संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र Sant Dnyaneshwar Information In Marathi

Sant Dnyaneshwar Information in Marathi संत ज्ञानेश्वर यांची माहिती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात परमार्थाच्या क्षेत्रात अजोड व्यक्तिमत्व असणारे अलौकिक चरित्र, सुमारे ७२५ वर्षे महाराष्टातील सर्व पिढ्यांमधील, तसेच सामाजवर्गाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ स्थान म्हणून जपले आहे ते एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे संत ज्ञानेश्वर होय. संत ज्ञानेश्वर महाष्ट्रातील १३ व्या शतकातील एक थोर योगी, महान संतकवी, तत्वज्ञानी, वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते.(sant dnyaneshwar in marathi)

sant-dnyaneshwar-information-in-marathi
sant dnyaneshwar information in marathi

संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती – Sant Dnyaneshwar Information In Marathi

नाव ज्ञानेश्वर
जन्म ई.स. १२७५  (महाराष्ट्र)
गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण,आपेगांव
आईरुक्मिणीबाई
वडीलविठ्ठलपंत
संजीवन समाधी ई.स. १२९६

जन्म

संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गांव आपेगांव येथे श्रावण कृष्ण अष्टमी, ई.स. १२७५ रोजी झाला. संत ज्ञानेश्वरांचा जन्म विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई या कुलकर्णी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे मुळनाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी होते. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळातच विरक्त संन्याशी होते. विवाहित असतानाच त्यांनी सन्यास घेतला व काशीला गेले.पण विवाहित असल्याचे समजल्यावर गुरुंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.

विठ्ठलपंत हे तीर्थयात्रा करत आळंदी येथे स्थायिक झाले. तत्कालीन सनातनी समाजात एका संन्यासी व्यक्तीने गृहस्थाश्रम स्वीकार करणे मंजूर नव्हते त्यामुळे विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. त्यावर उपाय काय असे विठ्ठलपंतानी धर्मशास्त्रीना विचारले असता त्यावर देहदंडाचीच शिक्षा आहे असे सांगितले त्यामुळे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी देहांत प्रायश्चित्त केला. आईवडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडाना समाजाकडून त्रास दिला गेला. त्यांना अन्न, पाणी यासारख्या मुलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. मुलांची मुंज करणेही नाकारले.

‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वर यांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माऊली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंमबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी अध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला.

संत ज्ञानेश्वर महाराजांची कथा

आईवडिलांच्या मृत्युनंतर समाजातील लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. त्यानंतर सर्व भावंडे पैठणला गेली आणि तिथे जाऊन संत ज्ञानेश्वरांनी विद्वता सिद्ध केली. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या रसाळ भाषेत शब्दरचना केली. संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला.

लहान असताना ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे ही भिक्षा मागून खात असत. एके दिवशी मुक्ताबाईला मांडे भाजण्यासाठी कोणी खापर दिले नाही तेव्हा ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईला आपल्या पाटीवर मांडे भाजायला सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविले, श्राद्धात प्रत्यक्ष पितर मंत्रांद्वारे उपस्थित केले, मृत माणूस जिवंत केला, चांगदेव महाराज वाघावर बसून ज्ञानेश्वरांकडे यायला निघाले होते तेव्हा त्यांचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या भावंडांसह भिंतीवर बसून अर्धवट बांधलेल्या निर्जीव भिंतीला चालवले अशा अख्यायिका सांगितल्या जातात.

संत एकनाथांविषयी माहिती 

संत ज्ञानेश्वर महराजांचे प्रसिद्ध ग्रंथ

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या मुखी बसलेला एक सर्वसामान्य संतांचा मेळा आहे. निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या रूपाने हिंदू धर्माचा धर्मग्रंथ लोकभाषेत आला. हे मराठी वाङ्मयाचे देशीकर लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.  

कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ ई.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे सांगितले जाते. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी:

आदिनाथ     मत्स्येंद्रनाथ    गोरक्षनाथ   गहिनीनाथ    निवृत्तीनाथ   ज्ञानेश्वर 

‘अमृतानुभव’ किंवा ‘अनुभवामृत’ हा त्यांचा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा दुसरा ग्रंथ आहे. यामध्ये सुमारे ८०० ओव्या आहेत. तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली.

‘चांगदेव पासष्ठी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला आहे. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वर यांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्ठी हा ग्रंथ होय. यामध्ये अद्वैतसिद्धांताचे अप्रतिम दर्शन आहे.  

संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.

संत ज्ञानेश्वरांनी स्फुटकाव्ये(अभंग, विराण्या आदि.) लिहिली.

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदानाची रचना केली.

            आता विश्वात्मके देवे | येणे वाग्यज्ञे तोषावे |

            तोषोनि मज द्यावे | पसायदान हे ||

            जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती लाभो ||

            भूता परस्परे घडो | मैत्र जीवाचे ||

हा विश्व बंधुत्वाची प्रेरणा देणारा ग्रंथ अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाला. या ग्रंथामुळे लोकांचेच नव्हे तर जगातील भारतीय संस्कृतीकडे आणि वाड्मयाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. आजही जगात ज्ञानेश्वरीचे अध्ययन चालू आहे.

माझा मराठीचि बोलू कौतुके | परि अमृतातेहि पैजासी जिंके |

      ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन ||

असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयी असलेला अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाकतृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना अध्यात्मिक प्रेरणा मिळाली.

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी माहिती

संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, ई.स. १२९६ रोजी संजीवन समाधी घेतली. हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई या त्यांच्या भावंडानी आपापली इहलोकीची यात्रा संपवली. 

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर थोर वारकरी ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant dnyaneshwar information in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about sant dnyaneshwar in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant dnyaneshwar maharaj information in Marathi essay language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

4 thoughts on “संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र Sant Dnyaneshwar Information In Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!