माझे कॉलेज निबंध My College Essay in Marathi

My College Essay in Marathi – My First Day in College Essay in Marathi माझे कॉलेज निबंध, माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझे कॉलेज या विषयावर निबंध लिहिणार आहोत. कॉलेज म्हटले कि आज देखील आठवतात कॉलेज मधील काही आठवणी, कॉलेजमधील काही आनंदाचे दिवस, मित्र मैत्रीणींच्या सोबत केली मज्जा, मस्ती आणि परीक्षा आल्यानंतर एकत्र मिळून केलेला अभ्यास. कॉलेजमधील अश्या अनेक आठवणी असतात तसेच हा एक आपल्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो ज्यावरून आपल्या पुढच्या करियरला दिशा मिळते.

कॉलेज हा प्रत्येक व्यक्तीचा सुवर्ण क्षण असतो आणि दहावी झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थीच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले असतात कि आपण कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा आणि कोणत्या विषयामधून आकारावी बारावीचे शिक्षण घ्यावे. कारण आपण ज्यावेळी अकरावीला प्रवेश घेणार असतो त्यावेळी आपल्या समोर कला, वाणिज्य आणि विज्ञान हे विषय असतात आणि आपल्या सोयीप्रमाणे विषय निवडून त्या विभागामध्ये प्रवेश घेवू शकतो आणि आपण अकरावीला विभाग निवडताना खूप विचार करून करतो.

my college essay in marathi
my-college-essay-in-marathi

माझे कॉलेज निबंध – My College Essay in Marathi

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध – My First Day in College Essay in Marathi

कारण आपले पुढचे शिक्षण किंवा करियर त्याच्यावर अवलंबून असते. शेवटी मी वाणिज्य हा विषय निवडून कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. मी ज्यावेळी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला त्यावेळी माझ्या शाळेतील काही मित्र आणि मैत्रिणी माझ्यासोबत होत्या त्यामुळे मला कॉलेजच्या पहिल्या दिवशी काही वाटले नाही मग जस जसे आम्ही कॉलेजमध्ये जुने होत गेलो तास तशी आम्हाला कॉलेजमधील वातावरणाची सवय होत गेली.

माझे कॉलेज तसे मोठे होते कारण माझ्या कॉलेजमध्ये आकारावी, बारावी ( कला, वाणिज्य आणि विज्ञान हे विभाग होते ). तसेच कॉलेज मध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या विभागाचे ग्रॅज्युयेशन आणि पोस्ट ग्रॅज्युयेशनचे शिक्षण देखील मिळत होते. आमच्या कॉलेजची इमारत हि दोन मजली होती आणि आमचा अकरावीचा वर्ग हा दुसऱ्या मजल्यावर होता आणि आमचा वर्ग हा ५० ते ६० मुले अगदी आरामात मावतील इतका मोठा होता आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण होता.

आमचे कॉलेज हे मॉर्निंग कॉलेज असायचे म्हणजेच सकाळी लवकर असायचे आणि आमचा पहिला क्लास हा ९ ते १० असायचा आणि मग त्यानंतर १५ मिनिटाची सुट्टी असायची असे सव्वा एक पर्यंत आमचे कॉलेज असायचे. आमच्या कॉलेजची जिमखाना इमारत देखील दोन मजली होती आणि आम्हाला तेथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचे साहित्य मिळायचे आणि ते बैठ्या खेळाचे असो किंवा मैदानी खेळाची आमच्या ग्रुपमधील काही जणांना कॅरम या खेळाची खूप आवड असल्यामुळे आम्ही कॉलेज मधील क्लास सुटले कि एक तास किंवा जर खेळ चांगला रमला तर जिमखान्यामध्ये कॅरम खेळत बसायचो.

जीमाखानाच्या बाजूला एक खेळाचे मोठे मैदान होते आणि तेथेच इतर विद्यार्थी वेगवेगळे खेळ खेळायचे आणि मुले दर त्या ठिकाणी दिवसभर क्रिकेट खेळत असत. याच मैदानावर आमच्या कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा दरवर्षी असायच्या आणि यामधील खेळामध्ये जसे कि रंनिंग मध्ये मी आणि माझ्या मित्र – मैत्रिणी भाग घेत होतो. त्याचबरोबर आमच्या कॉलेजमध्ये जर काही वाणिज्य विषयाबद्दल काही स्पर्धा असल्या तर आम्ही सगळे मिळून त्यामध्ये सहभागी होत होतो.

त्याचबरोबर आमच्या कॉलेजमध्ये ६ महिन्यातून एकदा इंडस्ट्रीयल विझिट देखील जात होते आणि आमच्या गटातील सर्वजन इंडस्ट्रीयल विझिटला न चुकता जात होतो कारण आम्हाला त्या विझिटमुळे कोणत्या तरी व्यवसाय बद्दल माहिती मिळत होती तसेच विझिट सोबत जर तेथे कोणतेतरी पर्यटन स्थळ असेल तर ते देखील पाहता यायचे आणि त्यामुळे सहलीचा आनंद देखील घेता यायचा. त्याचबरोबर आमच्या कॉलेजचा असा नियम होता कि एक वर्षी अन्युअल गॅदरिंग असायचे आणि एका वर्षी एक मोठी वार्षिक सहल असायची.

तसेच अभ्यासातून विरंगुळा म्हणून पारंपारिक दिवस ( traditional day ) रेट्रो डे, मिसमॅच डे या सारखे अनेक डे साजरे केले जायचे. पारंपारिक दिवस असायचा त्या दिवशी मुले साड्या नेसून यायच्या आणि महाराष्ट्रीयन, कर्नाटकी, बंगाली, तामिळी अश्या प्रकारे वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा करायच्या आणि मुले देखील वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा करत होते.

अश्या प्रकारे वेगवेगळ्या डे ला त्या डे प्रमाणे वेशभूषा विद्यार्थी करून यायचे. अश्या सर्व वर्षभराच्या कार्यक्रमांनंतर महत्वाची असाची ती म्हणजे परीक्षा आणि वार्षिक परीक्षा म्हटले कि सार्वजन अभ्यासाला लागायचे. परीक्षेचे वेळापत्रक नोटीस बोर्ड वर लावले कि सर्वांची धावपळ व्हायची आणि विद्यार्थी हुशार विद्यार्थ्याच्या काढून आणि सरांच्या कडून नोट्स गोळा करून अभ्यासाला सुरुवात करायची आणि विद्यार्थी जास्त करून ग्रुप करून कॉलेजमध्ये अभ्यास करत होती कारण काही समजले नाही तर एकमेकांना विचाराने सोपे जात होते.

आमच्या कॉलेज मधील परीक्षेची पध्दत हि खूप कडक होतो आणि परीक्षेचे नंबर टाकताना समोरील बेंचवरचा विद्यार्थी वाणिज्यचा असेल तर त्याच्या पाठीमागील विद्यार्थी हा विज्ञान किंवा कला विभागाचा असायचा अश्या प्रकारे कडक पद्धतीने आमची वार्षिक परीक्षा घेतली जायची.

पुढील बारावीचे शिक्षण मी त्याच कॉलेजमध्ये घेतले पण यावेळी थोडी मस्ती, मज्जा कमी आणि अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ दिला कारण बारावी हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो आणि आपण जर बारावीला चांगल्या उतीर्ण गुणांनी पास झालो तर शिक्षणाचा मार्ग चांगल्या पद्धतीने निवडता येतो. बाराविला असताना होणारे सर्व क्लास न चुकता करू लागलो तसेच कॉलेज सुटल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये असणाऱ्या ग्रंथालयामध्ये एक स्टडी रूम देखील होती आणि तेथे खूप शांतता असायची.

त्यामुळे आम्ही अभ्यासाला तेथेच बसायचो आणि ग्रंथालयामध्ये अभ्यासाला बसण्याचा आम्हाला एक फायदा झाला कि आम्हाला जर कोणत्या विषयाचे पुस्तक घ्यायचे असल्यास आम्ही तेथून लगेचच घेत होतो तसेच आमचे कॉलेजमध्ये एक्सट्रा क्लास देखील सुरु होते. बरीविच्या या वर्षामध्ये आम्ही अभ्यास करत करत अनेक मनोरंजक गोष्टीपण केल्या जश्या आणि अकरावीमध्ये असताना करत होतो.

अशा प्रकारे आमच्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक आले पण वर्षभरामध्ये चांगला अभ्यास झाल्यामुळे भीती वाटली नाही आणि आमच्या कॉलेजमध्ये बोर्डाच्या परीक्षा होत असल्यामुळे माझा परीक्षेचा नंबर आमच्याच कॉलेजमध्ये पडला आणि आमच्या बारावीच्या परीक्षा चांगल्या पार पडल्या आणि आम्ही बारावीला चांगल्या गुणांनी पास देखील झालो. पुढे ग्रॅज्युयेशन आणि पोस्ट ग्रॅज्युयेशन देखील केले. अश्या प्रकारे आपल्या कॉलेजबद्दल आणि कॉलेजच्या आठवणींच्या बद्दल जितके सांगेल तेवढे ते कमीच असते.

आम्ही दिलेल्या My College Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे कॉलेज निबंध, माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या  या my junior college essay in marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “माझे कॉलेज निबंध My College Essay in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!