29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन National Sports Day Information In Marathi

National Sports Day Information In Marathi 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन 2021 National Sports Day 2021 साजरा केला जातो. शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा हा प्रकार ही आपल्या देशात चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे रुढ झालेला आहे. तरुणांना खेळात रुची निर्माण व्हावी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांची माहिती तरुण पिढीच्या आयुष्याचा एक घटक बनावी या दृष्टिकोनातून भारतीय क्रीडा मंत्रालयानं खेळाचं स्वरूप देशव्यापी विश्वव्यापी बनवण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचे आयोजन केले आणि 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून जाहीर करण्याचे ठरवले.

विशेषता याच दिवशी हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिन. हॉकी या प्रकारांमध्ये मेजर ध्यानचंद यांनी आपल्या देशाला अनेक पुरस्कार मिळवून दिले ऑलम्पिक मध्ये एक वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी यांचा फार मोठा सिंहाचा वाटा. National Sports Day in India is Celebrated On म्हणूनच ध्यानचंद यांचा जन्मदिन म्हणजेच 29 ऑगस्ट देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले.

national sports day information in marathi
national sports day information in marathi

29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन 2021 – National Sports Day Information In Marathi

राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो – When is National Sports Day Celebrated ?

29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय क्रीडा दिन माहिती 

उत्तर प्रदेशातील आलाहाबाद या ठिकाणी यांचा जन्म 1905 साली झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचं ते आर्मीत दाखल झाले. असतानाच त्यांना हॉकी या खेळा विषयीची ओढ निर्माण झाली. तिथं अनेक कौशल्य दाखवली. त्यानंतर पहिल्यांदाच या आर्मीचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता.

त्यावेळी त्यांनी आपलं कौशल्य चांगल्या प्रकारे दाखवून त्या दौऱ्यामध्ये आपल्या देशाला अठरा विजय प्राप्त करून दिले. एकूण 192 गोला मध्ये जवळ जवळ शंभर गोल एकट्या ध्यानचंदचे होते . 1928, 1932 आणि 1936 ऑलम्पिक खेळांमध्ये सुद्धा त्यांनी जवळजवळ 185 गोल केले होते.

त्यांचं खरं नाव ध्यान सिंह सोमेश्वर सिंह बैस असं होतं, परंतु ध्यानचंद आपल्या हॉकीचा सराव रात्रीच्यावेळी चंद्रप्रकाशात करत असत. म्हणून त्यांच्या मित्राने ध्यान सिंहच्या ऐवजी ध्यानचंद केले. आणि याच नावाने ते प्रसिद्ध झाले. केवळ सहावी शिकलेला ध्यानचंद आर्मीत गेल्यानंतर आपल्या हॉकी या खेळा मध्ये कौशल्य गाजवून जगभर प्रसिद्ध झाला.

1936 मध्ये जेव्हा जर्मनीविरुद्ध बर्लिन या ठिकाणी ऑलिंपिक सामना चालू होता, तेव्हा जर्मनीचे बादशाह अडॉल्फ हिटलर हे स्वतः ध्यानचंदचा खेळ बघायला उपस्थित होते. ध्यानचंद असा खेळायचा की लोकांना असं वाटायचं की त्याचा बॉल आणि स्तिकमध्ये चुंबकत्व असावा आणि त्याच बरोबर 1936 च्या ऑलिंपिक खेळा मध्ये अनेक वेळा मेजर ध्यानचंद यांचे स्टिक तपासण्यात आले होते.

ध्यानचंदचे खेळाचे कौशल्य बघून ॲडॉल्फ हिटलर यांनी त्याला आपल्या इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद देण्याचे मान्य केले होते. परंतु स्वाभिमानी देशभक्त ध्यानचंद यांनी त्यांची ती ऑफर नम्रपणे नाकारली होती. असा खेळाडू आपल्या देशात असणं हे आपल्या देशाचे खूप मोठे भाग्य आहे. त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये जवळजवळ 400 गोल केले होते आणि 1948 मध्ये शेवटची मॅच खेळून 1956 साली या खेळातून सेवानिवृत्त झाले.

त्याच वेळी त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरव केला होता. 3 डिसेंबर 1979 रोजी भारतीय टपाल खात्यानेत्यांना श्रद्धांजली वाहिली आणि दिल्लीच्या स्टेडियमचे नाव मेजर ध्यानचंद स्टेडियम असं ठेवलं. आपल्या देशात क्रिकेट बरोबरच फुटबॉल, कबड्डी सारखे सामने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जातात.

विश्व कप जिंकून क्रिकेट मी संपूर्ण जगभरात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे सुनील गावस्कर, कपिलदेव, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यासारखे अनेक खेळाडू या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या देशाचे नेतृत्व करताना आपण पहात आलेलो आहोत.

मिताली राज सारख्या काही महिला क्रिकेटर खेळाडू ही खेळामध्ये मागे नाहीत. कबड्डी मध्ये सुद्धा भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचलेला आहे. ऑलिम्पिकचे उदाहरण घ्यायचं तर पी टी उषा पासून ते आज कालची पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, राही सरनोबत, मीराबाई चानू, लवलीना यांच्यासारखे  खेळाडू ऑलिम्पिकमध्ये चमकलेले आपण नेहमीच पाहतो.

भारतीय हॉकी संघाने सुद्धा यावर्षी आपली चांगली कामगिरी पार पाडली आणि ऑलिम्पिक मध्ये देशाचे नाव उज्ज्वल केले, एका आर्मीतील खेळाडू नीरज चोपडा याने सुवर्णपदक मिळवून भारताच्या यशा मध्ये फार मोलाची कामगिरी करून दाखवली. राष्ट्रकुल आणि ऑलिंपिक सारख्या क्रीडा प्रकारांमध्ये सर्वांनीच चांगले यशस्वी व्हावे म्हणून भारत सरकारने, क्रीडा मंत्रालयाने शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या मध्ये खेळाची आवड निर्माण करणं गरजेचं आहे.

त्या खेळांना आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. तरच विविध स्पर्धांमध्ये. विविध खेळांमध्ये आजचा विद्यार्थी तयार होईल यात शंकाच नाही आणि म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करून त्यानिमित्ताने देशातील आणि परदेशातील विविध खेळांना प्रयुक्त करणं हे संबंधित अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे.

मैदानी खेळाबरोबरच किंवा या सर्व प्रकारांमध्ये आपल्या भारतीय विद्यार्थ्यांनी, खेळाडूने प्रत्यक्ष नाव आणि क्रीडा प्रकारांमध्ये देशाचे नाव संपूर्ण विश्वात यशाच्या शिखरावर विराजमान करावं आणि देशाचा तिरंगा खेड्यातील अभूतपूर्व यशाने आनंदाने, अभिमानाने. स्वाभिमानाने फडकत रहावा हीच अपेक्षा.

कुस्तीसारख्या खेळातही फोगट बहिणी बरोबरच, रविकुमार, बजरंग यानी कुस्ती हा लाल मातीवरून मॅटवरील कुस्तीचा प्रकार प्रकाशात आणला आहे. ऑलिम्पिकचां विचार करता चीन, अमेरिका, रशिया हे देश सुवर्ण पदकासोबतच अनेक पदकांची खैरात करणारे देश, आपल्या समोर आदर्श आहे.

आपल्या देशातही अशा पदकाना गवसणी घालण्यासाठी आपल्या देशातील युवकांना त्या त्या खेळात सहभागी करून प्रोत्साहन दिलं पाहिजे. अजून बऱ्याच तरुणांना किंवा खेळात रुची असणाऱ्यांना उत्कृष्ट खेळाडू बनण्याच्या संबधी योग्य मार्गदर्शन दिलं पाहिजे. तरुणांना शालेय स्तरापासूनच विविध खेळाडू बाबत प्रेरणा दिली पाहिजे.

तरच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे योगदान उपयुक्त आणि सार्थक झाले असं म्हणता येईल. जगभरातील सर्व खेळांचा विचार केल्यास त्या त्या खेळात उल्लेखनीय कामगिरी करणारेच खेळाडू चांगले स्मरणात राहतात. म्हणूनच आपणही उत्कृष्ट खेळाडू बनण्यासाठी कुणालातरी आदर्श मानलं पाहिजे. कुणीतरी आपला गॉडफादर असावा. आणि आपली ज्या खेळात जास्त आवड आहे, त्याच खेळात आपण जादा इंटरेस्ट घ्यायला हवा.

उदाहरणार्थ: जर आपल्याला हॉकी पसंद असेल तर मेजर ध्यानचंद आपला गुरु मानून आपण तयारी केली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याकडे जिद्द हवी. प्रयत्न करण्याची इच्छा हवी. तरच आपण हॉकीचा जादूगार नाही बनणार पण निदान त्यांच्या जवळपास तरी पोहचू. खेळात संयम खूप महत्वाचा असतो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. त्यांचं कार्य चांगलं होतं. म्हणूनच त्यांचाही जन्मदिन संपूर्ण देशभर शिक्षकदिन म्हणून पाळला जातो..तसाच ध्यानचंद यांचा जन्मदिन देशभर राष्ट्रीय क्रीडा दीन म्हणून साजरा केला जातो.

आम्ही दिलेल्या 29 august national sports day information in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन” National Sports Day 2021 विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या National Sports Day of India या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about national sports day in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण national sports day is celebrated on या लेखाचा वापर असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!