मेघनाद साहा मराठी माहिती Meghnad Saha Information in Marathi

meghnad saha information in marathi मेघनाद साहा मराठी माहिती, भारतामध्ये अनेक असे शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले आणि तसेच मेघनाद साहा देखील एक शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनीं एक खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये मेघनाद साहा यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. मेघनाद साहा यांचा जन्म शार्टोली (बंगाल) या ठिकाणी ६ ऑक्टोबर १८९३ मध्ये एका गरीब कुटुंबामध्ये झाला होता आणि त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ साहा आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते.

त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतले म्हणजेच त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण आणि कॉलेजचे शिक्षण हे ढाका या शहरातून पूर्ण केले तसेच त्यांनी व्हिएन्ना मधून डॉक्टरेट पदवी देखील पूर्ण केली आणि त्यांनी कोलकत्यामधील प्रेसिडन्सी कॉलेज मध्ये देखील शिक्षण घेतले.

त्यांना जर्मनी भाषा देखील येत होती आणि ह्या जर्मनी भाषेचे प्रशिक्षण त्यांनी प्रा. नागेंद्र नाथ यांच्याकडून घेतले होते. मेघनाद सहा हे खगोल शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये ताऱ्यांचे तापमान आणि वर्णपट यामधील संबंधाची भौतिक कारणे शोधून काढली होती आणि हा त्यांचा त्यांच्या कारकिर्दीमधील मुख्य शोध होता.

त्याचबरोबर त्यांनी फक्त शास्त्रज्ञ म्हणून कामगिरी बजावली नाही तर त्यांनी एक राजकारणी म्हणून देखील कामगिरी बजावली आणि ते १९५२ मध्ये संसदीय निवडणुकीमध्ये निवडून आले होते. चला तर खाली आपण मेघनाद साहा यांच्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

meghnad saha information in marathi
meghnad saha information in marathi

मेघनाद साहा मराठी माहिती – Meghnad Saha Information in Marathi

नावमेघनाद साहा
जन्म६ ऑक्टोबर १८९३
जन्म ठिकाणशार्टोली (बंगाल)
पालकजगन्नाथ साहा आणि भुवनेश्वरी देवी
ओळखशास्त्रज्ञ आणि राजकारणी
शिक्षणडॉक्टरेट पदवी

मेघनाद साहा यांचे प्रारंभिक जीवन – early life

मेघनाद साहा यांचा जन्म ६ ऑक्टोबर १८९३ मध्ये एके गरीब कुटुंबामध्ये झाला आणि ते जगन्नाथ साहा आणि भुवनेश्वरी देवी यांचे पाचवे अपत्य होते. मेघनाद साहा यांची परिस्थिती गरीब होती आणि त्यांचे वडील हे दुकान चालवत होते आणि परिस्थिती जेमतेम असल्यामुळे ते मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नव्हते.

परंतु मेघनाद साहा यांना शिक्षणाची खूप आवड होती त्यामुळे त्यांनी ढाका मध्ये प्राथमिक शिक्षण आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले मग पुढे त्यांनी कोलकत्यामधील प्रेसिडन्सी कॉलेज मध्ये देखील शिक्षण घेतले.

मेघनाद साहा यांची कारकीर्द – career

  • त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात हि एक कॉलेजमधील प्राध्यापक म्हणून केली म्हणजेच ते १९१७ मध्ये सायन्स प्राध्यापक म्हणून कोलकत्त्यामधील युनिव्हर्सिटी कोलेजमध्ये रुजू झाले.
  • त्यानंतर प्राध्यापक म्हणून थोडे वर्ष काम केल्यानंतर त्यांनी पुढे १९३४ मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्षपद देखील भूषवले.
  • त्यांनी पुढे १९४७ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर फिजिक्सची स्थापना केली आणि मग त्यांनी किरणांचे वजन आणि दाब मोजण्यासाठी एक साधनाचा वापर करून शोध लावला म्हणजेच त्यांनी ताऱ्यांचे तापमान आणि वर्णपट यामधील संबंधाची भौतिक कारणे शोधून काढल.
  • त्यांनी पुढे सायन्स अँड कल्चर या जर्नलची स्थापना केली आणि त्यांने त्या संस्थचे मरे पर्यंत संपादन केले.
  • त्यांनी नशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंडियन फिजिकल सोसायटी या संस्थानाचे आयोजन त्यांनी केले.
  • त्यांनी १९५२ मध्ये संसदीय निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आणि ते त्या निवडणुकीमध्ये अपक्ष निवडून आले आणि ते लोकसभेवर निवडून येणारे पहिले शास्त्रज्ञ बनले.
  • ते एक महान वैज्ञानिक असण्यासोबत ते एक महान संस्थात्मक बांधकाम करणारे देखील होते आणि त्यांनी १९३५ मध्ये कलकत्ता येथे इंडियन सायन्स न्यूज असोसियेशनची स्थापना केली आणि १९५० मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर फिजीक्सची स्थापना केली तसेच दामोदर खरे प्रकल्पाच्या मूळ आराखडा तयार करण्याचे श्रेय देखील त्यांनाच दिले जाते.

मेघनाद साहा यांच्याविषयी काही मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

  • १९२० मध्ये मेघनाद साहा आणि त्यांच्या काळामध्ये स्वताला भौतिक शास्त्रामधील एक प्रमुख म्हणून स्थापित केले होते.
  • मेघनाद साहा हे इम्पिरियल कॉलेज, लंडन आणि मग नंतर ते जर्मनी अश्या प्रकारे दोन वर्ष भारताबाहेर राहिले आणि आणि मग ते भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांनी कोलकत्ता मधील विद्यापीठामध्ये प्राध्यापक बनले.
  • १९२७ मध्ये मेघनाद साहा यांची लंडन रॉयल सोसायटीमध्ये फेलो म्हणून निवड झाली होती.
  • मेघनाद साहा यांचा जन्म ढाका मध्ये झाला आहे ज्याला सध्याचे बांगलादेश म्हणून ओळखले जाते.
  • साहा यांचे गरीब कुटुंब होते आणि त्यांची परिस्थिती देखील जेमतें असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले तसेच त्यांना शिक्षण घेताना देखील अनेक कष्ट करावे लागले.
  • मेघनाद साहा यांच्या वडिलांचा व्यवसाय किराणा दुकानाचा होता आणि ते किराणा दुकान चालवत होते.
  • मेघनाद साहा यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनंत कुमार दास यांनी मदत केली.
  • मेघनाद साहा यांनी १९३२ मध्ये सावूथ इंडिया सायन्स अकादमी ( उत्तर प्रदेश विज्ञान अकादमी ) ची स्थापना केली .
  • मेघनाद साहा यांनी १९१८ मध्ये लग्न केले आणि त्यांच्या पत्नीचे नाव राधाराणी असे होते आणि त्यांना तीन मुली आणि तीन मुले होती.
  • मेघनाद यांना जरी नोबेलसाठी वारंवार नामांकन मिळाले असले तरी त्यांना नोबेल पारितोषिक मिळू शकले नव्हते.
  • त्यांनी त्यांच्या संशोधनाच्या कारकीर्दीमध्ये खगोलशास्त्रामध्ये काही शोध लावले परंतु त्यांच्या या योगदानाला शोध म्हणून मान्यता दिली नाही तर त्याला एक अनुप्रयोग म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • १९१७ मध्ये साहा यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज, कोलकत्ता या ठिकाणी विज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आणि त्या अगोदर त्यांनी क्वांटम फिजिक्स शिकवले होते.
  • मेघनाथ साहा यांनी शास्त्रज्ञ आणि राजकारणी म्हणून आपली कामगिरी बजावलीच परंतु त्यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून देखील कामगिरी बजावली म्हणजेच त्यांनी अनेक स्वातंत्र्य चळवळी मध्ये भाग घेतला होता.

मेघनाद साहा यांचा मृत्यू – death

मेघनाद साहा यांचा मृत्य हा वयाच्या ६२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने १६ फेब्रुवारी १९५६ मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झाला.

आम्ही दिलेल्या meghnad saha information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मेघनाद साहा मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या meghnad saha information in marathi language या dr meghnad saha information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information of meghnad saha in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये meghnad saha information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!