Essay on My Brother in Marathi – My Brother Essay in Marathi माझा भाऊ निबंध मराठी आपल्या सर्वांना एक बहिण किंवा भाऊ असतोच आणि ते आपल्यापेक्षा मोठे असतात किंवा आपल्यापेक्षा लहान असतात आणि जर ते आपल्यापेक्षा लहान असतील तर त्यांची काळजी आपल्याला घ्यायला लागते आणि जर ते मोठे असतील ते आपली काळजी घेतात. लहान भाऊ हा खोडकर असतो म्हणजेच मुद्दाम चिडवून रडवण्याचा प्रयत्न करतो आणि जर तो मोठा असेल तर लहान भावंडांची काळजी घेतो आणि आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या रितेने पार पडतो. मलाही एक मोठा भाऊ आहे आणि आता आपण माझा भाऊ या विषयावर निबंध लिहणार आहोत.
‘भाऊ जो
वडिलांच्या सारखे प्रेम
आणि
आई सारखी काळजी
करतो’
माझा भाऊ निबंध मराठी – Essay on My Brother in Marathi
My Brother Essay in Marathi
वडिलांच्यानंतर लहान बहिणीवर किंवा लहान भावावर निस्वार्थी प्रेम करणारा हा भाऊचा असतो. तसेच असे देखील म्हटले जाते कि आईसारखी काळजी देखील मोठा भाऊ घेवू शकतो आणि कुठल्याही नात्याला इतकी ओढ नसेल तितकी भाऊ आणि बहिणीच्या किंवा दोन भावांच्या नात्याला असते.
भाऊ हा आपल्या सर्व कठीन प्रसंगी आपल्या सोबत सतत उभा असतो आणि म्हणूनच भाऊ हा शब्द उलटा करून वाचला तर उभा असा होतो. तसेच भाऊ हा आपल्याला सर्व गोष्टीसाठी मदत करतो, आपल्या काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देतो. मोठा भाऊ असणारे खूप भाग्यवान समजले जातात कारण तो आपला आधार, आपला विश्वास किंवा एक अनमोल साथ बनतो.
भाऊ या शब्दावर जितके लिहाल तितके ते थोडेच. आपल्याला आपला भाऊ कधी म्हणार नाही कि मला तुझी काळजी आहे पण जगामध्ये आई आणि वडिलांच्या नंतर जर काळजी करणारा कोण असेल तर तो आपला भाऊच असतो. वडिलांच्यानंतर सर्व घराची जबाबदारी घेणारा, आपले दुख लपवून ठेवणारा आणि आपल्या अडचणी कोणाला न सांगता आपण स्वताच सोडवणारा हा फक्त भाऊच असतो.
असाच प्रेमळ, घरातील सर्व जबाबदाऱ्या चांगल्या पध्दतीने पार पाडणारा आणि घरातील सर्व लोकांची काळजी करणारा परंतु काळजी करतोय अस न दाखवानारा भाऊ मला देखील आहे. मी खूप भाग्यवान आहे कि घरातील सर्वांची काळजी घेणारा आणि सर्वांच्यावर प्रेम करणारा, माझे हट्ट पुरवणारा आणि मला कोणत्याही गोष्टीमध्ये मदत करणारा भाऊ मला मिळाला.
लहान असताना माझे आणि त्याचे खूप असे पटायचे नाही आणि सतत एकमेकांशी भांडत होते परंतु आज मला कुठे बाहेर जायचे असेल किंवा मला काही करायचे असेल तर मी त्याच्या मदतीशिवाय काही करत नाही आणि तो देखील मला खूप आनंदाने मदत करण्यासाठी तयार होतो तसेच आम्ही लहानपणी जशी दंगा मस्ती करायचो तशीच आज देखील करतो.
परंतु मला माझ्या भावाची भीती देखील वाटते आणि मी त्याच्या वस्तूंना त्याला विचारल्या शिवाय हात देखील लावत नाही. तसेच मी त्याची सर्व कामे देखील आनंदाने करते कारण तो माझ्या कामांच्या मध्ये मला मदत करतो. तसेच माझा भाऊ खूप सपोरटीव्ह देखील आहे कारण मला त्याने कायमच अभ्यासामध्ये आणि माझे करियर घडवण्यासाठी मला प्रोत्साहन दिले.
आम्ही ज्यावेळी शाळेला जायचे त्यावेळी आम्ही दोघेही एकाच शाळेमध्ये जात होतो आणि माझा भाऊ शाळेमध्ये देखील खूप हुशार होता. आणि त्याचे सर्व शिक्षक कौतुक करत असायचे आणि त्याला शिक्षक देखील प्रगती करण्यास प्रोत्साहन देत होते. त्याचे शाळेमध्ये सर्वच विषय चांगले होते. पण इंग्रजी हा विषय त्याला खूप आवडायचा आणि जर मला देखील अभ्यास करताना काही अडचण आली तर मी त्यालाच विचारत होते.
तसेच तो शाळेमध्ये असताना फक्त तो अभ्यासामध्येच हुशार नव्हता, तर तो खेळामध्ये देखील खूप हुशार होता आणि त्याला एक वर्षी त्याला जनरल चँम्पियनशिप देखील जिंकला होता. शाळेमध्ये त्याला क्रिकेट हा खेळ खूप आवडायचा आणि त्याच्या या कौशल्यामुळे तो शाळेमध्ये लोकप्रिय होता तसेच तो कला, विज्ञान अश्या क्षेत्रामध्ये देखील अगदी सक्षमपणे भाग घेत होता आणि त्यामध्ये त्याचा क्रमांक देखील येत होता. तसेच तो वार्षिक परीक्षेमध्ये गुण देखी चांगले पडत होता म्हणजेच तो सगळ्याच गोष्टींमध्ये पारंगत होता म्हणजेच त्याचे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते.
माझ्या भावाने त्याची दहावी परायान्ताची शाळा पूर्ण झाल्यानंतर आणि दहावीला चांगले मार्क मिळाल्यानंतर त्याने विज्ञान शाखेतून १२ केली आणि मग त्याने इंजिनीअरिंग केले आणि आता तो स्वताचा व्यवसाय देखील करतो. माझा भाऊ खूप हुशार आहे आणि त्याच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत.
आमच्या घरामध्ये मी, माझे आई – वडील आणि माझा भाऊ असा एक छोटासा परिवार आहे आणि आम्ही चौघेही खूप आनंदाने राहतो. घरामध्ये मी लहान असल्यामुळे माझे कौतुक आई वडील आणि भाऊ देखील करतो. माझा भाऊ मी लहान असताना देखील माझी खूप काळजी घ्यायचा तसेच तो शाळेला जाताना मला सोबत घेवून जात होता.
आणि आजही तितकीच काळजी घेतो आणि आम्ही लहान असताना एकमेकांच्या सोबत खूप खेळायचे दंगा मस्ती करायचो तसेच आम्ही लहान असताना एकमेकांच्या सोबत भांडण देखील करायचे जर मी त्याच्या कोणत्याही वस्तूला त्याला न सांगता हात लावला कि त्याला राग येतो आणि तो त्यावरून भांडतो आणि थोड्या वेळाने आणि परत तो स्वतःहूनच येवून माफी मागतो.
आम्ही आजही आणि पूर्वी देखील आमच्या रिकाम्या वेळामध्ये व्हिडिओ गेम्स, कॅरम, मराठी व्यापार, साप आणि शिडी आणि बरेच गेम खेळतो आणि तो मला सतत गेम कश्या पध्दतीने खेळायची आणि कोणतीही गेम युक्ती लाडावून कशी खेळायची या बद्दल शिकवतो.
मी खूप भाग्यवान आहे कि मला अतिशय गुणी, प्रेमळ, हुशार, माझ्यावर प्रेम करणारा, काळजी घेणारा, निर्मळ मनाचा भाऊ लाभला त्यामुळे मी देवाचे खूप आभार. तसेच त्याने मला प्रत्येक वेळी मदत केली माझ्या पाठीशी उभा राहिला आणि मला चांगल्या गोष्टी करण्यास प्रोत्साहन दिले. अश्या भावासाठी मी देवाकडे प्रार्थना करते कि माझ्या भावाला जे हवे आहे ते सर्व मिळू दे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत आणि त्याला चांगले आरोग्य लाभू दे.
आम्ही दिलेल्या essay on my brother in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझा भाऊ निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Majha Bhau Essay in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि majha bhau nibandh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Maza Dhakta Bhau Essay In Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट