Momos Recipe in Marathi मोमोज रेसिपी मराठी सध्या खूप चर्चेत असणारा आणि सतत खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मोमोज. मोमोज हा एक नाश्त्याचा प्रकार असून हा भारतामधील लोकांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक बनला आहे. जसे आपण उकडीचे मोदक बनवतो त्या पध्दतीनेच मोमोज बनवले जातात परंतु उकडीचे मोदक हे गोड असतात आणि मोमोज मध्ये तिखट वेगवेगळ्या आपल्या आवडत्या भाज्यांचे सारण भरलेले असते आणि ते उकडून सॉस किंवा शेजवान चटणी सोबत सर्व्ह केले जातात. मोमोज हा पदार्थ जरी तिबेटीयन असला तरी हा पदार्थ सिक्कीम, दार्जीलिंग, नेपाळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनवला जातो.
तसेच भारतामध्ये हा पदार्थ इतर ठिकाणी देखील आवडीने बनवला जातो आणि खाल्ला देखील जातो. मोमोज हा पदार्थ उकडीच्या मोदक बनवण्याच्या पध्दतीने बनवला जातो त्यामुळे हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये अगदी उत्तम बनतो. चला तर आता आपण या लेखामध्ये मोमोज रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
मोमोज रेसिपी मराठी – Momos Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ४० मिनिटे |
पाककृती | तिबेटीयन |
बनवण्याची पद्धत | सोपी |
मोमोज हि रेसिपी कुठली आहे आणि मोमो हा शब्द कोठून आला आहे ?
मोमोज या पदार्थाची पाककृती हि तिबेटीयन आहे आणि हा पदार्थ तिबेट तसेच सिक्कीम, दार्जीलिंग, नेपाळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जातो तसेच देशाच्या इतर भागामध्ये देखील हा पदार्थ आवडीने बनवला जातो. या पदार्थाचे नाव मोमो ह्या चीनी शब्दावरून पडले आहे. पण आपल्याला या पदार्थाचे नाव ऐकले कि वाटते हा पदार्थ चायनीज आहे. परंतु हा पदार्थ चायनीज नाही तर तिबेटीयन आहे. आणि फक्त या पदार्थाचे नाव चायनीज शब्द कोशातून आले आहे.
मोमोज म्हणजे काय ?
जसे आपण उकडीचे मोदक बनवतो त्या पध्दतीनेच मोमोज बनवले जातात परंतु उकडीचे मोदक हे गोड असतात आणि मोमोज मध्ये तिखट वेगवेगळ्या आपल्या आवडत्या भाज्यांचे सारण भरलेले असते. हे भाज्या घालून बनवलेले मोमोज आपण शेजवान चटणी बरोबर खावू शकतो.
मोमोज रेसिपी – veg momos recipe in marathi
मोमोज हि तिबेटीयन रेसिपी आपण नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स टाईमला खाण्यासाठी बनवू शकतो. मोमोज रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे कारण आपण जसे उकडीचे मोदक बनवतो त्या पद्धतीने हि रेसिपी देखील बनवावी लागते पण यामध्ये गोड सारण भरण्याऐवजी तिखट, भाज्यांचे सारण भरले जाते आणि ते उकडले जातात.
मोमोज हे आपण शक्यतो बाहेर हॉटेलमध्ये किंवा रस्त्यावर असणाऱ्या खाण्याच्या गाड्यांच्यावर ऑर्डर करतो आणि खातो परंतु आपल्याला घरामध्ये देखील बाहेरच्या मोमोज बनवता येतात आणि हे कमी वेळेमध्ये बनतात. चला तर मग मोमोज कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ४० मिनिटे |
पाककृती | तिबेटीयन |
बनवण्याची पद्धत | सोपी |
मोमोज बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळे सॉस लागतात आणि ते आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते तसेच मोमोज बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते त्यामधील काही साहित्य घरी उपलब्ध असते आणि काही साहित्य उपलब्ध नसते. पण मोमोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य बाजारामध्ये अगदी सहजपणे मिळू शकते. चला तर मग आता आपण मोमोज बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ वाटी कोबी ( खिसलेले ).
- १/२ वाटी गाजर ( खिसलेले ).
- १ हिरवी शिमला मिरची ( खिसलेली किंवा बारीक चिरलेली ).
- १ कांदा ( बारीक चिरलेला ).
- २ चमचे मटार.
- २ चमचे आले लसून पेस्ट.
- १ चमचा हिरवी मिरची पेस्ट.
- १ चमचा सोया सॉस.
- १/४ चमचा काळी मिरी पावडर.
- मीठ ( चवीनुसार ).
- १ चमचा तेल
पानांच्यासाठी लागणारे साहित्य
- २ वाटी मैदा .
- २ चमचे तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
आता आपण वर दिलेल्या साहित्यापासून मोमोज कसे बनवायचे ते पाहूयात.
- मोमोज बनवताना सर्वप्रथम एक मिक्सिंग बाऊल घ्यावा आणि त्यामध्ये मैदा, तेल आणि चवीनुसार मीठ घालावे आणि ते मिक्स करावे मग त्या मिश्रणामध्ये लागेल तेवढे पाणी घाला आणि ते पीठ मऊसर मळून घ्या.
- आणि या पिठावर झाकण लावून ते १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवा आणि त्यामध्ये एक चमचा तेला घाला. तेल गरम झाले कि त्यामध्ये आले – लसून पेस्ट, कांदा आणि मिरची पेस्ट घाला आणि १ मिनिट भाजून घ्या. आता यामध्ये चिरून आणि खिसून ठेवलेल्या सर्व भाज्या घाला जसे कि गाजर, कोबी, शिमला मिरची आणि मटार आणि ते ६ ते ७ मिनिटासाठी भाजून घ्या. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून भाज्या आणि २ मिनिटे भाजा.
- आता गॅस बंद करा आणि हे सारण थोडा वेळ गार होऊ द्या. मग त्यामध्ये सोया सॉस आणि काळी मिरी पावडर घाला आणि मिक्स करा.
- आता तयार करून ठेवलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि त्या गोळ्यांना तेल लावून ते लाटून घ्या म्हणजेच त्याची लहान लहान गोलाकार पाने लाटून घ्या.
- मग त्यामध्ये १ किंवा २ चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार किंवा पानाच्या आकारावर त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेले सारण भरून घ्या आणि त्या पानाला निऱ्या पाडून त्याच्या पाकळ्या बनवा किंवा मोमोज बनवा.
- जर तुम्ही मोमोज उकडण्यासाठी इडली पात्राचा वापर करत असाल तर इडली पात्रामध्ये थोडे पाणी घाला आणि इडलीच्या प्लेटला तेल लावून त्यावर मोमोज ठेवून त्याला झाकण घालून ते उकडण्यासाठी गॅसवर ठेवा.
- आणि हे मोमोज ७ ते ८ मिनिटे उकडून घ्या.
- ७ ते ८ मिनिटांनी किंवा मोमोज पूर्णपणे उकडल्यानंतर गॅस बंद करून घ्या आणि थोड्या वेळाने ते मोमोज बाजूला काढून घ्या. मोमोज खाण्यासाठी तयार आहेत.
- मोमोज गरमागरम सॉस सोबत किंवा शेजवान चटणी सोबत सर्व्ह करा.
मोमोज कश्यासोबत खाल्ले जातात – serving suggestion
- मोमोज आपण शेजवान चटणी, टोमॅटो सॉस किंवा रेड चिली सॉस सोबत खाल्ली जावू शकते.
टिप्स (Tips)
- मोमोज आपण उकडण्याऐवजी तेलामध्ये तळू शकतो.
- आपण मोमोजचे सारण बनवतो त्यामध्ये आपण आपल्या आवडीच्या भाज्या घालून सारण बनवू शकतो आणि एखादी भाजी आपल्याला आवडत नसेल तर ती त्या सारणामध्ये वापरली नाही तरी चालते.
- सारणामध्ये पनीर देखील घालू शकता.
आम्ही दिलेल्या momos recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मोमोज रेसिपी मराठी माहिती fried momos recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या veg momos recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि momos recipe in marathi video माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये momos meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट