आलू पराठा रेसिपी मराठी Aloo Paratha Recipe in Marathi

Aloo Paratha Recipe in Marathi आलू पराठा रेसिपी मराठी आलू पराठा हि एक भारतीय पदार्थ असून हा पदार्थ लोक सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा काही ठिकाणी संध्याकाळच्या जेवणासाठी देखील बनवला जातो. आलू पराठा हा पदार्थ जरी पश्चिम भारतामधील पदार्थ असला तरी हा पदार्थ भारताच्या उत्तर भागामध्ये खूप आवडीने बनवून खाल्ला जातो आणि हा पदार्थ उत्तर भागामधील प्रसिध्द पदार्थांपैकी एक आहे. आलू पराठा हा बटाट्च्या सारण कणकीच्या गोळ्यामध्ये भरून ते लाटले जाते आणि त्याला तेल लावून तव्यावर भाजले जाते. आलू पराठा असा पदार्थ आहे.

जो आपण सकाळच्या नाश्त्यासाठी, किंवा लहान मुलांच्या डब्यामध्ये, किंवा काही लोक रात्रीच्या जेवणासाठी देखील बनवतात. आलू पराठा हा पदार्थ घरामध्ये बनवणे खूप सोपे आहे आणि हा देखील कमी वेळेमध्ये बनणारा एक स्वादिष्ट पदार्थ आहे. भारतामध्ये जरी सर्व ठिकाणी आलू पराठा बनत असला तरी पंजाब मध्ये हा पदार्थ खूप आनंदाने बनवला जातो आणि आवडीने खाल्ला जातो.

त्या ठिकाणी आलू पराठे तुप लावून भाजले जातात आणि ते बटर किंवा लोणी सोबत सर्व्ह केले जातात. आलू पराठा हा पदार्थ लहानाच्या पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. म्हणून आज या लेखामध्ये आलू पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.

Aloo Paratha Recipe in Marathi
Aloo Paratha Recipe in Marathi

आलू पराठा रेसिपी मराठी – Aloo Paratha Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ४० मिनिटे
पाककलापश्चिम भारतीय

आलू पराठा म्हणजे काय ?

आलू पराठा म्हणजे उकडलेले बटाटे कुसकरून किंवा खिसून त्याला काही तिखट मसाल्यांची फोडणी दिली जाते आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून ते कणकीच्या पिठाच्या गोळ्यामध्ये भरले जातात आणि ते लाटून ते तव्यावर मध्यम आचेवर तेल किंवा तूप लावून भाजले जातात.

आलू पराठा बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • बटाटे : बटाटे हा घटक आलू पराठा या पदार्थातील महत्वाचा घटक आहे कारण यामध्ये उकडलेल्या बटाट्याला मसाले घालून फोडणी दिली जाते आणि ते सारण गोळ्यामध्ये भरून पराठे लाटले जातात.
  • गव्हाचे पीठ : गव्हाची पिठामध्ये तेल मीठ आणि पाणी घालून ते घट्ट मळून त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून त्यामध्ये बटाट्याचे सारण भरून लाटले जातात.
  • तूप : पराठ्याला तूप लावून भाजल्यामुळे आलू पराठ्याला एक वेगळीच चव येते.

आलू पराठा रेसिपी – aalu paratha recipe in marathi

आलू पराठा जरी पश्चिम भारतीय पदार्थ असला तरी उत्तर भारतामध्ये हा पदार्थ जास्त प्रमाणात बनवला जातो आणि खासकरून पंजाबमध्ये हा पदार्थ खूप आवडीने बनवला जातो आणि खाल्ला देखील जातो. हा पदार्थ त्या ठिकाणी तुप लावून भाजला जातो आणि लोणी किंवा बटर सोबत सर्व्ह केला जातो.

रोज रोज आपल्या पोहे, उपमा किंवा शिरा यासारखा नाश्ता खाऊन कंटाळा आलेला असतो आणि त्यावेळी काही वेगळे करून खावेसे वाटत असल्यास आपण आलू पराठे बनवून खावू शकतो कारण हा पदार्थ बनवणे खूप सोपे आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात बनणारा एक स्वादिष्ट पदार्थ आहे. आता आपण आलू पराठा कसा बनवायचा आणि हा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

आलू पराठा कसा बनवायचा – how to make aloo paratha in marathi recipe

तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ४० मिनिटे
पाककलापश्चिम भारतीय

आलू पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make aloo paratha 

आलू पराठे बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, बटाटे आणि तूप हे महत्वाचे घटक आवश्यक असतात आणि या व्यतिरिक्त लसून, हिरव्या मिरच्या आणि मीठ आणि इतर मसाले यासारखे साहित्य लागते. जर आलू पराठा बनवण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो.

  • ५ ते ६ उकडलेले बटाटे.
  • २ वाटी गव्हाचे पीठ.
  • ३ ते ४ चमचे आले लसून पेस्ट.
  • ८ ते ९ हिरव्या मिरच्या.
  • १ चमचा लिंबू रस.
  • १ चमचा हळद.
  • १/४ चमचा हिंग.
  • २ मोठे चमचे खोबरे कोथिंबीर पेस्ट.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • तेल किंवा तूप ( आवश्यकतेनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

आलू पराठे बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make aloo paratha 

  • सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून ते कुकरमध्ये घालून त्यामध्ये पाणी घाला आणि कुकरचे झाकण लावून कुकरला ४ ते ५ शिट्ट्या द्या.
  • मग कुकर थंड होईपर्यंत वाट पहा.
  • या वेळेमध्ये एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तेल आणि मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून ते चांगले मळून घ्या.
  • आणि ते १० ते १५ मिनिटे झाकून बाजूला ठेवा त्यामुळे कणिक चांगली भिजेल.
  • आता कुकर गार झाला असेल तर त्याचे झाकण उघडून त्यामधील बटाटे काढून घ्या आणि त्याच्या साली काढा.
  • मग ते बटाटे खिसून घ्या किंवा कूसकरून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये थोडे तेल घाला ते गरम झाले कि त्यामध्ये लसून, हिरवी मिरची, हळद, हिंग आणि खोबरे कोथिंबीर पेस्ट घालून ते चांगले मिक्स करा आणि मग त्यामध्ये खिसलेला बटाटा, साखर, मीठ आणि लिंबू रस टाकून ते चांगले एकत्र करू घ्या आणि गॅस बंद करून घ्या.
  • तुमचे सारण तयार झाले.
  • आता मळून ठेवलेली कणिक घ्या आपल्या हाताला थोडे तेल लावा आणि कणकीचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या आणि सारणाचे देखील गोळे करून घ्या.
  • मग कणकीच्या गोळ्यामध्ये बटाट्याचे गोळा भरून त्याला कोरडे गव्हाचे पीठ लावून तो गोळा गोल लाटून घ्या.
  • आणि मग तवा मध्यम आचेवर गरम करून त्याला थोडे तूप किंवा तेल लाऊन आपण लाटलेला पराठा तव्यावर टाका आणि त्याला दोन्ही बाजूने तेल लावून त्याच्या दोन्हीही बाजू भाजा.
  • अश्या प्रकारे सर्व गोळे भरून लाटून घ्या आणि ते तव्यावर भाजून घ्या.
  • तुमचा आलू पराठा सर्व्ह करण्यासाठी तयार झाला, तुम्ही हा पराठा लोण्यासोबत सर्व्ह करू शकता.

आलू पराठा कश्या सोबत खावा – serving suggetions 

गरमागरम आलू पराठा आपण तूप, लोणी किंवा बटर सोबत खाऊ शकतो त्याचबरोबर आपण आलू पराठा टोमॅटो सॉस सोबत देखील खाऊ शकतो.

टिप्स ( Tips ) 

  • बटाट्याच्या सारणामध्ये आपण मिरची ऐवजी लाल तिखट देखील वापरू शकतो.
  • जर तुम्हाला बटाट्यामध्ये कांदा आवडत असल्यास फोडणी देत असताना आपण त्यामध्ये कांदा देखील वापरला तर चालेले.
  • सारणामध्ये आपण आपल्याला अवणारे मसाले देखील वापरू शकतो जसे कि मॅगी मसाला.
  • आपण पराठा बनवण्यासाठी जी कणिक मळतो ती मऊ आणि गुळगुळीत असावी.

आम्ही दिलेल्या aloo paratha recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आलू पराठा रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या aalu paratha recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि how to make aloo paratha in marathi recipe माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये aloo paratha marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!