मेजर ध्यानचंद मराठी माहिती Major Dhyan Chand Information in Marathi

Major Dhyan Chand Information in Marathi मेजर ध्यानचंद मराठी माहिती मेजर ध्यानचंद यांनी भारताच्या क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये ध्यानचंद आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकी या खेळासाठी भारत संघाचे प्रतिनिधित्व करत होते. ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांनी ऑलम्पिक मध्ये भारताला १९२८ – १९६४ या काळामध्ये ७ सुवर्णपदक पटकावून दिली होती. ध्यानचंद हे त्यांच्या हॉकी या खेळातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विक्रमांन मुळे पद्मभूषण या पुरस्काराचे मानकरी ठरले.

भारताचे नाव त्यांनी इतक मोठा करून दाखवलं की भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या पुरस्काराचं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावांमध्ये रूपांतर केलं. प्रत्येक खेळाडूला आज त्याच्या क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द मुळे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो. आजच्या लेखामध्ये आपण मेजर ध्यानचंद यांचां जीवन परिचय घेणार आहोत.

major dhyan chand information in marathi
major dhyan chand information in marathi

मेजर ध्यानचंद मराठी माहिती – Major Dhyan Chand Information in Marathi

नाव (Name)मेजर ध्यानचंद
जन्म (Birthday)२९ ऑगस्ट १९०५
जन्मस्थान (Birthplace)उत्तर प्रदेशातील अलाहाबाद
वडील (Father Name)रामेश्वर दत्त सिंह
पत्नी (Wife Name)जानकी देवी
आईचे नाव (Mother Name)शारदा सिंग
मुले (Children)अशोक कुमार
मृत्यू (Death)३ डिसेंबर १९७९

जन्म

मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळाडू होते. क्रीडा क्षेत्रामध्ये ध्यानचंद यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. हॉकी या खेळा मध्ये ते उत्तम खेळाडू होते. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे ध्यानचंद यांचे जन्मस्थान होय. ध्यानचंद यांचा वाढदिवस २९ ऑगस्ट १९०५ हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

ध्यानचंद यांचं खरं नाव ध्यान सिंह असं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ध्यानचंद यांचा जन्म झाला त्यामुळे ध्यानचंद यांचे वडील रामेश्वर दत्त सिंह हे ब्रिटिश सैन्यामध्ये मध्ये कामाला होते. त्यांच्या सैन्यामध्ये त्यांचे वडील हॉकी खेळत असत. ध्यानचंद यांना आधी कुस्तीची आवड होती.

ध्यान सिंह यांचे वडील आणि त्यांचे मोठे भाऊ रूप सिंह हे दोघे हॉकी खेळायचे. या दोघांना खेळताना पाहूनच कदाचित ध्यान सिंह यांनादेखील हॉकी खेळाची आवड निर्माण झाली असावी. ध्यान सिंह यांच्या वडिलांची कामामुळे सतत बदली व्हायची त्यामुळे ध्यान सिंह यांना कुटुंबासोबत वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थलांतर करावं लागायचं.

या गोष्टींमुळे ध्यान सिंह यांचं शिक्षण अर्धवटच राहिलं. ध्यान सिंह यांनी पाचवी पर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण केलं. परंतु पुढे त्यांना हॉकी खेळाची आवड लागल्यामुळे ते दिवस-रात्र हॉकी खेळायचे. असं म्हणतात ध्यान सिंह हे रात्री उशिरापर्यंत हॉकी या खेळाचा सराव करायचे त्यामुळे त्यांच्या मित्रांनी त्यांना चंद्राच्या चांदण्यांची उपमा देऊन त्यांच्या नावाचं ध्यान सिंह याच्यावरून ध्यानचंद यांच्या मध्ये रूपांतर केलं.

हॉकी खेळाची सुरुवात

मेजर ध्यानचंद हे क्रीडा क्षेत्रामध्ये हॉकी या खेळाचे गुरू मानले जायचे. हॉकीचा सराव त्यांनी दिवस-रात्र एक करून इतका उत्तम केला होता की प्रत्येक सामन्यांमध्ये ते असे काही जादू करून गोल करायचे की त्यांच्या पराक्रमामुळे त्यांनाच जादूगार असं नाव पडलं. भारतामध्ये आजही हॉकीचे नाव काढलं तर तोंडामध्ये पहिला शब्द येतो तो म्हणजे मेजर ध्यानचंद.

फक्त भारतातच त्यांची प्रसिद्धी नव्हती तर संपूर्ण विश्वात हॉकी खेळासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू संबोधलं जायचं. हॉकी या खेळाची आवड त्यांना लहानपणी लागली होती. वडिलांच्या होणाऱ्या सारख्या बदलीमुळे प्रत्येक वेळी या शहरातून दुसऱ्या शहरात त्यांना स्थलांतर करावं लागायचं. त्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवटच राहिला.

म्हणून हॉकी खेळाचा सराव करून त्यांनी हॉकी या खेळामध्ये आपलं करिअर करण्याचं ठरवलं. लहानपणी ते गरीब असल्यामुळे १४ वर्षांचे ध्यानचंद झाडांच्या फांद्या कापून त्यांना हॉकी स्टिक बनवून कपड्यांचा गोळा करून त्याने हॉकीचा सराव करायचे. ऑलम्पिक मध्ये तीन वर्ष भारताचं प्रतिनिधित्व करून तिन्ही वर्षी सुवर्णपदक मिळवलं होतं.

लहानपणीच वडिलांसोबत हाॅकी सामना बघायला गेलेले ध्यानचंद यांनी पराभूत झालेल्या संघाला वडिलांची परवानगी घेऊन तो सामना चार गोल करून जिंकवून दिला. ध्यानचंद यांची हॉकी खेळण्याची पद्धत पाहून व ते ज्या प्रकारे गोल करतात त्यांची जिद्द त्यांची खेळासाठी असलेली ती भूक पाहून ध्यानचंद यांना सैन्य अधिकारी त्यांना सैन्यात घेण्यासाठी तयार झाले.

१९२२ ध्यानचंद हे पंजाब रेजिमेंट चे सैनिक झाले आणि त्यांच्या सैन्यातून हॉकी खेळण्यास सुरुवात केली. सुभेदार मेजर भोळे तिवारी हे ध्यानचंद यांचे सल्लागार होते ध्यानचंद यांना हॉकीचे प्रशिक्षण देण्यामध्ये यांनी मदत केली. ध्यानचंद यांनी भारताला १९२८, १९३२, १९३६ ऑलम्पिक मध्ये हॉकी खेळात सुवर्ण पदक मिळवून दिलं.

१९३६ मध्ये भारतीय संघाने जर्मनी संघाला ८-१ हे गुण मिळवून विजय प्राप्त केला तेव्हा. तेव्हा ध्यानचंद अनवाणी पायाने खेळले होते. ध्यानचंद यांचे हॉकी खेळातील कौशल्य आणि खेळा बद्दल असलेली त्यांची मनोवृत्ती पाहून जर्मनीचे हिटलर यांनी स्वतः ध्यानचंद यांना त्यांच्या सैन्यामध्ये वरिष्ठ पदाची संधी दिली होती.

पण ध्यानचंद यांच्या मनामध्ये असलेल देशप्रेम त्यांना ती ऑफर घेण्यास रोखत होतं. त्यामुळे अतिशय प्रेमाने ध्यानचंद यांनी हिटलर यांनी दिलेल्या ऑफर चा आदर करत ती ऑफर नाकारली. ज्यावेळी ध्यानचंद भारतासाठी प्रतिनिधित्व करत होते त्यावेळी भारत हा विश्वातील हॉकी खेळा साठी सर्वोत्कृष्ट शक्तिशाली संघ मानला जायचा.

ध्यानचंद यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तर सर्वात उत्तम आणि गौरवास्पद आहे. ध्यानचंद यांनी एकूण ४०० पेक्षा देखील अधिक गोल केले आहेत. जे हॉकी या खेळा मध्ये संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जास्त गोल आहेत. त्यांचा हा विक्रम अजून पर्यंत कोणी मोडला नाही आहे. हा एक विश्व विक्रमच आहे. १९२६ मध्ये न्यूझीलंड येथे एक हॉकी सामना रंगवण्यात आला होता.

त्या सामन्यांमध्ये ध्यानचंद यांचा देखील सहभाग होता. सामन्यांमध्ये एकूण २० गोल करण्यात आले त्यातील १० गोल स्वतः ध्यानचंद यांनी एकट्याने केले होते. न्यूझीलंडमध्ये झालेल्या या सामन्यांमध्ये भारत एकूण २१ सामने खेळला. त्यातील १८ सामने भारताने जिंकली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतातर्फे १९० गोल नोंदवले गेले. त्यातील १०० गोल तर एकटे ध्यानचंद यांनी केले होते.

ध्यानचंद यांचे हॉकी खेळातील रेकॉर्ड दिवसेंदिवस वाढतच चालले होते. ज्यामुळे भारत हा हॉकी या खेळासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला. बाॅल वरची त्यांची पकड इतकी उत्तम होती की त्यांना द विझार्ड असं नाव पडलं. हे नाव त्यांना पंजाब मधील झेलम येथे हॉकीचा सामना रंगला होतात तेंव्हा पडलं.

या सामन्यात तर ध्यानचंद यांनी कमालच केली त्यांच्या संघांना दोन गोलाची गरज होती आणि ध्यानचंद यांनी आपल्या उत्तम कौशल्यांनी शेवटचे उरलेल्या तीन मिनिटांमध्ये चार गोल करून दाखवले. इथून पुढे त्यांनी अनेक हॉकी सामन्यांमध्ये भाग घेतला आणि त्यांचे रेकॉर्ड बघून त्यांची आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यासाठी निवड झाली.

लंडनमध्ये १९२७ साली लंडन फॉकस्टोन फेस्टिवल यामध्ये हॉकीचे सामने व्हायचे. यातील दहा सामन्यांमध्ये आपल्या भारत संघाने एकूण ७२ गोल केले. त्यातील ३६ गोल तर ध्यानचंद यांनी केले होते. १९२८ मध्ये आम्सटरडॅम मध्ये भरलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला नेदरलाॅंड बरोबर सामना करायचा होता.

त्यावेळी मेजर ध्यानचंद यांनी दोन गोल करून दाखवले. भारत संघाचे एकूण तीन होते त्यातले दोन गोल तर ध्यानचंद यांनी केले होते. या गोष्टीमुळे भारताला सुवर्णपदक देखील मिळालं याचं संपूर्ण श्रेय मेजर ध्यानचंद यांना जातं. लॉस एंजेल्स येथे १९३२ मध्ये ऑलम्पिक स्पर्धा रंगली होती. त्यामध्ये भारताचा सामना अमेरिकेशी होता या सामन्यांमध्ये २३-१ असा विक्रम करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

२३ पैकी ८ गोल् ध्यानचंद यांचे होते. त्याच वर्षी बर्लिन ओलंपिक मध्ये आपल्या भारत संघाने जपान, हंगेरी, अमेरिका या देशांना ० गोलाने पराभूत केलं. ध्यानचंद यांची हॉकी क्षेत्रात होणारी प्रगती भारताला अभिमानास्पद ठरली. क्रीडा क्षेत्रामध्ये ध्यानचंद यांनी भारताचे नाव एका उच्च स्तरावर नेऊन ठेवलं. त्यांच्या या हॉकी कारकीर्द मुळे त्यांना मेजर ही पदवी देखील देण्यात आली आहे.

इतकेच नव्हे तर त्यांनी सलग तीन वर्ष भारताला ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं. त्यांनी एकूण त्यांच्या हॉकी कारकिर्दीमध्ये हजार गोल केले त्यातील चारशे गोल तर आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध चे होते. या गोष्टीमुळे भारत सरकारने त्यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला. व नवी दिल्लीमधील ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम त्यांच्या नावावर ठेवलं.

मृत्यू

ध्यानचंद यांचा मृत्यू यकृत कर्करोगाने झाला‌. त्यांना यकृत कर्करोग हा विकार होता. ३ डिसेंबर १९७९ यादिवशी मेजर ध्यानचंद यांचं निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयांमध्ये ध्यानचंद यांच्यावर उपचार चालू होते. १९४८ पर्यंत ते आंतरराष्ट्रीय सामने खेळत राहिले.

आम्ही दिलेल्या major dhyan chand information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “मेजर ध्यानचंद मराठी माहिती” major dhyan chand information in marathi pdf यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dhyan chand information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mejar dhyanchand माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये major dhyan chand information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!