मी केलेला प्रवास निबंध मराठी Mi Kelela Pravas in Marathi Essay

Mi Kelela Pravas in Marathi Essay मी केलेला प्रवास निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये मी केलेला प्रवास या विषयावर निबंध लिहिणार आहोत. प्रवासातील एक अविस्मरणीय प्रवास बहुतेक व्यक्तींना आवडणारा एक आनंदाचे क्षण असतात आणि आपण सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रवास हा केलेला असतो. माझ्या हि आयुष्यामध्ये खूप असे प्रवास केले पण त्यामधील एक आवडता, अविस्मरणीय आणि आनंदाचा प्रवास मला अजूनही लक्षात आला कि खूप आठवणी लक्षात येतात. मी कॉलेज मध्ये असताना कॉलेज मधून आमची सहल गेली होती आणि त्यामधून आम्ही सर्व मित्र मात्रिणी गेलो होतो आणि त्यावेळी आम्ही पूर्ण प्रवासामध्ये खूप मज्जा केलेली.

आमच्या कॉलेजमधून जी सहल गेलेली ती इंडस्ट्रीयल विझीटसाठी गेलेली आणि त्यावेळी आम्ही इंडस्ट्रीयल विझीट झाल्यानंतर अनेक प्रेक्षणीय स्थळे देखील पहिली होती. आम्ही कॉलेज मधून गेलेली हि सहल म्हैसूर आणि बेंगलोर या शहरामध्ये गेली होती आणि आम्ही महाराष्ट्रातून म्हैसूर ला जाणार होतो आणि प्रवासाठी रेल्वे मार्ग किंवा रेल्वेची निवड केली होती.

mi kelela pravas in marathi essay
mi kelela pravas in marathi essay

मी केलेला प्रवास निबंध मराठी – Mi Kelela Pravas in Marathi Essay

Maza Pravas Marathi Nibandh

आमच्या कॉलेजमध्ये आमच्या वर्गाच्या २ तुकड्या होत्या आणि दोन्ही तुकड्यामधील सर्व मुले मुली सहलीसाठी आलेल्या होत्या. आमच्या सहलीचे सर्व नियोजन हे टूर मॅनेजर करत होते आणि त्यांनी आमच्या रेल्वेची तिकिटे तसेच म्हैसूर बेंगलोर मध्ये गेल्यानंतर कोठे राहायचे तसेच नाश्ता जेवण कुठे करायचे हे सर्व त्यांनी ठरवून ठेवले होते.

आमची सहल हि ४ दिवसांच्यासाठी जाणार होती आणि आमची रेल्वे संध्याकाळी ६ वाजता होती आणि आम्हाला रेल्वे स्थानकावर एक तास अगोदर यायला सांगितले होते आणि बरोबर एक तास अगोदर रेल्वे स्थानकावर गेलो होतो आणि त्यावेळी प्रत्येकाच्या मित्र मैत्रिणींचे पालक स्थानकावर सोडण्यासाठी आलेले होते आणि माझे देखील वडील मला स्थानकावर सोडण्यासाठी आले होते. स्थानकावर आमच्या सोबत येणारे शिक्षण देखील हजार होते आणि माझ्या वडिलांनी त्यांची देखील भेट  घेतली आणि आमची रेल्वे येईपर्यंत ते देखील थांबले.

आम्ही सर्व मित्र मैत्रिणीनी रेल्वे स्थानकावर थोडे फोटो काढले आणि सहलीची सुरुवात खऱ्या अर्थाने फोटो पासून झाली. बरोबर ६ वाजता आमची म्हैसूरला जाणारी रेल्वे आली आणि आणि ज्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबणार आहे त्या प्लॅटफॉर्मवर उभे होतो रेल्वे आल्यानंतर आम्ही सर्व जन पटापट रेल्वे मध्ये चढलो कारण रेल्वेची थांबण्याची वेळ हि ठरलेली असते.

रेल्वे मध्ये चढल्यानंतर आम्ही आमच्या जागा कुठे आहेत ते पाहून आमच्या आमच्या जागी बसलो आणि आणि आमचा प्रवास सुरु झाला. आता आमच्या बॅग सुरक्षित जागी ठेवल्या आणि नशिबाने माझ्या २ ते ३ जवळच्या मित्र मैत्रिणी जवळ होत्या त्यामुळे प्रवासात खूप मज्जा आली तसेच आणि तिघे होते ते आमच्या वर्गाच्या दुसऱ्या तुकडीतील होते.

आम्ही रेल्वेमध्ये सर्व एकत्र येऊन गाण्याच्या भेंड्या, दम शेराज, आणि इतर वेगवेगळे गेम खेळले तसेच खूप मज्जा केली तसेच घरातून बांधून आणलेले जेवण रात्रीच्या जेवणामध्ये केले एकत्र मिळून केले आणि हा एक सुखद अनुभव होता. रात्री देखील रेल्वेमध्ये आणि ११ ते १२ पर्यंत गप्पा मारल्या आणि मग झोपलो. म्हैसूरला जाणारी रेल्वे सकाळी म्हैसूर जंक्शन वर पोहोचलो आणि तेथून आम्ही हॉटेलवर लक्झरी बसने गेलो आणि मग तेथे फ्रेश होऊन राफ्टींगसाठी जी कपडे लागतात ती कपडे घातली आणि तेथे नाश्ता करून हॉटेलपासून जवळच असणाऱ्या राफ्टींग पॉइंटला भेट दिली आणि आम्ही तेथे मनसोक्त राफ्टींगची मजा घेतली.

तेथे आम्हाला १२ वाजले मग आम्ही तेथून हॉटेलवर परतलो आणि मग अंघोळ करून आवरून आम्ही त्याच हॉटेल मध्ये जेवलो आणि मग दुपारी आम्ही म्हैसूर पॅलेस पाहण्यासाठी निघालो आणि मग आम्ही तास म्हैसूर पॅलेस पहिला तसेच तेथे असणाऱ्या गाईडने आम्हाला पॅलेसचा इतिहास सांगितला तसेच आम्हील त्या ठिकाणी थोडे फोटो काढले आणि तेथे जवळ असणारा सन सेट पॉइंट पहिला आणि मग परत आम्ही पॅलेसची रात्रीची रोशनाई पहिली आणि मुक्कामासाठी हॉटेलमध्ये निघालो.

दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी हॉटेलमधून आमचे समान घेवून लवकर निघालो आणि मग आम्ही दोन इंडस्ट्रीयल विझीट केल्या आणि मग आम्ही १५७ एकरमध्ये असणारे म्हैसूर प्राणी संग्रहालय पहिले आणि हे पाहण्यासाठी २ ते ३ तास लागले कारण त्या संग्रहालयामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या रंगाचे पक्षी आम्ही पहिले.

तसेच प्राणी संग्रहालयामध्ये आम्हाला गाईडने संग्रहालयाचा सर्व भाग दाखवला आणि माहिती देखील सांगितली आणि मग आम्ही मुक्कामासाठी दुसरे हॉटेल पहिले आणि तेथे राहिलो मग तिसऱ्या दिवशी आम्ही बेंगलोर शहराकडे गेलो आणि मग तेथे असणाऱ्या लोकप्रिय वॉन्डरेला पार्कमध्ये प्रवेश घेतला आणि मग तेथे असणाऱ्या सर्व राईडची मजा घेतली आणि आणि तेथे दिवसभर खूप मज्जा केली.

तेथे असणाऱ्या सर्व पाळण्यांमध्ये बसलो आणि ज्या ज्या वॉटर राईड्स होत्या त्या सर्व केल्या त्या पूर्ण दिवसामध्ये आम्ही आमच्या सर्व मित्र, मैत्रिणी, शिक्षक यांच्या सोबत खूप मज्जा केली आणि खूप सारे फोटो काढले तसेच व्हिडिओ देखील बनवले तसेच वॉन्डरेला पार्क मध्ये असणाऱ्या पदार्थांच्या दुकानामधील पदार्थाचा आनंद लुटला आणि तो आमचा सहलीचा शेवटचा दिवस खूप आनंदात घालवला.

वॉन्डरेला पार्क मधून आम्ही ५ वाजता निघालो आणि मग आम्ही बेंगलोरच्या रेल्वे स्थानकाकडे प्रवास करण्यास सुरुवात केली आणि ७ – ७.३० च्या दरम्याने आम्ही रेल्वे स्थानकावर पोहचलो आणि आमची रेल्वे ९ वाजता होती त्यामुळे आम्हाला रेल्वे स्थानकावर वाट पाहत बसावी लागली तसेच आम्हाला स्थानकावर शिक्षकांनी रात्रीच्या जेवणाचे पार्सल दिले.

आता ९ वाजले आणि रेल्वे आली आणि रेल्वेमध्ये पटापट चढलो आणि आमच्या आमच्या जागी बसलो. माझे सर्व मित्र मैत्रिणी थोडे उदास होते कारण आता आमची हि सहल संपण्याच्या मार्गावर होती. आता आम्ही थोड्या वेळाने रात्रीचे जेवण केले आणि आम्ही सहलीमध्ये केलेल्या गोष्टींच्याबद्दल चर्चा केली थोड्या गप्पा मारल्या आणि रात्री झोपलो आणि सकाळी आम्ही आमच्या गावी पोहचलो. अश्या प्रकार आम्ही चार दिवसाचा प्रवास केला आणि हा प्रवास माझ्या आयुष्यातील एक आनंददायी प्रवास ठरला.

आम्ही दिलेल्या mi kelela pravas in marathi essay माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मी केलेला प्रवास निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maza pravas essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Maza pravas Marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!