Methi Paratha Recipe in Marathi – Methiche Parathe पौष्टिक मेथी पराठा रेसिपी मेथी हि एक पौष्टिक भाजी असून यांचे एकदम स्वादिष्ट आणि खमंग पराठे बनवले जातात जे कित्येक लोक नाश्ता म्हणून खातात तर केत्येक लोक हा पदार्थ जेवणामध्ये देखील खातात. मेथी पराठा हा गव्हाचे पीठ, बारीक चिरलेली मेथीची भाजी, काही मसाले आणि तिखट – मीठ एकत्र करून त्याचे पीठ मळून त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून ते लाटून तव्यावर तेल लावून भाजून आपण ते दह्यासोबत सर्व्ह करू शकतो. मेथी पराठा हा पदार्थ काही स्वादिष्ट आणि खमंग पदार्थातील एक असून हा पदार्थ पौष्टिक मानला जातो.
कारण यामध्ये जीवनसत्वे, कॅल्शियम, प्रथिने यासारखे अनेक पोषक घटक आहेत त्यामुळे मेथी पराठा हा पदार्थ आपण लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत कोणाला हि खायला घालू शकतो. काही लहान मुलांना किंवा काही लोकांना मेथीची भाजी आवडत नाही त्यामुळे ते भाजी खात नाहीत.
त्यावेळी जर आपण मेथीची भाजी कणिक मध्ये मिक्स करून त्याचे पराठे बनवले तर ते पराठे लहान मुले किंवा मोठे आवडीने खातात. मेथीचा पराठा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी सहज बनतो. आज या लेखामध्ये आपण मेथी पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत.

मेथी पराठा रेसिपी मराठी – Methi Paratha Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
भाजण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारे वेळ | २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
मेथीचे पराठे कसे बनवायचे – how to make methi paratha recipe in marathi language
मेथी पराठा हा दोन प्रकारे बनवला जातो एक हिरवी मिरची वापरून आणि दुसरा प्रकार लाल मिरची पावडर वापरून. आणि ह्या दोन्ही प्रकारे मेथी पराठा बनवला तरी तो खूप छान लागतो. आता आपण मेथी पराठा कसा बनवला जातो आणि तो बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहणार आहोत.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
भाजण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारे वेळ | २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
पध्दत १ : लाल मिरची पावडर वापरून मेथी पराठा रेसिपी
आता आपण लाल मिरची वापरून मेथी पराठा कसा बनवायचा हे पाहूयात आणि ह्या प्रकारे मेथी पराठा सामन्यता सर्व ठिकाणी बनवला जातो. चाल तर मग पाहूयात लाल मिरची पावडर वापरून मेथी पराठा कसा बनवायचा.
- नक्की वाचा: आलू पराठा रेसिपी
मेथी पराठा रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make methi paratha recipe
मेथी पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्या घरामध्ये आधीपासून सहजपणे उपलब्ध असू शकते किंवा आपल्या घरामध्ये मेथी पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य जर उपलब्ध नसेल तर ते बाजारामधून उपलब्ध करून घ्या. मेथी पराठे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.
- २ वाटी गव्हाचे पीठ.
- दीड वाटी चिरलेली मेथी भाजी.
- १ चमचा ओवा.
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- १ चमचे लसून पेस्ट.
- १/२ चमचा हळद.
- १/२ चमचा गरम मसाला.
- १ चमचा साखर.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- तूप किंवा तेल ( आवश्यकतेनुसार ).
मेथी पराठा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make methi paratha recipe
- मेथी पराठे बनवताना सर्वप्रथम मेथीची भाजी चांगली निवडून स्वच्छ धुवून घ्या आणि मग ती बारीक चिरून घ्या.
- आता एक मोठा मिक्सिंग बाऊल घ्या ज्यामध्ये तीन वाटी पीठ मावेल किंवा तुम्ही पराती मध्ये देखील पीठ मळू शकता. परातीमध्ये गव्हाचे पीठ, बारीक चिरलेली मेथी, ओवा, लाल मिरची पावडर, लसून पेस्ट, हळद, गरम मसाला पावडर, साखर आणि चवीनुसार मीठ घालून ते चांगले मिक्स करा.
- आता त्या मिश्रणामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते पीठ चांगले मऊ मळून घ्या आणि १० ते १५ मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवा.
- १० ते १५ मिनिटांनी ते पीठ घेवून पोळपाटाला तेल लावून ते पीठ पोळपाटावर चांगले मळून घ्या आणि त्याचे आणि त्या पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या.
- आता गॅसवर मध्य आचेवर तवा ठेवा आणि तो गरम होऊ द्या.
- मग आपण बनवलेल्या गोळ्याला कोरडे गव्हाचे पीठ लावा आणि तो लाटून घ्या आणि तवा तापल्यानंतर त्यावर थोडे तेल सोडून तो पराठा ताव्यामध्ये टाका आणि त्याला दोन्ही बाजूंनी तेल लावून पराठ्याच्या दोन्ही बाजू चांगल्या खरपूस भाजून घ्या आणि पराठा भाजला कि तो बाजूला काढा.
- अश्या प्रकारे सर्व गोळ्यांचे पराठे लाटून भाजून घ्या आणि शक्यतो पराठे गरमागरम सर्व्ह करा.
- गरमागरम पराठा दह्यासोबत सर्व्ह करू शकता.
पध्दत २ : हिरवी मिरची वापरून मेथी पराठा रेसिपी
आता आपण हिरवी मिरची वापरून मेथी पराठा कसा बनवायचा ते पाहूयात.
मेथी पराठा रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make methi paratha recipe
हिरवी मिरची वापरून बनवलेल्या पराठ्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि ह्या प्रकारचा पराठा बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागते. या साहित्याची यादी आपण खाली पाहू.
- २ वाटी गव्हाचे पीठ.
- १ वाटी चिरलेली मेथी.
- १ चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची.
- १ चमचा लसून पेस्ट.
- १/२ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
मेथी पराठा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make methi paratha recipe
- सर्वप्रथम एका परातीमध्ये गव्हाचे पीठ, चिरलेली मेथीची भाजी, हिरवी मिरची, लसून पेस्ट, हळद आणि चवीनुसार पीठ घालून त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते चांगले मळून घ्या. आणि १० ते १५ मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवा.
- १० ते १५ मिनिटांनी ते पीठ घेवून पोळपाटाला तेल लावून ते पीठ पोळपाटावर चांगले मळून घ्या आणि त्याचे आणि त्या पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या.
- आता गॅसवर मध्य आचेवर तवा ठेवा आणि तो गरम होऊ द्या.
- मग आपण बनवलेल्या गोळ्याला कोरडे गव्हाचे पीठ लावा आणि तो लाटून घ्या आणि तवा तापल्यानंतर त्यावर थोडे तेल सोडून तो पराठा ताव्यामध्ये टाका आणि त्याला दोन्ही बाजूंनी तेल लावून पराठ्याच्या दोन्ही बाजू चांगल्या खरपूस भाजून घ्या आणि पराठा भाजला कि तो बाजूला काढा.
- अश्याप्रकारे सर्व पराठे बनवून घ्या.
मेथीचा पराठा कश्या सोबत खातात – serving suggestion
- मेथीचा पराठा आपण दही, लोणी किंवा सॉस सोबत खाऊ शकतो
टिप्स ( Tips )
- तुम्ही पराठ्याचे पीठ फ्रीज मध्ये ठेवून तुम्हाला हवा आहे तेंव्हा गरमागरम पराठा लाटून खावू शकता.
- आपण मेथी पराठा बनवताना त्या पिठामध्ये अगदी थोडेसे दही देखील घालू शकतो त्यामुळे पराठ्याला वेगळीच टेस्ट येते.
- पराठ्यामध्ये आपण आपल्या आवडीचे मसाले घालू शकतो.
मेथीच्या भाजीमध्ये असणारे पोषक घटक – nutritional value
घटक | प्रमाण ( प्रती १०० ग्रॅम ) |
कॅलरी | ३२३ |
सोडियम | ६७ एमजी |
कर्बोदके | ५८ ग्रॅम |
क जीवनसत्व | ३ एमजी |
जीवनसत्व बी ६ | ०.६ एमजी |
कॅल्शियम | १७६ एमजी |
प्रथिने | २३ ग्रॅम |
फायबर | २५ ग्रॅम |
आम्ही दिलेल्या methi paratha recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मेथी पराठा रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या aloo methi paratha recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि methi paratha in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये methiche parathe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट