Maze Baba Nibandh in Marathi – My Father Essay in Marathi माझे बाबा निबंध मराठी स्वताची भूक आणि झोप विसरून घरातल्या लोकांच्यासाठी किंवा मुलांच्यासाठी राबणारे किंवा झटणारे आणि इतके कष्ट करून देखील सतत हसरे, प्रसन्न आणि सकारात्मक असणारे एकमेव व्यक्ती म्हणजे बाबा. बाबा या शब्दाची व्याख्या सांगणे खूपच कठीण कारण बाबांच्या विषयी जेवढे आपण सांगू तेवढे कमीच असते. बाबा हे असे असतात कि ते आपल्या सर्व कुटुंबाची काळजी घेतात तसेच कुटुंबावर किंवा त्यांच्यावर आलेल्या संकटावर न डगमगता सामोरे जातात त्याचबरोबर बाबा हे अशे व्यक्ती असतात.
जे आपल्यासाठी खूप काही नकळत पणे करून जातात परंतु ते आपल्या तोंडाने कधीच सांगत नाहीत कि मी हे तुमच्यासाठी केले तसेच हे स्वताच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांचे हट्ट पूर्ण करतात आणि आज आपण अश्या या महान व्यक्तिमत्वाबद्दल म्हणजेच बाबा या विषयावर निबंध लिहिणार आहोत. चला तर मग निबंध लिहिण्यास सुरुवात करूयात.
‘आपले दुखः मनात ठेवून
मुलांच्या सुखासाठी झटणारा
एकमेव देवमाणूस म्हणजे
बाबा.’
माझे बाबा निबंध – Maze Baba Nibandh in Marathi
माझे वडील निबंध मराठी – My Father Essay in Marathi
‘स्वताचे मन मारून कष्ट करणारे शरीर आणि काळजी करणारे मन म्हणजे बाबा’ असतात आणि अश्या अनेक शब्द रचना जरी आपण लिहिल्या तरी बाबा व्यक्तीबद्दल सांगण्यास शब्द कमी पडतील. बाबा असले कि आपल्याला कोणतेही कष्ट करावे लागत नाही कारण बाबा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि त्यामुळे आपल्याला कष्टाची किंमत माहित नसते.
पण ज्यावेळी आपल्या डोक्यावरील छत निघून जाते त्यावेळी आपल्याला बाबांची किंमत कळते, त्यांनी केलेलं कष्ट, केलेलं त्याग, सामोरे गेलेली संकटे ज्यावेळी आपल्यावर पडतात त्यावेळी वाटते कि बाबांनी आपल्यासाठी किती गोष्टी सहन केल्या आहेत.
आणि त्यांनी आपले आयुष्य घडवण्यासाठी किती कष्ट खाल्ले आहेत. बाबा हे अशे व्यक्ती आहेत जे कुटुंबाचे आधारस्थंभ असतात तसेच कुटुंबातील सर्व लोक त्यांच्यावर अवलंबून असतात. त्याचबरोबर बाबा कुटुंबातील असे एकमेव व्यक्ती असतात जे कुटुंबातील सर्व गोष्टी ठरवतात तसेच ते कुटुंबाला नियम देखील घालून देतात त्यामुळे कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारे शिस्त लागते.
- नक्की वाचा: माझी आई निबंध मराठी
असे म्हणतात कि ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ पण जेवढे आपल्या आयुष्यामध्ये आईचे जितके महत्व आहे तितकेच बाबांचे देखील असते. बाबा आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांच्यासाठी आपली तहान, भूक सर्व विसरून कष्ट करत असतात आणि आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात.
त्यांना असे वाटते कि आपली मुले चांगले उच्च शिक्षण घेवून त्यांनी कोणत्यातरी चांगल्या कंपनीमध्ये किंवा स्वताचा व्यवसाय सुरु करून त्यांच्या पायावर उभे राहावे यासाठी ते प्रयत्न करत असतात. तसेच कुटुंबाच्या सर्व आवडी निवडी जोपासण्याचा प्रयत्न करत असतात, मुलांचे सर्व हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात अश्या प्रकारे ते सतत आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करत असतात.
जसे शिल्पकार दगडाला आकार देतात तसेच मुलांना घडवण्यात देखील बाबांचा मोलाचा हात असतो. आपण बाबांना वेगवेगळ्या नावांनी बोलावू शकतो जे कि बाबा, वडील, पप्पा, डॅडी आणि इतर काही नावांनी बोलावले जाते पण बाबा या नावाने बोलवण्यामध्ये खूप आत्मियता आणि आपुलकी लपलेली आहे. बाबा हे जगातील व्यक्ती आहेत जे जरी आपला खिसा रिकामा असेल आणि मुले त्यांच्या कडे काही मागत असतील तर नाही म्हणत नाही तर थोड्या दिवसांनी घेवूया म्हणून सांगून ती गोष्ट काही दिवसांनी आपण स्वताहून आणून देतात.
Majhe Baba Nibandh in Marathi
माझ्या वडिलांच्या बद्दल सांगायचे म्हटले तर माझे वडील खूप प्रेमळ, गोड स्वभावाचे आणि सतत हसतमुख किंवा राहणारे असे आहेत आणि त्यांच्या या स्वभावामुळे आम्हाला देखील त्यांच्या कडून खूप प्रेरणा मिळते. मला एक मोठा भाऊ देखील आहे आणि आमचे वडील आमच्यावर सारखेच प्रेम करतात आणि आमचे सर्व हट्ट पुरवतात.
ते काही वेळा आम्हाला रागवतात देखील आणि हे रागावणे साहजिक आहे कारण जर आपण काही चूक केली तर आपल्याला रागावले पाहिजे त्यामुळे आपल्याला चांगली वळणे लागतात आणि आपल्या हातून पुढच्या वेळी कोणतीही चूक होत नाही तसेच आमचे वडील देखील आम्हाला आमच्या हातून कोणतीही चूक झाली ली रागवायचे पण आम्हाला त्यांच्या रागवण्याचा फारसा राग येत नव्हता.
कारण ते आमच्या भल्यासाठी रागवत होते. आमच्या बाबांना आम्हा दोघांनाही चांगले शिक्षण द्यायचे होते जेणेकरून आम्ही मोठे झाल्यानंतर चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करू किंवा मग स्वताचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करण्यास सक्षम बनू आणि म्हणून ते आमच्या अभ्यासाच्या बाबतीत कोणताच काटकसरपणा करत नव्हते आणि ते आमच्या शाळेच्या नियमाच्या बाबतीत देखील खूप कडक होते.
आमचे बाबा हे आमच्या कुटुंबाचा आधारस्थंभ होते आणि ते कुटुंबाच्या आणि आमच्या सुखासाठी खूप कष्ट करत होतो तसेच ते आपले दुख कधीच कोणाला सांगत नाहीत आणि घरातल्यांना काळजी मध्ये टाकत नाहीत तर ते सर्व संकटांना न डगमगता सामोरे जातात. आमचे बाबा अपमचे सर्व हट्ट पुरवतात आणि आम्हाला जे हवे आहे ते लगेच आणून देतात.
- नक्की वाचा: माझा भाऊ निबंध मराठी
आमचे बाबा आम्हाला शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी जसे कि वही, पेन, पुस्तके, बॅग आणि शिक्षणासाठी लागणारे इतर साहित्य न मागता आणून देत होते आणि आजही जे महत्वाचे साहित्य आम्हाला लागते ते न मागता आणून देतात. तसेच आम्ही लहान असतान कोणतेही मोठे मोठे सन असले कि ते आम्हाला नवीन कपडे आणून देत होत. माझे बाबा हे कुटुंबामध्ये सर्वांचेच प्रिय व्यक्ती आहेत.
कारण कुटुंबातील सर्वांची काळजी ते करतात आणि ते आमचे देखील खूप आवडते आहेत कारण ते आमच्यावर खूप जीवापाड प्रेम करतात आमच्या इच्छा पूर्ण करतात, आमचे हट्ट पुरवतात तसेच आमचे उज्वल आयुष्य घडवण्यासाठी कष्ट करतात. जेव्हा मी किंवा माझा मोठा भाऊ दुखी बसलेले त्यांनी पहिले.
तर ते आमच्याजवळ येवून आम्हाला त्याच्या प्रोत्साहित शब्दांनी आम्हाला प्रेरणा देतात तसेच संकटांना कसे सामोरे जायचे हे सांगतात आणि अम्हाला समजावतात. तसेच माझे वडील माझ्या कुटुंबातील सर्व लोकांच्या इच्छा आणि गरजा कोणतीही तक्रार न करता पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
आमचे वडील हे आमच्या दोघांच्यासाठी जगातील सर्वात चांगले वडील आहेत कारण ते आमचे सर्व इच्छा पूर्ण करतात, हट्ट पुरवतात, काही वेळेला आम्हाला समजावून सांगतात तर काही वेळेला रागवतात तसेच ते कोणतीही तक्रार न करता आमच्या सुखासाठी अतोनात कष्ट करतात आणि आमचे भविष्य घडवतात.
म्हणून आपल्या जीवनामध्ये जसे आईला महत्व आहे तसेच आणि तितकेच महत्व बाबांना देखील आहेत कारण ते आपण लहान असताना आपल्या जीवनाचा आधारस्थंभ असतात आणि आपल्या डोक्यावरील छत असतात. पण सध्याच्या काळामध्ये लोक आई – वडिलांना वृद्धाआश्रम मध्ये ठेवतात पण हे खूप चुकीचे आहे.
ज्यांनी आपण लहान असताना आपला आधारस्थंभ बनले, ज्यांनी अतोनात कष्ट करून आपल्या जीवनाला आकार दिला आणि जे आपल्या डोक्यावरील छत बनले त्यांचा तुम्ही देखील त्यांच्या म्हातारपणी आधार बनला पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे.
आम्ही दिलेल्या maze baba nibandh in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझे बाबा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या majhe baba nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on father in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये majhe baba marathi nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट