malika amar sheikh information in marathi मल्लिका अमर शेख माहिती, आपल्या मराठी साहित्यामध्ये अनेक लेखक आणि लेखिका होऊन गेल्या ज्यांनी मराठी साहित्याला सुंदर आणि समृध्द बनवले आणि आज देखील असे अनेक लेखक आणि लेखिका आहेत ज्या मराठी साहित्य आणखीन भक्कम बनवत आहेत आणि त्यामधील एक प्रसिध्द लेखिका म्हणजे मल्लिका अमर शेख ह्या आहेत ज्या कवी अमर शेख यांची मुलगी आणि नामदेव ढसाळ यांची पत्नी आहेत.
मल्लिका अमर शेख हि मराठी साहित्यिक असून तिने अनेक पुस्तके जसे कि एक होता उंदीर, देहारुतू आणि वाळूचा प्रियकर या सारखी काही पुस्तके लिहिली त्याचबरोबर त्यांनी काव्यसंग्रह आणि आत्मचरित्र देखील लिहिले. चला तर खाली आपण मलिका अमर शेख यांच्या विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती घेवूया.
मल्लिका अमर शेख माहिती – Malika Amar Sheikh Information in Marathi
नाव | मल्लिका अमर शेख |
लग्नानंतरचे नाव | मलिका नामदेव ढसाळ |
जन्म | १६ फेब्रुवारी १९५७ |
राज्य | महाराष्ट्र |
ओळख | लेखिका आणि कवियित्री |
मल्लिका अमर शेख यांचे प्रारंभिक जीवन – early life
मल्लिका अमर शेख ह्या एक मराठी लेखिका आहेत आणि यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९५७ मध्ये महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाम शाहीर आणि कवी अमर शेख असे होते. त्यांचा जन्म हा १९५७ चा असल्यामुळे त्या १९६० पासून सुरु असलेल्या महाराष्ट्रामधील राजकारणाच्या गडबडीमध्ये वाढलेल्या होत्या.
आणि त्यांचे वडील अमर शेख हे कवी असल्यामुळे त्यांना देखील लेखनाची अव्क़द हि लहानपणी पासूनच असावी. पुढे त्यांचे लग्न कट्टर दलित पँथर्सचे सह संस्थापक नामदेव ढसाळ यांच्याशी झाले आणि त्यावेळी त्यांनी मराठी कविता रचण्यास सुरुवात केली परंतु मलिका अमर शेख यांचे त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर लग्न मोडले.
मल्लिका अमर शेख यांचे लेखन
मल्लिका शेख यांच्या लेखन प्रवास हा शालेय जीवनापासून सुरु झाला होता आणि त्यांनी त्यांच्या लेखन प्रवासामध्ये अनेक पुस्तके, कथासंग्रह, नाटक, काव्यसंग्रह, चित्रपट आणि एकांकिका लिहिल्या.
काव्यसंग्रह
द ट्री ऑफ टंग्ज आणि लाइव्ह अपडेट ही काव्यसंग्रह लिहिले.
पुस्तके
मल्लिका अमर शेख यांनी त्यांच्या लेखन कारकिर्दीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके लिहिली त्यामधील क काही वाळूचा प्रियकर, कोहम कोहम, एक होता उंदीर, महानगर, माणूसपणाच भिंग, देहऋतू, मला उध्वस्त व्हायचे (i want to distroy myself) इत्यादी.
मल्लिका अमर शेख यांच्याविषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- मल्लिका अमर शेख ह्या मुस्लीम धर्माच्या होत्या आणि लग्नानंतर त्यांचा धर्म बौध्द होता.
- मल्लिका यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये होती आणि मुलाच्या जन्मानंतर त्यांचे लग्न मोडले.
- मल्लिका अमर शेख ह्या महाराष्ट्रातील कवी असून त्या मुंबई या शहरामध्ये राहत होत्या.
- त्यांना लेखिका आणि कवियित्री म्हणून ओळखले जात होते.
- मल्लिका अमर शेख यांचे लग्न नामदेव ढसाळ यांच्याशी झाले तेंव्हा त्या फक्त १८ वर्षाच्या होत्या म्हणजेच त्यांचे खूप कमी वयामध्ये लग्न झाले होते.
- त्यांच्या घराचे वातावरण हे लेखनाचे आणि कविता रचण्याचे असल्यामुळे त्यांना देखील लेखनाची आणि कविता रचण्याची आवड हि लहान वयातच निर्माण झाली होती आणि त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली कविता लिहिली होती.
- त्यांना नृत्य करण्याची देखील आवड होती.
- मल्लिका शेख यांनी मला उध्वस्त व्हायचे आहे हे पुस्तक लिहिले आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांच्या संसाराचे संपूर्ण वर्णन केले आहे.
- मल्लिका शेख यांचे बडील देखील कवी असल्यामुळे त्यांच्या घरी कवी, कलाकार लेखक यांचे देखील येणे जाने असायचे त्यामुळे त्यांना चांगल्या लोकांचा सहवास देखील लाभला आणि त्यांना त्यामुळे लेखनामध्ये प्रगती करण्यास चांगला वाव मिळाला.
- नामदेव ढसाळ आणि मल्लिका अमर शेख यांचा प्रेमविवाह झाला होता.
- मला उध्वस्त व्हायचे (i want to distroy myself) हे त्यांनी लिहिलेले साहित्य आहे जे आत्मचरित्रावर आधारित आहे.
- २००६ मध्ये त्यांनी मला उध्वस्त व्हायचे आहे हे आत्मचरित्र लिहिले आहे.
- वाळूचा प्रियकर १९७९ मध्ये लिहिले आहे तसेच देहऋतू हे १९९९ मध्ये लिहिले आहे तसेच १९९३ मध्ये महानगर अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
- मल्लिका अमर शेख यांनी १९८४ मध्ये स्फोटक हे आत्मचरित्र देखील लिहिले होते.
- त्यांचे पती नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरची स्थापना केली होती तसेच ते प्रसिध्द कवी देखील होते.
- मल्लिका अमर शेख यांनी सूर एक वादळाचा हे पुस्तक लिहिले जे त्यांच्या वडिलांच्यावर आधारित होते.
- जरी मलिका अमर शेख यांना लेखनाचा आणि कविता करण्याचा वारसा हा त्यांच्या वडिलांच्या कडून मिळाला असला तरी त्यांच्या कविता आणि लेखन हे त्यांच्या वडिलांच्यापेक्षा खूप वेगळ्या आहेत.
- त्यांनी पोवाडा सोडला तर सर्व प्रकारच्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत.
- मल्लिका अमर शेख ह्या लग्नानंतर घरातील सर्व जबाबदारी पाहून कविता आणि नाटक देखील लिहित होत्या.
- मल्लिका अमर शेख यांची वडील मुस्लीम, आई उच्चवर्णीय हिंदू आणि पती दलितांचा नायक होता.
मल्लिका अमर शेख यांना मिळालेले पुरस्कार – awards
- मल्लिका अमर शेख यांना २०१५ मध्ये बहिणाबाई पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
- त्याचबरोबर त्यांना २०१६ मध्ये वाग्यज्ञे हा साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचा पुरस्कार देखील मिळाला होता.
आम्ही दिलेल्या malika amar sheikh information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मल्लिका अमर शेख माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या malika amar sheikh information in marathi wikipedia या malika amar sheikh information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about malika amar sheikh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट