Matki Usal Recipe in Marathi मटकी उसळ रेसिपी उसळ हा एक भाजीचा प्रकार आहे. जो महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये काही ठिकाणी रोजच्या जेवणामध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बनवला पदार्थ आहे. उसळ हा एक कडधाण्यापासून बनवला जाणारा पदार्थ आहे आणि हे वेगवेगळय कडधाण्यापासून बनवला जातो जसे कि मुगाचे उसळ, मसुराचे उसळ, चवळीचे उसळ त्याच प्रमाणे मटकीचे उसळ देखील बनवले जाते. मटकी हा देखील कडधान्याचा प्रकार असून हे भारतीय स्वयंपाक घरामध्ये वारंवार बनवले जाणारे उसळ आहे आणि हे खूप लोकांचे आवडते देखील आहे.
मटकीचे उसळ बनवताना सर्वप्रथम मटकी ८ ते ९ तास भिजवून मग त्यामधील पाणी काढून ते एका सुती कापडामध्ये बांधून ते एक भांड्यामध्ये दडपून ठेवून त्यावर झाकण लावून ते परत १० ते ११ तास तसेच ठेवले जातात त्यामुळे मटकीला मोड येतात तसेच मटकी थोडी मऊ होते आणि शिजण्यास मदत होते. मटकीचे उसळ हे दोन प्रकारे बनवले जावू शकते.
ते म्हणजे मटकी मध्ये आपण लाल तिखट वापरून उसळ बनवू शकतो किंवा मग हिरवी मिरची वापरून देखील मटकीचे उसळ बनवले जाते आणि हे कोरडे बनवले जाते यामध्ये पाण्याचा वापर जास्त केलेला नसतो. मटकीचे उसळ हे बनवण्यासाठी खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण या लेखामध्ये मटकी उसळ कसे बनवायचे ते पाहूयात.
मटकी उसळ रेसिपी – Matki Usal Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
मटकी उसळ रेसिपी – matki chi usal
मटकी हा कडधाण्यापासून बनवला जाणारा एक उसळ म्हणजेच भाजीच प्रकार आहे जो कित्येक लोक आवडीने खातात आणि हा भाजीचा प्रकार बनवण्यसाठी खूप सोपा आहे. मटकी पासून आपण उसळ तसेच मिसळ मध्ये देखील मोड आलेली मटकी वापरली जाते. मटकी हे कडधाण्य खूप पौष्टिक असते.
त्यामुळे काही ठिकाणी भारतीय स्वयंपाक घरांमध्ये मटकीचे उसळ वारंवार बनवले जाते आणि हे लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांच्यासाठी एक उत्तम भाजी आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनतो. चला तर मग पाहूयात मटकी उसळ कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
- नक्की वाचा: बटाटा भाजी रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
मटकी उसळ बनवताना विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर काही साहित्य घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारातून लगेच उपलब्ध करून घेवू शकतो. मटकी उसळ बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही म्हणजेच हि रेसिपी बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते. चला तर आता आपण मटकी उसळ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ वाटी मटकी.
- १ मध्यम अकराचा कांदा.
- १ छोटासा टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
- १ मोठा चमचा खवलेले ओले खोबरे.
- २ ते ३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
- १/४ चमचा हळद.
- १/२ चमचा लाल मिरची पावडर.
- मोहरी ( फोडणीसाठी ).
- हिंग ( फोडणीसाठी ).
- १ चमचा गुळ.
- ४ ते ५ कडीपत्ता पाने.
- ३ ते ४ चमचे तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
मटकी उसळ हे बनवण्यासाठी खूप सोपे आहे आणि झटापट बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून मटकीचे उसळ कसे बनवायचे ते पाहूयात.
- मटकीचे उसळ बनवताना सर्वप्रथम बाजारातून आणलेली मटकी स्वच्छ निवडून घ्या.
- आता ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ते पाणी काढून टाका आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून त्यावर झाकण लावून ती मटकी ८ ते ९ तास भिजू द्या. मटकी ८ ते ९ तास भिजल्यामुळे ती थोडी मऊ होईल आणि आणि ती चांगली शिजण्यास मदत होईल.
- मग हि ८ ते ९ तास पाण्यामध्ये भिजवलेली मटकी मधील सर्व पाणी गाळून घ्या आणि मग ते एका सुती कापडामध्ये घालून ते गच्च बांधा आणि मग ते एक भांड्यामध्ये दडपून ठेवून त्यावा झाकण लावा त्यामुळे मटकीला उष्ण हवा लागून मोड चांगले येतील. मटकी सुती कापडामध्ये १० ते ११ तास बांधून ठेवावी.
- १० ते ११ तासांनी मटकीला मोड चांगले येतात.
- आता त्यामधील वाटीभर मोड घ्या आणि ते पाण्यामध्ये परत धुवून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये ३ ते ४ चमचे तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी चांगली तडतडली कि त्यामध्ये कडीपत्ता आणि कांदा घाला आणि तो थोडा लालसर रंग येईपर्यंत भाजा.
- आता त्यामध्ये टोमॅटो घाला आणि तो देखील तेलामध्ये चांगला परतून घ्या आणि तो तेलामध्ये तसाच तेल वेगळे होईपर्यंत चांगले शिजवा.
- आता यामध्ये हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर घाला आणि ते मिक्स करा मग लगेच त्यामध्ये मोड आलेली मटकी घाला आणि ती थोडा वेळ भाजा. मटकी धुवून घेतल्यामुळे ती थोडी ओलसर असेल त्यामुळे त्यामध्ये ती शिजवण्यासाठी पाणी घालू नका तर मटकी थोडी भाजल्यानंतर त्यावर झाकण लावून ती मंद आचेवर ५ ते ६ मिनिटे शिजवून घ्या.
- आता यामध्ये चवीपुरते मीठ, गुळ, ओले खवलेले खोबरे आणि कोथिंबीर घाला आणि ते मिक्स करा आणि २ मिनिटे वाफवून घ्या.
- मग गॅस बंद करा.
- तुमचे मटकीचे उसळे तयार झाले.
मटकी उसळ कश्यासोबत खावे – serving suggestions
- मटकीचे उसळे आपण जेवणामध्ये चपाती सोबत, रोटी, नान, पुलके किंवा पांढऱ्या भातासोबत देखील खावू शकतो.
टिप्स (Tips)
- उन्हाळ्यामध्ये मोड लवकर येतात परंतु थंडीमध्ये कडधान्यांना मोड येण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे थंडीमध्ये कडधान्य थोडा जास्त वेळी दडपून ठेवावे.
- मटकीच्या उसल्यामध्ये आपण लाल मिरची पावडर ऐवजी हिरवी मिरची देखील घालू शकतो.
- मटकीच्या उसळ्यामध्ये टोमॅटो घालण्याऐवजी चिंच किंवा आमसूल देखील घातले तरी चालते.
- जर तुम्हाला उसळे थोडे सरसरीत हवे असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी देखील घालू शकता.
- १ वाटीची मटकी भाजी केली तर ती ७ ते ८ व्यक्तीच्यासाठी बनू शकते.
आम्ही दिलेल्या matki usal recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मटकी उसळ रेसिपी मराठी matki recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kolhapuri matki usal recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maharashtrian matki usal recipe माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये matki bhaji recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट