mogra flower information in Marathi मोगरा म्हंटल कि त्याच्या अत्यंत सुगंधित सुवासाची आठवण होतेच अश्या या सुगंधित फुलाचा उगम भारतामध्ये झाला आणि भारतामधुनच या फुलाचे ओळख दुसऱ्या देशांना झाली. सन १९९४ पासून मोगरा दुबई, यु. ए. ई आणि अफगाणीस्तान मध्ये हि फुले निर्यात केली जावू लागली. या फुलाला संस्कृतमध्ये मालती असे म्हणतात. हे पांढऱ्या रंगाचे असते आणि हे प्रखर सूर्यप्रकाशात आणि मध्यम पावसामध्ये चांगले येते. हे फुल उष्ण असल्यामुळे हे फुल प्रखर सूर्यप्रकाश सहन करू शकते. या फुलाच्या ४ प्रजाती आहेत त्या म्हणजे मोतिया, मदनवन, बेला आणि पालमपूर. या फुलाचे झाड झुडूपासारखे असते आणि या फुलाच्या बिया किवा रोप नसतात फुलाच्या झाडाची फांदी जमिनीमध्ये रोवली तर त्याला नवीन पालवी फुटते. या फुलाच्या झाडाची एक विशेषता म्हणजे ह्या झाडाला एकदा लागवड केल्यानंतर त्या झाडाला ९ ते १० वर्ष फुले लागतात. मोगरा हे फुल जास्मिनम वंशातील आहे या फुलाच्या झाडाचे वनस्पतिक नाव जास्मिनम समबक असे आहे. ह्या फुलाला जाई, जुई, अरबी चमेली, मदनबाण, सायली आणि कुंदा या नावानीही ओळखले जाते. (mogra fulachi mahiti)
मोगरा फुलाबद्दल माहिती / Mogra flower information in Marathi
मोगरा म्हटलं कि पांढरा रंग डोळ्यासमोर येतो त्याच बरोबर त्याचा दुरदूरवर पसरणारा सुगंध हि आठवतो. या फुलाला इंग्रजी मध्ये (Jasmine) जास्मिन असेही संबोधले जाते. चला तर या फुलाबद्दल आपण जाणून घेऊयात.
फुलांचा राजा गुलाब संपूर्ण माहिती
मोगऱ्यासाठी लागणारे वातावरण ( temperature required to grow the flower )
मोगऱ्याचे फुल उष्ण असल्यामुळे त्याला वातावरणही उष्ण लागते या फुलांची चांगली वाढ होण्यासाठी ३० ते ३५ डिग्री सेन्टीग्रेड तापमान लागते. या झाडाला अतिथंड वातावरण सहन होत नाही.
मोगऱ्याचे काही प्रकार ( types of mogra ) (jasmine flower information in marathi)
मदन मोगरा ( madan mogra flower information in marathi )
मदन मोगरा हि भारतीय फुलाची जात आहे आणि हे फुल तारका सारखे दिसते तसेच हे फुल दुहेरी असते म्हणजेच एकावर दुसरे फुल अशी या फुलाची रचना असते म्हणून या फुलाला ‘डबल मोगरा’ असेही म्हणतात . या फुलाला १२ ते १४ पाकळ्य असतात आणि हे सुवासिक फुल पांढऱ्या रंगाचे असते. या फुलाचे वैज्ञानीक नाव जास्मिनम समबक वार (jasminum sambac var) असे आहे.
वनमल्लिका मोगरा ( vanmallika mogra flower information in marathi )
वनमल्लिका या फुलाचे वैज्ञानीक नाव जास्मिनम अॅन्गुलर (jasminum angulare) असे आहे. हि फुले अतंत्य सुवासिक आणि पांढऱ्या रंगाची असतात आणि या फुलाला ६ पाकळ्या असतात. हि फुले शरद ऋतूमध्ये बहरतात.
मोतिया मोगरा ( motia mogra flower information in marathi )
मोतिया ह्या फुलाचा रंग पांढरा असतो आणि या फुलाला ६ ते ७ पाकळ्या असतात तसेच या फुलाच्या कळ्या गोल असतात आणि हे फुल हि सुवासिक असते. ह्या फुलाचे झुडूप सदाहरित असल्यामुळे या फुलाच्या झाडाची पाने गळत नाहीत त्याचबरोबर या झाडाला मोठ्या प्रमाणात फुले लागतात. या फुलांचा वापर चीनमध्ये चहासाठी आणि सुगंधित अत्तरे बनवण्यासाठी केला जातो. मोतिया या फुलाला बेला या नावानेही ओळखले जाते.
अरबी मोगरा ( arabi mogra flower information in marathi )
या फुलाला बत मोगरा किवा बत्तीस मोगरा या नावाने ओळखले जाते. या फुलाचा रंग पांढरा असतो आणि त्याला साधारण गुलाबी शेड असतो. या फुलाला जास्त पाकळ्या असतात आणि हे फुल दिसायलाही खूप आकर्षक असते आणि या फुलाचा सुगंध हि खूप चं असतो. ह्या फुलाचा वापर हार करण्यासाठी किवा गजरा करण्यासाठी केला जातो. या फुलाला तमिळमध्ये अडूक्कू माली असे म्हणतात.
tulip flower information in marathi
मोगऱ्याबद्दल काही अनोखी आणि मनोरंजक तथ्ये ( interesting facts about mogra flower )
- मोगऱ्याच्या फुलाचे उंची ६ ते ११ इंचापर्यंत वाढते.
- मोगऱ्याचे झाड हे सदाहरित झाड आहे.
- मोगऱ्याला संस्कृत मध्ये ‘मालती’ म्हणतात.
- लॅटीनमध्ये या फुलाला जॅस्मिन म्हणतात.
- या फुलाला हिंदीमध्ये ‘चमेली’ म्हणतात.
- या फुलाचे वैज्ञानीक नाव जास्मिनम समबक (jasminum sambac) असे आहे आणि हे फुल ओलीसि (Oleaceae) कुळातील आहे.
- हे फुल अतिशय सुगंधीत आहे.
- हे फुल फिलीपायीन्स देशाचे राष्ट्रीय फुल आहे.
- हे फुल भारत, भुतान, एशिया, पाकिस्तान आणि इतर काही देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.
- या फुलाचा वापर चहासाठी किवा अत्तरे बनवण्यासाठी केला जातो.
- या फुलांचा शक्यतो गजराच केला जातो आणि हा गजरा महिला केसामध्ये माळतात.
- ह्या फुलांचा शक्यतो पांढराच रंग असतो आणि हि फुले वर्षभर लागतात.
मोगऱ्याचा उपयोग ( use of mogra )
- मोगरा या फुलाचा उपयोग अरोमा थेरपी करण्यासाठी केला जातो कारण मोगऱ्याच्या सुगंधामुळे मनाला शांती मिळते आणि उत्साह मिळतो.
- या फुलांचा उपयोग अत्तरे, सुवासिक साबण, अगरबत्ती, सुगंधित धूप तसेच सुगंधीत मेणबत्या तयार करण्यासाठी होतो.
- जर आपण मोगऱ्याची फुले किवा कळ्या घालून चहा पिला तर त्याचा उपयोग कॅन्सर पासून बचाव होण्यासाठी होतो.
- तसेच मोगऱ्याचा चहा तापावर, मूत्ररोग किवा इन्फेक्शनवर गुणकारक आहे.
- जर आपल्याला सर्दी झाली असेल तर मोगऱ्याचा सुगंध दिवसभर घेतला तर सर्दी कमी होते.
- उन्हाळ्यामध्ये डोळ्यांना रखरख वाटत असेल तर हि फुले ४ ते ५ फुले पाण्यामध्ये बुडवून ५ मिनिटासाठी डोळ्यावर ठेवावीत डोळे लगेच शांत होतील.
- मोगऱ्याच्या सुकलेल्या फुलापासून द्रवयुक्त सेंद्रिय खत बनवले जाते जे शेतीसाठी उपयुक्त असते.
- मोगऱ्याच्या पानांचा लेप जखमेवर किवा खरुजवर लावला तर लगेच
मोगऱ्याचे केसांसाठी आणि त्वचेसाठी होणारे उपयोग ( use of mogra for hair and skin )
- चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग जर कमी करायचे असतील तर मोगऱ्याच्या तेल routine care म्हणून लावावे त्यामुळे चेहरा मऊ होईल आणि सुरकुत्या हि कमी होतील.
- आपण मोगऱ्याचा वापर skin toner म्हणूनही करू शकतो.
- कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवायची असेल तर मोगऱ्याच्या तेलाचा वापर करावा.
- मोगऱ्याच्या फुलांचा रस कडून तो रस केसाचा मसाज करण्यासाठी किवा सिरम म्हणूनही वापरू शकता.
- जर आपण रोज अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये मोगऱ्याच्या तेलाचे थेंब टाकले तर अंगाची दुर्गंधी येत नाही.
- मोगऱ्याची फुले टाकलेल्या पाण्याचा उपयोग आपण conditioner म्हणूनही करू शकतो.
मोगऱ्याचे झाड कसे लावावे ( how to plant mogra )
- मोगऱ्याचे झाड हे शक्यतो नोव्हेंबर मध्येच लावावे.
- जर झाड जमिनीवर लावायचे असेल तर १६ इंचाचा खड्डा खणावा लागतो आणि जर कुंडी मध्ये लावायचा असेल तर १४ इंचापेक्षा जास्त खोल कुंडी घ्यावी लागते.
- त्यानंतर त्यामध्ये चिकनमाती घाला त्यानंतर त्यात मोगऱ्याचे रोप ६ इंचापर्यंत आत खवयाचे आणि मग त्याला पाणि आणि थोडेसे शेणखत घालायचे.
- हे झाड जेथे सूर्यप्रकाश आहे तिथे ठेवले तर ते चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होईल.
मोगऱ्यावर आढळणारे रोग व कीड
या फुलांवर भुरी हा रोग येतो तसेच पाने खाणार्या किवा काळ्या पोखरणाऱ्या अळ्या होतात त्याचबरोबर या झाडांवर मावा हि होवू शकतो.
उपाय :- जर झाडावर कीड किवा बुरशी आली असेल तर पाण्यामध्ये विरघळणाऱ्या गंधकाची फवारणी करावी. मावा आणि अळी असेल तर एन्डोसल्फॉन चा वापर करावा. भुरी या रोगासाठी डीनोकॅप चा वापर करावा.
मोगऱ्याच्या झाडाची काळजी कशी घ्यावी
- फेब्रुवारी मध्ये या झाडांची अर्ध्या भागापर्यंत छाटणी केली पाहिजे.
- उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या झाडांना खूप पाणि दिले पाहिजे.
- फेब्रुवारी मध्ये मोगऱ्याच्या झाडाच्या मुलावर माती आणि शेणखत घातले पाहिजे.
- या झाडांना कमीत कमी ५ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा सुंदर असे दिसणारे मोगरा फुल व त्याचे प्रकार किती आहेत तो कसा लावावा व तोडावा. mogra information in marathi / jasmine flower information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही पफ्फिन या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट