मखाणा रेसिपी मराठी Makhana Recipes in Marathi

Makhana Recipes in Marathi मखाणा रेसिपी मराठी काही लोकांना मखाने पासून बनवलेले पदार्थ माहित आहेत आणि असे अनेक लोक आहेत ज्यांना मखाने पासून बनवलेले पदार्थ माहित नाहीत अशाच लोकांच्यासाठी आज आपण या लेखामध्ये मखाने पासून वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते पाहणार आहोत. मखाने पासून बनवलेले पदार्थ हे पौष्टिक असतात कारण यामध्ये अनेक आरोग्य फायद्यांचा समावेश आहे आणि या पासून बनवलेले सर्व पदार्थ लहान मुलांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांच्यासाठी खूप उत्तम आहेत. मखाने बनवलेले पदार्थ हे खूप सोपे असतात आणि हे झटपट आणि मोजक्या साहित्यामध्ये बनतात चला तर मग मखाने ओअसून वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते पाहूयात.

makhana recipes in marathi
makhana recipes in marathi

मखाणा रेसिपी मराठी – Makhana Recipes in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० मिनिटे
बनवण्याची पध्दतखूप सोपी

मखाने रेसिपीज – how to make makhana kheer

भारतामध्ये मखाने पासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवल्या जातात आणि आता आपण त्यापासून वेगवेगळ्या रेसिपी कश्या बनवायच्या आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

मसाला मखाने रेसिपी – masala makhana recipe

मसाला मखाने रेसिपी आपण मखानेमध्ये चाट मसाला, थोडासा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घालून बनवतो. चला तर मसाला मखाना रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० मिनिटे
बनवण्याची पध्दतखूप सोपी

मसाला मखाने बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make masala makhana recipe 

मसाला मखाने बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी आता आपण पाहूयात.

  • २ वाटी मखाने.
  • दीड मोठा चमचा तेल.
  • १/२ चमचा लाल मिरची पावडर.
  • १/४ चमचा गरम मसाला.
  • १/२ चमचा पिठी साखर.
  • १/२ चमचा चाट मसाला.
  • मीठ ( चवीनुसार ).

मसाला मखाने रेसिपी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make masala makhana recipe 

  • मसाला मखाने रेसिपी बनवताना सर्वप्रथम गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि ती गरम झाली कि त्यामध्ये दीड चमचा तेल घाला तेल गरम झाले कि त्यामध्ये मखाने घाला आणि ते तेलामध्ये चांगले २ ते ३ मिनिटे परतून घ्या.
  • ते तेलामध्ये चांगले भाजले कि गॅसची आच मंद करा आणि मग त्यामध्ये लाल मिरची पावडर,, गरम मसाला, मीठ ( चवीनुसार ) आणि साखर घालून ते मिक्स करा आणि मग गॅस बंद करा.
  • हे मसालेदार मखाने सर्व्ह करताना ते प्लेटमध्ये काढा आणि त्यावर चाट मसाला घालून ते सर्व्ह करा.

मखाने खीर रेसिपी – makhana kheer recipe in marathi

मखाने पासून बनवलेली खीर हा एक गोड पदार्थ आहे जो आपण मखाने, दुध, तूप आणि काही ड्राय फ्रुट्स वापरून बनवली जाते. चला तर आता आपण मखाने पासून खीर कशी बनवायची ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
बनवण्याची पध्दतसोपी

मखाने खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make makhana kheer 

  • १ वाटी मखाने.
  • २ वाटी दुध.
  • २ ते ३ चमचे तूप.
  • ४ ते ५ चमचे साखर.
  • २ ते ३ चमचे काजू, बदाम आणि पिस्ता तुकडे.
  • १ चमचा वेलची पावडर.

मखाणे खीर बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make makhana kheer recipe 

आता आपण वर दिलेल्या साहित्यापासून मखना खीर कशी बनवायची ते पाहूयात.

  • सर्वप्रथम गॅसवर एक पॅन ठेवा आणि पॅन गरम झाला कि त्यामध्ये दोन चमचे तूप घाला. तूप गरम झाले कि त्यामध्ये मखाने घाला आणि ते ५ ते ६ मिनिटे चांगले कुरकुरित भाजून घ्या. आणि ते भाजल्यानंतर ते बाजूला काढून गार होऊ द्या.
  • आता त्याच पॅनमध्ये आणखीन एक चमचा तूप घाला आणि त्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता घालून ते चांगले परतून घ्या आणि ते देखील बाजूला काढून ठेवा.
  • आता त्या पॅन मध्ये दुध घाला आणि ते उकळू द्या.
  • दुध उकळू पर्यंत आपण भाजलेले मखाने मधील १ मोठा चमचा मखाने बाजूला काढून ठेवा आणि राहिलेल्या सर्व मखाण्याची मिक्सरवर बारीक पावडर करून घ्या.
  • मग गॅसवर ठेवलेले दुध उकळले कि त्यामध्ये मखाने पावडर आणि बाजूला काढून ठेवलेले भाजलेले मखाने घाला आणि ते मिक्स करून ते मऊ होऊपर्यंत शिजवा.
  • आता त्यामध्ये ४ ते ५ चमचे साखर आणि वेलची पावडर घाला आणि साखर विरघळेपर्यंत ढवळत रहा. साखर विरघळली कि त्यामध्ये आपण तुपामध्ये परतून घेतलेले ड्राय फ्रुट्स घाला आणि ते मिक्स करा आणि खिरीला एक उकळी आणा आणि मग गॅस बंद करा.
  • तुमची स्वादिष्ट आणि गोड मखाने खीर तयार झाली.

मखाना चिवडा रेसिपी – makhana chivda recipe

आता आपण बनवण्यास एकदम सोपी आणि टेस्टी मखाना चिवडा रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० मिनिटे
बनवण्याची पध्दतसोपी

मखाने चिवडा रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make makhana chivda recipe 

  • २ वाटी मखाने.
  • २ मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे.
  • ५ ते ६ कडीपत्ता पाने.
  • १/२ चमचा लाल मिरची पावडर.
  • १ चमचा चिवडा मसाला.
  • १/४ चमचा हळद.
  • १ चमचा पिठी साखर.
  • ३ चमचे तेल.
  • मीठ ( चवीनुसार ).

मखाने चिवडा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make makhana chivda recipe 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून मखाने चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात.

  • सर्वप्रथम गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये १ चमचा तेल घाला. तेल गरम झाले कि त्यामध्ये मखाने घाला आणि ते ५ मिनिटे मखाने भाजा आणि ते एका भांड्यामध्ये काढून घ्या.
  • आता त्याच कढई मध्ये २ चमचे तेल घाला आणि तेल गरम झाले कि गॅसची आच मंद करा आणि मग त्यामध्ये कडीपत्ता आणि शेंगदाणे घाला आणि ते थोडा वेळ भाजू द्या.
  • आता यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि चिवडा मसाला घाला आणि २ सेकंद परता आणि ते फोडणी भाजलेल्या माखाण्यामध्ये टाका तसेच त्यामध्ये मीठ आणि साखर टाका आणि हे सर्व चांगले मिक्स करा.
  • तुमचा मखाने चिवडा तयार झाला.

आम्ही दिलेल्या makhana recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मखाणा रेसिपी मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या makhana kheer recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chatpata makhana recipe माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये makhana bhaji recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!