्म स्वीकारला होता आणि ते बौध्द धर्माचे गुरु होते आणि म्हणूनच महापरीनिर्वान हा शब्द बौध्द भाषेतून आला आहे.

mahaparinirvan din in marathi
mahaparinirvan din in marathi

6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन – Mahaparinirvan Din in Marathi

नावमहापरीनिर्वान दिन किंवा दिवस
का साजरा केला जातोहा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी दिवशी साजरा केला जातो
केंव्हा साजरा केला जातोहा दिवस दरवर्षी ६ डिसेंबरला बौध्द धर्माचे लोक साजरा करतात.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील महान व्यक्तींच्यापैकी एक आहेत कारण त्यांनी आपल्या देशाला एक चांगली घटना दिली आहे आणि म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये झाला आणि ते पहिले अस्पृश्य होते ज्यांनी उच्च शिक्षण घेतले.

आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे अस्पृश्यांच्या आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांच्या हक्कासाठी घालवले तसेच अस्पृश्यांना सामाजिक मान्यता, निवडणूक हक्कामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, पत्रक आणि कार्यकर्ते म्हणून देखील काम केले आणि देशाची घटना देखील लिहिली आणि त्यांच्या ह्या सर्वोच्च कामगिरीसाठी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

महापरीनिर्वान दिवसाचा इतिहास – history

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू हा त्यांच्या दिल्लीमधील निवास्थानावर ६ डिसेंबर १९५६ मध्ये झाला आणि मग त्यांचे पार्थिव हे मुंबईमध्ये आणण्यात आले आणि मग त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना शिवाजी पार्क या ठिकाणी असणाऱ्या हिंदू स्मशान भूमीमध्ये आणले आणि त्यावेळी त्यांचा शेवटचा निरोप घेण्यासाठी एकूण १२ लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बौध्द धर्मानुसार अंत्यविधी करण्यात आले. काही वर्षांनी त्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्तीवर चैत्य (एक शिल्पप्रकार आहे) उभारण्यात आले आहे.

आता त्यांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांना श्रद्धांजली आणि आदरांजली देण्यासाठी देशभरातून बौध्द जनसमुदाय मोठ्या प्रमाणात चैत्य या ठिकाणी एकत्र येतो आणि या दिवसाला त्यांनी महापरीनिर्वान दिवस नाव दिले आहे.

महापरीनिर्वान दिवस कसा साजरा केला जातो ?

महापरीनिर्वान दिवस हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली आणि आदरांजली देण्यासाठी ६ डिसेंबर म्हणजेच त्यांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला फुलांचे हार घातले जातात तसेच त्यांच्या घोषणा दिल्या जातात.

तसेच त्यांना श्रद्धांजली आणि आदरांजली देण्यासाठी दिवे मेणबत्या लावल्या जातात तसेच चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात बौध्द जनसमुदाय जमतो.

परीनिर्वान म्हणजे काय – mahaparinirvan din meaning in marathi

परीनिर्वान म्हणजे हे एक मृत्यूनंतरचे निर्वाण आहे ज्यामध्ये जो व्यक्ती निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासनेपासून आणि जीवनातील वेदनेपासून दूर होतो किंवा मुक्त होतो आणि म्हणून परीनिर्वान हे बौध्द धर्मातील एक तत्व आणि ध्येय आहे.

महापरीनिर्वान दिनाविषयी काही विशेष तथ्ये – facts

  • परीनिर्वान हे बौध्द धर्मातील एक तत्व आणि ध्येय आहे आणि हे प्राप्त करण्यासाठी त्या संबधी व्यक्तीला एक चांगले, धार्मिक आणि सद्गुणी आयुष्य जगावे लागते तरच त्या व्यक्तीला मृत्यू नंतरचे निर्वाण प्राप्त होते असे बौध्द धर्मामध्ये म्हटले जाते.
  • या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्तीवर उभारण्यात आलेल्या चैत्यभूमीवर देशभरातून बौध्द धर्माचे लोक जमतात तसेच त्यांच्या पुतळ्याला फुलांचा हार घातला जातो आणि त्यांच्या घोषणा दिल्या जातात आणि बौध्द धर्मातील पवित्र गाणी म्हटली जातात.
  • महापरिनिर्वाण दिवस हा दरवर्षी ६ डिसेंबरला साजरा केला जातो.
  • महापरिनिर्वाण हा शब्द बौध्द संकल्पनेतून आला आहे आणि हा बौध्द संकल्पनेतून येण्याचे कारण म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्म स्वीकारला होता.
  • डॉ बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची पुण्यतिथी हि ६ डिसेंबर या दिवशी असते आणि ६ डिसेंबर हा दिवस दरवर्षी महापरीनिर्वान दिन म्हणून साजरा केला जातो.
  • परीनिर्वान म्हणजे या शब्दाचा शब्दशः अर्थ हा मोक्ष किंवा मुक्ती असा होतो.
  • महापरीनिर्वान दिवस हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिवस म्हणून साजरा केला जातो.
  • त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे अस्पृश्यांच्या आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांच्या हक्कासाठी घालवले आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हा दिवस त्यांच्या पुण्यतिथी दिवशी साजरा केला जातो.
  • ६ डिसेंबरला म्हणजेच महापरीनिर्वाण दिनादिवशी देशभरातून २० ते २५ लाख लोक चैत्यभूमीवर जमतात आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली देतात.

आम्ही दिलेल्या mahaparinirvan din information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mahaparinirvan din meaning in marathi या 6 december mahaparinirvan din speech in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about mahaparinirvan din in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!