बटाटा भाजी रेसिपी मराठी Batata Bhaji Recipe in Marathi

Batata Bhaji Recipe in Marathi बटाटा भाजी रेसिपी मराठी भारतामध्ये अनेक खाण्याचे पदार्थ बनवतात जसे की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, गोडाचे प्रकार, नाश्त्याचे प्रकार आणि स्नॅक्स बनवले जातात. तसेच भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात आणि त्यामध्ये भारतातील सर्व स्वयंपाक घरामध्ये आठवड्याला एकदा तरी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी हि दोन प्रकारे बनवली जाते पिवळी भाजी जी हिरव्या मिरच्या आणि हळद वापरून बनवली जाते आणि लाल भाजी ज्यामध्ये लाल चटणी / किंवा लाल मिरची पावडर, वाटलेले खोबरे कोथिंबीर घालून बनवली जाते.

बटाट्याचे दोन्हीहि प्रकार बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि खूप कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतात. चला तर आता आपण बटाट्याची भाजी दोन्हीही प्रकारे कशी बनवायची ते पाहूयात.

batata bhaji recipe in marathi
batata bhaji recipe in marathi

बटाटा भाजी रेसिपी मराठी – Batata Bhaji Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

बटाट्याची पिवळी भाजी रेसिपी – shimla mirch batata bhaji recipe in marathi

बटाट्याची पिवळी भाजी हि हळद आणि हिरवी मिरचीची फोडणी देवून बनवली जाते. आता आपण हिरवी मिरची वापरून बटाट्याची भाजी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

पिवळी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients

बटाट्याची पिवळी भाजी बनवण्यासाठी बटाटे आणि हिरव्या मिरच्या हे महत्वाचे साहित्य आहे तसेच हि भाजी बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते आणि हि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य घरामध्ये आधीपासून उपलब्ध असते. चला तर आता आपण पिवळी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूयात.

  • ३ ते ४ बटाटे
  • ६ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या किंवा बारीक पेस्ट केलेल्या ).
  • १ चमचा मोहरी.
  • १/२ चमचा जिरे.
  • २ चमचे आलं लसून पेस्ट.
  • ७ ते ८ कडीपत्ता पाने.
  • १/४ चमच्या हिंग.
  • हळद ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( चिरलेली ).
  • १ मोठा चमचा तेल.

हिरवी मिरची घालून बटाट्याची भाजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती 

  • सर्व प्रथम बटाटे घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • मग कुकरमध्ये पाणी घाला आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून कुकरचे झाकण घालून त्याला ३ ते ४ शिट्या द्या त्यामुळे बटाटे चांगले शिजण्यास मदत होईल. ( टीप : आपण बटाटे भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये बटाटे टाकून त्यावर झाकण घालून देखील शिजवू शकतो ).
  • कुकर गार झाल्यानंतर त्यामधील बटाटे काढून घेवून त्याची साल काढा आणि ते चिरून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
  • मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच जिरे, हिरवी मिरची, आलं लसून पेस्ट आणि कडीपत्ता घाला आणि ते चांगले एकत्र करा.
  • त्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद घाला ते काही वेळासाठी चांगले चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये शिजवलेला बटाटा, मीठ ( चवीनुसार ) आणि साखर ( चवीनुसार ) घाला ते चांगले मिक्स करा.
  • आता त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाका आणि मिक्स करा.
  • तुमची पुरीसोबत खाण्यासाठी भाजी तयार झाली.

बटाट्याची लाल भाजी कशी बनवावी – tikhat batata bhaji recipe in marathi

लाल बटाट्याची भाजी हि मसाल्याची लाल चटणी वापरून बनवलेली असते आणि हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते. आता आपण लाल मिरची पावडर वापरून मसालेदार आणि चमचमीत भाजी कशी बनवायची ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients 

लाल बटाट्याची भाजी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते घरामध्ये आधीपासून उपलब्ध असू शकते आणि ते जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारामधून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर मग लाल बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ३ ते ४ बटाटे
  • १ चमचा मोहरी.
  • १/२ चमचा जिरे.
  • २ चमचे आलं लसून पेस्ट.
  • १/४ चमच्या हिंग.
  • हळद ( आवश्यकतेनुसार ).
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा गरम मसाला.
  • अर्धी छोटी वाटी वाटलेले खोबरे आणि कोथिंबीर.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • १ मोठा चमचा तेल.

बटाट्याची भाजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती 

  • सर्व प्रथम बटाटे घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • मग कुकरमध्ये पाणी घाला आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून कुकरचे झाकण घालून त्याला ३ ते ४ शिट्या द्या त्यामुळे बटाटे चांगले शिजण्यास मदत होईल.
  • कुकर गार झाल्यानंतर त्यामधील बटाटे काढून घेवून त्याची साल काढा आणि ते चिरून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
  • मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच जिरे, आलं लसून पेस्ट, हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर घालून ते चांगले एकत्र करा.
  • आता त्यामध्ये उकडलेले आणि चिरलेले आणि थोडेसे पाणी घाला आणि ते मिक्स करा.
  • आता त्यामध्ये वाटलेले खोबरे आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि ते सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
  • आणि या भाजीच्या भांड्यावर झाकण ठेवून भाजी ५ ते ६ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा आणि मग गॅस बंद करा.
  • चपाती, रोटी किंवा पुरी सोबत खाण्यासाठी बटाट्याची लाल भाजी तयार झाली.
  • सर्व्ह करताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.

बटाटा भाजी कश्यासोबत सर्व्ह केली जाते – serving suggestions 

  • लाल किंवा पिवळी बटाट्याची भाजी चपाती, रोटी, नान किंवा पुरी सोबत खावू शकतो.

टिप्स ( Tips )

  • लाल बटाटा भाजी बनवताना तुम्ही बटाटे फोडणी टाकून त्यामध्ये पाणी घालून देखील शिजवू शकता.
  • लाल बटाटा भाजीमध्ये गरम मसाला वापरला तर त्या भाजीला मसालेदार चव येईल.

आम्ही दिलेल्या batata bhaji recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बटाटा भाजी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या methi batata bhaji recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि potato bhaji in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये batata recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!