मी पंतप्रधान झालो तर निबंध Me Pantpradhan Zalo Tar Nibandh in Marathi

Me Pantpradhan Zalo Tar Nibandh in Marathi – If I Become a Prime Minister Essay in Marathi मी पंतप्रधान झालो तर…जर मी भारताचा पंतप्रधान झाले तर मी आपल्या भारत देशाला एक बळकट देश बनविण्याचा प्रयत्न करेन. मी भारतीय सैन्यांना जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य बनविण्याचा प्रयत्न करेन. तसेच, मला भारतातून दारिद्र्य आणि बेरोजगारी हटवायची आहे. याशिवाय, भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे, मी शेती सुधारण्याच्या दृष्टीने गंभीरपणे पाऊले उचलणार. जेणेकरून कोणताही शेतकरी हा दारिद्र्यामध्ये राहणार नाही. मी गरीब लोकांना पेन्शन व बेरोजगारी भत्ता देईन.

त्याचबरोबर, मी देशाच्या विविध भागात लघु उद्योग स्थापित करीन. मी जीवनावश्यक वस्तूंचे होणारे काळे बाजार बंद करीन तसेच जे भ्रष्टाचार करतात त्यांच्यावर अधिक कडक शिस्त आणि निर्बंध लावेन, मग तो मंत्री असो वा साधारण व्यक्ती. मी शेजारच्या देशांशी मैत्री निर्माण करून शांतता प्रस्थापित करीन.

मी अनेक देशांसोबत मैत्रीचे वातावरण तयार करेन. खरोखरच, देशाचा पंतप्रधान होणे ही एक अभिमानाची बाब आहे. त्यामुळे, मी जर पंतप्रधान झाले तर पंतप्रधान या पदाचा आदर करून देशाच्या विकासासाठी खूप प्रयत्न करेन.

me pradhanmantri zalo tar nibandh in marathi language
me pradhanmantri zalo tar nibandh in marathi language

मी पंतप्रधान झालो तर निबंध – Me Pantpradhan Zalo Tar Nibandh in Marathi

मी प्रधानमंत्री झालो तर निबंध

माझी इच्छा आहे की मी भारताचा पंतप्रधान झाल्यानंतर माझ्या नम्र स्वभावाच्या मदतीने माझ्या देशाची सेवा करावी. देशाचे कल्याण करण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करेन. दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये गरीब, दडपलेल्या जनतेचा विचार करीन आणि त्यांचे क्षेत्र खूप उत्कटतेने सुधारेन.

माझ्या अगदी लहानपणापासूनच माझे पंतप्रधान होण्याचे स्वप्न होते. माझ्याकडे काही कल्पना आणि आदर्श आहेत ज्या मी पंतप्रधान झाल्यानंतर प्रत्यक्षात आणू इच्छिते. मला भारत देश एक समृद्ध देश बनवायचा आहे. मला आपल्या देशाला सर्व वाईट गोष्टींपासून मुक्त करायचे आहे.

त्यासाठी सर्वप्रथम मी प्रशासनाचा आकर्षण ठरलेला भ्रष्टाचार तपासायला लावेन. भारतात काही असे राजकीय नेते आणि मोठ्या पदावर असलेले सरकारी नोकरदार आहेत जे आपल्या भारत देशाला तसेच जनतेला लुटून खात आहेत. यामुळे जीवनातील अनेक नैतिक मूल्यांमध्ये घट निर्माण होत आहे. देशाच्या प्रगतीच्या आणि विकासाच्या मार्गावर असलेला हा एक मोठा अडथळा आहे. त्यामुळे, हा अडथळा दूर करण्याचा मी प्रयत्न करेन.

गरिबी हे भारतासाठी फार मोठे आव्हान आहे. स्वातंत्र्याच्या सहा दशकानंतरही आपल्या भारतातील नागरिकांना पुरेशा अशा कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे, श्रीमंत व्यक्ती हि अजून श्रीमंत होत आहे आणि गरीब व्यक्ती ही अधिक गरीबच होत चालली आहे. भारत देश हा जगातील सर्वात मोठा गरीब देश आहे, ही आमच्यासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे. 

भरपूर मोठ्या संख्येने लोकांना अन्नाशिवाय दररोज झोपावे लागते. उन्हाळ्यामध्ये अतिदुर्गम असलेल्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची फार टंचाई उद्भवते, तिथल्या स्थानिक लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी मैलांवर जावे लागते. त्यामुळे मी या भागात पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर सुरू करेन.

आपल्या भारतासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे आपल्या देशातील निरक्षरता आहे. आपल्या भारतात सुमारे एक तृतीयांश लोकसंख्या अशिक्षित आहे. त्यांना कसे लिहायचे आणि काय लिहायचे ते अजुनही माहित नाही. याव्यतिरिक्त, सामान्य जनतेचे जीवनमान खूप कमी दर्जाचे आहे.

त्यामुळे, निरक्षरता आणि दारिद्र्य बर्‍याच सामाजिक दुष्कर्मांच्या वाढीसाठी एक मोठे कारण होऊ शकते. देशाच्या प्रगतीमध्ये खंड आणणाऱ्या अशा गोष्टी मी हटवण्याचा प्रयत्न करेन.

मी पंतप्रधान झाल्यास शिक्षणाच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम घेईन. मी सर्वांसाठी शिक्षण अनिवार्य करीन. भारत देश प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे. लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यांहून अधिक लोक अजूनही शेतीवर अवलंबून आहेत. तस पाहिला गेलं तर आपल्या लक्षात येईल की, भारतातील शेती मागासलेली आहे आणि जास्तीत जास्त ठिकाणी केली जाणारी शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

येथे पाऊस अनिश्चित आणि अवकाळी आहे. एकूणच मागासलेपणा आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यास कारणीभूत ठरणारा हा एक मुख्य घटक आहे. याशिवाय, पंतप्रधान म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे सक्षम आणि स्थिर मंत्रिमंडळ तयार करणे असेल. मी कॅबिनेट मंत्र्यांच्या कर्तव्याच्या वितरणाला अधिक प्राधान्य देईन.

मी महत्वाच्या समस्यांची यादी तयार करून त्याकडे जास्त वेळ देईन. बेरोजगारी, दारिद्र्य, भ्रष्टाचार आणि जास्त लोकसंख्या या समस्या सोडविण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या शिक्षण, उद्योग आणि शेतीच्या विकासाला प्राधान्य देण्याकडे विशेष लक्ष देईन. सर्वप्रथम मी पंतप्रधान म्हणून माझे असे एक उद्दीष्ट तयार करेन जे समाजाला वाईट गोष्टींबद्दल जाणीव करून देईल आणि त्यांना चांगल्या गोष्टींकडे घेऊन जाईल.

आपला भारत देश मजबूत बनवण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला आपल्या भारतातील राजकीय व्यवस्था भक्कम बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे, मी या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता राजकीय क्षेत्रात शंका आणि द्वेषाऐवजी गोडपणा आणि आत्मविश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करेन.

या संदर्भात, मी विरोधकांच्या विचारांचा आदर करेन आणि त्यांची मते विचारात घेऊन कार्य करेन. सध्या लाखो लोकांना दिवसातून दोन वेळा पुरेल इतके देखील जेवण मिळत नाही आणि त्यांची मुले रस्त्यावर विखुरलेल्या कपड्यांमध्ये आणि उघड्या पायांनी फिरत असल्याचे आपल्याला दिसत आहे.

त्यामुळे, मी या सर्व गोष्टींकडे अधिक लक्ष देईन. जर मी भारताचा पंतप्रधान झाले तर मी विविध क्षेत्रात दूरगामी बदल घडवून आणीन. त्याचप्रमाणे, मी माझ्या देशाला एक मजबूत आणि स्वाभिमानी राष्ट्र बनविण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करेन. मी जर पंतप्रधान झाले तर त्यावेळी आपला भारत देश एक महान शक्तिशाली देश म्हणून अस्तित्वात आलेला असेल आणि इतर कोणताही देश भारतावर हल्ला करण्याची हिम्मत देखील करणार नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे मी सर्वात गरीब आणि कनिष्ठ असलेल्या लोकांकडे पूर्णपणे आणि अस्सलतेने लक्ष देईन. प्रत्येक घरातील किमान एका सदस्याला तरी पूर्ण रोजगार देण्याचा मी प्रयत्न करेन. किंमती नियंत्रणात ठेवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असेल. मी सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सुलभ करण्याचा आणि गरीबांना अनुदान दरावर आवश्यक वस्तू पुरवण्याचा प्रयत्न करेन.

मी करप्रणाली अधिक उपयुक्त आणि तर्कसंगत बनविण्याचा प्रयत्न करेन. श्रीमंतांवर जास्त कर लादला, तर गरीब आणि मध्यमवर्गीयांना वाचवले जाईल. त्यामुळे मी लोकांच्या वार्षिक उत्पन्नावर आधारीत त्यांच्याकडून ठराविक कर आकारण्याचा नियम तयार करेन. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यासाठी मी माझी शक्ती समर्पित करीन ती म्हणजे शिक्षण व्यवस्था.

मी शिक्षण व्यवस्थेचे मानक उंचावेन आणि ते गुणवत्तेवर आधारित असेल याची काळजी घेईन. परीक्षा यंत्रणेवर जास्त ताशेरे ओढले जातील, जेणेकरून कोणतीही कॉपी होणार नाही आणि विद्यार्थ्यांची खरी योग्यता सहजपणे समजण्यासाठी मदत होईल. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारे व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये त्यांचा प्रवेश घेण्याकडे अधिक लक्ष दिले जाईल.

चौथी गोष्ट म्हणजे मी भारतातील दिवसेंदिवस वाढत असणारी लोकसंख्या नियंत्रण करण्याकडे विशेष भर देईन. त्यानंतर कृषी, उद्योग, तेल उत्पादन, खाणकाम, निर्यातीत वाढ इत्यादी महत्त्वाच्या आणि उत्पादक क्षेत्रांमध्ये लक्ष देऊन त्यांच्या विकासात भर होण्यासाठी विशेष योजना देखील राबवेन.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी लोकांचे नैतिक स्तर उंचावून त्यांना आपल्या देशाचे देशभक्त बनविण्याचा प्रयत्न करेन. मी दहशतवाद, जातीयवाद, प्रांतवाद, मादक पदार्थांचे सेवन, हुंडा प्रथा, मद्यपान इत्यादी सर्व दुष्कर्मांचे उच्चाटन करण्याचा देखील प्रयत्न करेन. मी पंतप्रधान झाले तर आपल्या देशातील आरोग्य प्रणालीकडे देखील आवश्यक असे लक्ष देईन.

“आरोग्य हीच संपत्ती” या म्हणीनुसार मी आरोग्य क्षेत्रात काही सुधारणा घडवून आणणार. ज्याठिकाणी सरकारी दवाखाने असतात तिथे फारशा सोई सुविधा उपलब्ध नसतात, त्यामुळे मी त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन.

गरीब जनतेला सरकारी दवाखान्याचा लाभ घेता येईल असे धोरण आखेन म्हणजे गरीब जनता कमीत कमी पैशात कोणत्याही बिमारीचा इलाज सहजतेने करू शकेन. मानवजातीच्या कल्याणासाठी मी आपल्या रीतीने सर्वांना रोजगार उपलब्ध करून देईन.

खरे म्हणजे माझे शिक्षण चालू असताना, “मी पंतप्रधान झाले तर…” हा विचार करणे सुद्धा वेडेपणाचे आहे. परंतु, सध्या आपल्या देशाच्या राजकारणाची स्थिती मन स्तब्ध करून टाकणारी आहे. भारत हे राष्ट्र लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाही देशांमध्ये पंतप्रधानांना राज्यकारभाराचे सर्वोच्च अधिकार असतात.

म्हणून मला असे वाटते की मला जर पंतप्रधानपद लाभले तर मी भारत देशाचे चित्र बदलून टाकीन आणि जगामध्ये माझ्या प्रिय भारत देशाला नामांकित सुद्धा करेन. मी पंतप्रधान झाले तर मी भारतीयांची सेवक आहे, हे कधीही विसरणार नाही. हे राज्य जनतेचे आहे ही गोष्ट मी सतत स्मरणात ठेवीन.

“साधी राहणी उच्च विचारसरणी” या विचारसरणीप्रमाने मी माझे वर्तन तयार करेन. त्याचबरोबर हे तत्त्व भारताच्या राज्यकारभारात भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वीकारावे, असा आग्रह देखील धरेन. या तत्वाची अंमलबजावणी मी स्वतःपासून करेन. मंत्र्यांनी नेमस्त पगार घ्यावेत असे पूर्वी गांधीजींनी सांगितले होते, तेही मी प्रयत्नपूर्वक अमलात आणीन.

शेवटचे सांगायचे म्हटल्यास मी पंतप्रधान झाले तर ‘सामान्य माणसाला सुखी करणे व देशाचा विकास साधणे’ या दोन गोष्टी सतत माझ्या दृष्टीपुढे ठेवेन. देशाच्या कल्याणासाठी कोणतेही धोरण ठरवताना व ते कार्यान्वित करताना, त्या धोरणाच्या संबंधित विषयावर अभ्यास करणाऱ्या विद्वानांशी तसेच, संबंधित खात्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करेन आणि योजनेचे फायदे – तोटे लक्षात घेईन.

मी प्रत्येक मंत्र्याचे ज्ञान व अनुभव लक्षात घेऊन खातेवाटप करेन. अशा पद्धतीने मी पंतप्रधान झाले तर भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालविण्यासाठी प्रयत्न करेन आणि भारत   देशाला उच्च स्तरावर नेण्यासाठी अहोरात्र कष्ट करेन.

               –  तेजल तानाजी पाटील

                     बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या me pantpradhan zalo tar nibandh in marathi language माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “मी पंतप्रधान झालो तर निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या if i become a prime minister essay in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि me pantpradhan zalo tar in marathi essay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण jar me pantpradhan zalo tar essay in marathi या लेखाचा वापर me pradhanmantri zalo tar nibandh in marathi language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “मी पंतप्रधान झालो तर निबंध Me Pantpradhan Zalo Tar Nibandh in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!