Manavta Hach Khara Dharma Essay in Marathi मानवता हाच खरा धर्म निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये मानवता हाच खरा धर्म या विषयावर निबंध लिहिणार आहोत. जगामध्ये तसेच आपल्या भारत देशामध्ये अनेक वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक राहतात आणि सर्वजण सांगतात कि माझा धरम कसा श्रेष्ठ आहे परंतु जगामध्ये जर कोणता धर्म श्रेष्ठ आहे. असे मानले तर मानवता हा एक खरा धर्म आहे आणि लोकांनी मानवता जपली पाहिजे त्यामुळे त्यांच्या धर्माचे देखील महत्व वाढेल. जरी या जगामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक राहत असले तरी आपण माणूस म्हणून एकाचा आहोत आणि देवाने आपल्याला जन्माला घालताना एक सारखेच घातले आहे आणि देवाने जन्माला घालताना आपल्यावर आपण ह्याच धर्माचा आहे आणि हीच माझी जात आहे.
असा शिक्का मारून पाठवले नाही तर आपण सर्व जन माणूस म्हणून एकच आहोत आणि आपला धर्म देखील एकाच आहे परंतु सध्याच्या काळामध्ये लोकांच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कारणांच्या साठी भांडणे होतात तसेच लोक अनेक कारणांच्यासाठी भांडतात. काही जन जात आणि धरण यावरून भांडतात, काही जन राजकीय सत्तेसाठी भांडतात तसेच काही जन संपत्ती साठी भांडत असतात आणि त्यामुळे लोकांना काही समजत नाही आहे कि ते काय करत आहेत.
आणि ते कश्यासाठी भांडत आहेत पण शेवटी आपण एक चांगला मानव म्हणून मानवाने मानवता जपली पाहिजे तसेच मानवाने एकमेकांना मदत केली पाहिजे, तसेच अडचणीच्या वेळी एकमेकांना समजावून घेतले पाहिजे, तसेच जाती, धर्म, भाषा, सत्ता आणि संपती यावरून भांडण न करता समंजसपणे या वर विचार विनिमय करून या वर काही उपाय करून मार्ग काढले पाहिजेत त्यामुळे मानवता धर्म खऱ्या अर्थाने जपला जाईल.
अनेक थोर लोकांनी भारतातील लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला कि मानवता हाच खरा धर्म आहे आणि याच्या पलीकडे कोणताही धर्म किंवा जात नाही आणि लोकांनी एकाद्या व्यक्तीच्या अडचणीच्या वेळी किंवा जर ती व्यक्ती संकटात असेल तर एकाद्या दुसऱ्या व्यक्तीने जात, धर्म आणि भाषा यासारखे विचार बाजूला ठेवून त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे त्यामुळे यातून मानवता धर्म दिसून येतो.
मानवता हाच खरा धर्म याचा अर्थ काय तर मानवता हाच खरा धर्म म्हणजे मानव जे माझा धर्म असा तसा म्हणून भांडत आहे किंवा माझाच धर्म श्रेष्ठ असे म्हणून झगडत आहे त्याने एकाद्या गरजू व्यक्तीच्या अडचणी तसेच एकदा व्यक्ती कोणत्याही संकटात असेल तर त्या व्यक्तीने त्या अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला जर मदत केली तर त्यावेळी मानवता जपली असे सिद्ध होते म्हणून प्रत्येक व्यक्ती आपली जात किंवा धर्म बाजूला ठेवून संकटात अडकलेल्या व्यक्तीला तसेच कोणतेही वाद न करता एकत्र अगदी आनंदाने राहिले पाहिजे.
आपण बघितले तर भारत हा एक संस्कृती प्रधान देश आहे आणि भारतामध्ये अनेक जातीचे, पंथाचे, धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकाच देशामध्ये अगदी आनंदाने राहतात आणि हे एक मानवतेचे उत्तम उदाहरण आहे कारण भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक न झगडता राहतात तसेच धर्म न पाहता भारतामध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन अनेक सन साजरे करतात तसेच गुण्या गोविंदाने राहतात.
पण सध्या मानवता म्हणजे काय हे मानवाला समजत नाही आहे आणि माणूस दिवसेंदिवस स्वार्थी होत चालला आहे त्याला समजत नाही आहे कि आपण काय करावे आणि आपण मानव म्हणून जन्माला येऊन आपली काय कर्तव्ये आहेत ते समाजात नाही आहे. जिकडे तिकडे बघेल तिकडे लोक कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी झगडत आहेत जसे कि लोक सत्तेसाठी मोठ्या प्रमाणात भांडत आहे तसेच आपल्याला सत्ता मिळावी म्हणून एकमेकांच्या मध्ये भांडण लावून आपला स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत,
तसेच काही लोक आपला धर्म श्रेष्ठ म्हणून भांडत आहेत. अश्या प्रकारे जगामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी अनेक ठिकाणी भांडण चालूच आहे आणि मानवाला कळत नाही आहे कि आपले कर्त्यव्य काय आहे आणि आपल्याला देवाने जन्माला कश्यासाठी घातले आहे तसेच मानवाने माणूस म्हणून काय केले पाहिजे. जगातील प्रत्येक मानवाने मानवता जपली पाहिजे आणि मानवतेची जागृकता वाढवली पाहिजे.
मानवाने हि एकमेकांच्या मनामध्ये असणारी धर्माची, जातीचे, भाषेची विषमतेची भावना नष्ट केली पाहिजे आणि मानवता धर्म पाळला पाहिजे. मानवता हा एक महत्वाचा भाग आहे आणि हा आपल्या जीवनाचा पाया आहे त्यामुळे मानवाने एकमेकांच्या सोबत प्रेमाने, आदराने, आपुलकीने आणि विश्वासाने वागले पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीमध्ये भेदभाव केला नाही पाहिजे तसेच कोणत्याही व्यक्तीची फसणूक केली नाही पाहिजे त्यामुळे खऱ्या अर्थाने मानवता धर्म पाळला जाईल.
भारतामध्ये मानवता हि चांगल्या प्रकारे जपली जाते आणि भारतामध्ये मानवता जपण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केला आहे त्यामधील एक म्हणजे साने गुरुजी यांनी मानवतेचे महत्व आपल्या कवितेतून सांगण्याचे प्रयत्न केले आहे आणि कविता सगळ्यांना माहित आहे ती म्हणजे “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे”.
साने गुरुजी या कवितेमध्ये म्हणतात कि मानवाचा खरा धर्म एकाच आहे आणि तो म्हणजे एकमेकांना प्रेम देणे, आपुलकीने वागणे, विश्वासाने वागणे आणि भेदभाव न करता अगदी आनंदाने एकत्र राहणे. संत ज्ञानेश्वरांनी देखील मानवता हा खरा धर्म आहे आणि यापुढे कोणताही धर्म नाही हे समजावून दिले आणि त्यांनी देखील मानवता हाच खरा धर्म याचा प्रचार केला तसेच त्यांनी वारीची सुरुवात केली आणि त्या वारीमध्ये सर्व धर्माचे लोक सामील झाले होते.
अश्या प्रकारे अनेक लोकांनी मानवता हाच खरा धर्म हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. जर आपल्याला वाटत असेल कि जगामध्ये होणारी युध्द जर थांबावी आणि आणि संपूर्ण जगामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदावी असे वाटत असेल तर जगामध्ये मानवता हाच खरा धर्म या बद्दल लोकांना महत्व पटवून दिले पाहिजे. अश्या प्रकारे मानवाने जर मानवता जपली तर मानवाचा जन्म सार्थक ठरेल आणि जग शांततेत आणि सुरळीत चालेल.
आम्ही दिलेल्या manavta hach khara dharma essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मानवता हाच खरा धर्म निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Manavta Hach Khara Dharma Nibandh in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Manavta Hach Khara Dharma Marathi Nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट