Manchurian Recipe in Marathi मंचूरियन रेसिपी मराठी मंचुरियन हि एक अशी डिश आहे जी कोणाला आवडत नाही हि डिश सर्वांना आवडते. हि डिश लहान मुलांच्यापासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडते आणि मंचुरियन सर्वजण अगदी आनंदाने खातात. मंचुरियन या पदार्थाचे नाव घेतले कि तोंडाला पाणी सुटते. अश्याच या स्वादिष्ट आणि उत्तम रेसिपी बद्दल आज आपण या लेखामध्ये माहिती घेणारा आहोत. मंचुरियन हि डिश इंडो चायनीज डिश आहे आणि हि भारतामध्ये लोकप्रिय आहेच तसेच इतर देशामध्ये देखील आवडीने खाल्ली जाते.
मंचुरियन बनवण्यासाठी जरी वेळ लागत असला आणि हा पदार्थ बनवण्यासाठी खूप साहित्य जरी लागत असले तरी या डिशच्या स्वादिष्ट चवीमुळे आपण हि डिश बनवण्यासाठी दिलेला वेळ याचे मोल होते. कोबी मंचुरियन आणि व्हेज मंचुरियन हा भारतातील सर्वत्र लोकप्रिय इंडो-चायनीज पदार्थ आहे. मंचुरियन हा पदार्थ दोन प्रकारे बनवला जातो एक म्हणजे ड्राय व्हेज मंचुरियन आणि ग्रेव्ही व्हेज मंचुरियन.
मंचूरियन रेसिपी मराठी – Manchurian Recipe in Marathi
मंचुरियन मध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या – vegetables used in manchurian
व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे कोबी, गाजर, कांदा या यापासून सामन्यता व्हेज मंचुरियन बनवले जाते. त्याचबरोबर या मध्ये आपण आपल्या आवडीनुसार बीन्स, सिमला मिरची, फ्लॉवर यासारख्या भाज्या घालू शकतो.
- ३ वाटी कोबी ( चिरलेला किंवा खिसलेला ).
- २ चमचे आलं लसून पेस्ट.
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १/२ वाटी मक्याचे पीठ ( कॉर्न फ्लावर )
- १/२ वाटी तांदळाचे पीठ.
- तेल (तळण्यासाठी).
- मीठ ( चवीनुसार ).
- १ चमचा खाद्य तेल
- २ चमचे आलं लसून पेस्ट
- १ कांदा ( उभा चिरलेला ).
- १ चमचा हॉट चिली सॉस.
- २ ते ३ चमचे टोमॅटो सॉस.
- ३ चमचे सोया सॉस.
- १ चमचा ग्रीन चिली सॉस.
- कोबी ( चिरलेला )
- सर्वप्रथम कोबी खिसून घ्या.
- मग एक मोठ्या आकाराचा बाऊल घ्या आणि त्यामध्ये खिसलेला कोबी घाला आणि त्याला मीठ ( आवश्यकतेनुसार ) लावा. आणि ते ५ ते १० मिनिटे बाजूला ठेवा.
- मग त्यामध्ये मावेल तेवढे तांदळाचे आणि मक्याचे पीठ घाला आणि ते चांगले एकत्र करून घ्या मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, आलं लसून पेस्ट आणि जर मीठ घालावे लागत असेल तर मीठ घाला आणि ते मिश्रण चांगले घट्ट माळून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये मंचुरियन गोळे टाळण्यासाठी तेल घाला.
- तेल गरम होईपर्यंत पीठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्या आणि एकदा तेल गरम झाले कि तेलामध्ये बसतील इतके गोळे घालून ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व गोळे तळून घ्या.
- आपले मंचुरियन गोळे तयार झाले आणि आता मंचुरियन सॉस कसा बनवायचा ते पाहूयात.
- आता सॉस बनवण्यासाठी कढई गॅसवर उच्च आचेवर ठेवावी आणि आणि मग कढई गरम झाली कि गॅसची आच मध्यम करा आणि त्यामध्ये तेल घाला.
- तेल गरम झाले कि त्यामध्ये आलं लसून पेस्ट आणि कांदा घाला आणि ते चांगले भाजा.
- आता या मध्ये १ चमचा हॉट चिली सॉस, २ ते ३ चमचे टोमॅटो सॉस, ३ चमचे सोया सॉस आणि १ चमचा ग्रीन चिली सॉस आणि ते चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये मंचुरियन गोळे घाला आणि ते चांगले एकत्र करून चांगले परतवा त्यामुळे गरम गरम मंचुरियन सर्व्ह करता येईल.
- आता मंचुरियन प्लेटमध्ये काढून त्यावर चिरलेला कोबी घालून सर्व्ह करा.
- ३ वाटी कोबी ( चिरलेला किंवा खिसलेला )
- २ मध्यम आकाराची गाजर ( खिसलेली )
- १ कांदा ( बारीक चिरलेला ).
- २ चमचे आलं लसून पेस्ट.
- २ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १/२ वाटी मक्याचे पीठ ( कॉर्न फ्लावर )
- १/२ वाटी तांदळाचे पीठ.
- तेल (तळण्यासाठी).
- मीठ ( चवीनुसार ).
- १ चमचा खाद्य तेल
- ११ ते १२ पाकळ्या लसून ( बारीक चिरलेला ).
- १ कांदा ( उभा चिरलेला ).
- २ हिरव्या मिरच्या ( मोठ्या आकारामध्ये चिरलेल्या ).
- १ ढब्बू मिरची ( उभी चिरलेली ).
- १ चमचा हॉट चिली सॉस.
- २ ते ३ चमचे टोमॅटो सॉस.
- ३ चमचे सोया सॉस.
- २ ते ३ चमचे मक्याचे पीठ.
- १//२ वाटी कोबी मोठा चिरलेला
- मीठ ( चवीनुसार ).
- सर्वप्रथम कोबीज खिसून किंवा खवून घ्या आणि मग लागणाऱ्या भाज्या जसे कि गाजर खिसून घ्या. त्याचबरोबर कांदा आणि मिरच्या चिरून घ्या.
- मग एक मोठ्या आकाराचा बाऊल घ्या आणि त्यामध्ये सर्व चिरलेल्या आणि खिसलेल्या भाज्या एकत्र करा जसे कि कोबी, गाजर, कांदा आणि हिरव्या मिरच्या एकत्र करा आणि त्याला मीठ ( आवश्यकतेनुसार ) लावा. आणि ते ५ ते १० मिनिटे बाजूला ठेवा.
- ५ ते १० मिनिटाने त्या भाज्यांच्या मिश्रणाला पाणी सुटेल मग त्यामध्ये तांदळाचे पीठ आणि मक्याचे पीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या आणि मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, आलं लसून पेस्ट, हळद आणि परत पीठ घातल्यानंतर मीठ लागत असेल तर मीठ घाला आणि ते मिश्रण चांगले घट्ट मळून घ्या. ( टीप : यामध्ये पाणी घालू नका भाज्यांना मीठ टाकल्यानंतर पाणी सुटते म्हणून त्यामध्ये जेवढे पीठ मावेल तेवढेच पीठ घालून घट्ट पीठ मळा).
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये मंचुरियन गोळे टाळण्यासाठी तेल घाला.
- तेल गरम होईपर्यंत पीठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्या आणि एकदा तेल गरम झाले कि तेलामध्ये बसतील इतके गोळे घालून ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व गोळे तळून घ्या.
- आपले मंचुरियन गोळे तयार झाले आणि आता मंचुरियन सॉस कसा बनवायचा ते पाहूयात.
- सॉस बनवण्यासाठी कढई गॅसवर उच्च आचेवर ठेवावी आणि आणि मग कढई गरम झाली कि गॅसची आच मध्यम करा आणि त्यामध्ये तेल घाला.
- मग गरम तेलामध्ये लसून घाला आणि काही सेकंदासाठी चांगला परतावा.
- त्यानंतर त्यामध्ये लगेचच कांदा, ढब्बू मिरची आणि हिरवी मिरची घाला आणि ते काही वेळासाठी भाजा.
- आता या मध्ये १ चमचा हॉट चिली सॉस, २ ते ३ चमचे टोमॅटो सॉस आणि ३ चमचे सोया सॉस घाला आणि हे मिश्रण चांगले एकत्र करू घ्या. मग त्यामध्ये मक्याच्या पिठामध्ये थोडेसे पाणी घालून त्याचे बॅटर बनवा आणि ते बॅटर त्यामध्ये घाला त्याचबरोबर मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते चांगले मिक्स करून ४ ते ५ मिनिटे शिजवा आणि मग त्यामध्ये मंचुरियन गोळे घालून ते चांगले एकत्र करून चांगले परतवा त्यामुळे गरम गरम मंचुरियन सर्व्ह करता येईल.
- आता मंचुरियन प्लेटमध्ये काढून त्यावर चिरलेला कोबी घालून सर्व्ह करा.
मंचुरियन कश्या सोबत खाल्ली जाते – serving suggestions
मंचुरियन आपण तशी देखील खाऊ शकतो आणि हि डिश व्हेज हक्का नूडल्स, व्हेज फ्राईड राईस किंवा शेझवान फ्राईड राईस या सोबत देखील खाल्ली जावू शकते.
आम्ही दिलेल्या manchurian recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मंचूरियन रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cabbage manchurian recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि patta gobi manchurian recipe in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये how to make manchurian recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट